बोलावणे आले की....: भाग १ : http://www.maayboli.com/node/5682
(मागच्या भागावरुन पुढे...
सन्मित्र भार्गव , एक सुशिक्षीत बेकार. नोकरी मिळत नसल्याने एका आडगावातील शेतकर्याच्या इस्टेटीच्या केअर टेकरची नोकरी स्विकारतो, गावी येवुन दाखल होतो. पण इथे आल्यावर स्थानिकांकडुन मिळणारे थोडेसे विचित्र प्रतिसाद, राहत्या जागेत जाणवलेल्या अनाकलनीय, थोड्याशा अबनॉर्मल गोष्टी यामुळे मनोमन अस्वस्थ होतो...पुढे.....!)
आता मात्र मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. अर्थात मी देवभोळा नाहीये. कदाचित लहानपणापासुन लादले गेलेले अनाथपण, जगण्यासाठी खावे लागलेले टक्केटोणपे यामुळे एकप्रकारचा बोथटपणा, बधीरता आलेली होती मनाला. पण तरीही मनात कुठेतरी अका अनामिक भीतीचा जन्म झाला होता. भुताखेतावर विश्वास नाहीये माझा, पण ती नसतातच असे ठामपणे नाही सांगु शकणार मी. म्हणजे कसय बघा, प्रकाश आहे तिथे अंधार आहे, खरेपणा आहे तिथे खोटेपणा आहे...तसंच जर देव असेल तर.......! नाही तर समतोल कसा साधणार निसर्गाचा. भुतखेतं नसतील कदाचित पण जशी सुष्ट शक्ती आहे तशा काही दुष्ट शक्तीही असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कदाचित म्हणुनच तुक्याने सांगितल्याप्रमाणे मी अजुन कुठल्याही वस्तुला अगदीच अपरिहार्य असल्याखेरिज स्पर्ष केला नव्हता. घड्याळात बघितलं तर पाच वाजुन गेले होते. बाहेर पुरेसा उजेड होता. मी वाडा बघुन घ्यायचे ठरवले.
वर सांगितल्याप्रमाणे वाडा दुमजली होता. म्हणजे तळमजला आणि वरची एक माडी. याला एकमजली पण म्हणता येइल का? असो. तळमजल्यावर समोरच मध्यभागी एक मोठा हॉल व त्याच्या दोन्ही बाजुला दोन दोन अशा चार खोल्या होत्या. मी हॉलमध्ये शिरलो आधी दिवे चालु केले. सुदैवाने माणिकरावांनी इथपर्यंत वीज आणलेली होती. दिवे लावल्यावर लक्षात आला तो हॉलचा भव्य आकार. उजव्या बाजुला एक जुना लोखंडी साखळ्यांनी अडकवलेला सुरेख झोपाळा होता. छान पैकी काळ्याभोर शिसवी लाकडाची बैठक होती. क्षणभर मोह झाला बसण्याचा, पण वाडा पुर्ण बघायचा होता आणि इथेच राहायचे आहे आता पुन्हा बसु, असा विचार करुन हॉलचे निरिक्षण करायला सुरुवात केली. चारी भिंती व्यवस्थित रंगवलेल्या होत्या पण पांढरा रंग त्या उदास वातावरणात अजुनच भर घालत होता. एका भिंतीवर फ़क्त एक फोटो होता. झोपाळ्यावर बसलेला एक रुबाबदार पुरुष आणि मागे उभी त्याला साजेशी त्याची पत्नी. माणिकरावांशी मात्र त्यांचे काहीच साम्य नव्हते. असेल कोणीतरी. अचानक लक्षात आले की हॉलला आणखी एक दार आहे आत डोकावुन पाहीले तेव्हा कळाले की तिथे अजुन एक खुपच रुंद अशी खोली होती. बहुदा माजघर म्हणतात तशी. तीचा उपयोग कधी काळी सामान कोठीसारखा केला जात असावा, कारण तिथे मला बर्याच रिकाम्या धान्याच्या कणग्या आढळल्या. बाकीच्या खोल्यांमधुनही काही सटरफटर सामान होते. त्यापैकीच एक माझ्या वाटेला आली होती. वरच्या मजल्यावर पण हीच रचना. फक्त तिथे बाजुच्या खोल्यात जाण्यासाठी हॉलमधुनच जावे लागत होते. इथे मात्र हॉलमध्ये भींतीच्या कडेला एक टेबल ठेवलेले होते. दोन-तीन खुर्च्या ही होत्या. हॉलमध्य पाऊल टाकले मात्र , मनात एक कसलीतरी अनामिक भिती दाटुन आली. जणु काही आतुन आवाज आला.....नाही, नको !!
मी भित्रा नसलो तरी मनाचे आवाज ऐकतो, लगेचच बाहेर आलो. जीने उतरुन खाली आलो. संपुर्ण वाडा बघुन होईपर्यंत साडे सहा - सात वाजायला आले होते. मनातल्या मनात ठरवले उद्या सकाळी परत आप्पांना भेटायचे. त्यांच्या त्या उदगाराबद्दल विचारायचे आणि माणिकरावांनी सांगितलेले कारण खरे असेल तर आप्पांची क्षमाही मागायची होतीच. नकळता का होईना मी त्यांच्या मुलाच्या नोकरीवर हात मारला होता. आणि का कोण जाणे पण माणिकराव म्हणतात तसे आप्पांचा मुलगा दारुडा वगैरे असेल असे वाटत नव्हते. एवढ्या गोड, प्रसन्न आणि तेही मारुतीरायाच्या पुजार्याचा मुलगा असा वाईट मार्गाला लागेलच कसा? एकदम कसल्याशा आवाजाने लक्ष वेधले गेले आणि दचकलोच. मग लक्षात आले कोणीतरी दरवाजाची कडी वाजवत होते. मी पुढे जावुन दार उघडले तर तुक्या जेवण घेवुन आला होता. मी दारातुन बाजुला झालो," ये रे आत ये!"
हा बाबा दारातुनच मला बाहेर यायच्या खुणा करतोय. मी चकीत ! पण बाहेर आलो. तसा त्याने डबा हातात दिला.
"माफी करा दादा, रातच्याला मी आत न्हाय येणाय, भ्या वाटतं. पण त्यांची हद्द फकस्त वाड्याच्या दरवाजापत्तुरच हाय. वाड्याच्या आत काय बी बोललं की त्यास्नी कळतया पगा. दादा, तरुण हायसा, दणकट दिसतासा, कुटंबी काम मिळंल की वो तुमाला. का जिवावर उदार झालासा. परत जावा दादा. ह्यो वाडा, लई वंगाळ हाये. कायतरी भायरचं हाय ततं. मगाशी चुकुन बोलुन गेलो तर पगा कसली शिक्षा मिळली मला.. त्याने माझ्याकडे पाठ केली आणि सदरा वर केला. आणि मी शहारलोच...
या टोकापासुन त्या टोकापर्यंत चाबुक मारावा तसा वळ उमटला होता.
"काय रे हे, कुणी मारलं तुला ? आणि हे ते, त्यांनी.... आहेत कोण ?" मी गोंधळलो होतो.
"ते म्हायीत असतं तर काय सांगायचं होतं दादा. पन आमच्या मालकाचा काय तरी संबंद हाये पगा. तुमी येक करा म्या सांगटल्यापरमानं कशालाबी हात लावु नगा. खोलीत झोपुबी नगा. आन जमल्यास उंद्याच्याला पयले आप्पांना भेटा. तेच कायतरी मार्ग काढतील. आता म्या जातो, मला उशीर झाला तर मालक वरडतील."
एवढं सगळं ऐकल्यावर आणि तुक्याच्या पाठीवरचा तो वळ पाहिल्यावर खरेतर जेवायची इच्छाच राहीली नव्हती. पण जर हे सगळं खरं असेल, जर तुक्या सांगतो तसा खरोखरच इथे अमानवी शक्तीचा वावर असेल तर पळुन जाण्यासाठी का होईना अंगात ताकद असणे जरुरीचे होते. पण का कुणास ठाऊक मी जेवण बाजुला ठेवुन दिले. सकाळी पण बाहेरच जेवलो होतो. मला एकदम आठवलं, घरात जेवायला नको म्हणल्यावर माणिकराव क्षणभर चिडल्यासारखे झाले होते.
"च्यायला.... नाही, आता पासुनच पळायची भाषा. नाही असे होता कामा नये. जे काय असेल त्याचा सोक्षमोक्ष लावायचाच. आजची रात्र काढु उद्या आप्पाजींना भेटु." मी मनाशी ठाम निर्णय घेतला.
सहज वर लक्ष गेले आणि एक गोष्ट लक्षात आली, तुक्या म्हणाला होता कुठंच खिडक्या नाहीत म्हणुन पण वरच्या हॉलला समोरच एक छोटीच पण काचेची खिडकी होती. नाही म्हणायला थोडी भिती वाटायला लागली होती. शेवटी मी एक निर्णय घेतला. मी सांगितलं ना , मी मनाचं म्हणणं शक्यतो टाळत नाही. एक केलं घराच सॉरी गढीचं दार उघडं ठेवलं आणि चक्क दाराबाहेर पथारी पसरली. दाराकडे डोकं ठेवुन झोपी गेलो. मस्त वारं सुटलं होतं. चांदण्या मोजता मोजता कधी तरी झोपेच्या आधीन झालो.
"सन्मित्र, ए सन्मित्र .... कुणीतरी जोरजोरात हाका मारत होतं. मला दचकुन जाग आली. घड्याळात पाहीलं तर फक्त साडे बाराच होत होते. यावेळी कोण हाका मारतय म्हणुन वैतागुनच उठलो. पाहतो तर वाड्याच्या दारातच आप्पाजी उभे होते. मी चकीतच झालो, आप्पाजी एवढ्या रात्री.
"अरे मला माहीत होतं तु घाबरला असशील, म्हणलं नवीन जागा, पोरगं घाबरुन जाईल, जावं सोबतीला, म्हणुन आलो झालं. सगळं आटपुन यायला उशीर लागला तर तु असा बाहेर झोपलेला. चल ये आतच झोपु दोघे मिळुन. आता मी आहे, घाबरु नको."
मला इतकं छान वाटलं म्हणुन सांगु. एकदम धीर आला. शेवटी आप्पाजीच आले होते आधाराला. या अशा अनोळखी जागेत, या पछाडलेल्या घरात कुणाचीतरी सोबत हवीच होती. म्हणुन उठलो पथारी गुंडाळली आणि घरात जायला निघालो.
"चल, चल लवकर, घाई कर नाहीतर कुणीतरी येइल." आप्पांना एवढी घाई कशाची झाली होती आणि कुणाची भिती वाटत होती. मी विचार करतच होतो, तोवर मागुन हाक आली,
" दादानु, नका जावु आत, त्ये आप्पा न्हायती !" हा तर तुक्याचा आवाज मी मागे वळुन पाहीलं तर खरेच तुक्या होता. वाड्यापासुन जवळजवळ फर्लांगभर अंतरावर उभा राहुन तो बोलावत होता. इकडे आप्पाजी घाई करत होते. "चल सन्मित्र , तो तुक्या नाही, पिशाच्च आहे." मला काही कळेना नक्की कोण खरे बोलतोय. वारा सु सु करत वाहत होता. त्यातच झाडांची सळसळ रात्रीच्या भयावहतेत भर घालीत होती. घशाला भितीने कोरड पडली होती. एवढ्या थंडीतदेखील मला घाम फुटला होता.
संकटाच्या वेळी आपोआप मेंदुला धार चढते म्हणतात. माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी आप्पाजींना म्हणालो," आप्पाजी, अहो तुम्ही बरोबर असताना कसली आलीय भीती, चला दोघे मिळुन त्या पिशाच्चाला घेरु."
"नाही, नाही मी बाहेर नाही येणार आता, तुच लवकर आत ये! चल नाहीतर ते पिशाच्च जवळ येतय बघ. "
मी वळुन पाहीलं तर खरोखरच तो तुक्या जवळजवळ येत होता. मला काही कळेना, आपोआपच मुखातुन ओळी बाहेर पडायला लागल्या.... "भिमरुपी, महारुद्रा, वज्रहनुमान मारुती.....!" आणि....
.......
............
तसे आप्पाजी एकदम गायब झाले. तुक्या मात्र अजुन जवळ आला.
"दादा, मस्नी वाटलंच होतं पगा, आज राती कायतरी व्हनार, म्हुन म्या हितंच लपुन बसलो हुतो!"
"झोपा आता बिनघोरी, त्ये न्हाय यायचं आता, म्या थांबतु पायजे तर!"
माझा कंठ दाटुन आला, कोण कुठला तुक्या, माझ्यासाठी जिवावर उदार होवुन आला होता.
"नाही, तुका तु जा आता, मी सावध राहीन आता ! ", मी त्याला सांगितलं तसा थोडासा साशंकपणेच तो परत गेला.
झोपेचं खोबरं तर झालंच होतं. मग तसाच झोपेचा प्रयत्न करत राहीलो. कधीतरी पहाटेच्या सुमारास झोप लागली. सकाळी उठल्यावर आत जायला पण भीती वाटायला लागली. तसाच धीर करुन आत घेतलो. कपडे घेतले आणि बाहेर पडलो. शेतातली विहीर शोधुन काढली आणि सुर मारला...........
आता कसं प्रसन्न वाटत होतं. १० वाजता माणिकराव येणार होते. घड्याळ बघीतले तर ८ वाजायला आले होते. घाई करायला हवी होती. पटापट आन्हिकं उरकली. मनोमन मारुतीरायाला नमस्कार केला कारण वाड्यावर कुठेच, कुठल्याही देवाचा फोटो मला आढळला नव्हता.
माझे मलाच हसु आले. कर्हाडात एवढी मंदिरे होती पण मी कधी कुठल्याच देवाला दर्शन दिले नव्हते. काळ समोर दिसायला लागला कि त्याची आठवण होते म्हणतात ते काही खोटे नाही. कपडे बदलले आणि घाई घाईत गावाकडे जायला निघालो.
मध्येच तुक्या भेटला. नाश्ता घेवुन आला होता तो. मला बघितलं की म्हणाला," दादा काल येक जेवलासा हितं, आजबी म्या नाश्ता घेवुन आलुया. पण नगा खावु हे खाणं. माझ्यावाणी अडकुन पडाल न्हायतर. लई वरसापुर्वी म्या चोरी करायला वाड्यात घुसलो होतो. येवस्तित तितनं पितळ्याची भांडी पळवली. ती इकली आन मयनाभर वापरला पैका. आन त्या नंतर अंगावर फोडं याया सुरुवात झाली. लई आग आग व्हायाची पगा.
चार दिसानंतर मालक आलं माज्याकडं. म्हणालं गुमान चल माज्यबरुबर, न्हायतर हि फोडं अशीच वाढतील आणि येक दिस घेवुन जातील वर."
म्या मालकाकडं आलो तर तासात फोडं गायब. नंतर येकदा पळायचा इच्चार केला नुसता तर परत फोडं आली. तवापसनं नाद सोडला अन हितंच अडकलुया पगा. पन दादा, लई वंगाळ हाये हे समदं. काय करु. म्हनलं तुमालातरी हुश्शार करावं."
का कुणास ठाऊक, मी त्याला पण सांगितलं नाही की काल रात्री मी जेवलोच नाही. त्याला सांगितलं हा नाश्ता असाच कुठल्यातरी कोपर्यात टाकुन दे, किंवा जमीनीत गाडुन टाक. आणि माणिकरावांजवळ काही बोलु नको. अगदी या भेटीबद्दलसुद्धा. मी आप्पाजींकडे चाललोय आता. कुणाला बोलु नकोस. तर त्याने थडाथडा थोबाडीत मारुन घेतल्या. "न्हाय, बा मला काय याड लागलय काय? हे समदं संपायला होवं दादा, संपायला होवं. तुमी आपांना भेटाच, त्यो देवाचा मानुस हाय. त्योच सोडवल पगा या समद्यातुन."
मी मंदिरात आलो. मारुतीरायाला साष्टांग दंडवत घातला. त्यानेच तर वाचवलं होतं रात्री त्या महाभयंकर संकटातुन.
"उठा सन्मित्र, मला माहीत होतं तुम्ही येणार ते. आणि आज एकदम साष्टांग दंडवत. हनुमंतानं प्रचिती दिलेली दिसते रात्री.घ्या प्रसाद घ्या."
मी आप्पांनाही नमस्कार केला. प्रसाद घेतला आणि त्यांना सगळं काही नीट सांगितलं.
"सन्मित्र मला वाटतं, यु आर द चोजन वन फ़ोर धिस जॉब!
मी बघतच राहिलो..आप्पाजी आणि इंग्लिश.
"असे बघताय काय, खेड्यात राहतो म्हणुन तुला काय मी अडाणी वाटलो काय? पुणे विद्यापिठाचा एम.ए. आहे मी फिलॉसॉफीचा. स्वामींची आज्ञा झाली म्हणुन इथे येवुन राहीलोय."
" स्वामी ..?" मी चक्रावलोच." आप्पाजी खरेतर मी माफी मागायला आलो होतो. नकळत का होईना माझ्यामुळे तुमच्या मुलाच्या पोटावर पाय आला. क्षमा करा." मी अगदी मनापासुन बोलुन गेलो.
तर आप्पाजी खळखळुन हसायलाच लागले,
" अच्छा तर त्या माणिकरावांनी हे भरवुन दिलं तर तुझ्या मनात. अरे वेड्या, मी मारुतीरायाचा भक्त, समर्थ रामदास स्वामींचा शिष्य. समर्थांच्या शिष्यपरंपरेतली १४ किंवा १५ वी पिढी माझी. बालब्रम्हचारी आहे बाबा मी. शिक्षण सुरु व्हायच्या आधी आणि नंतर आयुष्याच्या ३२ व्या वर्षापर्यंत सज्जनगडावर आनंदस्वामींच्या चरण सेवेत होतो. दहा वर्षापुर्वी स्वामींची आज्ञा झाली की तुझी गरज आता प्रतापनगरात आहे. म्हणुन आलो इथे. तेव्हापासुन इथेच आहे. मला वाटतं याच कामासाठी स्वामींनी मला इथे पाठवलं होतं."
"असो तु जा आता माणिकराव येतील थोड्या वेळात वाड्यावर. तुला, तु म्हणले तर चालेल ना?"
त्यांनी विचारले आणि मलाच शरमल्यासारखे झाले. "काय आप्पाजी, असं का विचारता? अहो, तुमचा अधिकारच आहे तो!"
"एक काम कर, जाताना ही मारुतीरायाची तसवीर घेवुन जा, वाड्यात गेलास की माणिकराव गेल्यानंतर योग्य जागा आणि योग्य वेळ बघुन वाड्यातच कुठेतरी प्रतिष्ठापना कर देवाची आणि हो हा गोफ बांध गळ्यात. चिंता करु नको, मारुतीरायावर विश्वास ठेव , संध्या़काळी मी येइन वाड्यावर, मला ही एकदा बघायचाच आहे तो वाडा."
आता आप्पाजींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. ती बघुन मला पण कमालीचे आश्वस्त वाटायला लागले. मग त्यांनी मला तिथलाच एक मारुतीरायाचा फोटो आणि एक गोफ दिला आणि काही बोलायची संधी न देता ते पुन्हा गाभार्यात शिरले. मी मनोमन त्यांच्या पाठमोर्या आकृतीला नमस्कार केला आणि झपाझप वाड्याकडे निघालो. मनात अजिबात शंका नव्हती की माणिकराव येणार आहेत हे आप्पाजींना कसे कळले असावे. मारुतीराया धन्य आहेस बाबा.
क्रमश:
(रेखाटनः पल्लवी देशपांडे)
सहीच! वेग
सहीच! वेग घेते आहे कथा आता.
अरे बापरे..
अरे बापरे.. विशाल या कथेचा मला तरी काही अंदाज येत नाहीये... पण भिती वाटली .. काय लिहीतोस तु ... पैजणचा क्लायमॅक्स आठवला..
आता पुढची कथा कधी टाकणार ? सोमवारीच टाक
वाह! अगदी
वाह! अगदी राहवल नाही हा भाग संपवे पर्यत. अधाशासारखं वाचुन काडल.. हुरहुर वाढलेय.. लवकर येवुदे पुढचं..
पल्लवी,
पल्लवी, सुरुची धन्स, आता पुढचा आणि बहुदा शेवटचा भाग १४ किंवा १५ तारखेला टाकेन, कारण ४ दिवसासाठी हैद्राबादला चाललो आहे. तिथे "मॅप वर्ल्ड २००९" म्हणुन एक इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे १० ते १३ फेब्रुवारी पर्यंत. तिथे आमचा स्टॉल आहे आणि माझे प्रेझेंटेशनही आहे. तेव्हा तिथुन आल्यावरच टाकेन.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
धन्यवाद,
धन्यवाद, गोवेकर.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
खुपच सही
खुपच सही ahe
खुपच सहि आहे .....पुड काय???
इतके दिवस
इतके दिवस वाट पहायची.....!!! ठिक आहे.
अस॑ वाटत की आपणच आहोत सन्मित्रच्या ठिकाणी.
अभिमन्यू
मस्त झालेत
मस्त झालेत दोन्ही भाग..
आधीच सांगायचं ना मग पुढचा भाग नंतर टाकणारे ते... तेव्हाच वाचले असते सगळे एकदम..
प्रिय
प्रिय विशाल,
अगदी तुझ्या कथेसारखाच काहीसा...................................... ................ ........................................................................... ..................... .........................@-----------------------@......
वाट बघीतली
वाट बघीतली जाणार नाही.. लवकर टाक! प्लीज!
दोन्ही भाग
दोन्ही भाग एकदम मस्त लिहिले आहेत...
पुढचा भाग एका आठवड्याने ?? विशाल, तुला कॉलेजमध्ये नाईट आऊट मारायची सवय होती ना... आज रात्री बस आणि लिहून टाक बघू उरलेलं...
कस्सली
कस्सली भिती वाटली माय गॉड!! मस्त लिहीलंय !
>>>>आता
>>>>आता पुढचा आणि बहुदा शेवटचा भाग १४ किंवा १५ तारखेला टाकेन, कारण ४ दिवसासाठी हैद्राबादला चाललो आहे. तिथे "मॅप वर्ल्ड २००९" म्हणुन एक इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे १० ते १३ फेब्रुवारी पर्यंत.
त्या १० फेब मध्येही अजून २,३ दिवस आहेत की. शेवटचा भाग सहज येऊ शकेल त्याआधी...
वाईट्ट
वाईट्ट माणूस आहे हा, विशाल... (पण काय लिहितोय....)
लिही की रे लवकर.... काय उगीच अंत बघायचा... चांगल्या वाचकांचा... वईट्ट वंगाळ काम ते.... आत्ता मस्तं मुहुर्त आहे... बसव बैठक आणि लिहून काढ बघू.
रात्री
रात्री घरातल्या घरात फिरायला सुद्धा भिती वाटतेय. पण कथा सॉलीड जमली आहे. शी बाबा, विकेंड्ला मायबोली डाउन आहे. विशाल, सोमवार पर्यंत पुढ्चे तीन्-चार भाग टाक रे.
कल्पू
विशाल,
विशाल, झक्कास रे एकदम....
मस्त रे
मस्त रे विशाल. सही लिहीलंयस.
आता व्हॅलेन्टाईन डे ची वाट बघतोय....
पण या वेळी तुझ्या कथेच्या पुढच्या भागासाठी बरं का!
-योगेश
विशाल
विशाल चाबूक जमली आहे पन आता फार उशीर करु नको.१५ तारखेपर्यन्त उत्सुकता तानने अवघद आहे
विशाल, अरे
विशाल, अरे आता फार उशिर लाउ नकोस.. दोन्हि भाग मस्तच आहेत.
--------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
फारच
फारच सुन्दर. उत्सुकता अजून वाढत आहे. पण पुढचे भाग लवकर येवू द्या.
भन्नाट !!
भन्नाट !! काटा आला
!!!*****************************!!!
तुहा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी !
खरच काटा
खरच काटा आला. आता तिसर्या भागासाठी इतक थांबायच काय आम्ही सगळ्यांनी?
विशाल...
विशाल... मित्रा, ही चित्रं पण तुच काढतोस का? मस्त आहेत...!!
-योगेश
योगीजी,
योगीजी, कथेच्या शेवती लिहीले आहे
(रेखाटनः पल्लवी देशपांडे)
आणि रेखाटणावर पल्लीची सहीसुद्धा आहे.
विशाल, कथा (माफ करा - भयकथा) मस्त चालु आहे...अगदी उत्क॑ठावर्धक!!! पण उत्क॑ठा जास्त ताणू नका
dreamgirl,
dreamgirl, धन्यवाद माहितीसाठी!
पल्ली, चित्रं मस्त आहेत!
-योगेश
आता पुढे
आता पुढे काय ?..........
वाट बघतोय
.........सुन्या आंबोलकर
(No subject)
जबरदस्त
जबरदस्त कथा विशाल!!!! दोन्ही भाग अगदी अधाशासारखे वाचुन काढले. तुझ्या प्रेझेंटेशनसाठी "ऑल द बेस्ट".
पण पुढे काय होईल याचा अजीबात अंदाज लावता येत नाहीये. पुढच्या भागाची अतुरतेने वाट पाहतोय सगळेच!!! लवकर येऊदेत!
*****************
सुमेधा पुनकर
*****************
सुंदर्.
सुंदर्. मनाचे पकड घेणारे लेखन. फार सही.
छान
छान