
प्रमाण १ कोंबडीसाठीचे आहे. मी एकाच वेळी २ होल स्किन्ड चिकन, कॉकरेल जातीचे, सुमारे ७-८०० ग्राम प्रत्येकी वापरले होते. चिकन लिव्हर व आतील खाण्यायोग्य भाग खिम्यात मिक्स केलेले होते.
या प्रकारासाठी अख्खी कोंबडी, खाटकास "मुर्ग मुसल्लम बनवण्यासाठी कापून दे" असे सांगून आणावी लागते. नेक व हेड इंटॅक्ट ठेवलेत तरी चालते, नको असल्यास थोडी नेक शिल्लक ठेवून बाकी डिस्कार्ड करावी.
कांदा भारतीय साईजचा आहे.
चमचा = त्यातल्या त्यात मोठा चहाचा चमचा. टेबलस्पून नव्हे.
स्टफिंगसाठी
खिमा :
खिमा : २०० ग्रॅम
कांदा : १ मध्यम बारीक चिरून
आलं लसूण पेस्ट : १ चमचा
तिखट : १ चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
कोथिंबीर : १ ते दीड मुठ बारीक चिरून
पुदिना : अर्धी ते १ मूठ, चवीनुसार. उग्र असला तर कमी घ्या.
मीठ : चवीनुसार. ब्राईन करताना चिकनमधे मीठ घातल्याचे लक्षात ठेवावे.
थोडं तेल. (२-३ चमचे)
६ उकडलेली अंडी
ग्रेव्ही :
बदाम : १२-१४
काजू : ८-१०
खसखस : १ चमचा.
शहाजिरे : २ चिमूट
(काजू, बदाम व खसखस भिजवून, बदाम सोलून, वरील ४री वस्तू कोरड्याच भाजून घ्याव्यात. थोडा खमंग वास येऊ लागला, की त्याची थोडे पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.)
दही : अर्धी-पाऊण वाटी, फेटून. आंबटपणानुसार कमीअधिक करणे.
टमाटा : १ मध्यम, कमी आंबट.
कांदा : बारीक चिरून २ मध्यम
आलं लसूण पेस्ट : २ चमचे
तेल : ३-४ चमचे
धणेपूड : २ चमचे
जिरेपूड :१ चमचा
मिरेपूड : १ चमचा
तिखट : अर्धा चमचा
गरम मसाला : १ चमचा
हळद : पाव चमचा
थोडं तेल
*
चिकन ट्रसिंग : बांधण्यासाठी दोरा.
२० सीसी डिस्पोजेबल सिरिंज.
*
याक्षणी एकादा आयटम विसरलो असलो तर अॅड करीन, तोपर्यंत माफ करून ठेवावे.
तर लोकहो, पाकृमधे विशारदपदवी मिळवायचीच असा पण करून गेल्या इयरेंडला मुर्ग मुसल्लम करण्याचा कट रचला. याची बेसिक पाकृ वाह शेफने यूट्यूबवर दाखवली होतीच. त्याप्रमाणे करता येईल असा कॉन्फिडन्स होता. प्रॉब्लेम फक्त इतकाच होता, की शेफने "मी कोंबडी ब्राईन करून घेतली आहे" असा ओझरता उल्लेख पाकृ व्हिडूमधे केलेला होता.
त्यानुसार, ब्राईनिंगवर रिसर्च सुरू केला. इथे माबोवरही २-३ धाग्यांवर खालीलप्रमाणे कोंबडी सोडून ठेवली.
>>
नमस्कार!
वर्षांतास मटन खिमा व अंडी स्टफ केलेली कोंबडी मुर्ग मुसल्लम स्टाईलने शिजवण्याचे योजिले आहे.(वाह शेफ + मॉड्स) या कोंबडीस ब्राईनिंग करावे किंवा कसे, याबद्दलची मते मागविण्यात येत आहेत.
ड्राय व्हर्सेस वेट ब्राइनिंग. किती वेळ. किती प्रमाण इ. सल्ले स्वीकारार्ह आहेत.
भारतीय प्रकाराने मॅरिनेट करणे व ब्राइनिंग याची तुलना केलीत तर अत्याधिक आनंद होईल.
आपल्या सल्ल्यांमुळे ज्युसी व टेंडर तसेच सक्युलंट (किंवा जे काय होईल ते) होणारे चिकन निजस्थळी पोहोचल्यावर दिलेले आशिर्वाद व शुभेच्छा आपल्यापर्यंत लवकरच (ASAP) पोहचविण्यात येतील.
धन्यवाद!
<<
याच्या उत्तरादाखल माबोवरच्या सुगरणींनी मला भरपूर मदत केली, पण ब्राइनिंगचा अनुभव कुणाला नव्हता. एक्सेप्ट एक, त्यांनी फार खारट होईल म्हणून ब्राईन करू नये असे सांगितले. सर्वच सुगरणींची नावं लिहिली नाहीत म्हणून न रागावता मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती.
तर ब्राइन करणे = चिकन, टर्की इ.ना रात्रभर (किमान १२ तास) पाण्याच्या वजनाच्या ६% मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून फ्रीजात ठेवणे. यामुळे चिकन कोरडे व तोंडात पावडरी न लागता ज्यूसी व सकुलंट लागते. हे प्रकरण करणे कठीण वाटत होते. तेव्हा ड्राय ब्राइनिंगचा विचार केला, पण तेही मनाला पटेना. अन रेस्पी फॉलो करायची तर ब्राईन करायलाच हवे, म्हणून नेटाने रिसर्च करू जाता एक मध्यम मार्ग सापडला.
त्या मार्गानुसार, १ पेलाभर (सुमारे २०० मिली) पिण्याच्या पाण्यात १ चमचा (सुमारे १०-१२ ग्रॅम) समुद्राचे मीठ मिसळून, (याला ६% हायपरटोनिक सलाइन म्हणता येईल) २० सीसीच्या सिरींजने इंजेक्शन दिल्याप्रमाणे सर्व चिकनला टोचले. सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.
यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.
पहिली स्टेप स्टफिंग.
नॉनस्टिक पॅनमधे थोडं तेल घेऊन त्यात चिमूटभर मिठासोबत कांदा परतावा.
आलं लसूण पेस्ट टाकून कचवट वास जाइपर्यंत परतावे.
कोथिंबीर, पुदिना, तिखट, गरम मसाला व खिमा घालून परतावे.
खिमा जाडसर असावा, नाहीतर गचका होईल. फार जास्त शिजवू नये. कारण नंतर कोंबडीच्या पोटात बसून सुमारे पाऊण तास शिजवला जाणारे. कच्चाही ठेवू नये.
खिमा एका प्लेटमधे काढून गार व्हायला ठेवा. त्यात उकडलेली अंडी सोलून ठेवुन द्यावीत.
दरम्यान ग्रेव्हीची तयारी करावी.
बदाम सोलून, बदाम, काजू, खसखस व शहाजिरे भाजून, त्याची पेस्ट करून घेणे.
कांदा, टमाटा चिरून ठेवला आहे की नाही ते पहाणे. ग्रेव्हीसाठीची इतर उस्तवार पूर्ण करून ठेवा.
आता कोंबडी स्टफ करायला घ्यावी.
आधी एक अंडे भरावे, ज्यामुळे नेककडील ओपनिंग बंद होईल, त्यानंतर थोडा खिमा, पुन्हा एक अंडे पुन्हा खिमा व शेवटी १ अंडे भरून कोंबडी बांधावी.
चिकन ट्रसिंगचे अनेक व्हिडू नेटवर उपलब्ध आहेत, इथे देत नाही. मुद्दा इतकाच की सुती दोरा, ज्याला पूर्वी 'पुड्या बांधायचा दोरा' म्हणत, तो किंवा या कमासाठी मिळतो तो स्पेशल दोरा वापरावा, व चिकन शिजवताना आतला मसाला बाहेर निघणार नाही, असे बांधावे.
आता जाऽड बुडाच्या एका मोठ्ठ्या कढईत ग्रेव्ही करायला घ्यावी.
स्टेप्स त्याच. कांदा परतणे. त्यात आलं लसून पेस्ट घालून परतणे.
त्यात बदाम-खसखस पेस्ट घालून परतणे.
टमाटा घालून तो गळे पर्यंत परतावे. त्यातच तिखट, गरम मसाला.
शेवटी फेटलेले दही घालून परत शिजवावे. चव पाहून थोडे कमीच मीठ घालावे.
इथवर तयार झालेली ग्रेव्ही पूर्ण व्हेज आहे. व्हेज मेंब्रांसाठी यात पनीरबिनीर घालून बाजूला काढू शकता.
आता ग्रेव्हीत आपण तयार करून ठेवलेल्या कोंबड्या पोहायला सोडाव्या.
दर २-३ मिनिटांनी कोंबडी खाली लागू नये म्हणून थोडी वर उचलून पातेल्यात गोल फिरवावी. इतर वेळी झाकण ठेवावे. चमच्याने ग्रेव्ही चिकनवर टाकत रहावी. सुमारे २० मिनिटांनी कोंबडी उलटवावी. व गोल बेबी गोल प्लस आंघोळ सुरू ठेवावी.
अधून मधून टूथपिकने टोचून पहावे.
अल्टिमेटली कोंबडी शिजून तयार होईल. अतीशय अंगच्या रश्शातली कोंबडी बनेल. झाकण ठेवून थोडी रेस्ट होऊ द्यावी. तोपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम उरकावा. नंतर कोंबडी ताटात काढावी.
परतीचे सर्व दोर कापून टाकावेत.
एका हाताने जस्ट लेग बाजूला केला की आपोआप उघडेल इतकी डेलिकेटली शिजली होती. चित्रात खिमा व अंड्याची स्टफिंग दिसते आहे. :
यापुढचा सॅफ्रॉन राइसवर सजवून वगैरे फोटो काढण्याचा बेत हाणून पाडत ५-६ मिनिटांच्या आत कोंबडी गायब झाल्याने फोटोग्राफीचे मार्क ऑप्शनला टाकण्यात आले आहेत.
१. फोटो मार्क मिळवण्यासाठी नव्हेत तर मी केल्याचा पुरावा म्हणून टाकलेले आहेत.
२. हाच प्रकार अत्यंत तेलकट्ट करता येतो, त्यासाठी कांदा परतायच्या आधी भरपूऽर तेल टाकावे. शिजलेली कोंबडी नंतर तेलात तळून घेण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे.
३. खिमा व एग्जच स्टफ केले पाहिजेत असं काही नाही. भरपूर बदाम काजू किसमीस घातलेला भात किंवा आपल्या आवडीच्या भाज्या भरून व्हेज कोंबडीही करता येईल.
अधिक टिपा सुचतील तशा लिहितो, आधी सेव्ह करू देत.
बघा, तुमचं फॅनफॉलोइंग किती
बघा, तुमचं फॅनफॉलोइंग किती आहे.
णीषेध !!! पहिला फोटो आम्ही
णीषेध !!! पहिला फोटो आम्ही कधीच ओळखला आहें
स्वस्ति | 5 January, 2016 -
स्वस्ति | 5 January, 2016 - 16:52
सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.
यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.>>>>>>> त्यामुळे मला वाटतय की तो फ्रीझ बाहेर काढलेल्या कोम्बडीचा फोटु असावा . आणि ती भोकं नाही आहेत , बाष्प आहे . क्लिन्ग फॉईल च्या आत .
दीमा, तुम्ही हा अन्याय केला आहे.
नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या नादात उभरत्या टॅलेंटकडे दुर्लक्ष!
मस्त ईथे आणखीही उपयुक्त
मस्त ईथे आणखीही उपयुक्त माहीत्या मिळत आहेत.
कापोचे तुमचा सेंट्रल ओटा अन ती आयड्या मस्त आहे. मध्यमवर्गीयांना मेहेंगडे पडेल. त्याला पर्याय म्हणून किचनमध्ये भुर्जीपावची गाडी लावली तर स्वस्त पडेल. शाकाहारी लोक्स पावभाजीची गाडी वापरू शकतात.
अरे हो की! स्वस्ती यांनाही
अरे हो की! स्वस्ती यांनाही पारितोषिक विभागून देण्यात येत आहे.
ऋन्म्या! कुठे नेऊन ठेवलीय कोंबडी माझी?
*
भुर्जीची गाडी
ओ डागदर बाबु, अस्स किती
ओ डागदर बाबु, अस्स किती लोकास्नी बक्षिश विभागुन द्येनार हायेत ते आमाला वाईच कळु द्या. साती, ह्यो ढळढळीत अन्याव्य ह्ये माह्यावर. माजी पोस्ट स्वस्तिच्या आदी आली व्हती, खाली बघा. म्याच आदी लिवल की ती क्लिन्ग फिल्लम हाये, मग स्वस्ति आणी चिनुक्सने कापी मारली.:दिवा: येळ बघा माह्या पोस्टची.:फिदी: म्या बाष्पाचे नाय लिवले पण क्लिन्गचे शिक्रेट फोडले. मला बी बक्षिस हवे. ( हातपाय आपटत भोकाड पसरणारी बाहुली)
रश्मी.. | 5 January, 2016 - 19:44
डॉक्टरान्कडे जबरदस्त पेशन्स असल्याने ते असली पाकृ करु शकले. बाकी आम्ही व्हेजमध्ये विचार करुन दमलो. डॉक्टराना नमस्कार.
तो पहिला फोटो फोडायचा प्रयत्न करतेय, डॉ़ कदाचीत शाब्दिक मार देतील.दिवा घ्या आतमध्ये मुरवलेली अख्खी मुर्गी दिसतीय, वरुन बहुतेक क्लिन्ग फिल्म गुन्डाळुन आत मुर्गीला आरपार इन्जेक्शने दिलीत. कारण वरुन नुसती भोके भोके दिसतायत.( पाण्याला भोके दिसणार नाहीत) पण भान्ड्या च्या बाजूला अल्युमिनीअम फॉईल गुन्डाळल्यासारखी वाटतेय.
बाकी मेडीकलमधले काही कळत नसल्याने बरेचसे लिखाण डोक्यवरुन पळुन गेले.
किचनमध्ये भुर्जीपावची गाडी
किचनमध्ये भुर्जीपावची गाडी
बक्षीस एकांकिका स्पर्धेच्या
बक्षीस एकांकिका स्पर्धेच्या निकाला सारखे वादग्रस्त झालेय ::फिदी:
सॉरी हां रश्मी! दीमा यांना पण
सॉरी हां रश्मी!
दीमा यांना पण द्या विभागून पारितोषिक!
मुलांनो आणि मुलींनो, भांडू
मुलांनो आणि मुलींनो, भांडू नका!

कोंबड्यांच्या पोटात सहा अंडी आहेत.
आत्तापर्यंत चारच विजेते!
अजून दोन पारितोषिके बाकी आहेत.
माझा पण उगीच पावशेरः दीमांचे
माझा पण उगीच पावशेरः
दीमांचे हात पाहून त्यांची उंची मध्यम असावी असा निष्कर्ष काढता येतो.
शेरलॉक होम्स पण इतके निष्कर्ष
शेरलॉक होम्स पण इतके निष्कर्ष काढत नसेल फोटो बघून

ये हाथ मुझे दे दे डॉक्टर
ये हाथ मुझे दे दे डॉक्टर .....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कोंबडी बनाने के लिये.
रश्मी यांना देखिल पारितोषिक
रश्मी यांना देखिल पारितोषिक देण्यात येत आहे.
अरे लोकहो, किती मसाला घालणार आहात माझ्या दीड कोंबडीला?
दया: सर , सिर्फ हाथ दिख रहे
दया: सर , सिर्फ हाथ दिख रहे हय... ?
सीआयडी": दया .... इसका मतलब जानते हो?
दया: नही सर.
सी आय डी : इसका मतलब हे ये बिना बॉडी के हाथ है...
::फिदी:
आक्का, मार्गशिर्ष आहे . अंडी
आक्का, मार्गशिर्ष आहे . अंडी नक्को.
दीमांच्या घरची बाई ताटं
दीमांच्या घरची बाई ताटं नारळाच्या शेंडीनं घासते वाटतं, चरे पडलेले दिसत आहेत (आमचा पण शाणपणा :फिदी:)
मंजू, खलबत्ता पण उचलून ठेवायला सांग, खरकटा झालाच आहे बघ
स्वस्ति, सोन्याची आहेत.
स्वस्ति, सोन्याची आहेत.

सोन्या अंडी पण देतो का ?
सोन्या अंडी पण देतो का ?
त्या दोन्ही कोंबड्यांनी एक
त्या दोन्ही कोंबड्यांनी एक गाणे नक्कीच म्हटले असेलः
डाक्टर बाबू देर ना करना

जल्दी लगा दे सुई
मै मर गई उई
कढई इन्डक्शन compatible वाटत
कढई इन्डक्शन compatible वाटत नाही . मुर्ग मुसल्लम च शिजवणे Induction cooktop वर झालयं अस दिसतयं. तसेच मांसांहारासाठी वेगळी भांडी असावीत का अशी शंका येते. जेवायची तयारी घेण्यात बायकी मदत होती असे दिसत नाही, हाताला लागतील ती ताटं वापरली आहेत जेवण (कोंबडी) वाढायला
संध्याकाळी चिकन करायला घेतले,
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.
असे फोटोच्या आधीच सांगितले आहे. तरी पण
शाकाहारी लोक गोबी मुसल्लम पण
शाकाहारी लोक गोबी मुसल्लम पण करतात म्हणे.
तो इंडक्शन कुकटॉपसारखा दिसत
तो इंडक्शन कुकटॉपसारखा दिसत असला तरी इंडक्शन कुकटॉप नसावा
गॅस स्टोव्ह रेंज असावी.
दिमा ,पुढच्या वेळेस फोटो
दिमा ,पुढच्या वेळेस फोटो काढताना हातांच वॅक्सिंग करुन घ्या म्हणजे तुमच्या वयावरुन लोक बुचकळ्यात पडतील
दिमा ,पुढच्या वेळेस फोटो
दिमा ,पुढच्या वेळेस फोटो काढताना हातांच वॅक्सिंग करुन घ्या म्हणजे तुमच्या वयावरुन लोक बुचकळ्यात पडतील
<<
शिरूभौ,
वयावरून ऑल्रेडी पडलेत.
वॅक्सिंग केलं म्हणून लिंगावरून बुचकळ्यात पडायला नकोत
(No subject)
(No subject)
प्रतिसाद पे प्रतिसाद!!
प्रतिसाद पे प्रतिसाद!! प्रतिसाद पे प्रतिसाद!!! नुस्तं
होतंय ..
रोज ही रेस्पी स्वप्नात येतीये.. लौकरच आणली पाहिजे वास्तवात!!!
प्रतिसादांचे दीड शतक
प्रतिसादांचे दीड शतक
Pages