अमेरीकेतील एक अड्चणः-मदतीचा सल्ला हवा आहे.

Submitted by pinkswan on 12 February, 2009 - 18:02

नमस्कार ,
मी ईथे नवीन आहे. आम्ही व्हर्जिनिया मधे काही महिन्यापूर्वी आलो. जानेवारी मधे आम्हि ईथे एक (used)कार विकत घेतली. पण आम्ही फसलो . या कारचे लोन न पे करताच त्या व्यक्तिने आम्हाला कार विकलि. आता ति व्यक्ति पण युएस सोडुन गेलि आहे. या बाब तित आम्हि काय करु शकतो ?हे कोनि सान्गेल का प्लिज.
१. आम्ही पुलिस कम्प्लेंट करायचा प्रयत्न पण केला.पण ते म्हनतात कि हा काहि क्राईम नाहि,आम्हि रिपोर्ट नाहि घेवु शकत. तुम्हि कोर्ट थ्रु जा.(lawyer through)
पण या बाब् तित आम्हाला काहि माहिति नाहि. आपल्या पैकि कोनाला वकिल्,त्याचि फी ,आनि कोर्ट प्रोसिजर( in verginia only) याबद्दल काहि माहिति असेल तर ईथे सान्गाल का प्लिज?
आगाऊ धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कारचे लोन न पे करताच त्या व्यक्तिने आम्हाला कार विकलि. >> माझ्या माहितीप्रमाणे गाडीवर लोन असेल तर मुळ टायटल बँकेकडे असते. तुम्ही गाडी घेतली तेव्हा त्या व्यक्तीने तुम्हाला कुठले टायटल दिले? आणी तुम्ही गाडी रजिस्टर केलीत कशी?

expertlaw.com वर काहि मदत मिळते का पहा . ह्या साईट वर तुम्हि तुमचा प्रोब्लेम लिहु शकतात पण b careful while giving personal info. इथे काहि सल्ले व माहिति नक्किच मिळेल.... Hope तुमचा प्रोब्लेम लवकर सुटेल. All the Best

धन्यवाद तुमच्या सुचने बद्द्ल,
गाडीचे टायट्ल सध्या आमच्या नावावर आहे.
डि एम व्हि ने टायट्ल दिले पण दुसर्‍यादिवशी फोन आला कि आम्हि तुमचे रेजिस्ट्रेशन (void) करत आहोत .आणि lein release letter द्या असे सांगितले आहे.सध्याचे आम् चे रेजिस्ट्रेशन
१ वर्श व्हॅलिड आहे. पण त्यानंतर आम्हि ते रिन्यू नाहि करु शकत. आणि कार हि विकू नाहि शकत.

लेंडर कम्पनी या बाब् तित काहिच हेल्प करत नाहि. (we asked them to any option as negotiate d loan n we 'll pay it off,but they r not providing any options)ते म्हनतात कि आम्हि कार परत घेवु.
पण हे सर्व झाले तरी एक हे कि, आमची काही चुकि नसताना हे सर्व आम् च्या (record ) वर जाईल का? याचे पण एक टेन्श् न आहे.
या बाब् तित काहि सांगाल का प्लिज?

सगळ्यात प्रथम टेन्शन घेऊ नका कारण तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून दिसते आहे की तुमची काही चूक नाही.

१. जर कर्ज तुमच्या नावावर नसेल तर कर्ज देणारी कंपनी तुमच्या नावावर काही करू शकत नाहि (मी कायदेतज्ञ नाहि) अर्थात तुम्ही सगळे कर्ज तुमच्या डोक्यावर घेऊ असे कुठे लिहून दिले नसेल तर.

२. जवळ जवळ ९०% वकील पहिली ३० मिनिटे तुमच्याशी फुकट बोलायला तयार असतात. आधी फोनवरून असे ठरवता येते. Consumer law, lemon law या गोष्टींशी निगडीत २-३ वकिलांचा फुकट सल्ला जरूर घ्या. (तो पहिला सल्ला फु़कट आहे हे confirm करून). खरे व्यावसायिक वकील असा सल्ला देण्यात उगीच कंजूसपणा करत नाहीत. (मला स्वतःला चांगला अनुभव आहे)

३. ९०% Law is about possestion. तुम्ही lending कंपनीला कार परत दिली तर कारपण गेली आणि तुमचे पैसेपण गेले (जे तुम्ही मूळ माणसाला दिले होते). असे होऊ देऊ नका. म्हणून तसे करायचे झाले तर तुमच्याकडे लेखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ती कुठली असावी हे वकील चांगले सांगू शकेल.

नात्याला पडलेले प्रश्नच मलाही आहेत.
१. विकणार्‍या माणसाने तुम्हाला मूळ(ओरिजनल) टायटल कस दिल? गाडीच लोन फिटले नसेल तर ते कागद्पत्र बँकेच्या ताब्यात असतात.
२. जर तुम्हाला टायट्ल कॉपी दिली असेल तर त्यावर lein holder म्हणुन बँकेच नाव नाही का?

आशि,नात्या,

हो, आम्हीहि त्यामुळेच फसलो.
त्या व्यक्तिकडे ओरिजिनल टायट्ल होते. त्यामुळे आम्हाला लोन चा काहि डाऊट नाहि आला. Sad
पण नंतर कळले कि हे नियम प्रत्येक लेंडर कम्पनी तसेच स्टेट नुसार वेग् वेगळे आहेत. ते टायटल होल्ड नाहि करत, त्यापैकि हि लेंडर कम्पनि आहे.

अजय,
धन्यवाद तुमच्या सल्ल्याबद्द्ल.
हो आम्हि असे काहि म्हट्ले नाहि,सगळे कर्ज आमच्या डोक्यावर घेऊ असे कुठे लिहून दिलेले नाहि,
तुम्हि म्हणता ते खरे आहे,पण त्या व्यक्तिने लोन पे नाहि केले तर आम्हि कार विकु नाहि शकत ना.

तुम्ही त्याला कार विकत घेताना पैसे दिले असणार. ते त्याने बँकेत कारलोन फेडायला भरायला हवे होते. तुमच्या एकूण सांगण्यावरून ही व्यक्ती तुमच्याकडून मिळालेले पैसे कर्ज फेडण्यात न घालवता खिशात टाकून युएस सोडून गेली. आता तुमचे पर्यायः
१) तुमचं त्याला कारसाठी केलेलं प्रूफ ऑफ पेमेंट बँक आणि पोलिस दोन्ही कडे दाखवा. ओरिजिनल लेंडर बँकची जबाबदारी आहे ह्या मूळ लोन घेणार्‍या माणसाला गाठायची. (ह्यात तुमचा सहभाग असण्याची गरज नाही).

२) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला ते टायटल स्वतःच्या नावावर करण्यासाठी 'बेटर बिजनेस ब्युरो' ला संपर्क करता येईल. कदाचित मदत मिळु शकेल. मनी मॅगझीन सारख्या मासिकांचे संपादक किंवा कॉलमिस्ट अश्या पर्सनल केसेस ना वाचा फोडून लागेल ती मदत करतात.

मनी मॅगझीन सारख्या मासिकांचे संपादक किंवा कॉलमिस्ट अश्या पर्सनल केसेस ना वाचा फोडून लागेल ती मदत करतात. >> अशीच मदत consumer magazine आणी लोकल TV channels पण करतात, तिथेहि प्रय्त्न करून बघू शकता.

अमेरिकेतून भारतात सामान (फर्निचर टीवी वेगेरे) कसे पाठवता येईल?
कोणाला माहिती असल्यास प्लीज़ सांगा..
धन्यवाद
राखी

लेंडर कंपनी सहसा तुम्हाला सहकार्य ही करणार नाही, कारण त्यात त्यांना काहीच फायदा नाही.... लोन आजुन फिटलेलं नाही त्या मुळे लेंडर चा गाडीवर पुर्ण हक्क असतो आणी ते लोन पेमेंट न केल्यास गाडी कायद्या प्रमाणे घेवुन जावु शकतात.....
ते लोन तुमच्या नावावर करता आलं तर कमीत कमी गाडी तुमच्या कडे राहील आणी लगेच तुम्हाला दुसर्‍या गाडीची तरतुद करावी लागणार नाही... हे पण तसं अवघड आहे, कारण की बँक (लेंडर) सहसा एक व्यक्तीच्या नावावर असलेलं अनपेड लोन दुसर्‍या च्या नावावर करत नाहीत....
इथे केस ला वाचा फोडुन काही हाती लागेल असं दिसत नाही, एक मात्र आहे, तुम्ही जर आतापुरती काही तुम्हाला जास्त खर्चात न पाडणारी अरेंजमेन्ट जर केली तर तुम्हाला हातात थोडा वेळ मिळेल.. आणी वेळ मिळाला तर त्या माणसाला शोधता येइल. हे अशा करता, कारण इथे बसुन वकील कायदेशीर केस करुन भारतात त्या माणसाच्या नावी वॉरंट काढु शकतात.... त्याला पैसे भरावे लागतील... थोडे फार वकिलाचे पैसे जातील पण उशीरा का होइना पण तुमचे पैसे मात्र नक्की परत मिळतील... माझ्या ओळखीच्या एका वकिलाने(अमेरिकेतुन) अस करुन सगळे पैसे परत मिळवुन दिलेले आहेत... चांगला वकिल शोधा......
तुम्हाला माझ्या ओळखीच्या (वर दिलेल्या) वकिलाची माहिती हवी असल्यास सांगा.... माझा फोन नं ९१४-५८२-००९८

नमस्कार naynishv ,
धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्द्ल.
केस करण्या बाबत....
माबो वरीलच काहि मंडलिन्चे असे मत आले कि वकिल/कोर्ट वगैरे मधे अजुन जास्त पैसे जातील.
म्हणजे असे नको व्हायला कि, कार चे दिलेले पैसे परत मिळवन्याकरता पुन्हा तितकेच पैसे घाला. किंवा त्यापेक्षा जास्त...
तुम्ही सान्गु शकता का साधारण किति खर्च येईल ते?
मग आम्हाला निर्णय घेणे सोपे होइल.
मुख्य म्हणजे आम्हाला पैसे परत घेण्यापेक्षा कार चे लोन क्लिअर करुन 'नावावर ' करुन घेणे गरजेचे आहे.कारण आम्हाला पण लवकरच परत जायचे आहे. म्हणजे आम्हि जाताना ति विकु शकेन.

नमस्कार मंडळी,
naynishv,asami ,Mrinmayee,aashi,ajay,naatyaa,sas ...
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद,
अजुन समस्या सुट्ली नाहि,तरी तुम्हा लोकांच्या प्रतिसादामुळे थोडा ताण कमी झाला.
काही नवीन माहिती मिळालि.

naynishv तुमच्य सोयिचि वेळ कळवलित तर मि फोन करु शकेन.

पुन्हा सर्वान्चे आभार. Happy

आम्ही एका अपार्टमेन्ट मध्ये भाडेतत्वावर राहात आहोत्.गेल्या आठवड्यात आमच्या अपार्ट्मेन्ट मधल्या डीशवॉशर मधून दरवाज्यातून पाणी गळत होते,म्हणून आम्ही लिजिन्ग ओफिस मध्ये तक्रार केली.
वास्त्वीक पाहता,आम्ही या अपार्टमेन्ट मधे यायच्या कितितरी अधीचा जूना तो डिशवॉशर असेल्.त्यामुळे वापराने त्याचे दरवाज्याचे रबर गास्केट सैल /खराब झालेले असेल. तर त्या मेनटेनन्स च्या माणसानी पूर्ण डिशवॉशर रिप्लेस केला,म्हणाला की आम्हि जुना नन्तर अमच्या गोडाउन मधे दुरुस्त करू.
तर मला हा प्रश्न पडला आहे की हे लोक आमच्याकडे ह्या डिश वॉशर चे पैस मागतील का???
प्लिज मला सान्गा......

आमच्याकडे ह्या डिश वॉशर चे पैस मागतील का??? >> नाही. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांना दुरुस्त करणे हे नविन घेण्यापेक्षा महाग पडते म्हणुन त्यांनी सरळ बदलुन टाकला असावा.

माझ्या माहीतीप्रमाणे ते नाही मागत. काही गोष्टी खराब होतात त्यांना त्याची कल्पना असते. माझ्या मागच्या अपार्टमेन्ट मध्ये असाच डीशवॉशर रिप्लेस केला होता. पैसे नाही मागितले.

नाही मागणार. appliances ची दुरुस्ती, बदलणे, दिवे, ट्यूबलाइटस बदलणे, प्लम्बिन्ग दुरुस्ती याबाबतीत पैसे लावत नाहीत. पण तुमच्या चुकीमुळे काही मोडतोड झाली तर घेतात. ब्लाइन्ड्स खराब झाल्या, कार्पेटवर डाग पडले तर ते रिप्लेस/क्लीन करायचे पैसे घेतात. काही वेळा अपार्टमेन्ट सोडून जाताना शेवटी ते क्लिनिन्ग चार्जेस डिपॉझिटमधून कापून घेतात.

तोषवी, साधारणपणे अशा दुरुस्तीचे बिल भाडेकरुला द्यावे लागत नाही. पण आपल्याला शंका असल्यास सरळ मॅनेजमेंट ऑफिसमधे फोन करून खात्री करून घ्यावी.