ज्योतिष आणि शरीर.....
जातकाचे रंग रुप हे चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग व
चंद्र व लग्न नक्षत्रावर अवलंबुन असते .
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना त्यामधील समजलेले काही ग्रहयोग.
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
2. चंद्राबरोबर शनि असल्यास किंवा चंद्रावर द्रुष्टी टाकत असल्यास व जेव्हा चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
3.शनीची तीसरी व दहावी द्रुष्टी चंद्रावर असेल व जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
4.वरील उदाहरणांमध्ये जेव्हा लग्न व चंद्राबरोबर जेव्हा,गुरु,सुर्य,मंगळ,
बुध युती किंवा प्रतियोग साधतात तेव्हा ते जातकाचा काळेपणा कमी करतात .
5.सिंह लग्न व सिंह रास असलेल्या जातकांवर मात्र याचा परिणाम होत नाही पण सिंह लग्न व सिंह रास असलेली माणस काळी सावळी नसतातच अस नाही .
6.चंद्रा बरोबर जेव्हा शुक्र युती किंवा प्रतियोग करत असतो तेव्हा जातक रंगाने गोरा असतो पण त्याचवेळी जेव्हा शनि लग्न किंवा सप्तमात असतो तेव्हा गोरेपण कमी करतो .
7.चन्द्र व सूर्य युती किंवा प्रतियोग जातकाला उजळ बनवते .
8.लग्न किंवा चंद्रावर शनीची द्रुष्टी असता जातकाच्या भुवया जाड असतात आणि एकमेकांशी जोडलेल्या असतात .
9.या व्यतीरीक्त ,रास,नक्षत्र ,लग्न रास , चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग ,ग्रहांची बारा स्थानांतील व राशीतील फळे जातकाचे रंग रुप ठरवतात .
ज्योतिष आणि शरीर .......
Submitted by y2j on 12 February, 2016 - 06:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काळा आहे की गोरा हे जाणून
मी काळा आहे की गोरा हे जाणून घ्यायला मूळात मी कुंडली घेऊन ज्योतिषाकडे जाईनच कशाला?
तुला कोण बोललय ज्योतिषाकडे जा
तुला कोण बोललय ज्योतिषाकडे जा म्हणून .
हे आफ्रिकेत पण लागु आहे का
हे आफ्रिकेत पण लागु आहे का निग्रो लोकांना?
असणार .
असणार .
आणि युरोपियन श्वेतवर्णिय
आणि युरोपियन श्वेतवर्णिय लोकांनाही?
हो .पण तुमचा या शास्त्रावर
हो .पण तुमचा या शास्त्रावर विश्वास दिसत नाही असे वाटते .
एक विचारायचे होते. मुलगा
एक विचारायचे होते.
मुलगा जन्माला आल्यानंतर त्याची पत्रिका बनते ना? मग जन्माला आल्यानंतर रंग आपोआप कळतो. आयुष्यभर हाच रंग राहणार आहे का हे जाणून घ्यायला ज्योतिषाकडे जावे असे आपले म्हणणे आहे का?
की आई वडिलांच्या पत्रिकेवरून मुलाचा रंग कसा असेल हे ज्योतिष सांगू शकतात असे आपले म्हणणे आहे?
कृपया स्पष्ट करा.
मी भयंकर गोरा आहे अगदी पिठाच्या गिरणीत काम करणारा वाटेल इतका. आणि माझी बायको मात्र गव्हाळवर्णिय आहे. अतिगोरा रंगामुळे मला शाळेत फार चिडवत होते म्हणून मला मुलं बायकोच्या रंगाची हवी यासाठी शनी कुठल्या घरात असावा गुरूला कुठल्या घरात बसवू? कृपया सांगावे.
7.चन्द्र व सूर्य युती किंवा
7.चन्द्र व सूर्य युती किंवा प्रतियोग जातकाला उजळ बनवते.::::::::::. निग्रो व्यक्तिचा ग्रहयोग 7 नंबरप्रमाणे असेल तर ती श्वेतवर्णिय होइल का?
ते होणे शक्य नाही ग्रहांची
ते होणे शक्य नाही ग्रहांची कुंडली मधील स्थान आपण बदलू शकत नाही .
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .)))))))) युरोपियन श्वेतवर्णिय कुटुंबात एखादे बाळ जन्माला आले नि त्याचा ग्रहयोग हा नंबर 1 प्रमाणे असेल तर ते बाळ काळे होउ शकते?
हे आफ्रिकेत पण लागु आहे का
हे आफ्रिकेत पण लागु आहे का निग्रो लोकांना?>>>>सचिन पगारे, तुम्ही परदेशात जर गेलात ( युरोप्,अफ्रिका,अमेरीका इत्यादी ) तर तिथे निग्रो लोकाना चूकुनही निग्रो वा निगर म्हणून नका, त्याना तसे म्हणणे हा तिकडे फार मोठा अपराध समजला जातो. उगाच काहीतरी बोलाल आणी बसाल हवा खात. हा फु सल्ला मी न मागता दिलाय, कारण तुम्हाला त्यातले काही माहीत नाही असे दिसतेय. तेव्हा आधी माहिती करुन घ्या मग बोला.
रश्मि माहितिबद्दल धन्यवाद.
रश्मि माहितिबद्दल धन्यवाद.
रश्मि ह्यांचा सल्ला मानुन
रश्मि ह्यांचा सल्ला मानुन वरील प्रश्नात पुढील बदल करत आहे.
7.चन्द्र व सूर्य युती किंवा प्रतियोग जातकाला उजळ बनवते.::::::::::. क्रुष्णवर्णिय जोडप्याच्या बाळाचा ग्रहयोग
7 नंबरप्रमाणे असेल तर ते बाळ श्वेतवर्णिय होइल का?
अरेच्या माझ्या प्रश्नाला
अरेच्या माझ्या प्रश्नाला उत्तर दिले नाही
रश्मी - सहमत.... सचिन - काळे
रश्मी - सहमत....
सचिन - काळे किव्वा शुद्ध मराठीत ब्लॅक
असा शब्द आहे.
<< तुमचा या शास्त्रावर विश्वास दिसत नाही असे वाटते>>
------- वरिल प्रकाराला शास्त्र म्हणणे चुकीचे आहे, त्याने लोकान्चा गैरसमज होतो.... तुम्ही काय वाट्टेल ते लिहा पण एक विनन्ती आहे ह्या प्रकाराला शास्त्र म्हणू नका.
२०१६ मधे जग ग्रॅव्हिटी व्हेव चा अभ्यास करतो आहे... आणि आपण निव्वळ थापेबाजीच्या आधाराने भोळ्या जनतेला लुबाडतो आहे...
<<8.लग्न किंवा चंद्रावर शनीची
<<8.लग्न किंवा चंद्रावर शनीची द्रुष्टी असता जातकाच्या भुवया जाड असतात आणि एकमेकांशी जोडलेल्या असतात .>>
------- जगातल्या सर्व जाड भुवया असणार्या लोकान्ना, तसेच प्राण्यान्ना ऑस्ट्रेलियात नेल्यास चन्द्राच्या कक्षेवर काय परिणाम होतील किव्वा जगातल्या सर्व काळ्या लोकान्नी (सोबत काळ्या रन्गाच्या प्राण्यान्ना) युरोपात स्थलान्तर केल्यास चन्द्र, शुक्रावर काय परिणाम होतील हे तपासुन पहाणे महत्वाचे आहे.
पगारे बराक ओबामा यांच्या
पगारे बराक ओबामा यांच्या कुंडली मधे मी सांगितलेले योग आहेत .ते आहेत निग्रो .
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
2. चंद्राबरोबर शनि असल्यास किंवा चंद्रावर द्रुष्टी टाकत असल्यास व जेव्हा चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
3.शनीची तीसरी व दहावी द्रुष्टी चंद्रावर असेल व जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .>>>>
म्हणजे अफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या कुंडलीमधे वरीलपैकी एक गोष्ट नक्की असणारच!
नीनाद तुमच्या प्रश्नाला उत्तर
नीनाद तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे तुम्ही म्हणालात की तुमची बायको गव्हाळवर्णिय आहे म्हणून मी म्हणालो की तुमच्या बायकोची कुंडली बदलने अशक्य आहे .
बरोबर चीकु .
बरोबर चीकु .
उदाहरणे 1.barak obama-लग्न
उदाहरणे 1.barak obama-लग्न स्थानांत शनि 2.cricketer pollard -चंद्र शनि युती 3.cricketer brian lara -चंद्र शनि प्रतियोग 4.african crickter rabada - चंद्र शनि युती
cricketer dwyane bravo -
cricketer dwyane bravo - चंद्र शनि युती
cricketer kevin cooper -
cricketer kevin cooper - चंद्र शनि प्रतियोग
पण हे समजून घ्यायला ज्योतिष
पण हे समजून घ्यायला ज्योतिष शास्त्राची तोंड ओळख तरी लागते .
कुंडलीत चंद्र आहे म्हणून
कुंडलीत चंद्र आहे म्हणून तुम्ही लगेच तोंड काळं करता हे समजल्यावर कशाला करायचीये तोंड ओळख?

वैद्यबुवा मुद्द्यांवर बोला की
वैद्यबुवा मुद्द्यांवर बोला की .
नको नको! मला माझ्या कुंडलीत
नको नको! मला माझ्या कुंडलीत तुमचा नं ८ चा योग यील की काय ह्याची फार भिती वाटते. तुमचं चालू द्या. मी माझं काळं करतो (तोंड).

Barak Obama's skin color is
Barak Obama's skin color is lighter because his mother was white (or darker because his father was an african)
If you are saying that the reason his mother is white is because of the planets in his horoscope .... then...
<<उदाहरणे 1.barak obama-लग्न
<<उदाहरणे 1.barak obama-लग्न स्थानांत शनि 2.cricketer pollard -चंद्र शनि युती 3.cricketer brian lara -चंद्र शनि प्रतियोग 4.african crickter rabada - चंद्र शनि युती>>
------ तुम्ही किती लोकान्चे असे सॅम्पल घेतले आहे? जगाची लोकसन्ख्या ७,४०१,४३३,७०३ आहे, सर्वान्चीच कुन्डली तयार करणे अशक्य आहे. पण आजकाल कुन्डली तयार करायला फास्ट कॉम्पुटरचा वापर होतो.
<<मी माझं काळं करतो
<<मी माझं काळं करतो (तोंड).>>
------ जोपर्यन्त गुरुचे पाठवळ आहे तो पर्यन्त शुक्र - शनी युती तुम्हाला तोन्ड गोरे ठेवायला भाग पाडेल.
Pages