सकाळी नऊ वाजता धावतपळत गाठलेला पहिला शो, हातात वजनदार कॅटलॉग सांभाळत लावलेल्या लांबच लांब रांगा, हवा तो सिनेमा बघण्यासाठी कोथरुड ते कॅम्प ते सातारा रस्ता अशी दिवसभरात केलेली धावपळ, तरुण मुलामुलींच्या गराड्यात असनारे नखाते सर...
महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १४ ते २१ जानेवारी, २०१६ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.
यंदा सिटिप्राईड (कोथरुड), सिटिप्राईड (सातारा रस्ता), आर डेक्कन सिटिप्राईड, मंगला, आयनॉक्स (कॅम्प), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता) आणि जय गणेश आयनॉक्स (पिंपरी-चिंचवड) अशा सात चित्रपटगृहांमध्ये तेरा पडद्यांवर ऐंशीपेक्षा जास्त देशांतल्या दोनशे ऐंशी चित्रपटांचे सुमारे चारशे खेळ सादर केले जाणार आहेत.
यंदा जागतिक स्पर्धाविभागासाठी विविध देशांतल्या तब्बल एक हजार चित्रपटांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यांपैकी स्पर्धेसाठी चौदा चित्रपट निवडण्यात आले आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे -
अनुक्रमांक. इंग्रजी नाव (मूळ नाव) - निर्माते देश - दिग्दर्शक
१. Absolution (Henkesi edestä) - Finland / Ireland - Petri Kotwica
२. Bopem (Bopem) - Kazakhstan - Zhanna Issabayeva
३. Dearest (Qin Ai De Xiao Hai) - China / Hong Kong - Peter Ho-Sun Chan
४. Don't tell me the boy was mad (Une histoire de fou) - France - Robert Guédiguian
५. Enclave (Enklava) - Serbia - Gorana Radovanovića
६. Immortal (Mamiroo) - Iran - Hadi Mohaghegh
७. Landscape with many moons (Maatik mitme kuuga) - Finland / Estonia - Jaan Toomik
८. Money Buddies (La Buca) - Italy / Switzerland / France - Daniele Ciprì
९. Pikadero (Pikadero) - Basque / Spain - Ben Sharrock
१०. Perfect Obedience (Obediencia Perfecta) - Mexico - Luis Urquiza
११. The Plastic Cardboard Sonata (The Plastic Cardboard Sonata) - Italy - Enrico Falcone and Piero Persello
१२. The man in the wall (Haish Shebakir) - Israel - Evgeny Ruman
१३. Thithi (Thithi) - India - Raam Reddy
१४. X+Y (X+Y) - USA - Morgan Matthews
या विभागात महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (रु. दहा लाख), महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (रुपये पाच लाख) व विशेष ज्यूरी पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.
फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धाविभागात अॅनिमेशन विभागात तेरा चित्रपट, तर मुख्य स्पर्धेसाठी अठरा चित्रपट निवडले गेले आहेत. या विभागात विजेत्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १००० अमेरिकन डॉलर, उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, छायांकन, ध्वनिमुद्रण यांसाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर, तर सर्वोत्कृष्ट भारतीय अॅनिमेशन चित्रपटास १००० अमेरिकन डॉलर आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट (आंतरराष्ट्रीय) १००० अमेरिकन डॉलर अशी पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
'स्पोर्टस् अॅण्ड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर' ही या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भेदांच्या भिंती पाडण्याची, जगाला प्रेमाचा संदेश देण्याची क्षमता खेळांमध्ये आणि चित्रपटांमध्ये आहे. हे ध्यानात घेऊन यंदा या विभागाची योजना केली आहे. या विभागांतर्गत ’चक दे! इंडिया’ (भारत), ’मेरी कोम (भारत), इक्बाल (भारत), पान सिंह तोमर (भारत), लगान (भारत), The miracle of Bern (जर्मनी) आणि Lessons of a dream (जर्मनी) हे चित्रपट दाखवण्यात येतील.
जागतिक चित्रपटविभागात (ग्लोबल सिनेमा) यंदा कान, बर्लिन, टोरन्टो, म्यूनिख, रोटरडॅम यांसारख्या महोत्सवांतर्गत वाखाणल्या गेलेल्या ७९ चित्रपटांचा समावेश असेल.
लॅटिन अमेरिकन चित्रपटांसाठी यावर्षी वेगळा विभाग आहे. कोलंबिया, मेक्सिको, ग्वाटेमाला, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना या देशांमधले अठरा चित्रपट या विभागात असतील.
कॅलिडोस्कोप विभागात यंदा कॅनडा, व्हिएतनाम, डेन्मार्क, इटली, कोरिया, नॉर्वे, तायवान, क्यूबा, अल्जेरिया, बेल्जियम या देशांमधले पंचवीस चित्रपट दाखवले जातील.
आशियाई चित्रपटांसाठी यंदा महोत्सवात खास विभाग असून या विभागात जपान, इराण, थायलंड, इस्रायल आणि यूएई या देशांमधले सात चित्रपट दाखवले जातील.
या वर्षी 'कण्ट्री फोकस' तुर्कस्तानावर असणार आहे. या विभागात तीन तुर्की चित्रपट दाखवले जातील.
'इंडियन सिनेमा' या विभागात तेरा भारतीय चित्रपट दाखविण्यात येतील. मल्याळम्, तमीळ, कन्नड, बोडो, बंगाली या भाषांमधले आणि जयराज, कौशिक गांगुली, जाहनु बरुआ अशा दिग्गज दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट या विभागात आहेत.
'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागामध्ये ब्राझीलचे प्रख्यात दिग्दर्शक हेक्टर बेबेंन्को यांचे सात चित्रपट, डेन्मार्कचे प्रसिद्ध दिग्दर्शक नील्स मलम्रोस यांचे सहा व भारतीय दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट दाखविण्यात येतील.
याबरोबरच 'जेम्स फ्रॉम एनएफएआय' या विभागात पुनरुज्जीवित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
'ह्यूमन माईंड अॅण्ड सिनेमा' या विशेष विभाग यंदा महोत्सवात आहे. जर्मनी आणि इजिप्त या देशांतले दोन चित्रपट या विभागात असतील.
'लिटरेचर अॅण्ड सिनेमा' या विभागात पाच चित्रपट दाखवले जातील.
यंदाच्या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे 'डीएसके अॅनिमेशन फिचर' हा विभाग. पूर्ण लांबीचे अॅनिमेशनपट या विभागात दाखवले जातील. भारतात अजूनही अॅनिमेशन असलेले चित्रपट म्हणजे लहान मुलांसाठीच, असा समज आहे. त्याला छेद देणारं काम अनेक वर्षं जगभरात होत आहे. भारतीय प्रेक्षकांनाही सर्वोत्तम अॅनिमेशनपटांचा आस्वाद घेता यावा, म्हणून यंदा ’पिफ’मध्ये डेन्मार्क, स्वीडन, मेक्सिको, जपान, भारत, नेदरलॅण्ड्स् आणि फ्रान्स या देशांमध्ये तयार झालेले सात अॅनिमेशनपट दाखवले जातील.
याबरोबरच यावर्षी पहिल्यांदाच महोत्सवात आयोजित होणार्या 'पिफ बाझार'अंतर्गत 'स्मिता पाटील पॅव्हेलियन' उभारलं जाणार आहे. स्मिता पाटील हयात असत्या तर त्यांना यंदा साठ वर्षं पूर्ण झाली असती. पुण्याशी त्यांचा ऋणानुबंध होता. त्यांना आदरांजली म्हणून या विभागाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला हा ’पिफ बझार’ असेल. 'पिफ बझार'मध्ये महोत्सवाच्या प्रायोजकांचे स्टॉल्स् तर असतीलच, याबरोबरच चित्रपटांशी संबंधित कार्यशाळा व चर्चासत्र यांचं आयोजनही करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अनेक मान्यवर चित्रपटांविषयीची त्यांची मतं उपस्थितांसमोर मांडतील. याशिवाय या ठिकाणी चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र असं व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येणार असून ते आपली कला सादर करू शकणार आहेत.
याशिवाय अनेक परिसंवाद, मुलाखती हे कार्यक्रमही अर्थातच असतील.
महोत्सवात दाखवले जाणारे मराठी चित्रपट, जीवनगौरव पुरस्कार, विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान यांची घोषणा ८ जानेवारी रोजी केली जाईल.
महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू झाली असून दरवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे महोत्सवास हजेरी लावू इच्छिणार्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.
’पिफ'ला दरवर्षी अनेक मायबोलीकरांची हजेरी असते. यंदाही या महोत्सवात मायबोलीकर धमाल करतील, हे नक्की!
प्लीज, कुणी हजेरी लावणार
प्लीज, कुणी हजेरी लावणार असेल, तर चित्रपटांची ओळख इथे करून द्या. हे चित्रपट नंतर बघायला मिळणे कठीण असते.
दिनेश + १ किती छान माहिती
दिनेश + १
किती छान माहिती दिलीयेस सविस्तर अगदी.. थँक्स चिनूक्स!! काश मला यायला जमलं असतं तर..
मस्त माहिती चिनूक्स... काही
मस्त माहिती चिनूक्स... काही चित्रपट बघायची नक्कीच इच्छा आहे.. बघू कसं जमतंय.. रजिस्ट्रेशनची लिंक देऊ शकशील का लेखात?
मस्त, चिन्मय हे सगळ आधीच
मस्त, चिन्मय हे सगळ आधीच लिहिलस ते बर केलस
मनिष ही लिंक
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद श्यामली.. मी केलंय
धन्यवाद श्यामली.. मी केलंय रजिस्टर ऑलरेडी
मजा करा लोकहो!! पिफला लय धमाल
मजा करा लोकहो!! पिफला लय धमाल येते.
मनीष, तू पुण्यात असणार आहेस का ह्या दरम्यान?
छान ओळख ! मीसुद्धा येणार
छान ओळख !
मीसुद्धा येणार होतो. सगळी तयारी झाली होती.फक्त पैशे भरायचे बाकी होते. यंदा शॉर्टकटमध्ये डेली रिपोर्ट वजा परीक्षणे लिहिण्याचाही विचार होता. पण घरी अचानक काही दु:खद घटना घडल्यामुळे यायला जमले नाही व बेत रहित करावा लागला.असो.