डोनट्स हा प्रकार अत्यंत आवडता. Mad Over Donuts, Dunkin Donuts ची outlets इथे आहेत. पण एकेका डोनटला ७०-८० रूपये मोजावे लागतात. तेही मोजत होतो, पण तेव्हा अंत:करण अंमळ जड होत होतं. अशात वर्तमानपत्रामध्ये ’डोनट शिकवायची कार्यशाळा’ अशी जाहिरात आली आणि लगेच नाव नोंदवलं. आमच्या टीचरने तोंपासु डोनट्स हाहा म्हणता आमच्या डोळ्यासमोर तयार केले, सजवले आणि आम्हाला चवही दिली! साहजिकच घरी येऊन, सामान जुळवून करून पाहिले आणि जमले!!! डोनट-प्रेमींसाठी ही कृती शेअर करतेय. तुम्हीही करून बघा. खटपट आहे, वेळखाऊ आहे, पण worth it!
१. मैदा- २५० ग्रॅम (इथे वाचकांना लगेचच एक प्रश्न पडला असेल. पण थांबा. आधी कृती पूर्ण लिहून होऊदे तरी! :फिदी:)
२. पिठीसाखर- ६ टीस्पून
३. मीठ- अर्धा टीस्पून
४. तेल- दीड टीस्पून
५. मिल्क पावडर- २ टेबलस्पून
६. कस्टर्ड पावडर- १ टेबलस्पून
७. व्हॅनिला पावडर- १ टीस्पून (या ऐवजी व्हॅनिला इसेन्स चालेल)
८. यीस्ट (फ्रेश अथवा ड्राय*- कोणतंही चालेल.)- १ टेबलस्पून
९. ब्रेड इम्प्रूव्हर**- अर्धा टीस्पून
१०. पाणी- १२० मिलि
११. डोनट्स तळण्यासाठी तेल
११. सजावटीसाठी डार्क चॉकलेट सॉस, व्हाईट चॉकलेट सॉस, स्प्रिंकलर्स- आपल्या आवडीप्रमाणे
१) * ड्राय यीस्ट असेल तर १२० मिलि पाण्यातलं काही पाणी काढून कोमट करा आणि त्यात यीस्ट घाला. झाकण ठेवून २० मिनिटं ठेवा. फ्रेश यीस्ट असेल तर कोमट पाण्यात घाला आणि लगेचच स्टेप २ कडे जा. थांबायची आवश्यकता नाही.
२) १ ते १० सर्व घटक एकत्र करायचे. प्रमाण अचूक घेतले असेल तर या साहित्याचा एक पर्फेक्ट कन्सिसटन्सी असलेला गोळा तयार होईल. फार मळायचं नाही. गोळा झाला की लगेचच एका पोळीसाठी घेतो इतके गोळे करून घ्यायचे. गोळ्यांच्या जाडसर पुर्या लाटायच्या. जाड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे डोनट कटरने पुरीला डोनटचा आकार द्यायचा. कटर नसला तरी हरकत नाही. रोजच्या वापरातल्या वाटीनेही गोल आकार देता येईल. सर्व डोनट लाटून/करून घ्यायचे. एका ताटात स्वच्छ कोरड्या फडक्याखाली किमान ४५ मिनिट झाकून ठेवायचे. हा वेळ यीस्ट फुलण्यासाठी आवश्यक आहे. (पण जास्तीतजास्त एक तास पुरेसा आहे. यीस्ट खूऽऽऽप फुलावं म्हणून चार-आठ तास ठेवायची गरज नाही
)
३) पुरेसा वेळ ठेवल्यानंतर तेल तापवून घ्यायचं. कोणतेही खाद्यतेल चालेल. पुर्या तळतो तसे डोनट्स तळून घ्यायचे. तळताना डोनट्स टमटमीत फुगतील. यीस्टचा परिणाम इथे दिसतो.
४) सर्व डोनट्स तळून घ्यायचे. गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. हे बेसिक डोनट्स तयार झाले. हे डोनट्स चवीला खूप गोड नाहीत, पण एकदम खुसखुशीत होतात.
५) सजावट हा डोनट्सचा प्रमुख भाग. या सजावटीमुळेच तर लहान-थोर त्यांकडे आकर्षित होतात. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट यांचे सॉस करून घ्यायचे. एकेक डोनट चक्क या सॉसमध्ये पूर्ण बुडवायचा. सॉस थोडा ओला असतानाच त्यावर स्प्रिंकलर्स वगैरे शिवरायचे.
अजून एक प्रकार म्हणजे पायपिंग बॅगमध्ये सॉस भरून सजावट करू शकतो. सजावटीला काहीच limit नाही. आपली सर्व कल्पनाशक्ती इथे वापरू शकतो. मी दोन सॉसेस केले आणि माझ्या कुवतीनुसार सजावट केली.
सजावट एमॅच्युअर आहे. पण टेस्ट एकदम भारी. शिवाय accomplishment चा आनंद निराळाच
१. ** ब्रेड इम्प्रूव्हर आवश्यक आहे. केकचे सामान जिथे मिळते त्या दुकानात मिळतो.
२. मैद्याऐवजी कणीक चालेल का? या लाडक्या प्रश्नाचे उत्तर माझ्या टीचरने तरी ’नाही’ असं दिलं. ’फ़ुगणे’ या क्रियेसाठी मैदाच आवश्यक आहे. पण आजकाल कणकेचे ब्रेड मिळतात, लोक घरी तयार करतात. त्यामुळे अर्थातच कोणाला मैदा रिप्लेस करायचा असेल तर तो पर्याय आहेच. मूळ डोनटची चव आणि रंगरूपाबाबत मात्र तडजोड करावी लागेल.
३. लोकल बेकर्यांमध्ये क्रीम भरलेला एक लांबुडका रोल 'डोनट' म्हणून मिळतो. तो अस्सल डोनट नाही. खरा डोनट हाच. मेदुवड्यासारखा जो दिसतो तो.
चंद्रा, श्रीखंड-पुरीमधली पुरी
चंद्रा, श्रीखंड-पुरीमधली पुरी करताना आपण पुरी पातळ लाटतो. बरोबर? डोनटची पुरी या पुरीपेक्षा दुप्पट जाड हवी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंवा अजून एक एक्स्प्लनेशन- एक पोळी लाटण्यासाठी जितकी कणीक लागते, तितका गोळा घ्यायचा. पण त्याची पोळी नाही, तर पुरी लाटायची. साहजिकच ती जाड होईल.
आय होप 'जाडी' लक्षात आली असेल आता
नवीन प्रतिसादकांचे आभार!
पूनम बाकि तोंपासु पाकृ
पूनम बाकि तोंपासु पाकृ टाकणार्यांना मी एकवेळ माफ करीन, पण तु ही डोनट ची पाकृ आणि असले किलिंग फोटो टाकून फार मोठं पाप केलं आहेस.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नक्की.
माझ्या नावची चित्रावळ लवकरात लवकर काढून ठेव नाहीतर तुझं पोदु
डोनट हा भयंकर आवडता पदार्थ आहे. कोल्हापूरला भारत बेकरीचा डोनट अशाच आकाराचा आणि आत गोड लोणी/क्रिम लावलेलं असायचं. बाबा अजूनही येताना डोनट आणू काय विचारतात. पण इथे येईतो ते बर्यापैकी शिळे होतात. पण चव अस्सल...
उम्म! सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
फेसबुक वर विडीओ येतात त्यात
फेसबुक वर विडीओ येतात त्यात रेनबो केक चे बॅटर सारखे घेउन डोनट बनवले आहेत. फारच रंगीत दिसतात ते. आणि एकात एका बाईने मटारा एवढे गोळे घेउन डोनट बनवले आहेत व चमच्याएव ढी कढई गरम करून त्यात तळलेतनी. काय गंमत. खाली गॅस म्हणून टीलाइट ठेवला आहे.
हेच बरे.
मी करून पाहिले डोनट ...छान
मी करून पाहिले डोनट ...छान झाले फक्त किती जाड ते नक्की न कळल्यामुळे थोडे बारीक झाले .... नेक्स्ट टाईम चूक सुधारेन ... रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद ☺
हो पूनम. आता आला अंदाज
हो पूनम. आता आला अंदाज पुरीच्या जाडीचा. बघते करून. डिट्टेल शंकानिरसनासाठी आणि रेसिपीसाठी धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षि नेक्स्ट टायमाला पक्का
दक्षि
नेक्स्ट टायमाला पक्का तुझे याद करेंगे.
विनार्च, सहीच. थँक्स! फोटो नाही काढला?
चंद्रा, ऑल द बेस्ट!
ह्यावेळी परफेक्ट जमले लेक
ह्यावेळी परफेक्ट जमले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेक तिच्या शाळेत घेवून गेलेली .. सगळे फ्रेन्ड्स खूश... थॅन्क यु अगेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही सगळे जबरदस्त कलाकार
तुम्ही सगळे जबरदस्त कलाकार आहात. एकदम दुकान डोनट बनवता
वॉव विनार्च! काय मस्त दिसत
वॉव विनार्च! काय मस्त दिसत आहेत डोनट्स.
हायला !! सहीच
हायला !! सहीच
वॉव, विनार्च, काय दिसतायंत
वॉव, विनार्च, काय दिसतायंत डोनट्स !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या छोट्या चांदण्या भारतात कुठे मिळतात ? आम्ही युकेत छोटे फेअरी कपकेक्स खायचो त्यावर असायच्या अशा चांदण्याच चांदण्या
विनार्च, यम्मी दिसतायत
विनार्च, यम्मी दिसतायत डोनट्स!! फ्रॉस्टिंग खूप क्यूट दिसतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरात ड्राय यीस्ट , ब्रेड
घरात ड्राय यीस्ट , ब्रेड ईम्प्रोवर आणि मैदा सोडून सग्गळ्ळं सग्गळ्ळं आहे .
.
अगदी स्प्रिन्कलर्स आणि चॉकलेट सॉस ( व्हाईट आणि दार्क ) सुद्धा आहे .
फक्त मुहुर्त नाही
एक प्रश्न आहे : जर ब्रेड इम्प्रोव्हर नाही वापरला तर काय फरक पडतो ???
घरात ब्रे. इ. शिवाय सगळ
घरात ब्रे. इ. शिवाय सगळ आहे,अगदी ड्राय इस्ट सुध्दा . तर बन्तील का
अधिक टीपा लिहीलेल्या वाचा ना
अधिक टीपा लिहीलेल्या वाचा ना लोकहो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनार्च, सुपर डुपर डोनट्स.
ब्रे.इ. नसेल तर फुगत कमी
ब्रे.इ. नसेल तर फुगत कमी असतील.. असो, कुठे मॉलमधे मिळाले तर पहाते.
विनार्च, सुपर डुपर डोनट्स +१
विनार्च, सुपर डुपर डोनट्स +१
एक प्रश्न आहे : जर ब्रेड
एक प्रश्न आहे : जर ब्रेड इम्प्रोव्हर नाही वापरला तर काय फरक पडतो ???>> ब्रेड इम्प्रोव्हर वापरायचे नसेल तर पिठ जास्त वेळ रेज करायला ठेवायला हवे तसेच डोनट्स तळण्यापुर्वी जरा रेज होऊ द्यायचे .
मी सिनॅमन रोल्ससाठी तयार केलेल्या पिठाचे तळून आणि भाजून दोन्ही प्रकारचे डोनट्स करून पाहिले. चवीला दोन्ही छान झाले होते. भाजलेले जरा आकाराने कमी झाले होते.
अधिक टीपा लिहीलेल्या वाचा ना
अधिक टीपा लिहीलेल्या वाचा ना लोकहो. >>>> वाचल्या की आशुतै .
म्हणूनच विचारलं की नाही वापरलं तर काय फरक पडेल ??
वापरलं नाही तर चालेलं का ? असा प्रश्न नाही आहे .
विनार्च, तुमचे डोनट्स अगदी
विनार्च, तुमचे डोनट्स अगदी प्रो दिसत आहेत. मस्तच.
मस्त दिसताहेत डोनट्स.. करुन
मस्त दिसताहेत डोनट्स.. करुन बघेन.
अगो, त्या चांदण्या मुंबईत असाल तर क्रोफ़र्ड मार्केटला मिळू शकतील.
मी नाही वापरलं ब्रेड improver
मी नाही वापरलं ब्रेड improver ... मिळालंच नाही कुठे ... बाकी कृती सेम टू सेम केली ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रोफ़र्ड मार्केटलाच मिळाल्या चांदण्या
धन्यवाद! कौतुका बद्दल __/\__
काय दुकानस्टाईल डोनटस दिसत
काय दुकानस्टाईल डोनटस दिसत आहेत.
मी नाही वापरलं ब्रेड improver
मी नाही वापरलं ब्रेड improver ... मिळालंच नाही कुठे ... बाकी कृती सेम टू सेम केली ...
>>>> धन्स विनार्च . हुरुप वाढला . गुड फ्रायडेचा मुहुर्त धरावा म्हणते .
अरे हे पाहिलंच नव्हतं.
अरे हे पाहिलंच नव्हतं. विनार्च, सही!! कोनमधून व्हाईट सॊस घातला का डोनट्सवर? असं करायचं असेल तर पुढल्या वेळी ते मधलं भोक पाडू नकोस. डोनट आख्खा ठेव. त्याने सॊस छान पसरेल. दिसेलही छान.
मला स्ट्रॊबेरी इमल्शन आणि आणखी काही डेकोरेशन साहित्य मिळालंय. आता एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत करावेच लागतील
क्रॊफर्ड मार्केटमध्ये ब्रे.इ मिळालं नाही?
पुण्यात मिळतं तर तिथे न मिळणं कसं शक्यए?
ब्रेड इम्प्रूव्हर नसेल तर खाण्याचा सोडा घाला. डोनट हलका होण्यासाठी हे आवश्यक आहे. नाहीतर दडस राहू शकतो. इम्प्रूव्हर घातलं की चवीत आणि हलकेपणात लक्षणीय सुधारणा होते हे नक्की! प्रोफेशनल टेस्ट येते.
ब्रेड इम्प्रूव्हर नसेल तर
ब्रेड इम्प्रूव्हर नसेल तर खाण्याचा सोडा घाला. >> छान. करून बघतेच आता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या विकांताला करणे झाले .
या विकांताला करणे झाले . सोप्या क्रुतीला , अवघड करणे आम्हाला चांगलेच जमते
.
थोडक्यात , डोनटस चवीला चांगले झाले होते . पण काही म्हणता फुगले नाहीत .
घारग्यांसारखे दिसत होते . दूसरं म्हणजे खुसखुशीत झाले नाहीत .
ताटात पडल्यावर लगेच मान टाकली त्यांनी .
माझं RCA :
पूनमनी पाव किलोच्या प्रमाणात , १६ चे प्रमाण दिले होते .
मी निम्मी सामग्री घेतली . त्या हिशोबाने ८/१० च करायला हवे होते . मी १४/१५ केले , आकार थोडा कमी ठेवला .
बहुतेक जाडी कमी झाली लाट्यांची .
अजून थोड्यावेळ 'रेज' करत ठेवायला हवे होते . लवकर तळायला घेतले.
पण जाणकार आणखी काही प्रकाश टाकू शकतील का?
एक-दोन आठवड्यात परत एक प्रयत्न करायचा विचार आहे .
लॉकडाऊन मध्ये कोणी केले की
लॉकडाऊन मध्ये कोणी केले की नाही डोनट्स. यीस्ट नाहीये घरात. तूनळीवर असंख्य व्हिडीओ आहेत बिना यीस्ट वापरून अमुक नी ढमुक, बघितले नाहीत अजून. काय पर्याय आहे का यीस्टला आणि तसेच फुगतील का. ब्रेड इम्प्रोवर तर अर्थातच नाहीये.
Pages