Submitted by जव्हेरगंज on 16 December, 2015 - 00:11
'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला.
मला दोन रुपय दिलं आन मनालं
"जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं"
बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला.
सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला.
पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा!
मग काका दिसला. शिग्रेट दिली. त्यानं तोंडात घालून काडी वढली.
"तोंडात घालून आणली कारं?"
"न्हाय बी"
मग हातात घीऊन त्यानं बघीतली
"हि काय, समदा फिल्टर वला वला झालाय, लका त्वा तोंडातच घातली हुती, पळ भाड्या"
मग आमी पण सुटलो.
शिग्रेट तोंडात घातल्यावर म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती, हे तवाच समजलं, जरा लवकरच न्हाय का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मागच्या कापसाला जिभ लावायची
मागच्या कापसाला जिभ लावायची नसते हे मला अत्ताच समजलं
मागे कापुस असतो का?
मागे कापुस असतो का?
रीया +१
रीया +१
आदिती, हो असतो गं. आम्ही
आदिती, हो असतो गं. आम्ही लहानपणी अशा विजलेल्या सिग्रेटींच्या मागचे कापूस काढून खेळत बसायचो. ते घरी कळालं तेंव्हा जे धुतलेलं आम्हाला ते आठवलं
मागच्या कापसाला जिभ लावायची
मागच्या कापसाला जिभ लावायची नसते हे मला अत्ताच समजलं फिदीफिदी:फिदीफिदी:
छान लिहिलंय
छान लिहिलंय
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मागच्या कापसाला जिभ लावायची
मागच्या कापसाला जिभ लावायची नसते हे मला अत्ताच समजलं
भारी! शिग्रेट तोंडात
भारी!
शिग्रेट तोंडात घातल्यावर म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती, हे तवाच समजलं, जरा लवकरच न्हाय का? >>>>
काही कळलं नाही. शिग्रेट बघावी
काही कळलं नाही. शिग्रेट बघावी लागणार.
लय बेस !!
लय बेस !!