नमस्कार मंडळी !
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण मायबोलीकर २०१० सालापासून (गतवर्षीचा अपवाद वगळता) काही ना काही उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमांना नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभत असतो. तर याही वर्षी सहर्ष घेऊन येत आहोत असेच काही उपक्रम.
हे वर्ष श्री. गो. नी. दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा हा उपक्रम-सोहळा गोनीदांना सादर समर्पित करत आहोत.
गो. नी. दांडेकर म्हणजे मराठी सारस्वताला पडलेले भटके स्वप्नच. त्यांचे विपुल साहित्य आणि भ्रमंती पाहता त्यांचे हात आणि पाय सतत चालतच राहिले असावेत, असे वाटते. गोनीदांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व बेजोड होते. त्यांनी आपल्या साहित्यामध्ये कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळबोली, ठाकरबोली अशा वेगवेगळ्या बोलीभाषा इतक्या बारकाव्यानिशी वापरल्या की कोणालाही वाटेल ते त्याच प्रांतातले असावेत. अशी मुशाफिरी करणारा दुसरा लेखक नाही आणि असे लेखन करणारा दुसरा मुसाफिर नाही.
सध्याच्या काळात गड-किल्ल्यांच्या सैर-भेटी / रानावनातल्या भटकंती फोफावल्या आहेत. गडाकिल्ल्यांवर नेणार्या संस्थांना उर्जितावस्था आली आहे. एकाही गडाकिल्ल्याला भेट न दिलेला मराठी माणूस आजमितीस मिळणे दुर्मीळच. पायी भटकंतीचे वाढलेले प्रमाणदेखील अफाट आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याने आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. जिथे जाईल तिथे त्याची पदभ्रमणाची हौस उफाळून येते आणि मग अशी हौस उफाळून आल्यावर तो भटकंतीला निघतो. मराठी माणसाने पादाक्रांत केलेली नाहीत अशी फार कमी ठिकाणे जगाच्या पाठीवर असतील. ह्या सगळ्याला गोनीदा फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी अनेक किल्ल्यांना अक्षरशः शेकडो भेटी दिल्या. किल्ल्यांवर पुस्तके लिहिली.
अशा महान लेखक-मुशाफिराचे, गोनीदांचे, स्मरण करून सादर करत आहोत लेखनविषयक उपक्रम - शब्दपुष्पांजली
विषय पहिला - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक / व्यक्तिरेखा
विषय दुसरा - मला भावलेले श्री. गो. नी. दांडेकर
विषय तिसरा - माझे दुर्गभ्रमण / मी पायी केलेली भटकंती
विषय पहिला - मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक किंवा त्यांच्या पुस्तकातील व्यक्तिरेखा
या विषयांतर्गत आपण एका लेखात गो. नी. दांडेकरांच्या आवडलेल्या कोणत्याही एकाच पुस्तकावर लिहायचे आहे. त्या पुस्तकातली सौंदर्यस्थळे, भावलेली संकल्पना, वाचनाने मिळालेला आनंद इत्यादी आमच्याबरोबर वाटून घ्यायचा आहे. तसेच गोनीदांच्या पुस्तकांतील अनेक व्यक्तिरेखा अगदी मनात घर करून बसतात. काहीजणांना 'माचीवरला बुधा' भावतो, तर काहींना 'जैत रे जैत'मधली चिंधी. तर आपल्याला अशाच एखाद्या व्यक्तिरेखेविषयी लिहायचे आहे. त्या व्यक्तिरेखेचे कोणते स्वभावविशेष आपल्याला भावले, त्या व्यक्तिरेखेने आपल्या जीवनावर काही प्रभाव पाडला का, असल्यास कसा पाडला, ती व्यक्तिरेखा का आवडते, यां संदर्भांत मोकळेपणाने लिहावे.
विषय दुसरा - मला भावलेले श्री. गो. नी. दांडेकर
या विषयांतर्गत आपण आपल्याला भावलेल्या गोनीदांच्या स्वरूपाबाबत लिहू शकता. मग ते प्रचंड ताकदीचे लेखक म्हणून असो, छायाचित्रकार म्हणून असो, गडाकिल्ल्यांचे प्रवक्ते म्हणून असो. या व्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर आपल्याला आलेले अनुभव, सुखद आठवणी, अविस्मरणीय घटना यांबद्दल लिहिले तरी चालेल.
विषय तिसरा - माझे दुर्गभ्रमण किंवा मी पायी केलेली भटकंती
या विषयावर लिहिताना आपण वेळोवेळी केलेल्या वेगेवेगळ्या गडाकिल्ल्यांच्या भटकंतीचा मागोवा / आढावा घ्यायचा आहे. गडाकिल्ल्यांवर जाण्याची आवड आपल्यामध्ये कशी आणि कधी निर्माण झाली, आजवर कोणकोणत्या गडांवर गेलात, काय अनुभव मिळाले ते लिहावे. रोमहर्षक प्रसंग, केलेली साहसे यांबद्दलही लिहावे कधी क्वचित झाली असेल(च) तर त्या फजितीबद्दलदेखील लिहावयास हरकत नाही.
आपण सगळेच अनेकविध कारणांनी पायी भटकत असतो. पण काही भटकंतींमध्ये अगदी अविस्मरणीय असे अनुभव येतात. वाहन चुकले म्हणून सक्तीने तुडवलेला रस्ता असो वा आदिवासी भागात स्वयंसेवक म्हणून गेलेले असताना केलेली पायपीट असो, नर्मदा परिक्रमा किंवा पंढरपूरची वारी असो, किंवा देशविदेशात केलेले ट्रेकिंग,असे अनुभव आपल्याला समृद्ध करतात. या विषयांतर्गत तुम्ही लिहू शकता तुमच्या कुठल्याही पायी केलेल्या भटकंतीबाबत. मात्र ती अगदीच घर ते स्टेशन अशी केलेली नित्य पायपीट नसेल, एवढीच अपेक्षा आहे.
नियम –
१. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा दिवस २०१६' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
२. लिखाण स्वलिखित असावे.
३. या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६ या चार दिवसांतच काढावेत. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
शब्दपुष्पांजली - विषयाचे नाव
सूचना -
हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
या लेखनाला शब्दमर्यादेचे बंधन नाही.
हा आपल्या मराठीचा आपल्या मायबोलीवर साजरा करत असलेला सोहळा आहे. त्याला साजेसे लेखन असेल, याची खबरदारी आपण घ्यालच.
मायबोलीच्या इतर उपक्रमांप्रमाणेच या उपक्रमालादेखील सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील, अशी खात्री आहे. तर मंडळी सुसज्ज व्हा, या सोहळ्यात सहभागी व्हायला.
लवकरच भेटू पुढच्या उपक्रमाच्या माहितीसह.
मस्त आहे उपक्रम . भाग घ्यायचा
मस्त आहे उपक्रम . भाग घ्यायचा प्रयत्न करेन
मस्त, शुभेच्छा
मस्त, शुभेच्छा
मस्त उपक्रम
मस्त उपक्रम
छान उपक्रम, चांगले विषय.
छान उपक्रम, चांगले विषय.
छानच आहे उपक्रम! प्रयत्न करेन
छानच आहे उपक्रम! प्रयत्न करेन लिहायचा.
मस्त उपक्रम
मस्त उपक्रम
छान आहे उपक्रम!
छान आहे उपक्रम!
चांगली आहे कल्पना. तिसर्या
चांगली आहे कल्पना.
तिसर्या विषयावर खूप लेख येतील असं वाटून गेलं.
लहानपणी गोनीदांचं प्रचंड आवडलेलं पुस्तक - आम्ही भगिरथाचे पुत्र. कधीतरी ६वी-७वीत वाचलं होतं. जाम भारावून गेले होते. पण त्यावर लेख लिहिण्याइतकं आता आठवत नाही.
छान उपक्रम ! शुभेच्छा!
छान उपक्रम ! शुभेच्छा!
ललिता-प्रिती , परत वाच ! अन
ललिता-प्रिती , परत वाच ! अन लिही ! हाकानाका.
लिखना जरूरी हय!
छान विषय.उपक्रमास शुभेच्छा !
छान विषय.उपक्रमास शुभेच्छा !
खूप सुंदर विषय. या निमित्ते
खूप सुंदर विषय. या निमित्ते पुस्तके परत वाचली जातील
छान विषय आहेत. उपक्रमाला
छान विषय आहेत. उपक्रमाला भरभरून शुभेच्छा!
अकु, मस्त लेख लिहून टाक एक
अकु, मस्त लेख लिहून टाक एक
मला एक शंका आहे. माझे वडील
मला एक शंका आहे. माझे वडील गोनिदांबरोबर तीन वर्ष राहीले आहेत शिक्षणानिमित्ताने. त्यांच्याजवळ त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या आठवणी त्यांच्या नावासहीत इथे या उपक्रमा अंतर्गत प्रकाशित करु शकते का?
हो नक्कीच मुग्धटली. वाचायला
हो नक्कीच मुग्धटली. वाचायला खुप आवडेल
धन्स लाडु. मी अॅक्च्युली
धन्स लाडु.
मी अॅक्च्युली संयोजकांच्या विपुतही हा प्रश्न विचारला आहे. त्याच उत्तर काय येत ते पाहु.
छानच. शुभेच्छा.
छानच. शुभेच्छा.
मुगधटली, शक्यतो तुमच्या
मुगधटली, शक्यतो तुमच्या वडिलांनी मायबोलीचे सभासदत्व घेऊन लिहिणे अपेक्षित आहे पण तसे शक्य नसल्यास तुम्ही या आठवणी, 'माझे बाबा गोनीदांबरोबर काम करत होते' अशा प्रकारे लिहू शकताच.
त्यांना सभासदत्त्व घेउन लिहिण
त्यांना सभासदत्त्व घेउन लिहिण शक्य नाही. पण तशी परवानगी मला दिल्याबद्दल संयोजक मंडळाची मी आभारी आहे. लेखाच शब्दांकन माझ असेल पण आठवणी पूर्णतः त्यांच्या असतील.. बाबांच्या आठवणींच कुठल्याही प्रकारच क्रेडीट मी घेणार नाही..
परवानगी दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद.
अरे वा मुग्धटली ! आठवणी
अरे वा मुग्धटली ! आठवणी वाचायला नक्की आवडेल.
मुग्धा मस्तच.
मुग्धा मस्तच.
छान उपक्रम.शुभेच्छा!
छान उपक्रम.शुभेच्छा!
अशी मुशाफिरी करणारा दुसरा
अशी मुशाफिरी करणारा दुसरा लेखक नाही आणि असे लेखन करणारा दुसरा मुसाफिर नाही. >>> वा:!
माझे दुर्गभ्रमण किंवा मी पायी केलेली भटकंती >>> मायबोलीवरच्या सगळ्या मावळ्यांना लिहायला हवं इथे.
मस्त विषय आणि गोनिदांना हा मभादिन समर्पित करण्याची संकल्पना आवडली.
माझे वडील गोनिदांबरोबर तीन
माझे वडील गोनिदांबरोबर तीन वर्ष राहीले आहेत शिक्षणानिमित्ताने. >> अरे वा. मस्त.
आठवणी वाचायला नक्की आवडेल. >> हर्पेन + १
संयोजक, २०१३ च्या मभादि
संयोजक, २०१३ च्या मभादि उपक्रमामधे "मनमोकळं" या सदरात मी गो नी दांडेकरांच्या "पडघवली" या कादंबरीतील "अबावहिनी" या व्यक्तिरेखेबद्दल लिहीलं होतं. तोच लेख जरा बदल करुन पुन्हा दिला तर चालेल का?
एका विषयावरचे लेख एकाच ठिकाणी संग्रहित राहतील म्हणून.
तसंच मभादि २०१६ च्या संयोजकांच्या धाग्यांच्या लिंक पहिल्या पानावरच राहाव्या यासाठी अॅडमीनना विनंती करणार का?
शुगोल, तुम्ही म्हणताय तसा लेख
शुगोल, तुम्ही म्हणताय तसा लेख चालेल. त्याबरोबर अजून एक लेख मिळाला तर उत्तम
छान उपक्रम! सहभागी होण्याचा
छान उपक्रम! सहभागी होण्याचा नक्की प्रयत्न करेन!
छान उपक्रम गोनीदांच्या
छान उपक्रम
गोनीदांच्या वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाने काही ना काही शिकवलंय, किंवा "आतवर झिरपेल आणि डोळ्यांतून ओघळेल" असं काहीसं नेहमीच झालंय पहिला विषय डोक्यांत घेऊन लिहिता आलं तर नक्की लिहिन
प्रयत्न नक्की, पहिलं
प्रयत्न नक्की,
पहिलं पुनर्वाचन झालंय मनात योजलेल्या पुस्तकाचं, अजून एकदा वाचणार
Pages