नमस्कार मायबोलीकरहो..
दरवर्षीप्रमाणे उन्हाळा येऊन ठेपलेला आहे. आणि उष्म्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. उन्हाळ्यात घ्यायची आरोग्याची काळजी याविषयी सर्वसाधारण माहिती सगळ्यांना असतेच. तरीही सगळ्यांनी त्यात भर घातली तर फायद्याचे राहिल.
मला माहित असलेले काही मुद्दे:
१. भरपुर पाणी पिणे. (शक्यतो माठातले).
२. उन्हात जातांना आवर्जून डोके झाकणे.
३. गॉगल्स वापरणे.
४. घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती (जमल्यास ढगळ) कपडे वापरावे.
५. शक्य असेल तर दोनदा अंघोळ करणे.
६. जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगणे.
७. रबरी चपला/ सँडल्स न वापरणे (त्याने डोळे तळावतात). (तळावणे = डोळे तापणे, दिवसभर जळजळणे, थकणे)
८. वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत/ आंबत असल्याने डबा खातांना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे. (मुळातच उन्हाळ्यात भूक कमी होत असल्याने कमीच डबा बाळगणे).
९. एसीमध्ये काम करणार्यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते त्यावर काहीतरी उपाय करणे. (मला उपाय माहित नाही. कोणास माहित असल्यास सांगावे).
१०. चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करणे.
११. बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे.. शक्य असल्यास हातात ग्लोव्हज् घालणे..
१२. उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मधे जाऊन बसु नये.
१३. उन्हातुन थकुन आल्यावर लगेच गारेगार पाणि पिउ नये.
१४. रोज एक चमचा गुलकंद खाणे ,
१५. रात्री झोपताना तळपायाला तेलाने अभ्यंग करणे. (अभ्यंग म्हणजे मसाज ना?)
१६. उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं. (खरं तर शक्य होईल तितके सर्वच महिन्यात टाळावे).
१७. सनस्क्रीन ( 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त) लावुनच उन्हात बाहेर पडावे. (त्वचेची काळजी)
असे आणखी उपाय असतील तर कृपया लिहावेत. जसजसे जमतील तसतसे हेडरमध्ये अपडेट करता येतील. आधीच असा एखादा धागा असल्यास हा धागा उडवावा हि अॅडमीन यांना नम्र विनंती.
मस्त उपाय दिले आहेत पियू.. ७.
मस्त उपाय दिले आहेत पियू..
७. रबरी चपला/ सँडल्स न वापरणे (त्याने डोळे तळावतात). >> म्हणजे ?
माझ्याकडून दोन चार ..
-> बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे..
-> हातात ग्लोव्हज् घालणे..
-> उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मधे जाऊन बसु नये.
-> उन्हातुन थकुन आल्यावर लगेच गारेगार पाणि पिउ नये.
-> हलक्या रंगाचे सुती (जमल्यास ढगळ) कपडे वापरावे.
छान धागा आहे माझ्याकडून
छान धागा आहे
माझ्याकडून धाग्यात थोडी भर
>>>रोज एक चमचा गुलकंद खाणे ,
>>>रात्री झोपताना तळपायाला तेलाने अभ्यंग करणे
>>>उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं
मस्त उपाय
मस्त उपाय
माझ्याकडुन एक टीप - सगळ्या
माझ्याकडुन एक टीप -
सगळ्या न्युज पेपरमधे 'उन्हाळ्यात/पावसाळ्यात/ थंडीत घ्यायची काळजी' असा एक लेख हमखास येतोच. तो वाचावा.
कंटाळा आला त्याच त्याच टीप्स वाचुन लहानपणापासुन.
बरं ते नेहमीचं एक -
बरं ते नेहमीचं एक - सनस्क्रीन ( 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त) हे नेहमीचं राहिलं आहे वरच्या लिस्टमधे.
मुळात उन्हाळा आला हे वाचुनच
मुळात उन्हाळा आला हे वाचुनच असं झालं... टीप्स वाचल्या आणि पाळल्या तरी त्रास होणारच आहे उन्हाचा
शक्य असल्यास रात्री, अंगणात
शक्य असल्यास रात्री, अंगणात अथवा गच्चीवर झोपणे. छान झोप लागेल. विजेची बचत होईलच, आणि मध्येच वीज गेली तर झोपमोड होणार नाही. सकाळी लौकर जाग पण येईल.
मध्येच वीज गेली तर झोपमोड
मध्येच वीज गेली तर झोपमोड होणार नाही. सकाळी लौकर जाग पण येईल.>>>>>हो, कारण रात्रभर डासानी कच्च खाऊन टाकलेले असेल.:दिवा::फिदी:
डास असतील तर मच्छरदाणी लावून
डास असतील तर मच्छरदाणी लावून झोपावे.
मध्येच पाऊस आला तर काय
मध्येच पाऊस आला तर काय करायचे? नाहीतर अंथरुण पांघरुण गुंडाळून पळेपर्यंत सगळंच चिंब भिजून जायचं.
मध्येच पाऊस आला तर काय
मध्येच पाऊस आला तर काय करायचे? नाहीतर अंथरुण पांघरुण गुंडाळून पळेपर्यंत सगळंच चिंब भिजून जायचं. स्मित>> इतक्या जोरात येतो पाउस ? आम्ही दोन थेंब पडले कि थोडस वाट बघायचो की खरच विजा चमकुन पाउस जोरदार पडण्याची शक्यता आहे का ते.. नसेल तर इतने शॉवर से झोप कायको खराब करना..तसच झोपायच .. आणि जोरात येईल असं वाटल तर पळायच बिस्तर गुंडाळून.. रम्य त्या आठवणी
टीना +१ Nidhii किनारपट्टीजवळ
टीना +१
Nidhii किनारपट्टीजवळ (त्यापासून १००-२०० किमी) असा अचानक जोरात पाऊस सुरु होतो, की उठुन गादी गुंडाळे पर्यंत भिजुन जाईल.
ऐन पासावसाळा / श्रावण वगळला तर इतरवेळी विदर्भ आणि हैद्राबादला तरी पाऊस हळुहळु सुरु होतो. आधी शिंतोडे येतात. अनेकदा शिंतोडे थांबतात. मग उठावं लागत नाही.
कधी हळुहळु जोर धरु लागतात. मग उठुन गादी गुंडाळायची, घरात जाउन अंथरुन त्यावरच झोपायचं.
मानव, टीना >> हो, आम्ही अरबी
मानव, टीना >> हो, आम्ही अरबी समुद्राच्या अगदी शेजारीच राहतो. त्यामुळे इकडे पाऊस असा अचानकच भयानक रुपात प्रकट होऊन कोसळायला लागतो. त्यामुळे किती उकाडा असला तरी बाहेर झोपणे परवडत नाय आम्हाला.
मला चांगले body lotion +
मला चांगले body lotion + sunscreen असे एकच प्रॉडक्ट हवे आहे, मी नेहेमी lotus चं sunscreen वापरते पण आता मला मिक्स body lotion हवे आहे. कुणी वापरत असल्यास सांगा
सनस्क्रीन हे नेहमी बॉडी
सनस्क्रीन हे नेहमी बॉडी लोशनच्या वरती लावतात. मला हे परवा परवा पर्यंत माहीत नव्हते.
सनस्क्रीन लगानेवालो,
सनस्क्रीन लगानेवालो, व्हिटॅमिन डी माफ नही करेगा.
तेव्हा व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या, सनस्क्रीन वापरत असाल तर.
Olay Total Effects Face
Olay Total Effects Face Moisturizer SPF 30 - हे चांगलंय
धन्यवाद , olay चं घेऊन बघते.
धन्यवाद , olay चं घेऊन बघते.
मला सनस्क्रीनची अॅलर्जी आहे
मला सनस्क्रीनची अॅलर्जी आहे पण डर्मेटॉलॉजिस्टने 'शीअर झिन्क' वापरायला सांगीतले. अजिबात त्रास झाला नाही. मस्त आहे. ड्राय आहे मात्र. मी थोड्या लोशनम्ध्ये मिक्स करुनच लावते.