Submitted by विदेश on 14 February, 2016 - 01:30
जाळे पुढे पसरण्या विसरून कोण गेली
माशास या उचलण्या विसरून कोण गेली
एका स्मितातुनीही घायाळ मज समजता
उपचार पूर्ण करण्या विसरून कोण गेली
काहूर स्पंदनांचे ह्रदयात माजवूनी
हृदयासनात बसण्या विसरून कोण गेली
नयनात भावसुमने हलकेपणी उमलता
नजरेमधून टिपण्या विसरून कोण गेली
घेऊन मीलनाच्या चंद्रासमोर शपथा
बाहूत मज बिलगण्या विसरून कोण गेली ..
.
..............विजयकुमार देशपांडे
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा