.२६ जानेवारीच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची यादी जाहीर झाली. खरतर त्या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यावी म्हणुन हा सन्मान दिला जातो. पण प्रजासत्ताक दिनाला लष्करी धुरळा इतका उडतो आणि त्यात पद्म पुरस्कारांनी सन्मानीत व्यक्ती, त्यांचे कार्य याची दखल घेण्याची जागा शिल्लक रहात नाही. त्यातुन १० पद्मविभुषण , १९ पद्मभुषण आणि ८३ पद्मश्री ने सन्मानीत अश्या लोकांपैकी अनेक मुळचेच सुप्रसिध्द त्यामुळे आढावा तरी कशाचा घेणार.
जय जवान आणि जय किसान ही घोषणा एकत्र दिली जात असली तरी जय किसान ला तितकेसे प्राधान्य प्रजासत्ताक सोहळ्यात नसते कारण हा सर्व सोहळा लष्करी नोकरशाही आणि गणमान्य व्यक्तींच्या सुरक्षा आनि प्रोटोकॉल्स मधे गढुन गेलेला असतो.
२६ जानेवारीला शनी शिंगणापुरला महिलांना प्रवेश का नको यामुद्यावरच्या गलबल्यात एका महाराष्ट्रातील एका अपरिचित पद्मश्रींचा प्राप्त शेतकर्याचा कार्याचा आढावा घ्यायला कुठल्याही चॅनलला वेळ बहुदा मिळाला नाही . ह्यांच नाव आहे श्री सुभाष पाळेकर.
फक्त व्यकंय्या नायडु यांना त्यांची महती माहित होती काय म्हणुन त्यांनी “Congratulations to all Padma awardees… Very happy that for the first time a Padma award is bestowed on a farmer, Shri Subhash Palekar”, -winning-padma-shri अस ट्वीट केल.
कारणच तस आहे. विदर्भातले सुभाष पाळेकर आपल्या सेंद्रीय खतांच्या आग्रहामुळे आणि शुन्यावर आधारीत शेती प्रयोगामुळे विदर्भ आणि कर्नाटकात प्रसिध्द आहेत.
https://www.youtube.com/watch?v=ESuZc2l-tfY
सुभाष पाळेकर म्हणतात एक गाय रोज १० किलो शेणखत देते. ज्यातुन सुमारे २० एकर शेतीला पुरेल इतके शेणखत तयार होते. शेणापासुन शेणखत कसे बनवायचे याचे तंत्र त्यांनी विकसीत केले आहे. जर गाय दुध देत असेल तर तो बोनस अन्यथा भाकड गाय सुध्दा शेतकर्यांना वरदान आहे अस त्यांच मत आहे.
आंतरजालाची वरची माहिती घेतल्यावर असे कळले की शेणखताच्या वापराने भाताचे दर एकरी उत्पन्न १२ क्विंटल वरुन २० ते २४ इतके वाढते शिवाय औषधे किटक नाशके यांचा वापर कमी करावा लागतो कारण शेणखतामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
जमिनीचा कस वाढवण्यासाठी ते आणखी काही प्रयोग सांगतात शिवाय स्वतः ला लागणारे बी- बियाणे स्वतः बनवुन अल्पभु धारक शेतकरी कसे किफायती शेती करु शकतात हे सांगणारे हे शेतकरी आपल्या विदर्भातले आहेत हे वाचुन मला फारच आनंद झाला.
नाम ( नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ) जे काम करत आहेत ते उत्तम आहे पण शेतकरी आत्महत्याच होऊ नयेत म्हणु सर्वांनी श्री सुभाष पाळेकरांचा मंत्र जर गावोगावी पोचवला तर मला वाटत मुलभुत काम होईल.
सुभाष पाळेकर यांचे किमान चार व्हिडीओ तर यु ट्युबवर आहेत . आजवर त्यांनी हा संदेश अनेक शेतकरी यांना दिलाय.
१. https://www.youtube.com/watch?v=_JOSnwZAzo8
२. https://www.youtube.com/watch?v=nF0nICMUors
३. https://www.youtube.com/watch?v=K3p4cBay8rU
४. www.dailymotion.com/video/x2k3zp4
ही माहिती आपल्याला जास्त शेतकर्यांपर्यंत पोचवण्यासाठी काय करता येईल ?
वा वा नितिन, महत्वाची माहीती
वा वा नितिन, महत्वाची माहीती दिलीत.
मुद्दाम उल्लेख करण्याबद्दल व्यंकय्या नायडुंना पण धन्यवाद.
वा, उत्तम माहिती. श्री
वा, उत्तम माहिती. श्री पाळेकरांचे हार्दिक अभिनंदन
छान माहिती... पाळेकरान्चे
छान माहिती... पाळेकरान्चे अभिनन्दन.
पाळेकरांचे हार्दिक अभिनंदन
पाळेकरांचे हार्दिक अभिनंदन !
ही माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद
श्री.पाळेकरांसारख्या
श्री.पाळेकरांसारख्या प्रयोगशील शेतकर्याचे अभिनंदन. या निमित्ताने 'प्रयोग-परिवार'ची आठवण झाली.
पण मला एक शंका नेहमी पडते, की शेणखतामुळे उत्पन्न वाढते हे खरे. पण रासायनिक खते येण्यापूर्वी शेकडो वर्षे शेणखतच वापरले जात होते, मग अधिक उत्पन्नासाठी वेगळ्या प्रकारच्या खतांची गरजच का पडली?( ही शंका जेन्युइन आहे.)
ही पहा पदमश्री सुभाष
ही पहा पदमश्री सुभाष पाळेकरांची घेतलेली निखील वागळे यांनी घेतलेली मुलाखत भाग १ https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE