Submitted by vishal maske on 13 January, 2016 - 09:20
राजकीय वाटा
राजकीय हायवे वरुन
सहज फोडतात फाटा
ज्याला त्याला आपल्या
स्वतंत्र असतात वाटा
अटी-शर्तीवरती का होईना
दोघांनाही ते पटले पाहिजे
जाणारा जात असला तरी
घेणारानेही घेतले पाहिजे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान मलाही काहीतरी चावलय
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही काहीतरी चावलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(मागे माशी वरुन विड.न्बन लिहील होत. माशी उडून गेली. डास मारले गेली काव्य झुरळे दगावली आता उरलाय फक्त ढेकुण म्हणजे मग कोरम पूर्ण होईल. नाकतोडा , भवरा, चतुर हे जातीबाह्य कीटक असल्याने आणिक त्या.न्चा प्रा.न्त वेगळा असल्याने त्याना आत्ता छेडत नाही)
खाटकीय ढेकूण (१)
खाटकीय कॉजवे वरुन
(ढेकूण) सहज काढतात वाटा
ज्याला त्याला आपल्या
स्वतंत्र असतात खाटा
धोती-कुर्तीवरती का होईना
दोघांनाही ते (२) नक्कीच (फाटले असले) पाहिजे
चावणारा चावत नसला तरी
घेणारानेही (चावून) घेतले पाहिजे (स्वतःला)
पुरवणी
(कविता मला पुरली नाही म्हणून ही अधिकचे कडवे (३)
चावून चावून चोथा झाला तरी
कविता पडत असतात सदा सदा (४)
ढेकुण येउन चावून गेला जरी
झोपा आता हसून खदा खदा (५)
ढेकुण राव घाणेकर
मो. न. आउट ऑफ कव्हरेज एरीया
तळ टीपा:
(१) खाटकीय म्हणजे खाटकाशी काही देणे घेणे नाही. खाटीत रहाणारे ते खाटकीय
(२) ते म्हणजे धोती कुर्ती बाकी काही अर्थ अभिप्रेत नाही
(३) कडवे म्हनजे कडू असाही अर्थ काढू शकता माझ काय जातय
(४) हे यमक जुळवण्या साठी)
(५) यमक चुकुन जुळलय