जगणे दत्तात्रेय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 February, 2016 - 03:03

दत्त माझा देव माझ्या ह्रदयात
मज दिनरात
सांभाळतो ||
सरल्या आयुष्या वर्ष आन देतो
प्रारब्धा ठेवितो
सोडवून ||
लायकी वाचून यश दे भरून
काढे पाण्यातून
बुडतांना ||
सुखाचे तोरण जीवनी बांधून
सांगतो हसून
बघ जिणे ||
आतले ते दार परंतु लोटून
राहीला थांबून
का न कळे ||
सरले खेळणे कळले जळणे
विक्रांता जगणे
दत्तात्रेय ||

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो ,धन्यवाद ...

अवघ्या लेकरा
एकच तहान
माय परतून
केव्हा येई
प्राणात काहूर
नयनात नीर
फुलेल औदुंबर
केव्हा बाई