Submitted by संयोजक on 29 February, 2016 - 12:36
वृत्तबद्ध कविता करणार्या समकालीन रचनाकरांमध्ये स्वामी निश्चलानंद यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने त्यांनी मायबोलीकरांसाठी काही वृत्तबद्ध कविता सादर केल्या आहेत.
वृत्तबद्ध कविता - भाग १
वृत्तबद्ध कविता - भाग २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा,मस्तच पुस्तकाची पाने
अरे वा,मस्तच
पुस्तकाची पाने उलटायची कल्पना आवडली
वंदन स्वामीजी,तुमचं हे
वंदन स्वामीजी,तुमचं हे सादरीकरण वृत्तबद्धतेवर आणि तंत्रावरही स्वामित्व सिद्ध करणारे. अनेकानेक प्राचीन वृत्ते अशा समकालीन आशयात समोर येतात तेव्हा प्रयोगशीलतेला प्रतिभा कधीच कमी पडत नाही हे नव्याने जाणवते. तुमच्या 'वृत्तबद्ध कविता ' या संग्रहात ही विविध वृत्ते वाचून माझ्यासारख्या अनेकांना वृत्तात लिहावंसं वाटलं.सामान्य परिचय म्हणून वृत्ताची फक्त लगावली देऊन तुम्ही वृत्तप्रांतातल्या काहीशा क्लिष्टतेला रजा दिली आहे हेही बरोबरच.
मंडळी भारती.. यांनी लिहिलेला
मंडळी भारती.. यांनी लिहिलेला हा लेख जरूर वाचा
‘वृत्तबद्ध वृत्ती' : स्वामी निश्चलानंद
http://www.maayboli.com/node/49030
हा उपक्रम खुप खुप आवडला. आज
हा उपक्रम खुप खुप आवडला.
आज सकाळी प्रवासात आधी अमेयचे कवितेचे प्रकार व वृत्ते यावरचे विवेचन आणि नंतर लगेच स्वामिजींची पहिली क्लिप ऐकली. अतिशय सुंदर.
शाळेत असताना व्याकरणात वृत्ते होती. ते यमातारा वगैरे कानावरुन गेलेले होते पण त्यानंतर कधी काहीच संबंध आला नाही. लगागा गाल वगैरे काय असते हे शाळेत वाचलेले, नंतर ऐकलेले पण कधी काय प्रकार ते कळले नाही. कुतुहल नेहमी वाटायचे पण माहिती करुन घ्याय्ची बुद्धी कधी झाली नाही. गालच का? लाग का नाही? हेही कधी कळले नाही. मराठी भाषा दिनानिमित्त हा उपक्रम जर आला नसता तर हे कोडे असेच कायम राहिले असते. अमेयच्या क्लिपमध्ये अजिबात क्लिष्टता न येऊ देता थोडक्यात गोडी म्हणतात तसे थोडक्यात हे प्रकरण नीट समजावले गेलेय आणि स्वामिजींच्या धीरगंभीर आवाजात प्रत्येक वृत्ताची कविता ऐकताना ते गालगागा प्रकरण नीट समजायला लागले.
बाकीचे अजुन ऐकायचे आहे. वेळ काढुन ऐकेन. मायबोलीचे खुप आभार हे सगळॅ इथे दिल्या बद्दल.
बाकीच्यांना हेच सांगेन की कृपया हे चुकवु नका. जरुर ऐका. आपण जे काव्य सहज जाता येता वाचतो त्यामागचे व्याकरण थोडे जरी कळले तरी काव्याचा आनंद शतपटीने वाढतो.
हे ऐकताना सुरुवातीला एकसुरी
हे ऐकताना सुरुवातीला एकसुरी वाटत होतं पण जसजसं ऐकत गेलो तसं भारून गेलो. लयबद्ध कविता वाचायला आवडतातच, त्यात त्या मूळ कवीने स्वतः लयीत गुणगुणलेल्या ऐकताना खूप भारी वाटलं.
वृत्तबद्ध कविता आणि त्यातला सहज उमजणारा आशय खूप आवडला.
>>कृपया हे चुकवु नका. जरुर ऐका.>> +१
स्वामीजींनी ऑर्कुटच्या
स्वामीजींनी ऑर्कुटच्या काळापासून अनेक जणांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांचा संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी काव्याचा अभ्यास थक्क करणारा आहे. संस्कृत भाषेतील वृत्त, व्याकरण त्याचं मराठीत रुपांतर हे त्यांच्याकडून ऐकताना भारावल्यासारखं होतं.
स्वामीजी या वलयामुळे आणि फोटोमुळे थोडी आदरयुक्त भीती वाटते, पण प्रत्यक्षात ते अत्यंत प्रेमळ आहेत. कविता या विषयावरील प्रेमामुळे त्यांच्याशी लहान थोर सर्वांची चटकन मैत्री होते. त्यांच्याकडून घेता येण्यासारखं खूप काही आहे. ते इथे नियमित लिहीणार असतील तर या उपक्रमाचं हे चांगलं फलित आहे.