संपादित धागा

Submitted by अमेय२८०८०७ on 6 March, 2016 - 02:35

संपादित
संपादित
संपादित
संपादित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छान फुलवली आहेस. जे म्हणायचं आहे ते नेमकं कळतंय.
शेवटच्या पॅरा मध्ये अनुराधाची हळहळ अगदी थेट डोळ्यासमोर उभीच राहिली.

पुलेशु!

खुपच छान लिहिलयं..
उपकार हि खुप भयंकर गोष्ट वाटते मला.. समोर कधीही नकार देण्यातील मोठ्ठा अडथळा..
पुलेशु

आवडली

बोनाफाईड सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ घातली जाते ती शाळेतील ऑफिसच्या क्लार्ककडून (कथेत चव्हाणबाईंचा उल्लेख आलेला आहेच...). त्यानी तयार केलेल्या त्या प्रमाणपत्रावर अनुराधा मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सही करणार. जनरल रजिस्टरमध्ये नोंद केलेली तारीख आणि सर्टिफिकेटवर क्लार्कने नोंदविलेली तारीख अचूक असल्याची खात्री शाळेचे हेड क्लार्क करतात. शिक्क्याखाली त्यांची इनिशीअल्स उमटविली जातात आणि मगच मुख्याध्यापिका यांच्याकडे अंतिम सहीसाठी ते बुक ठेवले जाते. हा शाळेचा नव्हे तर राज्य शिक्षण खात्याचा नियम असल्याने केवळ आले सहीला प्रमाणपत्र म्हणून केली बाईंनी सही हा प्रकार सहसा घडत नाही. चुकीच्या नोंदी उघडकीला आल्या तर पहिल्यांदा त्या क्लार्कला सस्पेन्शनची ऑर्डर मिळते; नंतर हेड क्लार्क यांची चौकशी....कारण कायद्याच्या भाषेत हेड क्लार्क यानी केलेली आद्याक्षरे पाहून मुख्याध्यापिकानी सही करायची असते.

एका चांगल्या कथेतील हा दुवा काहीसा त्रासदायक आणि न पटणारा वाटला. उपकाराच्या ओझ्याखाली असलेल्या अनुराधाबाईनी मिसाळ यांच्या मुलाला दाखला दिला हे ठीक. पण आता अपघातानंतर पोलिसांची जी काही रीतसर चौकशी होईल तिची सुरुवात त्या मुलाच्या लायसन्सपासून होईल....त्या त्रुटी आढळल्या की मग त्या कशामुळे याची चौकशी होते.

अमेय पंडित यानी फोन रिंग आवाजाच्या पार्श्वभूमीवर कथा थांबविली हे चांगले केले

मामा, उपकाराच्या ओझ्याखाली आणि विद्यार्थ्यावरील प्रेमापोटी अनुराधाकडून प्रमाणपत्र जारी करण्याची योग्य प्रक्रिया राबवण्यात चूक झाली आहे
(म्हणून तर कथा झाली ना!)

कथेत दाखवल्यासारख्या खाजगी शाळेत मुख्याध्यापकाला हवे तसे प्रमाणपत्र देण्याइतका अधिकार नक्की असतो (एका अशा शाळेचा व्यवहार मी जवळून पाहिला आहे).

बाकी पुढची चौकशी, नंतर क्लार्कचे काय होईल वगैरे कथेसाठी 'औट ऑफ सिलॅबस' आहे (pun intended) Happy

मस्त, आवडली कथा.

कथेचं नाव आणि मिसाळांचं वर्णन वाचल्यावर तो हॉस्पिटलचा सीन वाचत असताना इन्डिसेन्ट प्रपोजल सारखी कथा आहे की काय असं वाटलं. तुमच्याकडून अशी इतकी सरळ-सरळ कॉपी होणार नाही असं पण वाटलं म्हणून नेटानं वाचली Happy

अमेय....

~ कथेचे नाव आहे "किंमत". याचा अर्थच असा की कुणाला तरी ती चुकती करावी लागणार आहे...वस्तूसाठी वा एखाद्या कृत्यासाठी. कृत्य आले म्हणजेच मुद्दा समोर येतो तो तत्त्वाचा....त्याच्या महतेचा आणि ते पाळणे जबाबदारीचा. अनुराधा उपकाराच्या ओझ्याखाली आहे हे तर लेखकाने मजकुराद्वारे वाचकाच्या मनावर बिंबविले आहेच छानपैकी पण त्याचबरोबर तिने मुख्याध्यापिका पदापर्यंत माजलेली मजल आपल्या अंगभूत गुणांनी मिळविलेली असणार आणि संस्थेने ते मान्य केले आहे, हे तर उघडच. अशावेळी खाजगी जीवनातील एका घटनेबाबत मिसाळ नामक व्यक्तीने केलेल्या मदतीचे उपकार मनात ठासलेले आहेत म्हणून त्या ओझ्यातून (ओझे असतेच अशा उपकारांचे) काहीसे मुक्त व्हावे म्हणून खोटे प्रमाणपत्र देणे ही जर "किंमत" असेल तर त्याचे उत्तरदायित्व बाईंनी घेण्याचे मान्य केले (आणि त्या करतील असे त्यांच्या स्वभाव वर्णनामुळे म्हणता येईल...) तरीही शेवटी शिक्षणक्षेत्रातील कायद्याच्या भाषेत त्या चव्हाणबाई प्रथम दोषी ठरतात (सायकलस्वार त्या अपघातात जागेवरच मरण पावला आहे, हे लेखकानेच सांगितले असल्याने, त्या संदर्भातील पोलिस कारवाई अटळ आहेच आहे, हे तुम्हीही मान्य करालच). क्लार्कनी तो खोटा दाखला "तयार" केला आहे बाईंच्या सांगण्यावरून हे तर उघडच आहे. किंमतीचा मुद्दा ऐरणीवर येवो वा ना येवो, कायद्याच्या कागदावरून त्याची किंमत अनुराधाबाई नव्हेत तर चव्हाणबाई चुकती करणार....आणि हे क्लेशदायक.

".... बाकी पुढची चौकशी, नंतर क्लार्कचे काय होईल वगैरे कथेसाठी 'औट ऑफ सिलॅबस' आहे...' ~ हे तुमचे वाक्य पळवाटीचे आहे अमेय. कथा बांधताना सिलॅबसशी नाळ सोडता येऊ नये इतकेच मी म्हणेन.

सिंडरेला.. अगदी मलाही Indecent Proposal ची आठवण आली
पण अगदी वेगळंच वळण लागलेलं पाहून बरं वाटलं.. छान रंगवली आहे कथा.
पण अशोक जींनी म्हटल्याप्रमाणे अनुराधाला किंमत चुकवावी लागणारे नक्कीच..

पळवाट नक्कीच नाही मामा. मिसाळ मोठी व्यक्ती आहे, कदाचित प्रकरण चौकशीपर्यंत पोचणारच नाही त्यामुळे कोणाला कायदेशीर शिक्षा होणारही नाही. बडी धेंडे गुंतली असतील तर कायदा गाढव ठरतो याची अनंत उदाहरणे आहेत.
पण उपकारांची एका दृष्टीने परतफेड करायला जाताना हातून भयंकर चूक झाली आहे आणि मिसाळांनी आधी केलेल्या मदतीमुळे त्या चुकीची कुठेही कबुली देणे शक्य नाही या गिल्टचे ओझे तिला आयुष्यभर वागवायचे आहे.
हीच तिने मोजलेली किंमत आहे आणि कथेचा परिपाक.

मी काढलेला अर्थ-

पोलिसांची प्राथमिक चौकशीच सध्या चालू आहे. आणि carpe diem एवढीच अक्षरे कोरलेली पाटी मिळाली आहे.
आता ती पाटी कुणाच्या गाडीवर याची माहिती काहीच जणांना आहे.
तेव्हा कथानायिका हे सहज पोलिसांना सांगू शकते की ही पाटी अमुक मुलाच्या गाडीवरची आहे.

हे तिने करावे की नाही हा मूळात मुख्य प्रश्न आहे.
गाडीने सायकलस्वाराला उडवून पळ काढलेला असेल तर वय लहान असो वा मोठे, शिक्षा तर होऊच शकते.लायसंस का दिलं, वय का चुकीचं लिहीलं ही ड्रायव्हर आणि कार कोणती हे कळाल्यावरचा चौकशी झाल्यास पुढचा प्रश्न.

मूळ प्रश्न अनुने स्वतः फोन करून पोलिसांना ती नंबरप्लेट अमुक मुलाच्या गाडीवरची आहे हे सांगावे की नाही हा आहे.

"...बडी धेंडे गुंतली असतील तर कायदा गाढव ठरतो...."

~ मान्यच; पण म्हणून कायदे अस्तित्त्वाच असू नयेत असे कुणीही म्हणणार नाही. सायकलस्वाराच्या मृत्यूमुळे "फाईल" तर तयार होणारच. तिथे जबाबदारीच्या घटकांची यादी करताना तुम्ही म्हणता (मी म्हणत नाही...) तशी बडी धेंडे सुटतीलही पण त्यांच्याऐवजी चुलवाणात शेंगदाणे फुटाणे बळी पडतात, हे मी पाहिले आहे. या क्षेत्रात मी काम करत होतो हे तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही जाणू शकाल की अशा अनेकविध केसीस मी पाहिल्या आहेत आणि वेतनवाढ रोखणे (ही तर सर्वमान्य दंडकाची बाब असते...), पदोन्नती नाकारणे या पासून निलंबनापर्यंतच्या घटनांचा मी साक्षीदार आहे. खाजगी शाळा हा प्रकार जरी असला तर त्याना टक्केवारीनुसार वेतन आणि वेतनेतर अनुदान शासनाकडून मिळत असल्याने शिक्षणसंस्थेत संबंधितांवर गुन्हे आणि तत्सम संदर्भात अनेक कारवाया करणे हा तर कार्यालयीन बाबीचा प्रकार असतो.

गिल्टचे ओझे आयुष्यभर अनुराधाने वागवावे असे लेखक म्हणून तुम्ही म्हणत आहात....एकप्रकारे चुकीची किंमत मोजावी लागणार आहे तिला, हाच जर कथेचा परिपाक असेल तर त्या अनुषंगाने गिल्ट न करताही अन्य निर्दोष व्यक्तीही त्या चरकात पिचत राहतील हे दृश्य काहीसे टोचणी देणारे राहील....लेखकासाठीही.

.