& शांताराम त्याचा गावी येऊन पोचला . मुलगा झाला याचा आनंद बायकोला कधी एकदा बोलून दाखवतो & कधी त्याला पाहतो अस त्याला झाल होत.
आपल्या घरी पोचन्याआधी जी काही घरे वाटेत लागत होती त्यांच अभिनंदन घेऊन तो पावल टाकतच होता.
घरी पोचन्याआधी काही मानस त्याला भेटली त्यानी मात्र अभिनंदनबरोबर अजूनही काही संगितल की तुझी बायको बाळ झाल्यानंतर खुपच चिडचीडी झाली आहे फारसा हल्ली कोणी
गावातल घरीही जात नाही त्यामुळे. शांतारामला वाटल अस होन साहजिक आहे जनिने हे सगळ एकटीने सहन केल त्यामुळे चिडचिड वाढली असेल तिची.
आता आपण तिची खूप काळजी घेऊ & बाळाची ही .
शांताराम घरी आला त्यालाही थोडा जाणवली तिची चिडचिड. पण त्याने दुर्लक्ष केल & थोड्या वेळाने तीही चांगली वागायला लागली.
घरात कोणी नसल्यामुळे फारस सामान भरलेल नवत. याला वाटल आता आपण आलोय घरात सर्व काही भरून जनिला खूप खायला प्यायला घालू म्हणजे बालही छान होईल.
म्हणून तो वाण्याकडे गेला सगळ सामना आनल एवढ्या दिवसाता जनिने सर्व काम करायला सुरवात केली पण होती शांताराम तिला म्हणालाही की अस लगेच काम करू नको.
अजुन थोडा आराम कर. पण जनी म्हणाली की नाही मी ठीक आहे & तुम्ही इतक्या दिवसानी आलात तर तुम्चीच आराम करा.
एवढ्या लवकर सगळ सावरल्यामुळे शांतरमला आनंद झालाच पण आचर्य ही वाटल .
असाच बाळाशी खेळण्यात एक आठवडा निघून गेला तशी याची सुट्टी अजुन बरीच बाकी होती.
एका आठवड्यात च जनी म्हणाली धनी घरी सामान भरायला हॅव . तो म्हणाला आतच तर भरल होत इतक्यात संपल देखील.
ती म्हणाली 'धनी बाळ आता दूध पितो आपण आता तिघ आहोत सामान जास्त लागणरच' , तसा शांतारामने वाण्याच्या दुकानातून समान आणून टाकला.
अस पुन्हा 3च दिवसात समान संपल & तो वाण्याकडे गेला तर वाणी त्याला म्हणाला 'शांताराम इतके दिवस बघतोय बोलेन बोलेन म्हणतो पण म्हटल राहुडे आज विचारतोच '
"अरे तुझ्यघरी हल्ली सामान खूपच लवकर संपत . बाळ झाल म्हणून काय झाल अरे अस घर खाली होन तेही इतक्या लवकर हे बर लक्षण नव्हे तू एखाद्या जाणत्या माणसाला विचारून घे बघू."
हे ऐकल्यावर शांतारांच्या मनातही चक्र फिरू लगाल त्याने ठरवल की बाळाच्या & जनिच्या भल्यासाठी गावातल्या संपत ज्योतिशकडे जायाच & याच्या मगच कारण शोधयच .
त्याच संध्याकाळी तो संपत ज्योतिशकडे जातो जनिला उगीच चिंता नको म्हणून तो तिला काहीच सांगत नाही. संपत हा काही शांतरमाला आताच ओळखत नवता तो त्याच्या आई वडीलापासून सर्वाना
ओळखत होता. शांतारामने जाताच नमस्कार केला 'नमस्कार संपत काका' . संपत ज्योतिषी हा तिथल्या चार गावातील प्रसिद्द्ध अशी व्यक्ती होती. चेहर बघून घरात किवा त्या माणसाच्या आयुष्यात काय घडताय अस सांगणारा ज्योतिषी. शांतारामाला बघताच त्याच्या चेहरयवर वेगळेच भाव उमटले पण त्याने शांतराला काहीही कळू दिल नाही . पण शांतारामाला मात्र शंका आलीच मग त्याने मूळ मूदयाला हात घातला
तो म्हणाला "संपत काका तुम्हाला तर माहीत असेलच जनिला नुकातच बाळ झाल आहे". काका म्हणाले, "अरे हो हो अभिनंदन, कस आहे बाळ "
शांतरम म्हणाला "बाळ उत्तम पण " पण ऐकताच आधीच असलेली शंका काकांची अजुन पक्की झाली. शांतारामनेही आपल्या घरी घडत असलेला सामान लवकर संपण्यच्या एक विचित्र प्रकार सांगितला.
काका थोडा वेळ अतिशय शांत मुद्रेत बसले & मग त्यानी त्याला विचारले की तू बाळ झाल्यावर कितव्या दिवशी इथे आलास?
तो म्हणाला की 5 व्या दिवशी साधारण. काकानी त्याला सांगितले की तू आता मी सांगतो तस कर आज घरी गेल्यापासून बायकोच्या प्रत्येक गोष्टीकडे लपून हळूच तिला कळू ना देता लक्ष दे & काहीही आढळल्यास कुठेही आधी बोलू नकोस & 2 दिवसानी मला भेट.
शांतरामला या सगळ्याची खूपच चिंता लागून राहिली होती कारण संपत काकांनी स्पष्ट अस काहीच संगितल नाही. तरी तो शांत चेहरयाने घरी गेला & ठरवून बायकोच्या हालचाळीवर लक्ष ठेवू लागला. रात्री त्याने जनी जेवण बनवत असताना एक फार विचित्र प्रकार बघितला जनीने उकळत्या वरणात चक्क हात घातलेला असतो. & ती ते हलवत होती. ते पाहून त्याचा चेहृयावर घाम फुटला पण त्याला संपत काकाचे शब्द आठवले की कुठेही बोलू नकोस . मग तो तसाच काहीही नं बोलता बाळाला घेऊन बाहेर आला पण लगेच्च बायकोने आवाज दिला की जेवायला चला नाही म्हणाव तर हिला संशय येईल म्हणून तो काहीच बोलला नाही. तसाच जेवायला बसला & रात्री झोपेच सॉँग घेऊन जानीवर लक्ष ठेवून होता. पुन्हा त्याला असा काही प्रकार दिसला की बस्स. त्याणे ठरवल उद्या सकाळीच जाऊन काकाला भेटायाच . सकाळी तसा लवकरच उठून तो तयार झाला & काकांकडे गेला & सर्वकाही सांगितले रात्री झालेला प्रकारही सांगितला की जनीने रात्री झोपण्याधी लांब हात करून कंदीळातली वाट खाऊन टाकली. हे सांगतनच शांतरमला रडू फुटला त्याला काहीच काळात नवत . काकानी त्याला शांत केल & सांगायला सुरूवात केली ते म्हणाले "आधी आपण बाळाला तिथून तिच्यपासून हलवूया नाहीतर तुझा बाळ काही राहायच नाही. " खुलासा करताना काका म्हणाले की घरात जी आहे ती तुझी बायको नाहीच मुली तो तिचा प्रेत आत्मा आहे. जनी त्याच दिवशी गेली ज्या दिवशी तिला बाळ झाल. बाळाच्या प्रेमापोटी तिचा आत्मा काही मुक्त झाला नाही. तिने स्वताच प्रेतही खाऊन टाकल. & फकत बाळासाठी ती तिथे वावरतेय ज्या क्षणी तुला कळलाय हे तिला कळेल ती बाळाला ही घेऊन जाईल. तेवा तू एक काम कर की उद्या बाळाला उद्या घेऊन इकडे ए बाकी सगळी तयारी मी करतो.
ठरल्यापारमाणे शांताराम बाळाला घेऊन गुपचुप निघून आला & संपत काकाच्या घरी ठेवून परत काकाबरोबर & गावाचे चार मोठे जाणकार माणसांबरोबर आपल्या घराकडे परततला .
काकांनी ठरल्या प्रमाणे सर्व तयारी करून घराला चारी बाजूणी मंत्राच कुंपण घालून ठेवल & जनीच्या प्रेत आत्म्याला कायमच मुक्त करण्यास्तही उपाय केले , शांतारामला घडल्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटल.
अस काही आपल्या बरोबरच का घडल याचाच तो विचार करत होता.......................
समाप्त..
छान
छान
बाळाच्या
बाळाच्या प्रेमापोटी तिचा आत्मा काही मुक्त झाला नाही. तिने स्वताच प्रेतही खाऊन टाकल. & फकत बाळासाठी ती तिथे वावरतेय ज्या क्षणी तुला कळलाय हे तिला कळेल ती बाळाला ही घेऊन जाईल.>>> ती बाळाला ही घेऊन जाईल - ये बात कुछ हजम नही हुई
तोच तोच
तोच तोच पणा वाटतोय. सगळेच भुत प्रेत असच लिहीत आहेत. काहीतरी वेगळ अपेक्षित होत. दम नाही कथेत ईतका.
खुपसे
खुपसे संदर्भ सुटलेत. अर्धवट वाटतेय कथा. अजुन फुलवता आली असती.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
दूर गावी
दूर गावी एका घरी -२ काय ??