प्रेमपत्र

Submitted by आवारा on 14 December, 2015 - 22:22

नमस्कार मायबोलीकर........

टिप१ - मा.बो वर नविन असल्याने शुद्ध लेखन आणि इतर प्रकारच्या चुका झाल्यास सांभाळून घ्या..

टिप - खुप दिवसापासून मा.बो.वर काहीतरी लिहायचं होतं आणि भरपूर काही सुचतही होतं पण वेळेच्या अभावी काहीच शक्य होऊ शकलं नाही. आज सहज आमच्या सौ. ना अडगळितील वस्तूंची शोधाशोध करतांना मी १२ वी ला असतांना एका ११वी च्या मुलीला लिहलेल प्रेमपञ सापडलं आणि ते बघून मला वाटलं की हे मा.बो. वर टाकावं. सदरिल प्रेमपञ हे त्या मुलीला देण्यासाठी लिहलेलं होतं पण तसली हिम्मत कधीच झाली नाही आणि ते पञ नंतर फक्त एक आठवण म्हणून शिल्लक राहीलं.

टिप३- सदरिल पञ हे मी १२ वी ला असतांना जस लिहलं होतं तसच लिहतोय,एका अक्षराचाही बदल त्यात नाही.

प्रिय......

आजपर्यंत तुझ्यावर भरपूर लिहलयं..... पण आज फक्त तुझ्यासाठी लिहतो आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक अस वळण येतं जेव्हा माणूस सारी शुद्ध हरवून, दुनियेचं भान विसरून प्रेमात पडतो, तसच माझ्याही आयुष्यातील एका वळणावर एका सुंदर क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या प्रत्येक कृतीन मनाला वेडचं लावलं आणि माझ्या जिवनातील सारे क्षण सुवर्णमय होउन गेले.तुला फक्त एकदा पाहता यावं म्हणून तासन् - तास तुझी वाट पाहत त्या निर्जिव बसस्टॉपवर घालवलेत. वेडेपणाच्या कित्येक हद्दी मी या प्रेमात ओलांडल्या...मला माझं जग तुझ्यात दिसू लागलं . अस म्हणतात की, प्रेम वेडं असतं पण मला वाटतं की, प्रेमात वेडेपणही जरूरीचं आहे फक्त ते मुर्खपणाचं लक्षण व्हायला नको आणि आज मला तुझ्यावर प्रेम करणं मुर्खपणाच वाटतय. प्लीज मला उत्तर दे माझ तुझ्यावरचं प्रेम मुर्खपणा आहे का..…?
तु ९ वी ला असतांना मी तुला बसस्टॉपवर बसची वाट पाहत असतांना पाहीलं आणि मी माझ्याही नकळत तुझ्या प्रेमात पडलो. दिवसामागून दिवस जात होते आणि प्रत्येक येणारा दिवस आपल्याला एकमेकांच्या जवळ-जवळ आणतं होता. आठवयतयं.... आपलं दोघांचं ते प्रेमाचं विश्व किती छान होतं.... सार्या बसस्टॉपवरिल लोकांच्या अस्तित्वाच्या पलीकडे जाउन, मंञमुग्ध होउन आपण कित्येक तास एकमेकांकडे पाहत घालवत असू ,, ना मला तुझ नाव माहित ना तुला माझं, पण ९.३० ला आपण दोघंही न विसरता एकमेकांना फक्त पाहण्यासाठी जराही न चुकता आतुरतेनं बसस्टॉप गाठायचो ते सारं काय होतं फक्त एक आकर्षण, नाही ते फक्त एक आकर्षण असू शकतं नाही . ते जे काही होतं ते कदाचीत त्या वेळेला आपल्या बुद्धीला समजण्या एवढं सोपं नव्हतं इतकं नक्की. या सार्यात मग तुझ्या १०वीच्या बोर्डाची परिक्षा जवळ आली आणि मी स्वत:च तुझ्यापासून तुझे पेपर होइपर्यत दुर राहीलो. मी दुरून पाहत होतो की तुझा पेपर सुटल्यावर तुझी नजर मला सार्या बसस्टॉपभर शोधत असायची. आठवतय तुला तुझा त्या दिवसाचा शेवटचा पेपर संपल्यावर तु बसस्टॉपवर आली होतीस आणि इतर वेळी मैञींनींसोबत असणारी तु आज माञ एकटीचं होतीसं, कदाचित तुला वाटलं असणार की, मी तुझ्याशी बोलेल आणि मीही तुझ्याशी बोलायचं ठरवलेलं होतं पण या अगोदर कुणाही मुलीसोबत बोलण्याचे प्रसंगं आले नसल्याने तुझ्याशी काय बोलावं ते कळत नव्हंत आणि हिम्मतही होतं नव्हती, तरिही मी मनाची तयारी करत होतो पण तेवढ्यात तुझी बस आली नी तु माझ्याकडे शेवटचं निराशेनच पाहून बसमध्ये चढलीही. मी माञ एखाद्या दगडासारखा जागेवरच थिजून त्या निघून जाण्यार्या बसकडे लाचार होउन पाहण्यापलीकडे काही करू शकलो नाही किंबहूना करू शकत नव्हतो.......आणि हाच तो शेवटचा दिवस तुही माझ्याकडे पाहत होतीस, माझ्यावर प्रेम करत होतीस किमान मला तसं जाणवत तरि होतं. नंतर तुला सुट्टया लागल्या आणि आपली परत भेट थेट तुझ्या रिझल्ट च्या दिवसी झाली. खुप दिवसांपासून या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत, येणार्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक सेकंद काढणं दिवसेंदिवस जड होउन बसलं होतंआणि आज तोच दिवस आला होता जेव्हा मी तुला भेटून माझ्या मनातील सारं तुला सांगणार होतो. तु रिझल्ट पाहून सायकल वरून घरी जात होतीस आणि मी तुला रस्त्यात तुझ्या रिझल्ट बद्दल विचारलं होतं. मुळात मला तुझा रिझल्ट अगोदरच माहित होता पण ही फक्त एक टेस्टिंग होती की माझ्या बोलण्याला तु काय रिप्लाय देतेस पण माझी पुरती निराशा झाली जेव्हा तु माझ्याशी बोलनं तर दुरच पण माझ्याकडे पाहिलही नाहीस. वाटलं कदाचित तुला एकू आलं नसणार म्हणून मी तुझ्याशी परत बोललो पण नाही!! मला आता स्पष्टच झालं होतं की तुझ्यात मी जीला शोधत होतो ती तुझ्यात नव्हती की खरच उरली नव्हती. तु जशी आलीस तशी निघूनही गेलीस , माझ्या मनातील अनेेक प्रश्नांचा गुंन्ता अधिकच वाढउन. यापुढील कित्येक दिवस असेच गेले, कित्येक दिवस तुझ्या नजरेतील माझी जुनी ओळख मी शोधत होतो पण नाही तुझ्यासाठी मी एक अनोळखीच झालो होतो , जणू कधी भेटलेलोच नव्हतो. मग अगदी सहजपणे मी ठरवलं की आता मीही तुला विसरायला हवय. पण हे जितक्या सहजपणे मी ठरवलं तितकं सहज नव्हंत किंवा मला तरि तसं करणं शक्य नव्हतं. तुला विसरून जायचा निर्धार मी खुप दिवस टिकवून ठेउ शकलो नाही आणि तिसर्याच दिवशी मी तुला परत पाहण्यासाठी सोडलेला संकल्प मागे घेतला.
परत एकदा लव्हस्टोरी चालू झाली होती पण आताच्या कहाणीत फक्त मी एकटाच होतो. दुर- दुर पर्यंत फक्त स्वतःचीच सावली पाठलाग करणारी....... तु मला कुठेच दिसत नव्हती. रोज माझी असलेली तु मला भेटेल या आशेवर कॉलेजच्या गेटवर थांबायचो पण तुझ्या नजरेतला अनोळखीपणा मला उदास करून जायचा. तुला विसरावं म्हणायचं तर तेही मी आत्ता खुप मागे सोडून आलो होतो. आता माझ्या प्रत्येक श्वासात तुच भीनलेली होतीस . ज्यावेळेस तुझ्या नजरेत माझ्ं अस्तित्व शुन्य झालं होतं त्यावेळी ... त्याहीअगोदर मी तुला सर्वस्व मानलं होतं. तुझ्या हज्जारो आठवणींचं राज्य कधीच माझ्या मनावर सुरू झालं होतं . माझ्या वेडेपणाच्या कविता फक्त तुझ्यावर सुरू होत होत्या. मला नाही नाहीत मी जे करत होतो ते वेडेपणा होत की प्रेम...! पण मी तुझ्या प्रेमात पडल्यावर एक स्वप्न सजवलं होतं, काही झालं तरि तुझ्याच सोबत लग्न करायचं. समाजाच्या नजरेत लग्नाची व्याख्या काहीही असेल गं... पण माझ्यासाठी लग्न म्हणजे समाज मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायला जी परवानगी देतं ते म्हणजे लग्न... पण कदाचित आता या लग्नालाही काही अर्थ उरला नाहीय.... जिथे तुच नाहीस तिथे लग्नाला तरि काय अर्थ... आत्ता मागे वळून पाहील्यावर किनारा शोधतांना चक्काचूर होउन पडलेली नैका दिसते. जीला तिच्या अस्तित्वाची ओळख देणारा किनारा कधी सापडलाच नाही. मला माहीत नाही माझं काय चुकलय ते , पण मी इतकी मोठ्ठी चुक नक्कीच नाही केलीय की तु माझ्याकडे पाहणही टाळावसं...... मनात हज्जारो प्रश्न एकसारखे गोंधळ माजवत राहतात. प्रेमाला अर्थ तेव्हाच असतो जेव्हा दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि तितकाच विश्वास असतो. एकतर्फी प्रेम म्हणजे मुर्खपणा, अर्थहीन..! मग मी मुर्खपणा तर नाही ना करत..? मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुझही माझ्यावर प्रेम आहे का..? आणि तु जर माझ्यावर प्रेम करत नसशील तर माझं तुझ्याकडे सतत पाहण्याने, एखाद्या वेळेस तुझ्या मागे फिरण्याने तुला ञास तर होत नसेल..? या सारख्या प्रश्नांने मला आजपर्यंत पुरत हैरान करून सोडलय. आजही मी एक गोंधळलेलच आयुष्य जगतोय. आजचा वर्तमान मला माहीत नाही. आजही मी भूतकाळात त्याच रस्त्याच्या त्याच जुन्या वळणावर अडकलोय, जिथे मी तुझी वाट पाहतोय आणि तु आल्यानंतर निघून जातांना एकदा तरि मागे वळून पाहशील म्हणून तुझी पाठमोरी छबी दिसेनाशी होइपर्यंत फक्त तुलाच पाहतोय..... please help me!!! मला या सार्यातून बाहेर निघायचय मला वर्तमानात जगायचय. आत्ता मला फक्त तुच मदत करू शकतेस...
प्रेम करणं खरच गुन्हा आहे का गं ? मग मीही तुझ्यावर प्रेमच केलय ना ! आणि माझं असही म्हणन नाहीय की तुही बदल्यात माझ्यावर प्रेम करावसं. शेवटी तो तुझा निर्णय आहे आणि अधिकारही, की तु कुणावर प्रेम करावं . वाटलं होतं इतके दिवस तुझ्या अवती-भोवती फिरलो म्हणून तू बदलशील किंवा एकदा तरि म्हणशील की माझ्यामागे का फिरतोयस पण नाही तु काहीच बोलली नाहीस. मला माहीतीय की एका मुलीची समाजात काय इज्जत असते आणि तिच्यावर घरच्यांच किती दडपण असतं विशेष करून आपल्या खेड्यात तरि..पण हे ही तितकच खरय की प्रेमात समाज आणि घर गौण असते. आजपर्यंत तु एकदा जरि बोलली असतीस ना की माझं तुझ्यावर प्रेम नाहीय तर मी कधीच तुझ्या वाटेतही आलो नसतो आणि तु हे कधीच बोलली नाहीस, व मलाही माझ्या भावना तुझ्यासमोर कधीच व्यक्त करता आल्या नाहीत आणि म्हणूनच माझ्या मनात हा प्रेमाचा गुन्ता अधिकच वाढत गेला मला फक्त एवढ सांग मी जे तुझ्यावर करतो ते प्रेम आहे की मुर्खपणा…..? तुझ्या मनात माझ्या बद्दल खरच काहीच नाहीय का..? म्हणजे माझ प्रेम एकतर्फी आहे की तुही माझ्यावर प्रेम करतेस..????
मला माहीत नाही की माझ्या आयुष्यातील माझं सर्वात मोठ्ठं स्वप्न जे आयुष्यभर तुझ्या साथीने तुझ्यावर जिवापाड प्रेम करणं आहे ते पूर्ण होइल की नाही. माझ्या प्रेमाच स्वप्न पूर्ण झालं तर नक्कीच माझ्या प्रेमाला तुला होकार असेल आणि तुझा जर माझ्या प्रेमाला नकार असेल तर समजेल की कधी- कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न, ज्याला आपण जिवापाड जपलय ते पुर्ण होत नाही.
प्रेमात खरी मजा असते ती आपल्यां भावना आभाळभर झाल्यावर.. आपल्या प्रेमासमोर सारं जग छोटसं भासल्यावर....प्रेत्येक ठिकाणी मनावर राज्य करणार्या सुवर्ण चेहर्यावरिल हास्यात लपलेल्या गोडव्यावर.... माझ्याही आयुष्यात असे भरपूर क्षण आहेत जेव्हा दुनियेच्या प्रचंड गर्दित मी फक्त तुलाच शोधलयं कधी वेड लागल्यासारखं रडलोय तर कधी प्रमाणापेक्षाही जास्त आनंदी झालोय... मला तु माझ्यावर किती प्रेम करतेस किंवा करत होतीस यापेक्षा माझं तुझ्यावर असणारं प्रेम जपण्यात जास्त आनंद आहे. शेवटी एकच सांगतो तुझं उत्तर काहीही असो ...आयुष्यभर तुझ्यावर तुझ्या प्रेमाची अपेक्षा न ठेवता असचं प्रेम करत राहील. तुला यानंतर कसलाच ञास होणार नाही याची नेहमीच काळजी घेईल....

तुला ञास दिल्याबद्दल sorry!!!!!!!!
आणि पञ वाचल्या बद्दल Thanks
तुझा - अस्तित्वहीन....
हरवलेल्या रस्त्यावर स्वतःला हरवतांना
हरवत चाललेल्या प्रेमासाठी जगतांना
जाणवणार्या जखमेच्या वेदनाही असहनिय आहेत..!!!!!!

(खास टिप- सदरिल पञ तिला कधीच देउ शकलो नाही. पण एक दिवस तिलाच हे हाती लागलं आणि तिने वाचलही. आमच्या सौ. या त्याच पञावाल्या ज्यांच्या नावे हे पञ निघालं होतं. आणि सदरिल पञ वाचून सौ. म्हणाल्या की "हे पञ होतं की समझोता " )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ञ = त्र नव्हे.
त्+र असे टाईप करून पत्र.
पञ असा शब्द मराठीत ञ हा स्वर आहे, व्यंजन नाही.
तेवढी सुधारणा करणार का प्लीज?

ञ = त्र नव्हे हेच म्हणायला आलो होतो.
अगदीच ढोबळ चुक आणि ती ही शिर्षकातच असल्याने पुढचे वाच(व)ले नाही.

एका प्रेमविराची कथा समजली...

पण आपले लग्न कसे झाले ते ही कळू दे

म्हणजे मागे राहिलेल्या प्रेमविराना काही मार्गदर्शन होइल Happy

धन्यवाद साती, वरी

दीड मायबोलीकर- पुढच्या वेळी नक्की चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल.

निनाद - पुढच्या वेळी वाच(व)ल जाईल असेच टाकण्याचा प्रयत्न करेल

anu ताई - हो लग्न त्याच मुलीसोबत झालं. प्रेमपञाच्या माझ्या एका चुकीने हसू तर आलं . धन्यवाद!!!

निलुदा - अडचणी भरपूर आल्यात पण मला एक सारथी भेटला ज्याने माझा रथ थेट लग्नाच्या मंडपातच नेऊन सोडला.

छान.