सवयीत घुसायच्या आधी काही कन्सेप्ट क्लीअर करू इच्छितो.
थापा मारणे आणि बाता मारणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. थापा या कोणालातरी फसवण्यासाठी मारल्या जातात तर बाता या स्वताची टिमकी मिरवण्यासाठी मारल्या जातात.
थापा मारणे आणि अप्रामाणिकपणा यातही माझ्यामते एक मूलभूत फरक आहे. अप्रामाणिकपणा हा कोणाचे तरी नुकसान करण्याच्या हेतूने दाखवला जातो, किंवा त्यात कोणा दुसर्याचे नुकसान होतेच.
पण थापा या नेहमीच एखाद्याला धोका देण्यासाठी असतात असे गरजेचे नाही. त्यात निव्वळ मनोरंजनही शोधता येऊ शकते.
त्यामुळे मी देखील माझा प्रामाणिकपणा कायम जपत थापा मारायचा आनंद आजवर उचलत आलोय.
अर्थात, आपला हेतू नसतानाही आपल्या थापेमुळे कोणी फसवणूक झाल्याच्या भावनेने दुखावला जाण्याची शक्यता असतेच, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे थापा मारण्याच्या सवयीचे कोणतेही समर्थन न करता मी त्याला माझ्या वाईट सवयी या सदराखाली घेतले आहे. तसेच माझ्या इतर वाईट सवयींप्रमाणेच ही देखील तुम्ही आपल्या पदराखाली घ्याल अशी अपेक्षा करत आहे.
माझी पहिली थाप मी वयाच्या कितव्या वर्षी मारली हे नेमके सांगता येणे शक्य नाही. पण ईतर वाईट सवयींप्रमाणेच नक्कीच वयवर्षे आठवणीपलीकडे मारली असावी. त्यामुळे आठवतेय तिथपासून काही रोचक थापा सांगतो. डोण्ट वरी, या लेखात नाही थापा मारणार..
तर,
माझ्या शाळामित्रांमध्ये मी खुबीने एक अफवा पसरवली होती. की माझे आजोबा, पणजोबा व तत्सम पूर्वज स्वातंत्र्यपुर्व काळात जुन्या दक्षिण मुंबईतील वतनदार होते. मुंबई ज्या बेटांची बनली होती त्यातील अर्धे एखाद बेट आमच्या मालकीचे होते. आज मुंबईत जिथे एकेका फ्लॅटची किंमत करोडोंत आणि ईमारतींची अब्जांत आहे, तिथे अश्या कित्येक वसाहती ऊभ्या राहतील एवढी जागा आमच्या मालकीची होती. आजही तशीच राहिली असती तर त्या वडिलोपार्जित संपत्तीतील माझा हिस्सा म्हणून किमान पंधरा-वीस ईमारतींचा तरी मी मालक असतो. पण भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि संस्थानांचे विलीनीकरण झाले तसेच आमची मालमत्ता देखील जप्त झाली. सरकारी नियमाप्रमाणे काहीबाही किंमत लावत मोजक्याच पैश्यात आमची बोळवण करण्यात आली. क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि एकेकाळचे वतनदार रस्त्यावर आले. पण अजूनही कोर्टात आमची केस चालू आहे. खुद्द भारत सरकारविरुद्ध. त्यामुळे जिंकायची आशा कमीच आहे. पण चुकून जिंकलोच तर माझ्या वाटणीचे दोनचारशे करोड कुठे गेले नाहीत
तर, या थापेने कोणाचे नुकसान काही व्हायचे नाही. पण फायदा असा व्हायचा की चारचौघात नकळत एक ईज्जत मिळायची. तीच ईज्जत जी या देशात एखाद्या धनिकाला मिळते. ती मला मध्यमवर्गीय असूनही मिळायची. त्यामुळे एक गोष्ट मी लहानपणीच शिकलो, पैश्याचे सोंग घेता येत नसले तरी ढोंग घेता येते. आणि ते देखील बरेच फायदेशीर असते.
काही थापा मजेशीर असतात. फेकणार्यालाही मजा येते तर झेलणार्याही. अशीच माझी एक फेमस मजेशीर थाप म्हणजे शेजारची मुलगी. माझ्याच वयाची. माझ्यासारखीच एकुलती एक. मग काय, कधी ती माझ्या घरी यायची, तर कधी मी तिच्या घरी जायचो. आणि यातूनच पौगडावस्थेतील किस्से रंगायचे. तितक्याच चवीने ते सांगितले आणि चघळले जायचे. मला गुरू महागुरू अशी ओळख मिळवून देण्यास या किश्यांचाही बराच हातभार होता. प्रत्यक्षात मात्र माझ्या शेजारच्या पाजारच्या पुढच्या मागच्या चारही घरात अशी कोणतीही मुलगी नव्हती.
या गुरू महागुरू वरून आठवले, वाईट सवयींची माझ्या अंगात कमी नसली तरी एखादे तगडे व्यसन मला कधीच नव्हते. अगदी आजही मला माझी वाह्यात ईमेज जपताना मी दारू पित नाही हे एखाद्याला सांगायची चिक्कार लाज वाटते. त्यामुळे मित्रांबरोबर पार्टीला जेव्हा केव्हा चकणा खायला बसतो तेव्हा हळूच त्यांचा ग्लास आपल्यापुढे सरकवत एक फोटो काढून घेतो. तो फोटो सोशलसाईटवर टाकून थोडी फुशारकी मारून घेतो. शाळेत असताना देखील आपला मोठेपणा जपायला मला माझ्या नसलेल्या व्यसनांबद्दल खोटे खोटे मिरवणे गरजेचे व्हायचे. त्या वयात कोणीही मित्र पिणारा नसल्याने त्यांच्यासमोर इंग्लिश दारूची मोठमोठी नावे फेकणेही पुरेसे ठरायचे.
असो, तर आता एक कॉलेजची गंमत सांगतो. माझ्या डब्यात नेहमी भातच असायचा. पिवळा भात, तांबडा भात, पांढरा भात, मसाले भात, कधी पुलाव तर कधी बिर्याणी. परवडून जायचे. बोर नाही व्हायचे. कारण किमान दहाबारा जण तरी नेहमीच जेवायला एकत्र असायचो. याच्या त्याच्या डब्यातील चपाती भाजी खाल्ली की शेवटी माझा भात हा ठरलेला मेनू. कधी आमचे नशीब उघडले की मुलीही जेवायला बरोबर असायच्या. कालांतराने त्यातील काही चाणाक्ष मुलींनी हेरले की या रुनम्याच्या डब्यात नेहमी भातच असतो. तशी विचारणाही केली. मग काय, उत्तरादाखल मी मारली थाप. माझ्या आईला चपात्या बनवता येत नाहीत. म्हटले तर किती निरुपद्रवी थाप. पण बाप, अचानक चिमित्कार घडल्याप्रमाणे त्या मुलींना माझ्याप्रती एक सहानुभूती वाटू लागली. मुलींची सहानुभूती मिळवणे हे देखील प्रेम मिळवण्यापेक्षा काही कमी नाही असे वाटायचे ते वय. त्यामुळे ती थाप कायम रेटली जाईल याचीच काळजी मी घेतली. त्यातल्या एका मुलीने तर कहर केला. ही गोष्ट आपल्या हॉस्टेलवरच्या मैत्रीणींना देखील सांगितली. तसे त्या सर्व जणींना माझ्या वडिलांचेही कौतुक वाटू लागले, जे त्यांनी एका चपात्या न येणार्या बाईबरोबर लग्न केले. एवढी वर्षे सुखाचा संसार केला. माझ्याबद्दल त्या नेमका काय विचार करत होत्या नेमकी कल्पना नाही, पण थाप ईतकी हिट होती की मी एखाद्या मुलीला विचारले असते की माझ्यासाठी चपात्या बनवशील का, तर तो प्रपोज झाला असता.
एक माणूस एका वेळी एकाला थापा मारून फसवू शकतो पण दरवेळी सर्वांनाच थापा मारून फसवू शकत नाही, असे काहीतरी सूत्र आहे. कालांतराने ‘हा तर बघावे तेव्हा फेकतच असतो’ अशी इमेज तयार होतेच. लांडगा आला रे आला होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे काही वेळा आपण खरेच बोलत आहोत हे समोरच्याला पटवून द्यायला आपण शपथेचा सहारा घेतो. तुम्ही सज्जन लोकांनीही कैक वेळा शपथ घेतली असेलच. त्यामुळे मला तर उठता बसता शपथ खाण्याची गरज पडत असणार हे समजू शकता. तर या कामासाठी मी एक सोयीचा देव पकडला होता. त्या देवाची शप्पथ मी धादांतपणे खोटी घ्यायचो आणि यासाठी मला माझे नास्तिकत्व बळ द्यायचे. त्या देवाचे नाव ईथे घेऊन कोणाच्या भावना दुखवायच्या इच्छा नाही, पण हा ऊपाय काम करायचा. जर कोर्टात गीतेची खोटी शप्पथ घेतली जाते तर सीतेची आणि रामाची घेतली तरी काय चुकले, हा विचार लहान वयातही तारून न्यायचा. माझ्यासाठी माझा देव माझी आई होती. त्यामुळे तिची खोटी शप्पथ कोणी घ्यायला लावू नये म्हणून ‘आईची खरी शप्पथही कधी घेऊ नये’ असे तत्व मी माझ्यापुरते बनवले होते.
असो, छोटेमोठे सारेच किस्से आठवून आठवून सांगायला घेतले तर कैक किश्श्यांचे पीक निघेल. तसाही एक वैश्विक नियम आहे थापाडपणतीचा. तुम्ही जितके बोलाल तितके तुमच्याप्रती विश्वासार्हता कमी होत जाते. म्हणून इथेच थांबतो.
तरी जाता जाता अचूक आणि परीणामकारक थापा मारता येण्यासाठी लागणारे तीन गुण अधिकारवाणीने सांगू इच्छितो, ते ऐकाच.
१. आपण जे करतोय ते काही चुकीचे नाही हा विश्वास मनी असला पाहिजे.
किंवा
असेना चुकीचे काय फरक पडतो असा कोडगेपणा अंगी बाणवला पाहिजे.
२. कमालीची तल्लख स्मरणशक्ती हवी. थापेतील बारीक सारीक डिटेल कैक वर्षांनीही गरज पडल्यास लक्षात राहायला हवेत.
किंवा
जर स्मरणशक्ती कच्ची असेल तर वेळप्रसंगी या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता आली पाहिजे.
३. कल्पनाशक्ती, क्रिएटीव्हिटी - हा तो गुण आहे जो थापा मारणे या प्रकाराला कलेचा दर्जा देतो.
आणि थापाड्याला कलावंत बनवतो
आता थांबलाच आहात, तर आयुष्य जगण्याची एक फोटोशॉपीही ऐकून जाल,
जो नेहमी खरे बोलतो त्याचे आयुष्य सिंपल होते, आणि जो खोटे बोलतो त्याचे ईंटरेस्टींग
आपलाच,
- ऋन्म्या
............................................
ता.क. - वाईट सवयींच्या गेल्या एक दोन भागांपासून मी या मालिकेत निव्वळ फेकाफेकी करतोय असा छुपा ओरडा सुरू झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बहुधा लोकांना आता "मी थापा मारतो" हे देखील मी खोटेच बोलतोय असे वाटण्याची दाट शक्यता आहे. (काहीतरी लॉजिक गंडलेल्यासारखे वाटतेय) असो, पण म्हणूनच मला थापा मारता येतात यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठीच म्हणून मायबोलीवर मारलेली ही लेटेस्ट थाप संदर्भासाठी - http://www.maayboli.com/node/57593
चूक भूलथापा देणे घेणे
तुमचाच ऋन्मेष
तळटीप - यावेळी शब्दखूणात ‘लेखन थापा’ टाकेन ईतका पण मी काही हा नाहीये हां
अरे तू गेला होतास ना ? की
अरे तू गेला होतास ना ? की त्याही थापा होत्या ?
अरे थापा होत्या रे त्या पण !!
अरे थापा होत्या रे त्या पण !!
अरे मला वाटलं की तो संशोधकला
अरे मला वाटलं की तो संशोधकला नवीन इनिंग साठी थोडा स्कोप देइल पण कुठलं काय !
अर्र, मला बरं वाटलेलं अखेरचा
अर्र, मला बरं वाटलेलं अखेरचा निरोप बीबी वाचून. थापा नाहीत, खरंच. ह्यापुढे तुझे पकाऊ बीबी दिसणार नाहीत म्हणून हुश्श वाटलं होतं. पण त्या थापाच होत्या का? जळ्ळं मेलं लक्षण
असो, हे वर लिहिलेलं वाचलेलं नाही तेव्हा नो कमेंट्स.
वरचं वाचलं नाही. वाचायची
वरचं वाचलं नाही. वाचायची इच्छा नाही, तुझा सुरुवातीला राग आला तरी नंतर प्रतिसाद/ जनरल अॅटीट्युड याने बराच सुसह्य होतास. आता नाही. गुडलक. बाय.
रुनमेषा, माणूस गेल्यावर लोक
रुनमेषा, माणूस गेल्यावर लोक त्याच्याबद्दल कसे चांगले बोल्तात ते समजले असेल ना तुला ? का बोल्तात तेही समजून घे
अरे वा! मजा आली. माझ्या ७८६
अरे वा!
मजा आली.
माझ्या ७८६ शुभेच्छांनी तू परत आलास.
'आईला चपात्या बनवता येत नाहीत' ही मस्तं थाप आहे.
रिअली इंटरेस्टींग!
माझा मुलगा निदान हे वाक्य तरी खरं म्हणून बोलु शकेल.
पुनर्जन्म घेऊन किंवा
पुनर्जन्म घेऊन किंवा प्लास्टिक सर्जरीने चेहरा, शरीरयष्टी, उंची, आवाज, रंग बदलून परत येण्यताली मजा 'मी गेलो' असं सांगून दाराबाहेर लपून पाचच मिनिटांनी भ्भो करण्यात नाही.
ये दिन भी देखना बाकी था?
ये दिन भी देखना बाकी था?
बहुतेक मायबोलीला साडेसाती
बहुतेक मायबोलीला साडेसाती सुरू आहे हो दुसर काही नाही.
रश्मी, कसे शोधता तुम्ही नेमके
रश्मी, कसे शोधता तुम्ही नेमके फोटो? तुम्ही काही न लिहिता नुसते फोटोज टाकलेत तर माझ्या फेव्हरिट्स मायबोलीकरांच्या लिस्टित याल. त्वरा करा. एक जागा नुकतीच रिकामी झाली आहे.
ये, कसला थापड्या आहेस रे तू.
ये, कसला थापड्या आहेस रे तू. बरं झालं आलास परत. आता रोज एक येऊ देत उपवास सोड तुझाही आणि आमचाही.
ऋ, कुठे गायबला होतास? येऊ देत
ऋ, कुठे गायबला होतास? येऊ देत धागे..
वरच्या थापा मस्त आहेत ..
थापाड्या कुठचा. मला वाटलंच
थापाड्या कुठचा.
मला वाटलंच होतं. तुमसे ना होगा.
सहि है अखेरचा निरोप
सहि है
अखेरचा निरोप धाग्यावरचा माझा प्रतिसाद देन्या अगोदरच हा धागा आला होता
सो सोरी:-)
येऊ दे अजून ...............
रश्मी, एकदम मार्मिक फोटो!
रश्मी, एकदम मार्मिक फोटो!
.... <<आता रोज एक येऊ देत
....
<<आता रोज एक येऊ देत उपवास सोड तुझाही आणि आमचाही........>>काय रोज एक ? नाऽऽऽऽऽऽऽऽहि... नाऽऽऽऽऽऽऽऽहि.
.
@_मनाली_ संशोधक हा त्याचाच
@_मनाली_
संशोधक हा त्याचाच ड्यू आय डी आहे असे वाटते
संशोधक हा त्याचाच ड्यू आय डी
संशोधक हा त्याचाच ड्यू आय डी आहे असे वाटते >>
+१
"चाचणी" या धाग्यवर खरे नवे सदस्य जेवढी चाचणी करतील त्यापेक्षा अमंळ जास्तच केलेली आहे. आपल्या नजरेत भरावी म्हणुन.
- शेरलॉक नवीमुंबईकर
कालांतराने ‘हा तर बघावे
कालांतराने ‘हा तर बघावे तेव्हा फेकतच असतो’ अशी इमेज तयार होतेच.
>>
झाली आहेच की !
रश्मी आणि मनाली, काय फोटु टाकलात तुम्ही. भारीच आहे.
चाचणीचा धागा कुठला? जरा विस्कटून सांगाल काय?
रुन्म्या, हा शुद्ध हलकटपणा
रुन्म्या, हा शुद्ध हलकटपणा आहे
वाटलच होतं ड्रामेबाजी चालु
वाटलच होतं ड्रामेबाजी चालु आहे ते !
बाकी ॠण्मेस नी थापा मारल्या असल्या तरी अखेरचा निरोप वाचून आनंदानी हुश्श केलेले प्रामाणिक होते /आहेत
ऋन्मेश वेल्कम बॅक. तुझा धागा
ऋन्मेश वेल्कम बॅक. तुझा धागा बघुन मला आनन्द झाला.... त्या पेक्षाही तु परतोनी आलास याचा आनन्द मला शब्दात सान्गता येणार नाही.
तु लिही रे.... मन मोकळे पणाने लिही... आम्ही वाचनाचा आनन्द घेत आहोत.
पुढिल लेखनास शुभेच्छा.
<<बाकी ॠण्मेस नी थापा मारल्या
<<बाकी ॠण्मेस नी थापा मारल्या असल्या तरी अखेरचा निरोप वाचून आनंदानी हुश्श केलेले प्रामाणिक होते /आहेत स्मित>>
----- कुठल्याही आय डीने एका विशिष्ट अशा मानसिक स्थितीमधे घेतलेला अखेरचा निरोप वाचून आनन्दानी हुश्श करणारा अस्सल मायबोलीकर नाही आहे. ज्यान्नी ज्यान्नी हुश्श केले असेल त्यान्ना गेली ३ दिवस किती त्रास झाला होता हे स्वतः ला सान्गा. अस्सल मायबोलीकर सर्व प्रकारच्या विचारधारान्ना सामावुन घेणारा आहे. उलट "ऋन्मेशचे जोरदार वेलकम करण्याचा धागा काढावा का ?" असा नवा धागा काढण्याचा माझा विचार आहे.
टिपः पर्यायच नसेल तर पुन्हा येण्याचे स्वागत करायला काय हरकत आहे ? दुखावले मन अजुन ढिगभर धागे गुम्फत बसेल मग आ बैल मुझे मार असे नको व्हायला.
"ऋन्मेशचे जोरदार वेलकम
"ऋन्मेशचे जोरदार वेलकम करण्याचा धागा काढावा का ?" असा नवा धागा काढण्याचा माझा विचार आहे.>>नऽऽऽऽऽऽऽऽहि... नऽऽऽऽऽऽऽऽहि , उदय कह दो कि ये झूठ है />
<<नऽऽऽऽऽऽऽऽहि... नऽऽऽऽऽऽऽऽहि.
<<नऽऽऽऽऽऽऽऽहि... नऽऽऽऽऽऽऽऽहि. कह दो कि ये झूठ है />>
----- छान नकार दिलेला आहे...
लोक खरंच इतके ओव्हर रीअॅक्ट
लोक खरंच इतके ओव्हर रीअॅक्ट का होतात कळ्त नाही? ऋ असला काय नसला काय फरक पडतो का? भारंभार धागे काढतो. त्याचाही त्रास का व्हावा? मायबोलीवर एखाद्याच्या असण्याने नसण्याने जाण्याने परतुन येण्याने इअतका काय फरक पडत असेल? स्वतःबद्दल पण जरा विचार करा. की आपण असलो काय आणी नसलो काय कुणाला खरंच फरक पडेल का?
खरंच जा.
माबोची साडेसाती गेली.
माबोचे चांगले दिवस आलेत.>>> सिरीयसली?
<<<<<<लोक खरंच इतके ओव्हर
<<<<<<लोक खरंच इतके ओव्हर रीअॅक्ट का होतात कळ्त नाही? ऋ असला काय नसला काय फरक पडतो का? भारंभार धागे काढतो. त्याचाही त्रास का व्हावा? मायबोलीवर एखाद्याच्या असण्याने नसण्याने जाण्याने परतुन येण्याने इअतका काय फरक पडत असेल? स्वतःबद्दल पण जरा विचार करा. की आपण असलो काय आणी नसलो काय कुणाला खरंच फरक पडेल का?
खरंच जा.
माबोची साडेसाती गेली.
माबोचे चांगले दिवस आलेत.>>> सिरीयसली?>>>>>>>>
@ सस्मित
लोक गम्मत करतात हो थोडी
आणि अस ऋन्मेषच्या बाबतीत घडायला तो स्वतःच जबाबदार आहे , सतत बढाया मारण ,थापेबाजी करण हयामुळे त्याची इमेजच अशी झाली आहे की काही लोकांना त्याच्या जाण्याने आनंद झाला होता आणि तसही बाकीचे कुणी माबो सोडून गेले तरी त्याची अशी जाहिरातबाजी करत नाहीत
त्याच्या 'अखेरचा निरोप' ह्या धाग्यावर कितीतरी जणांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या कारण लोकांना वाटल कि तो खरच एखाद्या अडचणीत आहे , पण ह्याने काय केल ? खोट रडगाण गाऊन गम्मत बघत होता
उद्या जर दिनेशदा ,साती , मामी किंवा नंदिनी ह्यांच्यासारख्या एखाद्या आयडीने जर माबो सोडण्याचा निर्णय घेतला तर लोक असे रीअॅक्ट होतील का ?
अजिबात नाही उलट सगळेजण त्यांना माबो न सोडण्याचा आग्रह करतील
मी संशोधक नाहीये. ना नावाने
मी संशोधक नाहीये.
ना नावाने ना स्वभावाने.
गंमत एवढीच की जेव्हा मी नवा माबोकर होतो तेव्हा मला कोणाचा तरी ड्यू आयडी म्हटले जायचे.
आज कोणाला तरी माझा ड्यू आय म्हटले जातेय.
याला प्रगती म्हणावे की अधोगती
असो, मध्यंतरी काही कारणांमुळे माबोपासून दूर होतो. त्यात तब्येत हे एक मुख्य कारणही होतेच. तसा उल्लेखही केलेला एके ठिकाणी. नंतर ती बरी झाली पण दुसर्या एका कारणाने आणखी काही काळ दूर राहणे भाग होते. मध्ये एकदा माबोवर चक्कर टाकायचा मौका आला तर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उचलत (माझी वाईट सवय ६ - थापा मारणे संदर्भासहित स्प्ष्ट करायला) अखेरच्या निरोपाचा किडा केला ईतकेच
अहो मयेकर काही वेळेस शब्दच
अहो मयेकर काही वेळेस शब्दच बोलत नाहीत तर फोटोच जास्त बोल्तो.:फिदी: पण मला या पेक्षा जास्त फनी चित्र टाकायचे होते, पण साईजमध्ये बसेना.
ऋ, काय हे!
Pages