ब्रिगादेरॉ (brigadeiro)- एक ब्राझिलीयन डेझर्ट
मी हे एका इंटरनॅशनल पार्टी मध्ये खाल्लं होतं. आवडलं म्हणून मैत्रिणी कडून लगेच पाकृ मागून घेतली. ही एक पारंपारीक ब्राझिलीयन डिश आहे.
लागणारा वेळ:
७-८ तास
लागणारे जिन्नस:
१ कॅन कन्डेन्सड मिल्क
१ कप Sour cream
३ अंडी
१ कप कोको पावडर
१/२ कप साखर (आवडीनुसार)
१००ग्रॅम मार्गारीन/ बटर
कलरफुल किंवा चॉकलेट स्प्रिंकल्स
इतर साहित्यः
केकचे भांडे किंवा microwave compatible भांडे
क्रमवार पाककृती:
- सर्व जिन्नस एकत्र करुन ब्लेंडरमध्ये मिक्स करुन घ्यावेत
- भांड्याला आतून बटर/ मार्गारीन लावा.
-१०-१२ मिनीटे मायक्रोवेव मधे medium power वर ठेवा.
- थोडे थंड झाल्यावर त्यावर स्प्रिंकल्स पसरुन, फ्रीजमध्ये ७-८ तास ठेवा.
- केक सारखे तुकडे करुन सर्व करा.
वाढणी/ प्रमाण
साधारण ७-८ माणसांना
अधिक टिपा:
- असेही करु शकतो-मिश्रण थंड झाल्यावर ६-७ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचे हवे त्या आकाराचे बॉल्स बनवून स्प्रिंकल्स मध्ये घोळवुन सर्व करावेत. लहान मुलांच्या पार्टी साठी छान.
- स्प्रिंकल्स म्हणून सुके खोबरेही वापरु शकता.
- इथे गोड Sour cream मिळते ते मी वापरले आणि साखर कमी घातली.
माहितीचा स्रोत:
ब्राझिलीयन मैत्रिण
टेंप्टिंग दिस्तंय.. स्वीट
टेंप्टिंग दिस्तंय.. स्वीट सावर क्रीम.. वॉव..
सेट झाल्यावर टेक्शचर जेली/ पुडिंग सार्खं आहे का?? कि केक सारखं??
मस्तं दिसतंय!
मस्तं दिसतंय!
लईच टेम्प्टिंग आहे..
लईच टेम्प्टिंग आहे.. प्रतिक्रिया दिल्याशिवाय पुढे जाताच आलं नाही
मस्त दिसतयं!
मस्त दिसतयं!
वर्षू नील...थोडं फार केक
वर्षू नील...थोडं फार केक सारखं...पण फुगत नाही... एकदा खाल्ल्यावर खातच रहावं असं वाटतं...
भारी आहे . यम्मी !!
भारी आहे . यम्मी !!
साॅलिड दिसतय.
साॅलिड दिसतय.
मस्त्च दिसतंय. लहान मूले खुष
मस्त्च दिसतंय. लहान मूले खुष होऊन जातील.
भारी दिसतंय. स्वीट सावर क्रीम
भारी दिसतंय.
स्वीट सावर क्रीम मिळतं का? काय लिहिलेलं असतं त्यावर?
मस्तच, वरुन चॅाकलेट साॅस
मस्तच, वरुन चॅाकलेट साॅस पसरलाय का?
ओक्के.. त्या स्वीट सावर क्रीम
ओक्के.. त्या स्वीट सावर क्रीम च्या ब्रँड चा फोटो टाक ना इकडे प्लीज!!
मस्त दिसतंय ! करायला सोपं पण
मस्त दिसतंय ! करायला सोपं पण वाटतंय !
देव तुम्हाला दररोज किमान ४०
देव तुम्हाला दररोज किमान ४० मिनिटं ब्रिस्क वॉक करायची, अन किमान १ तास जिम करायची शिक्षा देवो.
नुसता फोटो पाहिल्याबद्दल मला माझ्या उद्याच्या सायकलिंगमधे १० मिंटं वाढवावी लागणारेत आता.
मस्त ! एकदा खाल्ल्यावर खातच
मस्त !
एकदा खाल्ल्यावर खातच रहावं असं वाटतं... >>> आणि डायटची पार लावणार
मस्त दिसतंय.. पण केक चाकलेटला
मस्त दिसतंय.. पण केक चाकलेटला माझा पास असतो.
sour cream ऐवजी चक्का वापरता
sour cream ऐवजी चक्का वापरता येईल का?
किंवा दुसरा कुठला ऑप्शन?
इथे मला सॉर क्रीम मिळणे कठिण!
धन्स सर्वांना... देव तुम्हाला
धन्स सर्वांना...
देव तुम्हाला दररोज किमान ४० मिनिटं ब्रिस्क वॉक करायची, अन किमान १ तास जिम करायची शिक्षा देवो.>>
आणि डायटची पार लावणार>>
डाएटची वाट लागते पण"chocolate के लिये कुछ भी करेगा "
वर्षू नील मी फोटो टाकला तरी त्याचा उपयोग नाही होणार ... इस्रायली ब्रँड आहे आणि हिब्र्यु मधे नाव आहे
साती....sour cream ला ऑप्शन
साती....sour cream ला ऑप्शन नाही माहित मला पण मी मैत्रिणीला विचारुन सांगते...
अंड्याला पर्याय ????????
अंड्याला पर्याय ????????
मस्तं प्रकार आहे. सोपा
मस्तं प्रकार आहे. सोपा दिसतोय.
सॉवर क्रिम किंवा अंडं
सॉवर क्रिम किंवा अंडं वापरायचे नसेल तर
http://www.frombraziltoyou.org/brigadeiro-brazil-chocolate-fudge-truffles/
करुन बघायला हरकत नाही... पण
करुन बघायला हरकत नाही... पण हे कदाचित साधं chocolate truffles सारखच लागेल..
सावर क्रीम वापरायचं आहे, ते
सावर क्रीम वापरायचं आहे, ते मिळतं आणि सावर पण असतं.
ते गोड आहे हे कळण्यासाठी, ते गळ्यात मारून उघडून चव बघण्याशिवाय, काही युक्ती आहे का? का रेग्युलर आणून साखर लोटायची?
आता प्रश्न, कंडेन्स मिल्कचा कॅन किती मिलीचा आहे? घरी ८ ओझचा आहे, त्या प्रमाणात कपचं माप बदलायला त्रैराशिक मांडता येईल. बरं, एक कप म्हणजे २५० मिली वाला कपच ना?
फोटो भारी आहेत.
फोटो भारी आहेत.
कसला यम्मीए फोटो.. एक तर लंच
कसला यम्मीए फोटो.. एक तर लंच टाईम सुरु होणार आहे.. अनै हे असल पाहिल्यावर डबा कसा गोड लागणार ????
ते गोड आहे हे कळण्यासाठी, ते
ते गोड आहे हे कळण्यासाठी, ते गळ्यात मारून उघडून चव बघण्याशिवाय, काही युक्ती आहे का?
तुम्हि खरच विचारताय? इन्ग्रॅडिअन्ट्स वाचुन कळेल ना.
फोटो सुरेख आलाय. चवही मस्तच असणार. पण कॅलरीज चा विचार करता फोटोवरच समाधान मानाव हे बर.
अमितव...१ कप= २५०मिली
अमितव...१ कप= २५०मिली ...बरोबर
१ कॅन = १ १/२ कप कन्डेन्सड मिल्क (इथे मी एवढ वापरलयं)...
वॉव..
वॉव..
आई ग कातील आहे टीना च्या
आई ग
कातील आहे
टीना च्या स्मायली माझ्या पण आहेत असे समजणे
मस्तच, वरुन चॅाकलेट साॅस
मस्तच, वरुन चॅाकलेट साॅस पसरलाय का?>>>>>> +१११११११
Pages