अकोल्यात आमच्या शेजारी एक आजी आजोबा रहायचे. आजोबा चार वर्षापुर्वी गेलेत. ते ९५ वर्षाचे होते. आता आजी ९३ वर्षाची झाली आहे. दोन वर्षांपासून त्या पुण्यात वृद्धाश्रमात राहतात. त्यांना मुलबाळ नाही आहे. आजी आणि आजोबा दोघेही संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. असे शेजारी आणि तेही आजीआजोबा आपल्याला मिळालेत ह्याचे मला फार अप्रुप वाटते. आजीला कुठल्याच नातेवाईकांकडे राहयचे नाही. सासरच्या लोकांना आजी नको आहे. आजी मला नेहमी विनंती करतात की चांगले वृद्धाश्रम बघ. मला पुण्यात इतके दिवस शोध घ्यायला मिळत नाही. महिना १० हजार इतपत त्या देऊ शकतात. पुर्वी त्या सिंहगड रस्त्यावर दुर कुठेतरी विजनवासात एका ठिकाणी राहयच्या तिथे फक्त त्या एकच वृद्धा होत्या. फार कंटाळून जायच्या. मी पुण्यात आलो की आजींना माझ्याघरी घेऊन येतो. त्या स्वभावाने फार आनंदी आहेत. सतत वाचायला हवच असत त्यांना. अशा आजींसाठी मला चांगले वृद्धाश्रम शोधायचे आहे. इथे कुणी मदत करु शकेल का? मी जर भारतात परतलो तर आजींना माझ्याच घरी ठेवून घेईन. पण मी नसताना मला माझ्या घरच्यांना ही जबाबदारी देणे योग्य वाटत नाही. कारण माझी आई हीच एक आजी झालेली स्त्रि आहे.
पुण्यातील चांगले अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम
Submitted by हर्ट on 15 January, 2016 - 05:39
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी, खुप छान विचार आहेत
बी, खुप छान विचार आहेत तूझे.
आजींना एखादे कुटुंब दत्तक घेऊ शकते कि. त्यांनाही मदत होईल, आजींचीही सोय होईल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/55898
पुणे/पिंपरी चिंचवड मधे वृद्धाश्रम कुठे आहेत?
हा धागा वाचला आहात का?
बी, खुप छान विचार आहेत
बी, खुप छान विचार आहेत तूझे.<< +१
बी, खरंच सलाम तुला. ग्रेट
बी, खरंच सलाम तुला. ग्रेट विचार.
सोनू, मला अगदी मध्यवर्ती पुणे
सोनू, मला अगदी मध्यवर्ती पुणे भागात हवे आहे कारण अधूनमधून आजींना बघायला मी माझ्या पुतणीला नाहीतर भाच्याला पाठवत असतो. आजी खूप दुर राहायला गेल्यात की हे सहज शक्य होणार नाही. आणि आजींकडे जाऊन चौकशी करणे हे खूप खूप महत्त्वाचे आहे.
धन्यवाद.
निवारा
निवारा
कुठे आहे सांगशील का निवारा?
कुठे आहे सांगशील का निवारा?
हे बहुतेक
हे बहुतेक http://www.niwaraoldagehome.org/
राजाराम पुलाच्या सुरुवातीला
राजाराम पुलाच्या सुरुवातीला मातोश्री वृद्धाश्रम आहे.
(कसा आहे माहिती नाही.)
मातोश्री वृद्धाश्रम - राजाराम
मातोश्री वृद्धाश्रम - राजाराम पूल
निवारा वृद्धाश्रम - वैकुंठ स्मशानभूमीजवळ
किरकिटवाडी येथे एका डॉ. दांपत्याच्या बंगल्यावर एक वृद्धाश्रम आहे. तसेच सिंहगड येथे आहे. सर्व ठिकाणचे फोन नंबर्स मिळवून देऊ शकेन.
सर्वात उत्तम व महागडी व्यवस्था आहे अथश्री येथे! महिना सुमारे चाळीस हजार! अत्यंत उत्तम निगा राखली जाते. मेडिकल सेवा असतात. नर्सेस व रेसि. डॉक्टर असतात. फोन असतो. आहार उत्तम असतो. टीव्ही असतो. चांगले उपक्रम असतात.
आता अथश्री सोडून इतरत्र ठिकाणची अनुभवलेली परिस्थिती वाचा:
=========================================
एकेका लहान खोलीत तीन तीन वृद्ध ठेवले जातात. खोल्या बकाल आणि धुळकटलेल्या असतात. प्रकाशयोजना अंधुक असते. जुनाट फर्निचर असते. मुळातच वातावरण अतिशय उदासवाणे असते आणि त्यात तेथे उदास असलेले वृद्ध राहत असतात. एका हॉलमध्ये कॉमन टीव्ही असतो. काही काही वृद्ध तर शब्दही बोलत नाहीत इतके निराश असतात. मेडिकल सेवा फारच अपुर्या असतात. एका ठिकाणी तर वृद्धांवर सरळ खेकसतात. (मी हा प्रसंग पाहून विषण्ण झालो होतो. त्यावर एक कथाही लिहिली होती माबोवर, तिची लिंक पुढील प्रतिसादात देतो). शिस्तीचा बडगा काही वेळा फारच भीतीदायक वाटतो वृद्धांना! अश्यानेही काही वृद्ध आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असताना अतिशय खिन्न होऊन जातात. प्रमुख स्टाफची अरेरावी व पाणउतारा करण्याची सवय आणि आधीच्या आयुष्यात मिळालेली सन्मानाची वागणूक ह्यातील तफावत अर्थातच असह्य होऊन काही वृद्ध जिवंत प्रेतासारखे वागताना दिसतात.
आता ह्या अश्या वृद्धाश्रमांना समाज काय काय मदत देतो बघा. उत्तमोत्तम खाद्यपदार्थ येथे जवळपास दररोज देणगीदाखल येतात. सीझनमध्ये आपल्या घरी अजून आपण हापूस आंबा आणला नसेल त्याच्या आत येथील वृद्धांच्या दोन्हीवेळच्या जेवणात हापूस आंब्याचा रस पोटभर असतो. अन्नपदार्थांच्या पुडक्यांचे भरपूर वाटप होते. निरनिराळी मंडळे येऊन करमणूकीचे कार्यक्रम वगैरे करतात. रोख रकमा मिळतात. विविध उपयुक्त उपकरणे मिळतात. पुस्तके वगैरे मिळतात. आता अशी परिस्थिती येते की अनेक वृद्धांना त्या वयात अश्या खाद्यपदार्थांची आणि इतर गोष्टींची चटक लागू शकते. आपल्याला अधिक मिळावे म्हणून त्यातील काही जण चक्क लहान मुलासारखे लबाडपणा करू लागतात. त्यांचे वर्तन पाहून देणगीदार नाखुष होतात. मग देणग्यांवर परिणाम होऊ लागतात.
एकंदरीत वृद्धाश्रम हा मानसिक यातनांसाठीची छावणी असल्यासारखे होते. अथश्री हा अतीश्रीमंत वृद्धाश्रमही शेवटी उदासवाणाच होऊन राहतो.
आजी-आजोबांचे संस्कार मुलांना मिळणे (तेही नवरा व बायको दोघेही नोकरी करतात अश्या परिस्थितीत) हे खरे तर आपल्यासारख्या समाजासाठी आवश्यक आहे. पण अडगळ म्हणून किंवा मुले इतरत्र असल्याने हे आजी आजोबा वृद्धाश्रमात ठेवले जातात. तुमच्या ज्या ह्या आजी आहेत त्यांना एखाद्या परिचितांकडे ठेवून त्यांचा खर्च व आणखीन थोडे पैसे असे देता येतात का ते बघा. थोडे पैसे मिळाले तर माणसे एखाद्याला आपल्यात समाविष्ट करून घेण्यास उत्सुक होऊ शकतात. शक्य होईल तोवर वृद्धाश्रमात ठेवणे टाळा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/34562 - ही ती कथा
आजी-आजोबांचे संस्कार मुलांना
आजी-आजोबांचे संस्कार मुलांना मिळणे (तेही नवरा व बायको दोघेही नोकरी करतात अश्या परिस्थितीत) हे खरे तर आपल्यासारख्या समाजासाठी आवश्यक आहे. पण अडगळ म्हणून किंवा मुले इतरत्र असल्याने हे आजी आजोबा वृद्धाश्रमात ठेवले जातात.
>> ह्यावर खुप काही लिहिता येईल. पण तो या लेखाचा विषय नाही.
पियु सहमत आणि भापो. बरेच
पियु सहमत आणि भापो. बरेच लिहीता येईल.
खराडीला एक वृद्धाश्रम आहे.
खराडीला एक वृद्धाश्रम आहे. नाव आठवत नाही. खूप चांगला आहे. माझी मावशी तिथे होती तेव्हा तिला भेटायला गेले होते. मावशीकडून चांगला रिव्हु ऐकला आहे.
स्विटर टॉकर यांच्या
स्विटर टॉकर यांच्या लेखात(बोरन्हाण)- 'आपल घर' याचा उल्लेख आहे. त्याची ही साइट-
http://www.apalaghar.com/
इथे वृद्धाश्रम ही आहे.
बी तुमचे विचात आवडलेच पण त्या
बी तुमचे विचात आवडलेच पण त्या बरोबर सगळ्यात् जास्त काय् आवडलं असेल् तर तुम्ही त्यांना तुमच्या घरी नेण्याची दाखवलेली तयारी. प्रत्यक्षात वेळ आल्यावर काय घडेल ती वेगळी गोष्ट पण किमान आत्ता तरी तुमच्या मनात हा विचार आला त्याचा आनंद वाटला
पियू +१ आणि भापो
बी खुप चांगले विचार. म्हणजे
बी खुप चांगले विचार. म्हणजे खर तर तुम्हाला साष्टांग _/\_. डोळ्यात पाणी आलं वाचून
माझ्या नवर्याच्या सख्ख्या आत्या स्वतःच्या गेली ७ वर्ष ऑलमोस्ट बेडरिडन आईला कधी मरतेस ग असं विचारतात. तरी बरं आजी आमच्या घरी राहाते. मोस्ट सगळा खर्च आम्ही करतो. असोच.
पियु - भापो. ह्यावर एक वेगळा धागा काढूया. इथे ह्या पॉझिटिव्ह वातावरणात आय मीन धाग्यावर नको..
बी, खूप चांगले विचार आहेत.
बी, खूप चांगले विचार आहेत. मध्यंतरी माझ्या आईबाबांसाठी वृद्धाश्रम / घरी आया-दादा वगैरे शोधाशोध केली तेव्हा मराठी संकेतस्थळांवरील मैत्रिणींनी खूप मदत केली. त्यातल्याच एका मैत्रिणीने खराडीच्या वृद्धाश्रमाबद्दल सांगितले होते. ती माहिती इथे देत आहे.
Late Padmashree Annasaheb Behere Old Age Home
Survey no. 15/2. A/1 Chandannagar,
Kharadi, Pune 411014, Maharashtra, India.
Telephone: +91 20 27012464
For Details
Contact: Mr. P. N. Gole (Chairman & Managing Trustee)
4–A Woodland Society,
Shivaji Nagar,
Pune 411005, Maharashtra, India.
Telephone: +91 20 25511869
बेफीजी अथश्री हा वृद्धाश्रम
बेफीजी अथश्री हा वृद्धाश्रम नाही.
कृपा करून निवारा वृध्दाश्रम
कृपा करून निवारा वृध्दाश्रम नको. फारच वाईट आहे.
अथश्री वृद्धाश्रमच आहे ना?
अथश्री वृद्धाश्रमच आहे ना? माझी आत्या, तिचे मिस्टर आणि माझी मावशी तिघेही तिथे होते. मी पाषाणमधील अथश्रीबद्दल लिहीत आहे. बावधनमधील अथश्रीसुद्धा वृद्धांसाठीच आहे पण तेथे अपार्टमेन्ट्स विकल्या गेल्या आहेत.
बी खुप छान विचार मी अस ऐकलेल
बी खुप छान विचार
मी अस ऐकलेल की डी एस के ने असा काहीतरी गृह प्रकल्प सुरू केला आहे जो वरीष्ट नागरीकासाठी आहे.
तीथे बर्याच सोई पूरवल्या जातात आणिक वातवरण आनन्दी असते.
जर आजीचे स्वतःचे रहाते घर असेल तर हा विचार होऊ शकतो. (जर अर्थीक गणीत जुळत असेल तर)
अधिक माहीती मला वाटत पूण्यातले लोक देऊ शकतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेफिकीर, 'अथश्री' वृद्धाश्रम
बेफिकीर, 'अथश्री' वृद्धाश्रम नाही. ते ५५+ वाल्यांसाठीचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे. तिथली अपार्टमेंट भाड्याने किंवा खरेदी करता येतात. सोयी चांगल्या आहेत.
शुगोल, तुम्ही जे म्हणत आहात
शुगोल,
तुम्ही जे म्हणत आहात ते बावधनच्या अथश्रीबाबत परफेक्ट आहे. पण पाषाण रोडवरचे अथश्री तसे नाही. त्यात एकेकच खोल्या आहेत. तिथे राहण्याचे, वैद्यकीय सेवा, पुरेपूर आहार, करमणूक ह्या सर्वाचे मासिक भाडे भरावे लागते. त्यात वृद्धांची काळजी घेण्याची यंत्रणा आहे.
दोन अथश्री आहेत. त्यातील एक (अत्याधुनिक व महागडा, पण) वृद्धाश्रम आहे (पाषाण रोडवरचा). तो वृद्धाश्रम नाही असे तुम्ही सगळे का म्हणत आहात लक्षात आले नाही.
पाषाणच्या अथश्रीत माझ्या
पाषाणच्या अथश्रीत माझ्या मैत्रिणीच्या आईचा ओनरशिप फ्लॅट होता. वन रुम किचन का वन बीएचके असा छोटा फ्लॅट होता पण त्यांच्या मालकीचा होता. त्या बाई तिथे राहत नसल्याने त्यांनी तो भाड्याने दिला होता.
घरभाडे आणि बाकी सर्व्हिसेस मिळून चाळीस हजारांपर्यंत खर्च जातो असे तुम्ही म्हणताय असे मलाही वाटले.
तिथले फ्लॅट्स ओनरशिपचेच असतात मात्र ते सिनियर सिटिझन्सच विकत घेऊ शकतात किंवा त्यात राहू शकतात. भाड्यानेही सिनियर सिटीझन्सनाच द्यावे लागतात. वेटिंग लिस्ट असते. त्यांची मुले वर्षातून फक्त ठराविक कालावधीसाठीच तिथे राहायला येऊ शकतात. थोडक्यात तुमच्या मालकीचा फ्लॅट असला तरी मॅनेजमेंटचे निर्बंध पाळावे लागतात कारण ते असिस्टेड लिव्हिंग होम आहे.
बेफि, पाषाणरोडवरच्या अथश्री
बेफि, पाषाणरोडवरच्या अथश्री मधे माझे काका राहात होते. त्यांचा तिथे दोन बेडरुमचा फ्लॅट होता. अनेकदा तिथे गेली आहे. तो लौकिकार्थानी वृद्धाश्रम नाही. तो ५५+ वाल्यांसाठीचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे. वैद्यकीय सेवा, मेस, करमणूक इत्यादी सोयी ह्या अॅमॅनीटीज आहेत.
काका मागच्या वर्षी वारले. आता फ्लॅट त्यांच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर झाला आहे, पण तो ५५ नसल्यामुळे त्याला तिथे तोपर्यंत राहाता येणार नाही असं मॅनेजमेंटनी सांगितलं आहे.
माझ्या माहिती प्रमाणे बावधनचं अथश्री देखील असंच आहे.
शुगोल, त्या पाषाणच्या
शुगोल,
त्या पाषाणच्या अथश्रीचेही दोन भाग आहेत ना? आतल्या भागात अपार्टमेन्ट्स आणि बाहेर (सिक्युरिटी गेटच्या बाहेर असलेल्या इमारतीत) एकेक खोली असे?
बाहेरच्या अथश्रीमध्ये प्रत्येक नागरिकाला एक खोली, एक रेसि. डॉक्टर, नर्सेस, तिथेच जेवण वगैरे प्रकार आहेत.
असो. विषय अधिक ताणत नाही.
बेफि, मी जे सांगतीय ते
बेफि, मी जे सांगतीय ते सिक्युरिटी गेटच्या आतल्या भागाविषयी आहे. बाहेर त्यांचच हॉस्पीट्ल आहे असं माहित आहे, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही नवीन झालं असेल तर माहित नाही.
बी, आजींना पैशाच्या मदतीची
बी, आजींना पैशाच्या मदतीची गरज आहे का ? नर्स वगैरे ठेवून त्या तुमच्या शेजारच्या घरात राहू शकतील का? पैशाची वगैरे गरज असेल आजींना तर मदत करायला आवडेल. (१०००० पेक्षा जास्त खर्च येईल ना नर्स वगैरे ठेवून?)
तुझा विचार चांगला आहे. त्यामुळं तस विचारल.
क्रूपया तु मी लिहिलेल्या पोस्टीचा भलताच विपरीत(आपल्याला सोयिस्कर वाटनारा) अर्थ कुणी काढू नये.
शुगोल, सिक्युरिटी गेटच्या
शुगोल, सिक्युरिटी गेटच्या बाहेरील इमारतीत एकेक खोली अश्या खोल्या असून म्हातारी माणसे राहत असतात भाड्याने.
Pages