डोनट्स हा प्रकार अत्यंत आवडता. Mad Over Donuts, Dunkin Donuts ची outlets इथे आहेत. पण एकेका डोनटला ७०-८० रूपये मोजावे लागतात. तेही मोजत होतो, पण तेव्हा अंत:करण अंमळ जड होत होतं. अशात वर्तमानपत्रामध्ये ’डोनट शिकवायची कार्यशाळा’ अशी जाहिरात आली आणि लगेच नाव नोंदवलं. आमच्या टीचरने तोंपासु डोनट्स हाहा म्हणता आमच्या डोळ्यासमोर तयार केले, सजवले आणि आम्हाला चवही दिली! साहजिकच घरी येऊन, सामान जुळवून करून पाहिले आणि जमले!!! डोनट-प्रेमींसाठी ही कृती शेअर करतेय. तुम्हीही करून बघा. खटपट आहे, वेळखाऊ आहे, पण worth it!
१. मैदा- २५० ग्रॅम (इथे वाचकांना लगेचच एक प्रश्न पडला असेल. पण थांबा. आधी कृती पूर्ण लिहून होऊदे तरी! :फिदी:)
२. पिठीसाखर- ६ टीस्पून
३. मीठ- अर्धा टीस्पून
४. तेल- दीड टीस्पून
५. मिल्क पावडर- २ टेबलस्पून
६. कस्टर्ड पावडर- १ टेबलस्पून
७. व्हॅनिला पावडर- १ टीस्पून (या ऐवजी व्हॅनिला इसेन्स चालेल)
८. यीस्ट (फ्रेश अथवा ड्राय*- कोणतंही चालेल.)- १ टेबलस्पून
९. ब्रेड इम्प्रूव्हर**- अर्धा टीस्पून
१०. पाणी- १२० मिलि
११. डोनट्स तळण्यासाठी तेल
११. सजावटीसाठी डार्क चॉकलेट सॉस, व्हाईट चॉकलेट सॉस, स्प्रिंकलर्स- आपल्या आवडीप्रमाणे
१) * ड्राय यीस्ट असेल तर १२० मिलि पाण्यातलं काही पाणी काढून कोमट करा आणि त्यात यीस्ट घाला. झाकण ठेवून २० मिनिटं ठेवा. फ्रेश यीस्ट असेल तर कोमट पाण्यात घाला आणि लगेचच स्टेप २ कडे जा. थांबायची आवश्यकता नाही.
२) १ ते १० सर्व घटक एकत्र करायचे. प्रमाण अचूक घेतले असेल तर या साहित्याचा एक पर्फेक्ट कन्सिसटन्सी असलेला गोळा तयार होईल. फार मळायचं नाही. गोळा झाला की लगेचच एका पोळीसाठी घेतो इतके गोळे करून घ्यायचे. गोळ्यांच्या जाडसर पुर्या लाटायच्या. जाड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे डोनट कटरने पुरीला डोनटचा आकार द्यायचा. कटर नसला तरी हरकत नाही. रोजच्या वापरातल्या वाटीनेही गोल आकार देता येईल. सर्व डोनट लाटून/करून घ्यायचे. एका ताटात स्वच्छ कोरड्या फडक्याखाली किमान ४५ मिनिट झाकून ठेवायचे. हा वेळ यीस्ट फुलण्यासाठी आवश्यक आहे. (पण जास्तीतजास्त एक तास पुरेसा आहे. यीस्ट खूऽऽऽप फुलावं म्हणून चार-आठ तास ठेवायची गरज नाही
)
३) पुरेसा वेळ ठेवल्यानंतर तेल तापवून घ्यायचं. कोणतेही खाद्यतेल चालेल. पुर्या तळतो तसे डोनट्स तळून घ्यायचे. तळताना डोनट्स टमटमीत फुगतील. यीस्टचा परिणाम इथे दिसतो.
४) सर्व डोनट्स तळून घ्यायचे. गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. हे बेसिक डोनट्स तयार झाले. हे डोनट्स चवीला खूप गोड नाहीत, पण एकदम खुसखुशीत होतात.
५) सजावट हा डोनट्सचा प्रमुख भाग. या सजावटीमुळेच तर लहान-थोर त्यांकडे आकर्षित होतात. डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट यांचे सॉस करून घ्यायचे. एकेक डोनट चक्क या सॉसमध्ये पूर्ण बुडवायचा. सॉस थोडा ओला असतानाच त्यावर स्प्रिंकलर्स वगैरे शिवरायचे.
अजून एक प्रकार म्हणजे पायपिंग बॅगमध्ये सॉस भरून सजावट करू शकतो. सजावटीला काहीच limit नाही. आपली सर्व कल्पनाशक्ती इथे वापरू शकतो. मी दोन सॉसेस केले आणि माझ्या कुवतीनुसार सजावट केली.
सजावट एमॅच्युअर आहे. पण टेस्ट एकदम भारी. शिवाय accomplishment चा आनंद निराळाच
१. ** ब्रेड इम्प्रूव्हर आवश्यक आहे. केकचे सामान जिथे मिळते त्या दुकानात मिळतो.
२. मैद्याऐवजी कणीक चालेल का? या लाडक्या प्रश्नाचे उत्तर माझ्या टीचरने तरी ’नाही’ असं दिलं. ’फ़ुगणे’ या क्रियेसाठी मैदाच आवश्यक आहे. पण आजकाल कणकेचे ब्रेड मिळतात, लोक घरी तयार करतात. त्यामुळे अर्थातच कोणाला मैदा रिप्लेस करायचा असेल तर तो पर्याय आहेच. मूळ डोनटची चव आणि रंगरूपाबाबत मात्र तडजोड करावी लागेल.
३. लोकल बेकर्यांमध्ये क्रीम भरलेला एक लांबुडका रोल 'डोनट' म्हणून मिळतो. तो अस्सल डोनट नाही. खरा डोनट हाच. मेदुवड्यासारखा जो दिसतो तो.
मस्त गं, पूनम!!
मस्त गं, पूनम!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्तं
काय मस्तं दिसतायत.
सुंदरच.
ब्रेड इम्प्रूवरचा ब्रँड कुठला मिळतो भारतात?
झक्कास गं वैने. खरं तर डोनट
झक्कास गं वैने. खरं तर डोनट ह्या खाद्यपदार्थाचं विशेष आकर्षण नाहीये मला. पण तू टाकलेले फोटोज पाहुन मात्र तोंडाला पाणी सुटलं. त्यामुळे प्रतिसाद द्यावाच लागला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैने,हे असे इथे फोटो टाकुन आम्हाला त्याचा त्रास होण्यापेक्षा घरी खाण्यासाठी तरी बोलाव की. तुझं प्रत्यक्षात तोंड भरून कौतुक करू मग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डोनट्स पाहून मीही तुझं नाव
डोनट्स पाहून मीही तुझं नाव दोन-दोनदा चेक केलं पूनम. भारी आहेस तू. काय मस्त दिसतायंत डोनट्स !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
गरमागरम डोनट्स स्वर्गात पोचवतात डायरेक्ट. क्रिस्पी क्रीमच्या ठराविक दुकानांत ठराविक वेळी मिळायचे गरम डोनट्स.
कस्टर्ड भरलेले आणि वरुन डार्क चॉकलेट असलेले सगळ्यात आवडतात पण सगळेच फ्लेवर्स खास असतात खरंतर.
माझ्याच्याने घरी केले जातील असं मात्र मला नाही वाटत
मस्त जमलेत!
मस्त जमलेत!
मी_अनू, सोनपापडीचे लेयर्स कसे
मी_अनू, सोनपापडीचे लेयर्स कसे बनतात हे खरोखरच पहायचे असेल तर तूनळीवर video उपलब्ध आहे, मला वाटतं मागे दिनेशदांनी इथे share केला होता. सोनपापडी आवडत असेल तर तो video बघू नका असा माझा प्रामाणिक सल्ला आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तशीही सोनपापडी आवडत नाही त्यामुळे फरक पडला नाही
रेसिपी मस्त, डोनट्स आवडतात, त्यामुळे नक्की करून बघणार
वावावा.. पूनम..ग्रेट
वावावा.. पूनम..ग्रेट जॉब!!!!!!एकदम तोंपासुयेत!
पूनम, मस्तच .. फोटोही झक्कास
पूनम, मस्तच .. फोटोही झक्कास ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला खरंतर डोनट्स अजिबात आवडत नाहीत .. पण कार्यशाळेत जाऊन रेसिपी शिकून आता स्वतःचे प्रयोग करून पाहत आहेस हे सगळं सॉल्लिड इम्प्रेसिव्ह आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डोनट्स वर रबडी घालून खाण्याची आयडियेची कल्पना वाचली .. ती प्लेन डोनट्स करता आहे ना? (गिव्हन दॅट मी डोनट्स अँटी फॅन क्लब शी मेम्बर आहे, माझं असं प्रामाणिक मत आहे की आपले गुलाबजाम च मस्त रबडी घालून खाण्याकरता .. :))
आहाहा, लय भारी.
आहाहा, लय भारी.
डोनट वर रबडी? कुफेहेपा !!
डोनट वर रबडी?
कुफेहेपा !!
कॅरेमल, कंडेन्स्ड मिल्क व
कॅरेमल, कंडेन्स्ड मिल्क व फ्रेश व्हिप्ड क्रीम,
बनाना, टॉफी,
कॉफी क्रीम
मिक्स्ड फ्रूट व फ्रेश क्रीम
नटेला व बनाना ही काही मस्त कॉंबिनेशन्स आहेत. डोनट अर्धा कापून त्यावर मिक्स्ड फ्रूट व फ्रेश क्रीम घालता येइल.
भारतीय मध्ये छुंदा व बारीक चिरलेली कोथिंबीर/ पुदिना मस्त लागेल.
इमली चटणी व शेव पण. पण डोनट फार गोड नसावा.
हलक्या गुलाबी रंगाचे आयसिंग करून दिल्यास लहान मुलींच्या पार्टीला साजरे दिसेल.
अप्रतीम! एकदम प्रोफेशनल
अप्रतीम! एकदम प्रोफेशनल वाटतायत.:स्मित: म्हणजे चान्गल्या बेकरीत ( नोट-चान्गल्याच बेकरीत )बनवतात तसे. चॉकलेटपेक्षा ते स्प्रिन्कल केलेले आवडलेत. चॉकलेटवाले मस्त आहेत, पण आजकाल चॉकलेट खावेसे वाटत नाही.
थँक्स लोक्स अमांच्या आयडियाज
थँक्स लोक्स
अमांच्या आयडियाज भारी आहेत एकेक! सेन्टर फिल्ड डोनट करायचा असेल तर डोनटला सुरीने मध्ये छेद देऊन पायपिंग बॅगने फिलिंग भरायचं असतं असं आमच्या टीचरने सांगितलं.
ब्रेड इम्प्रूव्हर इथल्या दुकानात सुटा मिळतो वजनावर. ब्रॅन्ड ठाऊक नाही त्यामुळे. बाकी उत्पादनं स्टॅन्डर्ड ब्रॅन्डची आहेत. त्याने काही फरक पडणार नाही. यीस्टची भट्टी जमली की बाकी फारसं महत्त्वाचं नाही.
संपदा, अगो का गं बायांनो?
पुण्यातले लोक आणि डोनट्स हे कॉम्बो अगदीच अनबिलिव्हेबल आहे का? ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑरेन्ज झेस्टचं डोक्यात होतं, पण तो प्रयोगच कितपत यशस्वी होईल हे माहित नव्हतं त्यामुळे झेस्ट पुढल्या वेळी.
पग्या, मयूरेश वाट बघा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी खपून केलेल्या डोनटांवर रबडी ओतणार??? कुफेहेपा? आता काहीच मिळणार नाही. ना रबडी ना पुरी ना डोनट! विषयच संपला!
मलाही गर्रम गुलाबजाम- गारेगार्र रबडी असं कॉम्बी आवडतं.
थँक्स अगेन!
हॅट्स ऑफ...डोनट कार्यशाळा आणि
हॅट्स ऑफ...डोनट कार्यशाळा आणि डोनट घरी बनवणं...मस्तच!
मला krispy kreme चे रेग्युलर क्लासिक glazed डोनट प्रचंड आवडतात. भारतात मिळतात की नाही माहीत नाही.
अरेरे!!! डोनटस्वर रबडी हा
अरेरे!!! डोनटस्वर रबडी हा शुद्ध विनोद होता![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बादवे, रबडी जलेबी काँबिनेशनपण
बादवे, रबडी जलेबी काँबिनेशनपण अफलातून लागतं.
जबरदस्त आहे.
जबरदस्त आहे.
जिलेबी हा अधिक कौशल्याने
जिलेबी हा अधिक कौशल्याने केलेला डोनटच आहे. पाश्चात्यांना डोनटची कल्पना 'आपल्या' जिलबीवरूनच सुचली.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
- नवीन व्हॉट्सॅप मेसेज.
चांगली माहीती, आधी ठाऊक
चांगली माहीती, आधी ठाऊक नव्हते हे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यीस्ट अन ब्रेड इम्प्रुव्हर वगळता आमच्या इकडे सगले मिळेल, याच दोन गोष्टी कशा काय मिलवायच्या ते बघितले पाहिजे. (ते चायना ग्रासही तसेच.... खरवसासाठी हवे होते.. नाहीच मिळाले शेवटापर्यंत)
बायदिवे, तेल कोणते वापरणे
बायदिवे, तेल कोणते वापरणे योग्य?
माझ्यामते बालुशाही हा डोनट्स
माझ्यामते बालुशाही हा डोनट्स च्या जवळ जाणारा देसी पदार्थ आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंबू, निगडी स्टार बाझार
लिंबू, निगडी स्टार बाझार मध्ये ब्रेड इम्प्रूव्हर मिळेल ना?
यीस्ट कोणत्याही 'आईमाता' 'भवानी' 'खेतेश्वर' 'चारभुजा' 'लक्ष्मी' असं नाव असलेल्या किराणा दुकानात मिळेल
(ही नावं मी का घेतली हे किंचीत विचार केल्यास कळेल.ही नावं जे लोक ठेवतात ते आपल्या दुकानात काहीही ठेवून आणि कितीही कष्ट घेऊन धंदा विस्तार करतात.)
<< पुण्यातले लोक आणि डोनट्स
<< पुण्यातले लोक आणि डोनट्स हे कॉम्बो अगदीच अनबिलिव्हेबल आहे का? स्मित
नाही गं. आता स्पष्टच सांगते, तू आणि डोनट्स कॉम्बो अनपेक्षित वाटलं :फिदी:. कृती वाचल्यावर बराच उलगडा झाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनु, धन्यवाद. बघतो आता.
अनु, धन्यवाद. बघतो आता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाम भारी. आमच्या कॉलेजच्या
जाम भारी. आमच्या कॉलेजच्या बाजुला मिळायचे
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
मस्तच.
घरी बनवलेले डोनट मस्त
घरी बनवलेले डोनट मस्त जमलेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका पोळीसाठी घेतो इतके गोळे करून घ्यायचे. गोळ्यांच्या जाडसर पुर्या लाटायच्या. जाड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे >>>>
जाड म्हणजे किती जाड? अर्धा इंच / पाउण इंच ? रेसिपीच्या या पायरीवर जरा जास्त प्रकाश टाकल्यास माझ्यासारख्या अडाण्यांना डोनट करताना बरे पडेल
मस्त!!
मस्त!!
पूनम! कडक सॅल्युट डोक्यात
पूनम! कडक सॅल्युट
डोक्यात येणे आणि जमवून आणणे याबद्दल. नाय्तर आमचे फकस्त इमले :ड
अस्मादीक डंकीन्समध्ये फक्त कॉफीसाठी जात असे. एक इंडीयन कपलचं लोकल शॉप होतं, ते डोनट्स मात्र भारी असायचे. फोटो बघून तेच आठवलं.
अहाहा, काय दिस्ताय! मस्त मस्त!
Pages