विठ्ठल विठ्ठल!

Submitted by प्रमोद देव on 14 January, 2016 - 22:54

विजयकुमार देशपांडे ह्यांच्या ’विठ्ठल विठ्ठल’ ह्या भावपूर्ण भक्तीरचनेला मी लावलेली चाल ऐका...आपली प्रतिक्रिया प्रतिकुल असली तरी जरूर द्या.. चालीत काही सुधारणा सुचवाविशी वाटली तर तीही सुचवा...
https://www.youtube.com/watch?v=6moUXyB3kv4

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रयत्न. : )
काका, भजनी ठेका न वापरता अध्धा किंवा आणखी कुठला थोडा मोकळा ठेका आणखी खुलवेल असं सुरुवातीच्या कडव्यात वाटलं. अर्थात, त्याप्रमाणे वजन बदलावं लागेल.

तुमची गाणी एकाच बाफवर एकाखाली एक संकलित करा.
अल्बमप्रमाणे शोधण्यासाठी सोपे जाईल. अजून ऐकले नाही गाणे. नंतर ऐकेन जरूर.

आवडले!
(एक बाळबोध प्रश्न..'नामघोषात' तल्लीन होण्यासाठी अजुन थोडी लय हवी होती का? )

विदेश, अमितव, कैपोचे आणि चंबू, आपणा सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद!

अमितव, अरे मला तालातलं फारसं कळत नाही...त्यामुळे भजनी ठेका योग्य वाटला म्हणून वापरला...पण आता तुझ्या सुचनेनुसार अध्धा वापरून पाहीन...अर्थात आधी तो जालावर शोधावा लागेल मला....अशाच सुचना नियमित मिळाल्या तर मला प्रगती करता येईल आणि अशा जाणकार प्रतिक्रियांचे नेहमीच स्वागत आहे...मोकळा म्हणजे केहरवा म्हणायचंय का तुला?

कैपोचे, आपली सुचना आवडली...ह्यापुढे तसेच करेन.

चंबू, तांत्रिक तबला वापरल्यामुळे जी लय सुरुवातीला ठेवलेय तीच लय नामघोषाच्या वेळी साहजिकपणे आली..जिवंत तबला असता तर आपण म्हणता ते नक्कीच करता आले असते....अर्थात तांत्रिक तबल्यातही कदाचित तसे करता येईलही...मी प्रयोग करून नक्कीच पाहीन तसा.

मंडळी, पुन्हा एकदा धन्यवाद आणि अशाच मौलिक सुचना जरूर करत राहा.

कापोचे आणि साती, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!