सर्वप्रथम तमाम मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टीचा फायदा घेत व २०१५ वर्षात कमी ठिकाणी झालेल्या भटकंतीचा बॅकलॉग भरण्यासाठी ४ दिवसांची गुहागर भटकंती करून आलो. मुंबई - पुणे - सातारा - उंब्रज - पाटण - कोयनानगर - कुंभार्ली घाट - चिपळुण - गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - राई-भातगाव मार्गे गणपतीपुळे - जयगड - तवसाळ - अंजनवेल - गोपाळगड - गुहागर - चिपळुण - कुंभार्ली घाट - पाटण - दातेगड किल्ला - सडा वाघापुर मार्गे सातारा - शेरे लिंब येथील "बारा मोटेची विहिर" - बावधन (वाई) - पुणे - मुंबई असा भरगच्च कार्यक्रम होता. सदर भटकंतीचा हा चित्र वृत्तांत.
प्रचि ०१हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश
प्रचि ०२हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ
प्रचि ०३
हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!
प्रचि ०४हेदवीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा
प्रचि ०५
प्रचि ०६उफराटा (उरफाटा) गणपती मंदिर (गुहागर)
प्रचि ०७
खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासुन गुहागरला वाचवण्यासाठी, एका भक्ताच्या हाकेला श्री गणपती धावून आला. पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख वळवून सागराकडे म्हणजेच पश्चिमाभिमुख केले. समुद्र शांत झाला व गुहागरचे संरक्षण झाले. दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणुन "उफराटा गणपती". (आख्यायिका)गुहागरचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०वेळणेश्वर
प्रचि ११दुर्गादेवी मंदिर
प्रचि १२
प्रचि १३राई-भातगाव पूल
प्रचि १४
गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव भातगाव व रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणारा पूल. या पुलामुळे गणपतीपुळे, जयगड, या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे सुलभ झाले.
प्रचि १५जयगडची खाडी
प्रचि १६
प्रचि १७रोहिले गाव
हेदवीच्या पुढे तवसाळला जाणार्या रस्तावर "रोहिले" नावाचे गुहागर तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असलेले गाव वसले आहे.
प्रचि १८
प्रचि १९तवसाळचा समुद्रकिनारा
प्रचि २०तवसाळ - जयगड फेरी बोट
प्रचि २१
तवसाळहुन अगदी ४०-४५ मिनिटात आपल्या गाडीसहित जयगडला पोहचत येते आणि तेथुन पुढे कर्हाटेश्वर, मालगुंड गावांना भेट देत गणपतीपुळ्यास कमी वेळात जाता येते. (राई-भातगावहुन जाकादेवी मार्गे गणपतीपुळे तर तवसाळ-जयगड फेरीबोटीने मालगुंड मार्गे गणपतीपुळे)
प्रचि २२
प्रचि २३जयगड किल्ल्याचा उपदुर्ग "विजयगड"
प्रचि २४गोपाळगड
प्रचि २५
प्रचि २६टाळकेश्वर दीपगृह
गोपाळगडाच्या जवळच दीपगृह आणि टाळकेश्वर मंदिर आहे. येथील कर्मचार्यांच्या परवानगीने दीपगृह पाहता येते. संध्याकाळी ५ पर्यंत दीपगृह पाहता येते.
प्रचि २७
प्रचि २८टाळकेश्वर मंदिर
प्रचि २९अंजनवेल येथील बहुचर्चित एनरॉन प्रकल्प
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३आंबेमोहर
प्रचि ३४
प्रचि ३५बकुळ
प्रचि ३६अंजनवेल येथील "अंजन वेल"
प्रचि ३७चांडाळ चौकडी
प्रचि ३८तळटीपः
१. प्रकाशचित्रे टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत.
२. वरील काही माहिती "पराग पिंपळे" यांच्या "साद सागराची गुहागर-वेळणेश्वर-हेदवी" या पुस्तकातुन. गुहागर भटकंतीसाठी (रादर को़कण भटकंतीसाठी) अतिशय उपयुक्त पुस्तक आहे.
पुढील भागात "गणपतीपुळे परीसर"
मस्तच..
मस्तच..
माका बी जाउक होया||| खिशाला
माका बी जाउक होया|||
खिशाला परवडतील अशी आणि तरीही स्वच्छ चांगली हॉटेल्स सजेस्ट करणे. राहाण्यासाठी आणि जेवणाखाण्यासाठी, जिथे मुंबईतल्या हॉटेल्स सारखे पंजाबी वेज जेवण मिळेल अशी. (आता कोकणात जाऊन पंजाबी जेवण कशाला असे अवांतर नको)
जिप्सी तू कमाल आहेस आता पुढची
जिप्सी तू कमाल आहेस आता पुढची सायकल राईड नक्कीच गुहागर ला करणार
सगळे फोटो फार मस्त
मस्त फोटो.
मस्त फोटो.
झक्कास फोटो.
झक्कास फोटो.
मस्त फोटो जिप्सी ...
मस्त फोटो जिप्सी ...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
कुठे उतरला होतात याची माहिती मिळु शकेल का?? - मला असा plan करायचा आहे.>>>>स्नेहमयी, गुहागरात मित्राच्या घरी राहिलेलो, श्रुंगारतळी जवळ गाव होत. तळी हा बेस ठेवुन बाकीचा भटकंतीचा कार्यक्रम आखलेला.
आता पुढची सायकल राईड नक्कीच गुहागर ला करणार>>>>अमित
दापोलीला गेलात तसेच जाऊन पुढे दाभोळला सायकल बोटीत टाकुन गुहागरात, धोपावे, वेलदुर, अंजनवेल करत गुहागरात येऊ शकतात किंवा पुणे-सातारा-उंब्रज-कुंभार्ली घाट-चिपळुन-गुहागर मार्गे.
पुणे ते गुहागर अंतर साधारण २८० किमीच्या आसपास आहे.:-)
राहाण्यासाठी आणि जेवणाखाण्यासाठी, जिथे मुंबईतल्या हॉटेल्स सारखे पंजाबी वेज जेवण मिळेल अशी>>>>>आम्ही मित्राच्या घरी राहिलेलो सो राहण्यासाठी हॉटेलचा अनुभव नाही. पण मुंबईतल्या हॉटेल्स सारखे पंजाबी वेज जेवण मिळु शकेल.
फक्त याला टाळता येतं का ते बघा


हायला. क स ला मासा दिसतोय
हायला.
क स ला मासा दिसतोय तो... स्लर्प. अशक्य भारी.
अमितव
अमितव

हहाआआआआआआआआ.. येईच मिस्सिंग
हहाआआआआआआआआ.. येईच मिस्सिंग था.. मला वाटलं यावेळी जळवण्याचा विचार नसेल बापड्याचा.. पण नाही..
चला..मस्त ओळख झाली
चला..मस्त ओळख झाली सहलीची..पुढल्या वेळी डीट्टो हा प्रोग्राम अरेंज करता येईल..
प्रचि मस्तच.. आवडेश..
ते होड्यांचे प्रचि मीसुद्धा काढलेत .. जवळपास याच अँगलने.. आता म्हटलय कि टेक्नीकली प्रचि धड आले नै म्हणजे बरोबरच आहे म्हणायचं
जिप्सी मासेखाऊ किन्वा
जिप्सी
मासेखाऊ किन्वा नॉनव्हेज खाऊन्ची काय बिशाद की ते असले रुचकर जेवण टाळतील. पण खरी पन्चाईत झाली ती माझी. पहिल्यान्दा कोकणात गेले पण मी सोडुन बाकी सारे मासेखाऊ असल्याने त्यान्ची चन्गळ झाली. पण मला मात्र उकडलेल्या बटाट्याची भाजी आणी पचपचीत मटकी उसळ खावी लागली. नाईलाज होता. व्हेजमुळे नाही तर त्या बेचव अन्नाने माझे डोके फिरले.
मामीनी चान्गले चिटणीसान्बद्दल ( नागाव) सान्गीतले होते, पण आम्हाला वेळच झाला नाही, कारण सकाळी जाउन लगेच रात्री पुण्यात आलो. आधी ओळखीच्याना जायचे होते म्हणून मामीना विचारले, पण ते परीचीत तिकडे गेले नाही, मात्र आम्ही एका दिवसात अचानक ठरवुन गेलो. व्हेज वाल्यानी अगदी निवडुन निवडुन सोयी शोधाव्या हे उत्तम.
मस्तच! गुहागर
मस्तच! गुहागर पहायचंय!

गुर्जी...१० नं प्रचीसारखा एक माझ्याकडेही आहे. सापड्ला तर डकवते. अर्थातच मॅटर फक्त साधारण सेम. क्वालिटी नाही हं !
सापड्ला...दापोली.
व्वा ... नेहमीप्रमाणे अप्रतिम
व्वा ... नेहमीप्रमाणे अप्रतिम ..प्रचि ! आणि अप्रतिम वर्णन ...
व्वा जिप्सी ! चुम्मेश्वरी
व्वा जिप्सी ! चुम्मेश्वरी फोटोज आणि कोकण .
ह्या राऊट वर आपल्या गाडीने भटकंती करायची असेल तर कुठे राहणं सोईस्कर पडेल ? जर चांगल्या होटेल्सचे पत्ते पण शेअर केले तर भगवान आपको दुवा देगा.
मस्त फोटो जिप्सी!
मस्त फोटो जिप्सी!
तुझ्या प्रचिंतून जास्त सुंदर
तुझ्या प्रचिंतून जास्त सुंदर दिसतो गुहागर
मस्त. शेवटच्या फोटोत गणपती
मस्त.
शेवटच्या फोटोत गणपती पुळ्याच्या बाजूचे मंदिर कुठले आहे ?
रश्मी, कोकणात हॉटेलमधे खायचं
रश्मी, कोकणात हॉटेलमधे खायचं तर अगदी ठराविक जागा सोडल्या तर शाकाहारी लोकांचे हालच होतात. तरी रत्नागिरी जिल्ह्यात बरी परिस्थिती आहे सिंधुदुर्गापेक्षा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ह्या
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
ह्या राऊट वर आपल्या गाडीने भटकंती करायची असेल तर कुठे राहणं सोईस्कर पडेल ? जर चांगल्या होटेल्सचे पत्ते पण शेअर केले तर >>>>>मी चेक करतो आणि कळवतो.
शेवटच्या फोटोत गणपती पुळ्याच्या बाजूचे मंदिर कुठले आहे ?>>>>>माधव, ते जयगडजवळील जय गणेश मंदिर आहे.
अधिक फोटो खालील भागात पहायला मिळतील:
http://www.maayboli.com/node/57176
Pages