Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48
इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतः घरात बसून काय करणार
स्वतः घरात बसून काय करणार आहेस
त्यापेक्षा माझ्या घरात कायमची पोर सांभाळत बस.
रेशनकार्डचे भन्नाट आहे बकीपण
रेशनकार्डचे भन्नाट आहे :d
बकीपण मस्त.
बहुतेकांनी "मुलगा मुलीला
बहुतेकांनी "मुलगा मुलीला प्रपोझ" करणे इतकाच फोकस ठेवत आहेत का? मुलींनी मुलांना प्रपोज केलेलंच नाहीये का?
(शंभर रूपयाची पैज लावून "एका मैत्रीणीने" असं वर्गातल्या सर्वात हुशार मुलाला प्रपोज केलं होतं. तो बिचारा इतका गांगरला की दोन मिनिटं काहीच बोलू शकला नाही. त्यानं हो किंवा नाही म्हणायच्या आत मैत्रीनीने "घाबरू नका, पैज लावली आहे" हे बोलून घेतलं. हो म्हणाला असता तर भलतेच वांदे झाले असते. लाईफमध्ये इतकी कॉम्प्लिकेशन्सची तेव्हा काही आवश्यकता नव्हती)
मैत्रिणीच्या वतीने मित्राला
मैत्रिणीच्या वतीने मित्राला प्रपोझ करण्याचा अनुभव आहे. आज ते दोघे सुखाने नांदतायत. त्यांचं पोरगं आता प्रपोझ मारायच्या वयाला आलंय.
>>>> मुलींनी मुलांना प्रपोज
>>>> मुलींनी मुलांना प्रपोज केलेलंच नाहीये का? <<<<
आमच्या काळी सातार्यासारख्या (आजही) मागास असलेल्या गावात मुलिंनी मुलांकडे ट्युटोरिअल्स वा होमवर्कच्या वह्या मागणे इतपतच "प्रपोझलची सीमा" होती.
व माझ्या आठवणीप्रमाणे बर्याच मुली त्या काळी मला "हुषार" वगैरे समजत असल्याने, दोघीतिघिंनी तरी मला होमवर्क/नोट्सच्या वह्या मागितल्याचे आठवते. व त्यावेळेस "एकही वही नाही माझ्याकडे" हे मी काय शब्दात सांगितले वा सांगायचे कसे टाळले ते आठवत नाही.
छान होत्या त्या मुली. आता केवळ "धुसर असे" चेहेरेच लक्षात आहेत. नावेही आठवत नाहीत. पण ज्या धुसर आठवणी आहेत, त्या मात्र "तीक्ष्ण" आहेत. अजुनही हुरहुर की कायसेसे लावुन जातात अन आयुष्यात बरेच काही चांगले गमावल्याची जाणिव देतात.
संशोधक साहेब, त्या माझ्या
संशोधक साहेब,
त्या माझ्या सवयी आहेत म्हटलं.
tutiorials किंवा होमवर्कच्या
tutiorials किंवा होमवर्कच्या वह्या मागणं हे प्रपोजल कस काय होत ???
ब्रिगेडी असेल मुलगी
ब्रिगेडी असेल मुलगी
प्र. tutiorials किंवा
प्र. tutiorials किंवा होमवर्कच्या वह्या मागणं हे प्रपोजल कस काय होत ???
उ. अकोर्डींग टु द २३ड लॉ ऑफ मामी!
अँड देन अकोर्डींग टु २४थ लॉ .....
अहो निनाद , लिंबूकाकांच
अहो निनाद , लिंबूकाकांच म्हणणं ग्राह्य धरायच म्हणलं तर सगळेच मुलं मुली एकमेकांना प्रपोज करतात अस म्हणावं लागेल. शाळेत गैरहजर असलो की सर्रास जो जवळ मित्र मैत्रीण राहत असेल त्याची तिची वही मागायची हा अलिखित नियम असतो . त्याला प्रपोज कस म्हणता येईल
नंदिनीच्या किस्स्यावरुन माझा
नंदिनीच्या किस्स्यावरुन माझा पण एक किस्सा आठवला.
हायस्कूलला असताना गृपमधल्या एकाला एक दुसर्या वर्गातली मुलगी फार आवडायची.
तेव्हा प्रपोज करायला घाबरायची फॅशन होती ( संदर्भः- रंगीला, आमीर खान)
पण मला कधीच कळाले नाही कि त्यात एवढे विशेष काय असते. जावून आय लव्ह यू तर म्हणायचे फक्त.
एकदा हा मित्र तिच्या नावाने उसासे टाकत असताना मी वैतागलो तर तो मलाच प्रपोज करणे किती अवघड अस्ते हे सांगायला लागला.
बोलता बोलता पैज लागली. मी त्याच्या गफ्रे ला प्रपोज करायचे. गृपमधले बाकी सगळे होतेच हरभर्याच्या झाडावर चढवायला.
एका ओल्या भेळेची पैज लागली. सोबत साक्ष म्हाणून एक मित्र येणार असे ठरले.
मी सरळ सायकल काढली. मित्राला डबलसीट घेउन तिच्या समोर गेलो.
"हाय"
"हाय "
"आय लव्ह यू, लव्हशीप देतेस का ? "
मुलगी अवाक होवून " पण मी तर तूला ओळखत पण नाही"
मी " हो का बरं. ठीक आहे" असं म्हणून सायकल काढून पसार !!!!!!!!!!!!
हे सगळे होईपर्यंत मागे डबलसीट बसलेला मित्र तसाच ..........
स्पॉक
स्पॉक
लहानपणापासुनच अतरंगीये
लहानपणापासुनच अतरंगीये कार्ट....
लिंब्या म्हणतोय ना वाटू द्या
लिंब्या म्हणतोय ना
वाटू द्या की त्यांना बरे
उगाच कुणाच बी मन मारू नये
आधी ओळख वाढवू मग दे आरामात
आधी ओळख वाढवू मग दे आरामात मला घाई नाही आहे
असा एक वाक्य टाकायला हवे होते
जाई, एकेकाळी मुलगा मुलगी
जाई, एकेकाळी मुलगा मुलगी बोलताना जरी दिसले तरी "त्यांच्यात कायतरी आहे" अशा वावड्या ताबडतोब उठायच्या. खासकरून निमग्रामीण निमशहरी भागात तर हमखास.
तळटीप १ : हा आमचा वेगळा
तळटीप १ : हा आमचा वेगळा शिजायला टाकलेला दीड तांदूळ आहे. शक्यतो वाचू नये.
-*-*-*-*-
"प्रोपोज" करणे या कन्सेप्टमधेच आपला भारतीय लोचा झालेला आहे. बेसिकली ही टिपिकली पाश्चात्य कन्सेप्ट आहे. तिथे अनेक दिवस डेटिंग केल्यानंतर, प्रेमात पडून सोबत राहील्या, फिरल्या, अगदी आईबाप झाल्यानंतरही अनेकदा लोक एकमेकांना 'माझ्याशी लग्न करशील का?' असे विचारायला 'हिचकिचत' असतात.
जेव्हा धीर एकवटून ते आपल्या प्रिय पात्राला 'तू माझ्याशी लग्न करशील का?' असं विचारतात, त्यावेळी टिपिकली हॉटेलीत जाऊन, तिला वाईन-डाईन करवून, मग तिच्यासमोर गुडघ्यावर बसून हिरा असलेली अंगठी समोर धरायची व विचारायचे अशी पद्धत आहे.
आपल्याकडे डेटिंग ही कन्सेप्ट अजूनही नवखी असल्याने डेट मिळवणे = प्रपोज करणे असा एकंदर फंडा वर आलेल्या प्रतिसादांतून मला तरी दिसतो आहे.
तेव्हा सिंधू संस्कृतीनुसार, प्रपोजल घेऊन जाण्याचे, अर्थात उपवर/उपवधु मुलांच्या आईबापांना आलेले 'वरसंशोधन वा आजकाल वधूसंशोधनाचे' अनुभव इथे लिहावेत, असे सुचवितो
*-*-*-*
तळटीप २ : पहिली तळटीप प्रतिसादाच्या डोक्यावर का लिहिली? असा प्रश्न विचारू नये. तिला शीर्षटीप म्हणावे काय? असाही प्रश्न विचारू नये. विचारल्यास तांदूळासोबत तुम्हालाही शिजत घालण्यात येईल.
तिथे अनेक दिवस डेटिंग
तिथे अनेक दिवस डेटिंग केल्यानंतर, प्रेमात पडून सोबत राहील्या, फिरल्या, अगदी आईबाप झाल्यानंतरही >> हे भगवान ! मुझे यहा क्युं पैदा किया ?
दीमा, अतिशय सहमत. वरचे काही
दीमा, अतिशय सहमत. वरचे काही प्रतिसाद वाचता चांगल्या ओळखीनंतर, सहवासानंतर प्रपोज करणे ही कन्सेप्ट योग्य वाटतेय पण बाकी ठिकाणी 'माझ्याबरोबर फिरशील का?' असा साधा सोपा अर्थ वाटतोय त्याचा.
काका, इतके दिवस फिरून ,
काका, इतके दिवस फिरून , मुलंबाळं झाल्यावर कुणी लग्नाचं (मलाच) घाबरत घाबरत विचारलं असतं तर माझ्याकडून खाडकन मुस्काटात खाल्ली अस्ती!
बाहेर हे सर्रास आहे फिलीपींस
बाहेर हे सर्रास आहे
फिलीपींस वगैरे देशात तर मुल झाली पण लग्न नाही हा प्रकार दिसतो
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/57309
प्रपोज करण्याचा हा फंडा कसा वाटतो ?
रंग बघितलाय का आपल्या
रंग बघितलाय का आपल्या रेशनकार्डाचा! >>> हे भारी उत्तर
प्रपोज केल्यानंतर मिळणारी काही उत्तरे पण अतरंगी असतात.. माझ्या एका मित्राला एकदा एक मुलगी म्हणालेली, " वेडा आहेस का तू? मी तुझ्या ताईच्या वयाची आहे

त्यावर तो मुलगा साळसूदपणे म्हणाला, "अग्ग पण मला ताईच नाहीये .."
मुलगी तितक्याच निर्ढावलेल्यापणे, "मग मलाच बनव..." म्हणून पसार झाली
इथे मला वाटतं प्रपोज म्हणजे
इथे मला वाटतं प्रपोज म्हणजे "Asking out for the first time" असा दिसतो आहे.
^^ प्रपोज म्हणजे एका मुलाने
^^
प्रपोज म्हणजे एका मुलाने मुलीला विचारणे, "आय लव्ह यू टू, यू सेम टू मी ऑर नॉट ?"
मराठी भाषांतर - मी तुझ्यावर सुद्धा प्रेम करतो, तू सुद्धा माझ्यावर करतेस का?
>>>मी तुझ्यावर सुद्धा प्रेम
>>>मी तुझ्यावर सुद्धा प्रेम करतो<<<
ऋन्मेषसारखा मुलगा असेल तर
ऋन्मेषसारखा मुलगा असेल तर सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर असणार, मग उरलेलं तिच्यावर'सुद्धा' असणार.

हा हा, साते हे भारी होते...
हा हा, साते हे भारी होते... येस्स, स्वतावर प्रचंड प्रेम आहे आणि ते व्यक्त करायलाही आवडते, चारचौघात न लाजता
पण जसे एखादा मुलगा आईबहिणींवर वर खूप प्रेम करतो म्हणून तो गर्लफ्रेंडवर कमी करेल असे नसते.. जसे विविध नात्यांमधील प्रेम वेगवेगळे असते.. तसेच स्वतावर खूप प्रेम आहे म्हणून ईतर प्रेमाच्या व्यक्तींंवर कुठलाही अन्याय होत नाही.. त्यांच्यावरही भरभरून प्रेम करतो, आणि ते देखील व्यक्त करतो.
यावरूनही प्रपोजची फिलॉसॉफी बनेल .. हातचे न राखता, भरभरून प्रेम व्यक्त करत प्रपोज करा .. मुलीलाही क्षणभर वाटायला हवे की स्साला याला सोडला तर एवढे प्रेम आपल्याला आणखी कुठे मिळेल.. बस्स मग त्याच क्षणाला तिचा होकार आपल्या पदरात पाडून घ्या
एक यशस्वी सुरूवात तर नक्किच
एक यशस्वी सुरूवात तर नक्किच इथनं होते, "मुझसे दोस्ती करोगी?"

किंवा मग,
"हाय! ₹!हुल..नाम तो सुना ही होगा.."
भारी धागा
भारी धागा
काही वर्षे आधी वाचनात आला असता तर सार्थकी लागला असता
रेशन कार्डावर नाव चढ़वायला
Pages