रपुन्झेल पास्कल अनं बरच काही....

Submitted by विनार्च on 1 February, 2016 - 06:29

हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे Wink )

रपून्झेल न पास्कल Happy
IMG_20160121_210935.jpg

वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग

IMG_20160201_154639.jpg

लोणावळ्याच्या रस्त्यावर आम्हाला दिसलेला सुर्यास्त.... जो आम्ही हॉटेलवर पोहचल्या पोहचल्या वहीत उतरवला
माध्यम : कलर पेन्सिल्स

IMG_20160201_155728.jpg

हे ३डी ड्रॉइंगचे काही प्रयत्न.....

IMG_20160201_160939.jpgIMG_20160201_161517.jpg

समोर गोटी ठेवून हे चित्र काढलय.... हे चित्र पुर्ण होई पर्यंत घरातले सदस्य जणू घरभर माइन्स पेरले आहेत अशा प्रकारात जपून पावल टाकत फिरत होते Proud

IMG_20160201_160518.jpg

हा आमचा फेव्हरेट घोडा .... ह्याचे बरेच व्हर्जन्स घरातल्या प्रत्येक भिंतीवर... दाराच्या मागे..वहीच्या मागच्या पानांवर पहायला मिळतात Happy
युनिकॉर्न
IMG_20160201_161447.jpg

ही आम्ही काढलेली रांगोळी
IMG_20160201_160027.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप धन्यवाद __/\__ ☺....
चिकू अनन्या कुठेही चित्रकलेचे शिक्षण घेत नाहीय... मनमौजी कारभार असतो सगळा .. हुकमी चित्र ती नाही काढू शकत ... जेंव्हा न जे मनात येत तेच काढते .. त्यामुळे चित्रकला स्पर्धा वगैरे मध्ये नाही भाग घेऊ शकत ... पुढच्या वर्षी एलिमेंट्री परीक्षा द्यायची आहे .. कस होणार देवच जाणे Sad

पुढच्या वर्षी एलिमेंट्री परीक्षा द्यायची आहे .. कस होणार देवच जाणे
>>>
माझी गचाळ ड्रॉईंग ज्याची वही चित्रकलेच्या बाईंनी कैकदा भिरकावलेली आणि तुला एलिमेंटरी कोणी पास केला म्हणून माझ्या त्या इज्जत काढायच्या असा मी ईंटरमिजीएट सुद्धा पास झालोय.. Proud

तुमची लेक त्या परीक्षांच्या फार फार पुढे आहे.. गोटी वगैरे काढणे.. कमाल आहे बाप !!

Pages