शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत

Submitted by Rajesh Kulkarni on 29 December, 2015 - 08:40

शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
.
नुकताच माझ्या एका मित्राबरोबर दीर्घकाळ गप्पा मारण्याचा योग आला. त्याचे घर गावापासून ब-यापैकी दूर आहे. तेव्हा तेथे सुरक्षिततेचा काही प्रश्न येत नाही का अशी शंका होती. तो म्हणाला त्याने शस्त्रपरवाना घेतलेला आहे. पण कोणी समोर आलेच तर गोळी मारण्याची हिंमत होईल की नाही माहित नाही.

त्या निमित्ताने त्याने या परवान्याच्या भानगडींची गोष्ट सांगितली. परवाना घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला तो का हवा याची पडताळणी झाल्यावर सुमारे सत्तर हजार रूपयांचा डीडी काढून द्यावा लागतो. मग तुमच्या नावचे पिस्तुल की रिव्हॉल्वर भिवंडी की कुठल्या कारखान्यात बनवले जाते. ते तीन महिन्यात तयार होणे अपेक्षित असते. पण सहसा तसे होत नाही. मग डीडी दिलेला असूनही अर्जाची मुदत वाढवण्यासाठी काही हजारांचे शुल्क भरावे लागते. तुम्हाला परदेशी बनावटीचे पिस्तुल हवे असेल तर त्याची किंमत दोन-अडीच लाखांच्या घरात, म्हणजे बरीच अधिक.

असे करून एकदाचे पिस्तुल मिळाले की मग ज्या पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला असतो तेथे तसे कळवायचे. मग आला प्रश्न गोळ्यांचा. कारण आधी भरलेले शुल्क केवळ पिस्तुलासाठी असते, गोळ्यांसाठी नाही. मग गोळ्यांसाठी वेगळा अर्ज. गोळ्यांसाठी पुन्हा भिवंडीला जाण्याची गरज नसते. त्या सरकारमान्य दुकानात मिळतात. त्यासाठी तुमच्याकडे शस्त्रपरवाना असावा लागतो.

सरकारी गोळी पंचावन्न रूपयांना मिळते. व त्या प्रत्येक गोळीचा म्हणजे ती गोळी कोठे वापरली याचा हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा बाजारात असरकारी गोळ्या वीस रूपयांना मिळतात. मग त्या गोळ्या 'सरावा'साठी वापरता येतात.

सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसेल अशा पद्धतीने कमरेला लावून फिरण्याची मुभा नसते. तसे केल्यास कोणीही नागरिक तुम्ही दहशत माजवत आहात अशी तक्रार करू शकतो.

असे प्राणघातक शस्त्र बाळगायचे तर काही प्राथमिक शिस्त पाळायला हवी हे सांगितले जाते. म्हणजे त्यासंबंधीची नियमावली दिली जाते. उदाहरणार्थ, कोणीही म्हणजे अगदी कोणी पोलिस अधिका-याने जरी ते शस्त्र मागितले तरी आधी त्यातल्या गोळ्या काढून मगच ते त्याच्याकडे द्यायचे.

आता निवडणूक जाहीर झाली या व अशा कारणांच्या वेळी आपल्याकडील शस्त्र पोलिसांकडे परत करावे जागते. निवडणुकीच्या काळात तुमच्या जीवाला धोका असण्याची परवानगी नसते. ते तेथे जमा करण्यासाठी शंभर रूपये पोलिसांना त्यांच्या मेहेरबानीसाठी विनापावतीचे द्यावे लागतात. नंतर ते शस्त्र परत घेतेवेळी शंभर रूपये चालत नाहीत. पाचशे रूपये द्यावे लागतात. अर्थात विनापावतीने. हे तात्पुरत्या काळासाठी शस्त्र परत करणे मोठे गंमतशीर असते. तुम्ही ते परत केलेले आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी तुम्हाला फोन केला जातो. तुम्ही जर परगावी असाल तर तेथेच कोणत्या तरी पोलिस स्टेशनमध्ये ते परत करण्याची अपेक्षा असते. तुम्ही परगावी असाल आणि ते शस्त्र घरी आहे असे सांगितले तरी पंचाईत. कारण मग तुम्हाला त्या शस्त्राची गरज नाही असे समजले जाते.

या सगळ्या कटकटींना कंटाळून त्याने शस्त्रपरवाना रद्द करण्यासाठी चौकशी केली. तेव्हा त्याला कळले की शस्त्रपरवाना परत करणे म्हणजे भरलेली रक्कम परत मिळवणे नव्हे. कारण ते पिस्तुल म्हणजे शस्त्र खास त्याच्यासाठीच तयार केलेले असते, त्यामुळे ते परत घेण्याची पद्धत नसते. तर मग त्या पिस्तुलाचे करायचे काय? आपणच ज्याच्याकडे शस्त्रपरवाना आहे व ज्याला पिस्तुल विकत घ्यायचे आहे अशी व्यक्ती शोधून तिला गाठायचे. व तिच्याशी व्यवहार करायचा. बाकी पोलिस खाते केवळ तुमचा परवाना रद्द करू शकते.

तर अशी ही कैफियत शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागाकर्त्यांची जमात निष्प्राप्य मनाची, निर्भेळ हेतूची आणि सत्तुंगशील विचारांची असते. ते अश्या भरकट कृत्यांकडे कानझाकडोळा करत पुढच्या धाग्याकडे वळतात .. ईति बाबा हृदयन्मेश Happy

धागा कर्ता मनात म्हणत असावा..
काहीपण अपेक्षा
धागा काढून झाला कि कुठे इथे फिरकतात

नाही, लोकांना वाईट सवयी सोडायला उद्युक्त करणार.
आणि वाईट सवयी सोडायची पहिली पायरी म्हणजे स्वत:तील वाईट सवय ओळखणे. तर सुरुवात तिथून करायला लावणार.

बाकी मायबोलीने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठे हे देखील एक ऑनलाईन आश्रमच आहे की Happy

मी खूपच गूळ खात असल्याने मम मातोश्री मजला गुरुमाऊलींच्या पादुकांकडे घेऊन गेली. पादुकास्पर्श करताच गुरुमाऊलींनी पुशिले 'माऊली , काय समस्या? " माऊलीने भणितलें 'हा मूढ बालक सारखा गूळ खात असे. याची संवय सोडवावी.'गुरुमाऊलींनी म्हणितले'माते , एक महिन्यानंतर ये"
एक महिन्यानंतर पुन्हा पादुकांशी लीन झालो. समस्या मांडली . गुरुमाऊळींनी स्नेहार्द्र दृष्टीने मजवर कृपा कटाक्ष टाकला आणि वदले ' बालका, अति गूळ खाणे वाईट. ही संवय आजपासून सोडून दे. आणि या पादुकांना स्पर्श कर.' म्यां पामराने गुरुवाणी आचरिलीं. मातेने पुशिले 'गुरुमहाराज , हे तर आपण एक मासापूर्वीही सांगू शकले अस्ते ना? "' त्यावर गुरुमहाराज सस्मित मुद्रेने वदले 'माते , एक महिन्यापूर्वी मी स्वतःच खूप गूळ खात असे. तस्मात मासभरात मीच गूळ खाण्याचे व्यसन त्याजिलें. मग सांगितले. हे तो प्रचितीचे बोलणे !"

तद्वत, ऋन्मेष बंधूने वाईट सवयी सोडायची पहिली पायरी म्हणजे स्वत:तील वाईट सवय ओळखणे. तर सुरुवात तिथून करायला लावणार हे जे काही वचिले आहे हा साक्षात्कार आहे. आत्मचिंतन आहे आणि गुरुपादुकांच्या कृपेने आलेले आत्मभान आहे...

अधिक काय वर्णावे?

Few commentators have asked RaaKu why is he spreading false information. To them I want to say this why you think RaaKu wants to spread false information. He has written what someone told him. You can comment and say why that information is wrong but do not ascribe intentions to him which you think are correct.
For the information of the commentators who will ascribe some intention to me I want to say this I have been living overseas since 1966 and I do not know RaaKu. Even after this comment you want to attack him be my guest but remember this section is not for settling old or new scores. Let him be.

राकु छान कैफियत मांडली !
पण तसे पाहीले तर सगळ्याच गोष्टीत कटकटीच्या आहेत. राशन कार्ड पासुन ते आधारकार्ड काय अन ७/१२ पासुन ते आयकर काय? ज्याला कटकटी नको त्याने मंत्री व्हावे !

खोटारडे राकु
धाग्यावर खोटी माहिती दिली आहे आणि तसे सांगितल्यावर कोणतेही स्पष्टीकरण ना देता दुसरे धागे काढत आहेत.

अरे! हाय दैय्या! चि कु ऋ चा बाबा हृन्मेषानन्द कधी झाला? की धागे विणता विणता शालच विणली भगव्या रन्गाची? जय हो!

दिगोचि,
It is really unfortunate to see that Maayboli has become a place merely for passing time for some without adding any value to it. Basic decency of not sticking to the subject of the post is not being followed.
Attacking or questioning the member's motives rather than commenting onthe contents of the post has also become a common feature.
Time and again I have requested the administration of this portal to at least allow removal of unwarranted and irrelevant comments on the post so that some basic discipline could be maintained, but somehow nothing seems to be happening in this direction. I do not want to disturb them every time I observe this, but once this features are provided almost all the troubles will be over.
It is really unfortunate.

मायबोली करांना दिलेले वचन पुर्ण केले.
आज वाट वाकडी केली आणि राणीबागेतल्या नीलगायीच्या पिंजर्‍यात शिरलो.
टिपले तिला.

ng 1.JPGng 2.JPG

ng 3.JPG

तळटीप - नीलगायीचे नाव देत पिंजर्‍यात काही भलते सलते ठेवले असेल तर त्याचा दोष राणीबाग प्रशासनाकडे जाईल.

तळटीप - नीलगायीचे नाव देत पिंजर्‍यात काही भलते सलते ठेवले असेल तर त्याचा दोष राणीबाग प्रशासनाकडे जाईल.>> Biggrin
बरोबर आहे. मला ती गाय वाटण्याऐवजी हरिणासारखा कोणतातरी प्राणी वाटतोय.

तुम्ही ज्याला घोडा म्हणत आहात ते घोडा नसून हरण-काळवीटाचाच कुठलासा प्रकार असावा. नजर बारीक करून पाहिल्यास लक्षात येईल ते पलीकडच्या पिजर्‍यात आहे. त्यामुळे ते नीलगाय असल्याचा दावा ना मी करत आहे ना राणीबाग.

आणि ज्याला हरण म्हणत आहात ते नीलवासरू आहे.

Pages