तडका - हूंडा विसरा

Submitted by vishal maske on 21 January, 2016 - 08:47

हूंडा विसरा

हूंड्यासाठी घडतं
हूंड्यामुळे मोडतं
लग्नाचं सारं कांड
हूंड्यावरच अडतं

नका होऊ गुन्हेगार
सांगणं आहे पुन्हा
हूंडा देणं-हूंडा घेणं
कायद्यात आहे गुन्हा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users