नमस्कार मायबोलीकर्स,
जुन्या पीआयओ कार्ड ऐवजी ओसीआय कार्ड मिळवण्याबाबत प्रश्न आहेत. एम्बसीच्या साइटवर सगळी माहिती वाचून काढली आहे. ज्या इजन्सी कडे कागदपत्रे पाठवायची आहेत त्यांची चेकलीस्ट एम्बसीच्या चेकलीस्ट पेक्षा वेगळी असल्याने गोंधळ होतोय. कुणाला माहिती असल्यास प्लीज मदत करा.
१. सुरुवातीला अॅप्लीकेशनबरोबर ओरिजिनल अमेरिकन पासपोर्ट पाठवणे गरजेचे आहे की ते नंतर पाठवावे लागते?
२. तुम्ही जर हे अॅप्लीकेशन गेल्या काही महिन्यात केले असेल तर ते प्रोसेस होउन यायला किती वेळ लागला?
३. पीआयओ कार्ड मार्च नंतर वॅलिड आहे की नाही? ( जुलै मध्ये भारतात जायचे आहे. फॉर्म भरुन, सगळे डोक्युमेंट तयार आहेत. पण ओरिजिनल पासपोर्ट बद्दल दोन साइटवर दोन वेगळे नियम वाचल्याने काय करावे समजत नाहीये.)
४. हे अॅप्लीकेशन न करता, आहे ते पीआयो कार्ड, सध्याचा पासपोर्ट (जो पीआयओ कार्ड एन्डोर्स केलेला नाही) आणि जुना अमेरिकन पासपोर्ट बरोबर ठेवला तर वेगळ्या विसाची गरज पडते का? की पीआयओ एन्डॉर्स करु घ्यावेच लागेल?
५. इमिहेल्प वर वाचले (जी सरकारी साइट नाहीये ही कल्पना आहे) की आहे त्या पीआयो वर लाइफलॉन्ग विसा शिक्का मारुन मिळेल. याचा कुणाला अनुभव आहे का?
धन्यवाद!!
How important is to transfer
How important is to transfer sticker on new passport for kids? is it must? do they check oci sticker ]on new passport at india airports?
पुढच्या आठवड्यात पी आय ओ टू
पुढच्या आठवड्यात पी आय ओ टू ओसीआय ट्रान्स्फर करण्यासाठी बी एस आयला जाणार आहे. पासपोर्ट नंतर द्यावा लागतो. बाकी प्रश्नांची उत्तरे धक्का खाऊन आल्यावर लिहितो.
धन्यवाद अमितव!!!
धन्यवाद अमितव!!!
>>>१. सुरुवातीला
>>>१. सुरुवातीला अॅप्लीकेशनबरोबर ओरिजिनल अमेरिकन पासपोर्ट पाठवणे गरजेचे आहे की ते नंतर पाठवावे लागते?
आम्ही पासपोर्ट नंतर पाठवलेला.
>> २. तुम्ही जर हे अॅप्लीकेशन गेल्या काही महिन्यात केले असेल तर ते प्रोसेस होउन यायला किती वेळ लागला?
आम्हाला ~३ महिने लागले , सुरू केल्यापासून.
>> ३. पीआयओ कार्ड मार्च नंतर वॅलिड आहे की नाही? ( जुलै मध्ये भारतात जायचे आहे. फॉर्म भरुन, सगळे डोक्युमेंट तयार आहेत. पण ओरिजिनल पासपोर्ट बद्दल दोन साइटवर दोन वेगळे नियम वाचल्याने काय करावे समजत नाहीये.)
माहिती नाही. अंदाज असा होता की नवीन पीआयो कार्डे देणार नाहीत, पण जुनी पीआयो ग्राह्य धरली जातील.
>> ४. हे अॅप्लीकेशन न करता, आहे ते पीआयो कार्ड, सध्याचा पासपोर्ट (जो पीआयओ कार्ड एन्डोर्स केलेला नाही) आणि जुना अमेरिकन पासपोर्ट बरोबर ठेवला तर वेगळ्या विसाची गरज पडते का? की पीआयओ एन्डॉर्स करु घ्यावेच लागेल?
माझी माहिती जुनी आहे. तेव्हा जुना पासपोर्टत्ठेवला तरी चालत होता.
>> ५. इमिहेल्प वर वाचले (जी सरकारी साइट नाहीये ही कल्पना आहे) की आहे त्या पीआयो वर लाइफलॉन्ग विसा शिक्का मारुन मिळेल. याचा कुणाला अनुभव आहे का?
नाही.
ज्ञाती, इथे देखील तत्सम चर्चा
ज्ञाती, इथे देखील तत्सम चर्चा झाली होती. कृपया पहा
http://www.maayboli.com/node/38815?page=1
सुयोगः तुमच्या प्रश्नांची
सुयोगः तुमच्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी मिळतील.
१. मी हा प्रश्न इथल्या भारतीय काँसुलेटला विचारला... (मुलींचे पासपोर्ट बदललेत). त्यानी सांगितले की तुम्ही व्हिसा घ्या. नवीन On Arrival व्हिसा घेतला.
२. मुंबईला विमानतळावर गेल्यावर दोन्ही गोष्टी बरोबर होत्या.. (OCI पुस्तक, जुना पासपोर्ट, नवीन पासपोर्ट आणि व्हिसा).
३. सिस्टीम मधे नंबर टाकल्याबरोबर त्याना दोन व्हिसा असल्याचे लक्षात आले (OCI , आणि घेतलेला व्हिसा).
४. त्याना न्यूयॉर्क काँसुलेटचे मत ऐकवले.. त्यानी त्याकडे कानाडोळा केला.
५. आता काय करावे म्हणून केस वरिष्ठांकडे गेली.
६. शेवटी OCI आहे , तेव्हा व्हिसाची गरज नाही असे निदान झाले. आणि OCI प्रमाणे छापे दिले.
७. सगळं विमान रिकामे होऊन पुढे गेले तरी आम्ही व्हिसाच्या रांगेतच अडकलो होतो..
आणि हे ही वाचा..
http://nriinformation.com/articles4/index_htm_files/UVisa_Transfer_MHA_C...
पण .. आता परत आल्यानंतर transfer OCI Visa to New Passport हा प्रयत्न करतोय.. पण ती साईट फोटो Upload ला खूप त्रास देतेय. म्हणजे करूच देत नाहीय..
नंद्या, वेका आणि देसाई,
नंद्या, वेका आणि देसाई, धन्यवाद!
ज्ञाती पासपोर्ट नंतर द्यायचा
ज्ञाती पासपोर्ट नंतर द्यायचा असतो.
मागच्या वर्शी २ महिने लागले ओ सी आय दिल्लीवरून सी के जी एस कडे यायला मग पासपोर्ट मॅचिंग करून हातात यायला अजून ३ आठवडे लागले.
मला फोन वर २०१६ मधे पी आय ओ कार्ड वॅलीड राहणार नाही आणि ओ सी आय केलेच पाहिजे असे सांगितले होते.
सी के जी एस वाले फोन वर नीट माहिती देतात असा माझा अनुभव आहे.
सुयोग, मी डिसेंबरमध्ये भारतात
सुयोग,
मी डिसेंबरमध्ये भारतात गेलो होतो तेव्हा स्टिकर असलेला जुना पासपोर्ट नेला नव्हता.
फक्त अमेरिकन पासपोर्ट आणि ओसीआय घेउन गेलो होतो. पण काही प्रॉब्लेम आला नाही.
धन्यवाद फुलपाखरु आणि
धन्यवाद फुलपाखरु आणि त्रिशंकू!
मी एम्बसी मध्ये फोन करण्याचा प्रयत्न केला होता. आता सीकेजीएस ला करते.
नंद्या, फुलपाखरू तुम्ही पासपोर्ट नंतर पाठवला होतात पण ओरिजिनल पीआय ओ कार्ड सुरुवातीला फॉर्म बरोबर पाठवले का?
हो
हो