काल शिर्डीत होते, अगदि द्वारकामाईच्या अगदी बाजुलाच काश्मिरी हँडलुमचे दुकान होते, काश्मीर हँडलुम डेव्हलपमेंट एम्पोरीयम. विविध प्रकारचे काशिदा काढलेले ड्रेसमटेरीयल पाहुन त्या दुकानात गेल्या वाचुन राहवले नाही. एका मैत्रीणीने पश्मिना शाली बद्द्ला विचारताच दुकानदाराने माहीती द्यायला सुरुवात केली. कश्या प्रकारे चिगु / चिरु नावाच्या प्राण्यांच्या शरीरावरील लोकर कापुन ब्लँकेटस बनवतात आणि त्या स्कीम मधे ग्राहकांना वापरायला देतात. त्याने एक ब्लँकेट दाखवली जी कोणत्याही ऋतुमधे वापरता येते, फर वाला भाग थंडी मधे आणि उलट बाजुकडील भाग उन्हाळ्यात वापरता येउ शकतो, मग त्याने सांगितले की याची किंमत काहीतरी २० हजारु रुपयांच्या वर आहे पण काश्मिर सरकारने बायकांसाठी स्कीम काढली आहे त्यात फक्त या ब्लँकेट साठी १०,८०० भरायचे आहेत, २१ महीने वापरल्यावर ही ब्लँकेट आपल्याला सरकारला परत करायची आहे, तेव्हा जर आपण त्यांना नेउन दिली तर १००% पैसे परत आणि जर त्यांचा माणुस आपल्याकडे येउन घेउन गेला तर आपल्याला ७५% पैसे परत मिळतील. आणि याची किंमत लोकांना जास्त वाटते म्हणुन यासाठी ५ गिफ्त हॅम्पर्स सुद्धा मिळतील जे ग्राहकाला परत करायचे नाहीत. त्या हॅम्पर्स मधे , एक बेड कव्हर विथ बेड शीट , एक साडी , एक फरचा गालिचा त्याला त्याने (बुलबुल का बच्चा) असे काहीसे नाव सांगितले, एक पश्मिना शाल जी अशी विकत घ्यायला गेलो तर ५ हजारच्या वर किंमत होती.आणि एक आणखी ब्लँकेट होते वरुन काश्मिरसाठी फ्री टु मीळेल जी हे ब्लॅंकेट घेतल्याच्या १ वर्षानंतर पासुन ते ५ वर्षापर्यंत आपण कधीही अवेल करु शकतो. हे सगळे फक्त काश्मिर सरकारने बायकांसाठी स्कीम मधे दिले आहे असे तो सांगत होता. तसेच सरकार ती ब्लँकेट परत घेउन काय करेल तर आपण ती ब्लँकेट वापरल्याने आपल्या शरीराच्या उष्णते मुळे त्या फर वर गोळे तयार होतात त्या गोळ्यापासुन सरकारच्या हँडलुम डीपार्टमेंट कडुन १० पश्मिना शाली बनवण्यात येतील ज्यांची किंमत ४२ हजार असेल म्हणजे काश्मिर सरकारला कमीत कमी ४ लाखांचा फायदा म्हणुन अशी स्कीम काढलीये नाहीतर कोण असे फुकट देईल. आणि आता तुमच्या कडे १०८००/- नसतील तर १८००/- रु आता डीपोझिट भरा बाकीचे तुम्हाला या वस्तु घरपोच केल्यावर द्या. या वस्तु घरी आल्यावर तुमचा एक फोटो रीसिप्ट वर चिकटवा आमच्या रेफरन्स साठी. आणि त्याने एक रजिस्टर ही दाखवलं. आणि स्कीम कार्ड मधे अशा ५-६ वेगवेगळ्या स्कीम्स होत्या .आताच घ्या नंतर काश्मीर फ्री टुर मिळणार नाही असे तो दुकानदार सांगत होता. पण आम्ही काही याला बळी पडलो नाही आणि नंतर पाहु असे सांगुन निघालो.
आज काश्मिर हँडलुम डीपार्टमेंटची वेबसाईट चेक केली तर त्यात या फसवणुकिबद्दल उल्लेख होता.
साईट - http://www.jkhandloomdepartment.org/downloads/beware.pdf
हे वाचुन काल अज्जिब्बत या स्कीम वर विश्वास ठेवला नाही याचा खुपच आनंद झाला, मी स्वतः तरी अशा स्कीम्स वर कधीच विश्वास ठेवत नाही पण बाकीच्यांनीही फसु नये म्हणुन तातडीने धागा काढलाय.
बरं झालं सांगितलं. अशी
बरं झालं सांगितलं.
अशी काहीतरी स्किम मनालीत गेलो होतो काही वर्षापूर्वी तेव्हा ऐकली होती, पण 'इतके सगळे सामान वाहून न्यायचे आणि ठेवायचे कुठे' या दोन कन्सर्न्स मुळे ती आपोआप मागे पडली.
बाजारात काहीही फुकट मिळत नाही
बाजारात काहीही फुकट मिळत नाही हे सत्य.
तूम्ही विश्वास ठेवला नाहीत हे उत्तम पण यावर विश्वास ठेवणारे अगदी सुशिक्षित लोकही पाहिलेत. त्यामूळेच तर असल्या लोकांचे फावते.
बेसिकली, कोणतीही स्किम ही
बेसिकली, कोणतीही स्किम ही फसवणुकीकरता असते असंच गृहित धरून चला. जगाच्या कल्याणाकरता कोणीही कुठलीही स्कीम चालवत नसतं.
स्कीम जितकी जास्त आकर्षक, तितकी जास्त फसवणुक हे एक सुत्र मनाशी बाळगा.
या माहितीसाठी धन्यवाद, केपी.
Best info, thanks. This
Best info, thanks. This scheme is conveyed on almost all Kashmiri shops in different states of India.
मामी +१०० कविता, माहितीकरता
मामी +१००
कविता, माहितीकरता धन्यवाद !!!
हिमाचल मधे मार्केटमधे फिरताना
हिमाचल मधे मार्केटमधे फिरताना वैताग आणला होता या कश्मीर एम्पोरियमवाल्यांनी. ती जी काही फरवाली रजाई होती, त्याला 'बरफ की गिंडी' असं काही म्हणत होते. मी गेले होते कश्मीरी कुर्ते घ्यायला, पण दुकानदाराने सगळी कॅसेट ऐकवलीच. असल्या थोतांड स्किमवर नवरे विश्वास ठेवतच नाहीत आणि मी शहाणी बायको असल्याने घेण्याचा हट्ट पण केला नाही.
नुकतीच शिमला मनाली सहल झाली.
नुकतीच शिमला मनाली सहल झाली. या स्कीमबद्दल लोकांना कळाल्यामुळे आता ती "पारू/स्पारू" या नावाने चालवली जाते. आम्हाला प्रवासात एक कुटुंब भेटले जे या स्कीमला बळी पडले. मोडस ऑपरंडी सारखीच आहे. ते तुम्हाला दुकानात बोलावून, निवांतपणे बसवूनच हे पारू दाखवतात. वशिष्ठ मंदिराच्या इथे खूप लोक 'हिमाचल
ची खासियत पारू घ्या म्हणून मागे लागले होते.
http://timesofindia.indiatimes.com/india/Despite-ban-chingu-selling-like...
https://www.tripadvisor.in/ShowUserReviews-g304552-d320056-r134609801-Ku...
http://www.consumercomplaints.in/complaints/chingu-shawl-from-himachal-c...
फक्त इतकेच नव्हे. अशा
फक्त इतकेच नव्हे. अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. कमीत कमी तक्रार तर केलीच पाहिजे!!
बाप्रै! ऐकावे ते नवलच.
बाप्रै! ऐकावे ते नवलच.