------ पश्चाताप -------
नव्हतोच कधी मी
वस्त्र परीटघडीसम शुभ्र
सांधू कुठे नात्याला
सारे फाटलेले माझे अभ्र
…………….. उशीरच झाला जरासा
अर्धोर्न्मीलीत कळ्यांचा गजरा
मुग्ध निश्वासतो मोगरा
न माळता केसात
मोजीतो घटका पूडीत
…………….. उशीरच झाला जरासा
नभ आले ओथम्बून
जल बरसी तुझे नयन
न आले मज गहीवरून
शोधीतो मी इंद्रधनूची उधळण
…………….. उशीरच झाला जरासा
कसलीही ना मज तमा
ओलान्डली मग तूही सीमा
न फूटते नव-पालवी ह्या प्रेमा
सैरवैर माधव शोधीशी रमा
…………….. उशीरच झाला जरासा
ना उरली लक्ष्मी आता सहिष्णू
भूमी अवतरले मग श्रीविष्णू
न सुटले त्यांसही कोडे संसाराचे
फेडीता कर्ज अवघे विश्व-निर्मीतीचे
…………….. उशीरच झाला जरासा
कृष्ण खरेच का माझे कर्म
निसर्गही नेमाने पाळतो धर्म
तुजविण रीते क्षण, जणू एक पर्व
मग उमजला शून्याचा गर्व
.....उशीर झाला बराचसा
-स्वप्नाली
(19/02/2016)
उत्तम काव्यनिर्मिती
उत्तम काव्यनिर्मिती
(No subject)