मुर्ग मुसल्लम अर्थात, इंजेक्शन दिलेली कोंबडी.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 January, 2016 - 13:16
murg musallam
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

प्रमाण १ कोंबडीसाठीचे आहे. मी एकाच वेळी २ होल स्किन्ड चिकन, कॉकरेल जातीचे, सुमारे ७-८०० ग्राम प्रत्येकी वापरले होते. चिकन लिव्हर व आतील खाण्यायोग्य भाग खिम्यात मिक्स केलेले होते.
या प्रकारासाठी अख्खी कोंबडी, खाटकास "मुर्ग मुसल्लम बनवण्यासाठी कापून दे" असे सांगून आणावी लागते. नेक व हेड इंटॅक्ट ठेवलेत तरी चालते, नको असल्यास थोडी नेक शिल्लक ठेवून बाकी डिस्कार्ड करावी.

कांदा भारतीय साईजचा आहे.

चमचा = त्यातल्या त्यात मोठा चहाचा चमचा. टेबलस्पून नव्हे.

स्टफिंगसाठी

खिमा :
खिमा : २०० ग्रॅम
कांदा : १ मध्यम बारीक चिरून
आलं लसूण पेस्ट : १ चमचा
तिखट : १ चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
कोथिंबीर : १ ते दीड मुठ बारीक चिरून
पुदिना : अर्धी ते १ मूठ, चवीनुसार. उग्र असला तर कमी घ्या.
मीठ : चवीनुसार. ब्राईन करताना चिकनमधे मीठ घातल्याचे लक्षात ठेवावे.
थोडं तेल. (२-३ चमचे)

६ उकडलेली अंडी

ग्रेव्ही :
बदाम : १२-१४
काजू : ८-१०
खसखस : १ चमचा.
शहाजिरे : २ चिमूट
(काजू, बदाम व खसखस भिजवून, बदाम सोलून, वरील ४री वस्तू कोरड्याच भाजून घ्याव्यात. थोडा खमंग वास येऊ लागला, की त्याची थोडे पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.)

दही : अर्धी-पाऊण वाटी, फेटून. आंबटपणानुसार कमीअधिक करणे.

टमाटा : १ मध्यम, कमी आंबट.

कांदा : बारीक चिरून २ मध्यम
आलं लसूण पेस्ट : २ चमचे
तेल : ३-४ चमचे
धणेपूड : २ चमचे
जिरेपूड :१ चमचा
मिरेपूड : १ चमचा
तिखट : अर्धा चमचा
गरम मसाला : १ चमचा
हळद : पाव चमचा
थोडं तेल

*

चिकन ट्रसिंग : बांधण्यासाठी दोरा.

२० सीसी डिस्पोजेबल सिरिंज.

*
याक्षणी एकादा आयटम विसरलो असलो तर अ‍ॅड करीन, तोपर्यंत माफ करून ठेवावे. Wink

क्रमवार पाककृती: 

तर लोकहो, पाकृमधे विशारदपदवी मिळवायचीच असा पण करून गेल्या इयरेंडला मुर्ग मुसल्लम करण्याचा कट रचला. याची बेसिक पाकृ वाह शेफने यूट्यूबवर दाखवली होतीच. त्याप्रमाणे करता येईल असा कॉन्फिडन्स होता. प्रॉब्लेम फक्त इतकाच होता, की शेफने "मी कोंबडी ब्राईन करून घेतली आहे" असा ओझरता उल्लेख पाकृ व्हिडूमधे केलेला होता.

त्यानुसार, ब्राईनिंगवर रिसर्च सुरू केला. इथे माबोवरही २-३ धाग्यांवर खालीलप्रमाणे कोंबडी सोडून ठेवली.
>>
नमस्कार!

वर्षांतास मटन खिमा व अंडी स्टफ केलेली कोंबडी मुर्ग मुसल्लम स्टाईलने शिजवण्याचे योजिले आहे.(वाह शेफ + मॉड्स) या कोंबडीस ब्राईनिंग करावे किंवा कसे, याबद्दलची मते मागविण्यात येत आहेत.
ड्राय व्हर्सेस वेट ब्राइनिंग. किती वेळ. किती प्रमाण इ. सल्ले स्वीकारार्ह आहेत.
भारतीय प्रकाराने मॅरिनेट करणे व ब्राइनिंग याची तुलना केलीत तर अत्याधिक आनंद होईल.
आपल्या सल्ल्यांमुळे ज्युसी व टेंडर तसेच सक्युलंट (किंवा जे काय होईल ते) होणारे चिकन निजस्थळी पोहोचल्यावर दिलेले आशिर्वाद व शुभेच्छा आपल्यापर्यंत लवकरच (ASAP) पोहचविण्यात येतील.
धन्यवाद!
<<

याच्या उत्तरादाखल माबोवरच्या सुगरणींनी मला भरपूर मदत केली, पण ब्राइनिंगचा अनुभव कुणाला नव्हता. एक्सेप्ट एक, त्यांनी फार खारट होईल म्हणून ब्राईन करू नये असे सांगितले. सर्वच सुगरणींची नावं लिहिली नाहीत म्हणून न रागावता मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती.

तर ब्राइन करणे = चिकन, टर्की इ.ना रात्रभर (किमान १२ तास) पाण्याच्या वजनाच्या ६% मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून फ्रीजात ठेवणे. यामुळे चिकन कोरडे व तोंडात पावडरी न लागता ज्यूसी व सकुलंट लागते. हे प्रकरण करणे कठीण वाटत होते. तेव्हा ड्राय ब्राइनिंगचा विचार केला, पण तेही मनाला पटेना. अन रेस्पी फॉलो करायची तर ब्राईन करायलाच हवे, म्हणून नेटाने रिसर्च करू जाता एक मध्यम मार्ग सापडला.

त्या मार्गानुसार, १ पेलाभर (सुमारे २०० मिली) पिण्याच्या पाण्यात १ चमचा (सुमारे १०-१२ ग्रॅम) समुद्राचे मीठ मिसळून, (याला ६% हायपरटोनिक सलाइन म्हणता येईल) २० सीसीच्या सिरींजने इंजेक्शन दिल्याप्रमाणे सर्व चिकनला टोचले. सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.

यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.

mm00.jpg

पहिली स्टेप स्टफिंग.
नॉनस्टिक पॅनमधे थोडं तेल घेऊन त्यात चिमूटभर मिठासोबत कांदा परतावा.
आलं लसूण पेस्ट टाकून कचवट वास जाइपर्यंत परतावे.
कोथिंबीर, पुदिना, तिखट, गरम मसाला व खिमा घालून परतावे.
खिमा जाडसर असावा, नाहीतर गचका होईल. फार जास्त शिजवू नये. कारण नंतर कोंबडीच्या पोटात बसून सुमारे पाऊण तास शिजवला जाणारे. कच्चाही ठेवू नये.
mm01.jpg
खिमा एका प्लेटमधे काढून गार व्हायला ठेवा. त्यात उकडलेली अंडी सोलून ठेवुन द्यावीत.
mm02.jpg

दरम्यान ग्रेव्हीची तयारी करावी.
बदाम सोलून, बदाम, काजू, खसखस व शहाजिरे भाजून, त्याची पेस्ट करून घेणे.
कांदा, टमाटा चिरून ठेवला आहे की नाही ते पहाणे. ग्रेव्हीसाठीची इतर उस्तवार पूर्ण करून ठेवा.

आता कोंबडी स्टफ करायला घ्यावी.
mm03.jpg
आधी एक अंडे भरावे, ज्यामुळे नेककडील ओपनिंग बंद होईल, त्यानंतर थोडा खिमा, पुन्हा एक अंडे पुन्हा खिमा व शेवटी १ अंडे भरून कोंबडी बांधावी.

चिकन ट्रसिंगचे अनेक व्हिडू नेटवर उपलब्ध आहेत, इथे देत नाही. मुद्दा इतकाच की सुती दोरा, ज्याला पूर्वी 'पुड्या बांधायचा दोरा' म्हणत, तो किंवा या कमासाठी मिळतो तो स्पेशल दोरा वापरावा, व चिकन शिजवताना आतला मसाला बाहेर निघणार नाही, असे बांधावे.

mm04.jpgtruss1.jpg

आता जाऽड बुडाच्या एका मोठ्ठ्या कढईत ग्रेव्ही करायला घ्यावी.
स्टेप्स त्याच. कांदा परतणे. त्यात आलं लसून पेस्ट घालून परतणे.
त्यात बदाम-खसखस पेस्ट घालून परतणे.
टमाटा घालून तो गळे पर्यंत परतावे. त्यातच तिखट, गरम मसाला.
शेवटी फेटलेले दही घालून परत शिजवावे. चव पाहून थोडे कमीच मीठ घालावे.

mm05a.jpg

इथवर तयार झालेली ग्रेव्ही पूर्ण व्हेज आहे. व्हेज मेंब्रांसाठी यात पनीरबिनीर घालून बाजूला काढू शकता. Wink

आता ग्रेव्हीत आपण तयार करून ठेवलेल्या कोंबड्या पोहायला सोडाव्या.
mm05.jpg

दर २-३ मिनिटांनी कोंबडी खाली लागू नये म्हणून थोडी वर उचलून पातेल्यात गोल फिरवावी. इतर वेळी झाकण ठेवावे. चमच्याने ग्रेव्ही चिकनवर टाकत रहावी. सुमारे २० मिनिटांनी कोंबडी उलटवावी. व गोल बेबी गोल प्लस आंघोळ सुरू ठेवावी.

अधून मधून टूथपिकने टोचून पहावे.

अल्टिमेटली कोंबडी शिजून तयार होईल. अतीशय अंगच्या रश्शातली कोंबडी बनेल. झाकण ठेवून थोडी रेस्ट होऊ द्यावी. तोपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम उरकावा. नंतर कोंबडी ताटात काढावी.

mm06.jpg

परतीचे सर्व दोर कापून टाकावेत.

एका हाताने जस्ट लेग बाजूला केला की आपोआप उघडेल इतकी डेलिकेटली शिजली होती. चित्रात खिमा व अंड्याची स्टफिंग दिसते आहे. :
mm07.jpg

यापुढचा सॅफ्रॉन राइसवर सजवून वगैरे फोटो काढण्याचा बेत हाणून पाडत ५-६ मिनिटांच्या आत कोंबडी गायब झाल्याने फोटोग्राफीचे मार्क ऑप्शनला टाकण्यात आले आहेत. Sad

वाढणी/प्रमाण: 
१ कोंबडी = खाणार्‍यांनुसार २ ते ४ जण.
अधिक टिपा: 

१. फोटो मार्क मिळवण्यासाठी नव्हेत तर मी केल्याचा पुरावा म्हणून टाकलेले आहेत.

२. हाच प्रकार अत्यंत तेलकट्ट करता येतो, त्यासाठी कांदा परतायच्या आधी भरपूऽर तेल टाकावे. शिजलेली कोंबडी नंतर तेलात तळून घेण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे.

३. खिमा व एग्जच स्टफ केले पाहिजेत असं काही नाही. भरपूर बदाम काजू किसमीस घातलेला भात किंवा आपल्या आवडीच्या भाज्या भरून व्हेज कोंबडीही करता येईल.

अधिक टिपा सुचतील तशा लिहितो, आधी सेव्ह करू देत.

माहितीचा स्रोत: 
वाह-शेफ @ वाहरेवाह.कॉम, इंटरनेट, मायबोलीवरील सुगरणींच्या टीपा. प्लस माझ्या काड्या.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दामलेकाका लोकांच्या घरी जातात का? ते स्टुडियोतच असतात आणि लोकांना तिथे बोलवून रांधावाढायला सांगतात.
ते घरी जाणारे संकर्षण आहेत.

१. कोंबडी स्टफ करतानाच्या फोटोत ओटा एल शेप आहे हे कसं कळलं?
२. डॉक्टर साहेब ओट्यापासून फार लांब उभे आहेत असं फोटोत वाटतंय त्यावरून जेवण करायची सवय नसावी असं वाटलं.
३. हातावरून ते त्यांचं वय बरंच असलं म्हणत असले तरी तसं अजिबातच वाटत नाहीये.

मुर्ग मुसल्लम टर्निंग इंटू डिटेक्टिव्ह स्टोरी Wink

ऑब्जेक्शन टू प्वाइंट २ : फोटोमधे स्वतः कमी व कोंबडी जास्त यावी अशी अपेक्षा असल्याने मागे सरकून फोटो काढलेला असावा.

डॉ Proud अहो बाया बापडे असे एकत्र लिहीले तरी मध्ये आडवी रेघ (-) असते की. मग बाया वेगळ्या आणी बापड्या (पुरुष) वेगळे की. का बायाना बापडे म्हणजे गरीब बिचार्‍या म्हणतात्?:अओ:

कोंबडीला पर्याय दुधी वाचून कट्टर मांसाहार्‍यांनी अंगावर आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडून घेतलं असेल
Lol

घरगुती मूर्ग मुसल्लम अप्राप्य वाटल्यामुळे लोकांनी सल्लाकेंद्र चालू केलं का इकडे? Wink
लगेहाथ मी पण एक देऊन टाकते (सल्ला!).
कोंबडी भरताना मिसळण्याचा डबा बंद करून ठेवा. स्टफिंगच्या झटापटीत शिंतोडे उडतील त्यात Proud

कापोचे भन्नाट पोस्ट!

कोंबडी भरताना मिसळण्याचा डबा बंद करून ठेवा. स्टफिंगच्या झटापटीत शिंतोडे उडतील त्यात >>>>> फायनल प्रॉडक्टैवजी माझंही लक्ष तिकडेच होतं!

>>>> ताटातील त्या दोन कोंबड्या अतिशय दयनिय दिसतायत. स्मित <<<<<
कोणत्याही डागदरापुढे खाटेवर आडवा पडलेला पेशण्ट असाच दयनीय दिसत असतो.. Proud

कोणत्याही डागदरापुढे खाटेवर आडवा पडलेला पेशण्ट असाच दयनीय दिसत असतो. >>> लिंब्याला कुठल्यातरी इस्पितळात सोललेला दिसतोय.. ड्रेस्ड लिंबू Wink

सायो | 6 January, 2016 - 09:16

१. कोंबडी स्टफ करतानाच्या फोटोत ओटा एल शेप आहे हे कसं कळलं?
२. डॉक्टर साहेब ओट्यापासून फार लांब उभे आहेत असं फोटोत वाटतंय त्यावरून जेवण करायची सवय नसावी असं वाटलं.
३. हातावरून ते त्यांचं वय बरंच असलं म्हणत असले तरी तसं अजिबातच वाटत नाहीये.
>>>>>>>>>

अगदी अगदी!!! Wink

ते कोपर्‍यातलं पातेलं दोन कोंबड्या ठेवायला जास्त मोठं नाही का वाटतं? त्यात ४-५ कोंबड्या राहतील. (हे आपलं उगाच Proud )

कुठली तरी फळभाजी कोरून त्यात व्हेज चेंदामेंदा आणि बाळ बटाटे भरुन पाहिलं पाहिजे. बाळ बटाटे गॅसवर किंवा कोळश्यांवर भाजून घ्यायचे होळीत भाजतात तसे. मस्त लागेल.

करमचंद मोड ऑन
हातांवरुन दीमांचा लेक डॉक्टर वगैरे नसून शाळेत किंवा फारतर कॉलेजात असावा असं वाटतंय.
करमचंद मोड ऑफ

Biggrin deema, tumhi core expertise bahercha dhaga kadhala tar public bagha davaNi sodun uDhLala. Eravi kuNachi himmat... :diwa: Wink

हे घरी करणे मला तरी जमणार नाही.
पुण्यात कुठे चांगले मिळेल ते सांगा म्हणजे मला शांती मिळेल .

कापोचे, दीमांचा पेशंट डोळ्यांचा पेशंट असणार ना? मग त्याला बरोबर दोन इंचांवर इन्जेक्शन टोचायचं दिसलं तर पाहिजे! दीमा Light 1

दीमा, रागावलात काय? फोटोतला हात वयस्कर माणसाचा वाटत नाहिये म्हणून लेकाचा आहे का विचारलं टिपी म्हणून. तुमचाच असेल तर काँप्लिमेंट समजा Happy

THE NATION WANTS TO KNOW
,
,
,
,

तो पहिला फोटो कशाचा आहे???

अचूक रहस्यभेद केल्याबद्दल सिंडाक्का व चिनूक्स यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात येत आहे. Wink

If person does regular exercise and very fitness cautious then the hand of middle age (50 ish)might look like young person's. So it's possible it belongs to dima. Remember reading somewhere on mb about doc telling his age to LT.

Remember reading somewhere again on mb that the doc has only daughter so that hand might not be of his son's. ☺

Pages