ज्योतिष आणि शरीर.....
जातकाचे रंग रुप हे चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग व
चंद्र व लग्न नक्षत्रावर अवलंबुन असते .
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना त्यामधील समजलेले काही ग्रहयोग.
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
2. चंद्राबरोबर शनि असल्यास किंवा चंद्रावर द्रुष्टी टाकत असल्यास व जेव्हा चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
3.शनीची तीसरी व दहावी द्रुष्टी चंद्रावर असेल व जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
4.वरील उदाहरणांमध्ये जेव्हा लग्न व चंद्राबरोबर जेव्हा,गुरु,सुर्य,मंगळ,
बुध युती किंवा प्रतियोग साधतात तेव्हा ते जातकाचा काळेपणा कमी करतात .
5.सिंह लग्न व सिंह रास असलेल्या जातकांवर मात्र याचा परिणाम होत नाही पण सिंह लग्न व सिंह रास असलेली माणस काळी सावळी नसतातच अस नाही .
6.चंद्रा बरोबर जेव्हा शुक्र युती किंवा प्रतियोग करत असतो तेव्हा जातक रंगाने गोरा असतो पण त्याचवेळी जेव्हा शनि लग्न किंवा सप्तमात असतो तेव्हा गोरेपण कमी करतो .
7.चन्द्र व सूर्य युती किंवा प्रतियोग जातकाला उजळ बनवते .
8.लग्न किंवा चंद्रावर शनीची द्रुष्टी असता जातकाच्या भुवया जाड असतात आणि एकमेकांशी जोडलेल्या असतात .
9.या व्यतीरीक्त ,रास,नक्षत्र ,लग्न रास , चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग ,ग्रहांची बारा स्थानांतील व राशीतील फळे जातकाचे रंग रुप ठरवतात .
ज्योतिष आणि शरीर .......
Submitted by y2j on 12 February, 2016 - 06:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुढे बघा याचा गोरेपण थोडा कमी
पुढे बघा याचा गोरेपण थोडा कमी होईल.भूवया जाड असतिल .
(No subject)
निनाद१ तुम्ही काळा रंग
निनाद१ तुम्ही काळा रंग सांगितला असता तर हे म्हणाले असते पुढे बघा हा थोडा उजळेल
पुढे बघा याचा गोरेपण थोडा कमी
पुढे बघा याचा गोरेपण थोडा कमी होईल.भूवया जाड असतिल >>
आधी सांगतात किंचीत गोरा आहे मग सांगतात पुढे बघा याचा गोरेपणा कमी होईल म्हणजे भविष्यात पोरग सावळे सुंदर होणार? असे म्हणायचे आहे का?
पगारे मी त्यानं गोराच म्हणालो
पगारे मी त्यानं गोराच म्हणालो अस म्हणायचे असते तर सावळा म्हणालो असतो गोरे पणात पण किंचित गोरा आणि एकदम गोरा असा फरक असतो .
तुम्ही म्हणालात दुधासारखा
तुम्ही म्हणालात दुधासारखा गोरा आहे म्हणून मी म्हटल की गोरेपणा थोडा कमी होईल. सावळा होईल अस म्हणालोच नाही .
निनाद१, मुलगा तुमच्यावर गेलाय
निनाद१, मुलगा तुमच्यावर गेलाय कां??
y2j, तुमची पत्रिका पाहण्याची
y2j, तुमची पत्रिका पाहण्याची गरज नाही.. तुम्ही कोलांटीउडी मारणारे एक्स्पर्ट आहात हे नक्की.
विठ्ठला त्याला मी गोराच
विठ्ठला त्याला मी गोराच म्हणलो या एव जी काळा किंवा सावळा
म्हणलो असतो तर ती कोलांटीउडी ठरली असती थोडे वाचून बोलत जा .
चला मीच रहस्यभेद करतो एक तर
चला मीच रहस्यभेद करतो
एक तर माझे लग्न झाले नाही
दुसरे म्हणजे वरील पत्रिका माझ्या मित्राच्या मुलाची आहे जो जरा जास्त सावळा देखणा आहे..
मी फोन करून त्याच्या मुलाची जन्म तारिख आणि वेळ ठिकाण मागवले होते. त्यावरून नेटवरून कुंडली काढून इथे दिली.
निनाद१, आणखी थोडा वेळ चालु
निनाद१, आणखी थोडा वेळ चालु राहु द्यायचे होते की.
नीनाद त्या सावळा देखण्यआ
नीनाद त्या सावळा देखण्यआ मूलाचा फोटो पाहायला मिळेल का .
क्षमा असावी. लहान मुलांचे
क्षमा असावी. लहान मुलांचे फोटो दिले जात नाही. हवे तर मी आपणास त्याच्या वडिलांचा फोटो देऊ शकतो.
नीनाद तुम्हाला काहीही करून
नीनाद तुम्हाला काहीही करून मला खोटेच ठरवायच होत त्यामुळे तुमचे सगळ वागणे संशयास्पद आहे यावरुंन कोलांटीउडी कोण मारत
आहे हे दिसत आहे .
एक भाबडा प्रश्न कुंडली फक्त
एक भाबडा प्रश्न
कुंडली फक्त भारतात बनवतात का सा-या जगात?
सम्पूर्ण जगात .
सम्पूर्ण जगात .
मग ती (कुंडली) बनवण्याचं
मग ती (कुंडली) बनवण्याचं शास्त्र सगळीकडे सारखंच असतं,का व्यक्तीपरत्वे बदलतं?
मला फक्त् सावळा देखण्यआ
मला फक्त् सावळा देखण्यआ मूलाची झलक बघायची तुमचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी .
अजिबात नाही. मला चेष्टा
अजिबात नाही. मला चेष्टा करायची असती तर मी अजुन बरेच काही केले असते.
मी माझा वर्ण सांगितला होता त्यावरून आपण माझ्या मुलाचा वर्ण सांगत होता. जर मुलगा खरच सावळा असेल तर वडील कितीही गोरा असेना पत्रिकेत सावळा म्हणूनच यायला हवा ना.
म्हणून मी मिसमॅच करून आपणास सांगितले. आपण सावळा बोलला असतात तर मी होच म्हणालो असतो.
जगात astrology चे बरेच प्रकार
जगात astrology चे बरेच प्रकार आहेत .
मग त्या अनेक प्रकारांनी जर
मग त्या अनेक प्रकारांनी जर एकाच व्यक्तीची कुंडली बनवली तर ती एकसारखीच असते की त्यात काही बदल होतात?
नीनाद अस थोडीच आहे की वडील
नीनाद अस थोडीच आहे की वडील काळ असतिल तर मुलगा ही काळा हवा किवा मुलगा काळा असेल तर त्याचे वडिल ही काळ पाहिजेत .तुम्ही म्हणालात की " मी माझा वर्ण सांगितला होता त्यावरून
आपण माझ्या मुलाचा वर्ण सांगत होता. "अजिबात नाही असे असते तर पुर्ण गोरा म्हणालो असतो "याचे कारण मी सांगितलेले की कर्कच्या गुरूची चंद्रावर द्रुष्टी व व्रुशिक रास यामूळे हा मुलगा किंचित गोरा असणार असे म्हटलं होते .
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल
आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा
प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व
सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने
काळा असतो . 4.वरील उदाहरणांमध्ये जेव्हा लग्न व चंद्राबरोबर
जेव्हा,गुरु,सुर्य,मंगळ,
बुध युती किंवा प्रतियोग साधतात तेव्हा ते
जातकाचा काळेपणा कमी करतात . यावरुन माझ म्हणणे सिद्ध होते .
सचिन पगारे साहेब, तूम्ही
सचिन पगारे साहेब, तूम्ही आफ्रिकन लोकांना उद्देशून जो शब्द वापरला आहात तो सध्या अपशब्द मानतात. त्यांना तूम्ही काळे म्हणू शकता. इजिप्त, मोरोक्को. अल्जीरिया हे देशही आफ्रिकेतच आहेत आणि तिथले बहुतांशी लोक वर्णाने उजळच आहेत.
<< दुधान भरलेल्या पातेल्यात
<< दुधान भरलेल्या पातेल्यात बसविल्यावर गायब होईल असा रंग हाय. आनं तुम्ही किंचित म्हणाय ?>>
------ दुध गाईचे, म्हशीचे का बकरीचे आहे ? त्यान्च्या कुन्डल्या पण विचारात घ्यायला हव्यात. पुर्ण पडताळणी न करता अज्ञाताच्या ज्ञानाला टिकेचा विषय बनवू नका...
निव्वळ मुलाच्या रन्गावरुन ग्रह, तार्यान्च्यी स्थिती आणि कक्षा सान्गता येतात एव्हढे हे तन्त्र आज विकसित झाले आहे. या साठी किमान ३ वेगवेगळे रन्ग हवेत... ज्याप्रमाणे Global Positioning Satellite (GPS) तन्त्रात पृथ्वी विश्वातले अचुक स्थळ शोधण्यासाठी किमान ३ उपग्रह लागतात अगदी त्याच प्रमाणे येथे ग्रहान्ची कक्षा/ स्थिती समजण्यासाठी किमान ३ वेग-वेगळे रन्ग (लाल, काळा, पान्ढरा) असणे आवश्यक आहे...
खात्री न करतात निव्वळ नावे ठेवणे सोपे आहे, त्यापेक्षा काही सकारात्मक करता येत का हे प्रयत्न व्हायला हवेत. ह्या क्षेत्रात सरकारने आणि खाजगी उद्योग्गान्नी पैसा उपलब्द करुन मोठी गुन्तवणुक करायला हवी. सर्व जगभरातुन लोक भारतात मुलान्चे रन्ग ओळखायला आणि त्यावरुन ग्रहान्ची स्थिती जाणायला येतील...
<<सचिन पगारे साहेब, तूम्ही
<<सचिन पगारे साहेब, तूम्ही आफ्रिकन लोकांना उद्देशून जो शब्द वापरला आहात तो सध्या अपशब्द मानतात. >>
------ रश्मी यान्नी यावर सल्ला दिलेला आहे...
ते (व इतरही) अशी चुक पुन्हा करणार नाही अशी अपेक्षा... असाच विचार भारतातल्या जाती, वर्णा बद्दलही व्हायला हवा. प्रत्येक गोष्ट कायद्यानेच व्हायला हवी असे नाही.... कायद्याने बदल हा सर्वात शेवटचा मार्ग आहे. आपण स्वत: काही बदल घडवू शकतो. आपण अगदी सहजपणे (अर्थात जाणतेपणी दुखवण्याचा उद्देश नसतो) असे शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात वापरतो.
उदय वायफळ बड़बड़ बंद करा .
उदय वायफळ बड़बड़ बंद करा .
<<उदय वायफळ बड़बड़ बंद करा
<<उदय वायफळ बड़बड़ बंद करा .>>
----- त्यात वायफळ बडबड काय आहे ?
ज्योतिष विषयातील चर्चा
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह तयार केला आहे.
हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.
ज्योतिष विषयावर
माहितेची देवाण घेवाण,
सल्ला मसलत,
कुंडलीची चर्चा,
बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा,
नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय,
अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे.
या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या समुहात ज्योतिष खरे की खोटे ही चर्चा निषिद्ध आहे!
तसेच ज्योतिष या विषया व्यतिरिक्त इतर कोणतेही फॉर्वर्डसना परवानगी नाही, प्रसंगी समुह दिवसेंदिवस थंड राहिला तरी चालेल!
समुहात सामील होण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक निरोपाने अथवा विपु मध्ये कळवावा.
आपला नम्र
निनाद
Pages