Submitted by गजानन on 5 January, 2016 - 10:23
पृथ्वी स्वतःभोवती फिरते. समजा एका विमानाने (न जाणो त्याच्या खाण्यात काय आले!) जमिनीशी एकदम काटकोनात सरळ रेषेत उड्डाण केले आणि काही किलोमीटर उंचीवर जाऊन (उदा. ५ किमी उंचीवर एका बिंदूशी) ते स्थिर झाले, (ना आगे, ना पिछे, ना उपर, ना नीचे) तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दुरावलेल्या अवस्थेत राहील. मग ते बराच वेळ असेच राहिले तर स्वतःभोवती फिरणार्या पृथ्वीचा पृष्ठभाग विमानाच्या खालून पुढे सरकत राहील का? आणि अजून बराच वेळ विमान आकाशात त्याच बिंदूवर स्थिर राहिले तर पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाचा, त्या वेगाने उड्डाणापूर्वी विमानाला प्राप्त झालेल्या जडत्वाचा आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाचा विचार करता, विमानाची त्या बिंदूवर स्थिर असूनही पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण होईल का?
.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेलिकॉप्टर हाही विमानाच एक
हेलिकॉप्टर हाही विमानाच एक प्रकार झाला ना?! ते स्थिर राहू शकते म्हणजे विमान सुद्धा स्थिर राहू शकते.
म्हणून "हवेत एका जागी स्थिर
म्हणून "हवेत एका जागी स्थिर होऊन राहिले" हे विमानास लागू पडत नाही <<< खरेच का?! आजच्या काळात पुढारलेल्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात असे असेल असे वाटले नव्हते. लढाऊ विमानही नाही थांबू शकत? >>
माझ्या माहितीप्रमाणे (युएसए टुडे मधील संरक्षक विषयीचा लेख) अमेरिका हेलिकॉप्टर सारखे विमान बनवत आहे किंवा बनवून झाले आहे.
इथे त्याबद्दल माहिती आहे.
http://blog.al.com/breaking/2013/09/flies_like_a_plane_lands_like.html
व्हर्टिकल टेकऑफ/लॅंडीग
व्हर्टिकल टेकऑफ/लॅंडीग करण्याची क्षमता असलेली हॅरियर विमाने रॉयल एअरफोर्स कडे १९६७ पासून अस्तित्वात आहेत मात्र ती फार काळ एकाच जागी व जमिनीपासून अधिक उंचीवर थांबु शकत नाहीत. त्या वरिल दुव्यातील अमेरिकन विमानही ह्याच प्रकारचे दिसतेय.
खरोखरी उड्डाणाचा वेळ कमी आणि
खरोखरी उड्डाणाचा वेळ कमी आणि पूर्व तपासणीचाच वेळ अधिक असे जे देशांतर्गत विमानांचे होते तसे झाले आहे या विमानाचे. कसून तपासणी चालू आहे. तरी बरे, विमान स्थिरच राहणार आहे.
इथे Airospace Engineers काय
इथे Airospace Engineers काय सांगत आहेत वाचावे:
https://www.quora.com/Can-an-airplane-stand-still-in-mid-air
हायला गजाभाऊ वेगळंच विचारून
हायला गजाभाऊ वेगळंच विचारून राहिलेत बहुतेक.
'न जाणे खाण्या पिण्यात काही आल्याने' वर गेलेल्या विमानाबद्दल माहिती हव्येय त्यांना.
वर जाऊन ही स्थिर राहणारे
वर जाऊन ही स्थिर राहणारे विमान ही अत्यंत तरल कल्पना आहे.
ही क्लिप पाहिल्यावर ही चर्चा
ही क्लिप पाहिल्यावर ही चर्चा आठवली.
https://fb.watch/l5Flkp_s3-/?mibextid=l2pjGR
पहिल्या आणि या पानावरचे
पहिल्या आणि या पानावरचे प्रतिसाद वाचले, मधल्या पानांवरचे नाही. तेव्हा हा मुद्दा येऊन गेला असेल तर माहीत नाही.
गजानन, वर ढग स्थिर आहेत आणि पाऊस पडतोय. पृथ्वी फिरतेय. तर कलकत्याला सुरू झालेला पाऊस खरगपूर नागपूर करत मुंबईला पोचुन पुढे ओमानला जाईल असे नाही वाटले का?
नाही, मानव इतके वाटले नव्हते.
नाही, मानव इतके वाटले नव्हते. पण चालत्या गाडीतून वर उडवलेल्या चेंडूबद्दल वाटले होते. (ते वरील कमेंट्समध्ये आले असेल).
भूस्थिर उपग्रहासारखे काही
भूस्थिर उपग्रहासारखे काही म्हणायचेय का ?
त्याला एक रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते. असं एक विमान ज्याच्यावर गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव नाही, जे भूस्थिरही नाही, ज्याच्यावर एका जागी राहील्याने रेडीएशनचा परिणाम होणार नाही पण ते स्थिर झालेलं आहे, म्हणजे पृथ्वीशी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी शून्यवर झालेली आहे असे थोडक्यात गृहीत धरायचेय ना ?
थोडक्यात ते विमान म्हणजे मी असेन आणि पृथ्वी ऐश्वर्या राय असेल तर ऐश्वर्या राय मला फेर्या मारेल का ?
विमान नाही करू शकणार पण
थोडक्यात ते विमान म्हणजे मी असेन आणि पृथ्वी ऐश्वर्या राय असेल तर ऐश्वर्या राय मला फेर्या मारेल का ?
>>>> नाही, विमान म्हणजे रजनी असेल तर कायकी..
-------
विमान नाही करू शकणार पण सॅटेलाईट करतेय नं. विमान सॅटेलाईटला बांधलं ( पाळण्यासारखं ) म्हणजे बेस गुरूत्वाकर्षणाच्या बाहेर किंवा सॅटेलाईटचा सेंट्रिफ्युगल फोर्स गुरूत्वाकर्षणाला कमीतकमी करेल तिथे व मेन आयटेम डोक्यावर, तर पृथ्वी फिरत राहील व प्रदक्षिणा होईल. एकाजागी उडवत ठेवायचे कष्ट वाचतील, शिवाय तसं होणं कठीण असेल तर त्याचा शोध लागायची वाट बघायची गरज नाही. रेडिएशनने पेटू नये म्हणू anti-flammable काही लावू किंवा आपण विमान रिकामंही ठेवू शकतो. काहीच accuracy नाही या पोस्टीत पण हे जमलं तर मला काय बक्षीस मिळेल?
मूळ लेख आणि चर्चा वाचली नाही,
मूळ लेख आणि चर्चा वाचली नाही, पण वरचे काही प्रतिसाद वाचले.
Satellite गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर नसतं. Lower earth orbit, medium earth orbit आणि high earth orbit हे तीनही गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असतात. त्याच्याही बाहेर, आपला चंद्रसुद्धा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात आहे. त्या पासून कित्येक पटीने लांब अंतरावर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण कमी आणि सूर्याचं त्या मानाने जास्त भासू लागेल. तेव्हा विमान जर इतक्या उंचीवर पाठवलंच तरी त्याला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाशी झगडून परत यावं लागेल. हवेत जर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसता, तर विमान कशाला, नुसती उडी मारल्यावर आपण दुसऱ्या जागी पडलो असतो. पृथ्वी सेकंदाला साधारण अर्ध्या किलोमिटरने फिरते.
Pages