एक बाऊल प्राॅन्स
३ टी-स्पून मिरची पावडर
२ टी-स्पून गरम मसाला
अर्धा टी-स्पून हळद
लिंबाचा रस
२ दालचिन काड्या
१०-१२ लवंगा
१ मसाला वेलची
८-१० हिरवी वेलची
१ चक्रफुल
१ टी-स्पून शहाजीरे
२ तमालपत्र
४ कांदे
३ पेले बासमती तांदूळ
१ टेबल-स्पून आलं लसूण पेस्ट
१ टोमॅटो
मुठभर कोथंबीर
१ टेबल-स्पून कोकोनट क्रीम
केशर
तेल
मीठ
१. प्राॅन्स स्वच्छ धुवून त्यात १ टी-स्पून मिरची पावडर, अर्धा टी-स्पून हळद, १ २ टी-स्पून गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस चोळून किमान ३० मिनिटं मॅरीनेट होऊ द्या.
मसाले-
२. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिटं निथळत ठेवा.
३. एका भांड्यात तेल गरम करा त्यात १ दालचिन काडी, लवंगा, मसाला वेलची, ४-५ हिरवी वेलची, चक्रफुल परतून घ्या. प्राॅन बिर्याणीला चिकन वा मटण बिर्याणी पेक्षा थोडं जास्त तेल लागतं, कारण प्राॅन इतर मीट सारखं प्राॅन्स तेल नाही सोडत.
४. कांदे बारीक चिरून घ्या.
५. मसाला भाजला गेला कि त्यात बारीक चिरलेले कांदे घाला.
६. कांदे पूर्ण गोल्डन ब्राऊन होऊ द्या आता त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि परता.
७. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कोथंबीर, मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला.
८. बाजूला एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात शहाजीरे, हिरवी वेलची, १ तमालपत्र, १ दालचिन घालून तांदूळ घाला. तांदूळ साधारण ९० टक्के शिजला कि थर लावायला तयार आहे .
९. मिश्रणातून तेल सुटे पर्यंत परता.
१०. त्यात मॅरीनेट केलेले प्राॅन्स घाला.
११. वरून थोडे १ टेबल-स्पून कोकोनट क्रीम घाला. चिकन बिर्याणीप्रमाणे दह्याचा पर्याय आहे पण कोकोनट क्रीम आणि प्राॅन काॅम्बीनेशन जास्त छान वाटतं.
१२ . रेव्ही मध्ये प्राॅन्स ७-८ मिनिटं शिजू द्या.
१३. एका भांड्यात एक थर प्राॅन्स आणि एक थर भात वरून थोडी पुदिना पाने(माझ्या कडे पुदिना चटणी होती केलेली तीच वापरली) घालून, सगळे थर लावून घ्या.
१४. वरून थोडे थोडे करून केशराचे पाणी सोडा.
१५. बिर्याणी दम व्हावू द्यावी. भांडे सील करायला मी पीठा ऐवजी अॅल्युमिनिअम फाॅईल वापरली.
साधारण १० मिनिटे मंद आचेवर बिर्याणी दम होऊ द्या.
प्राॅन दम बिर्याणी तयार
किती घाई तरी प्रतिसाद
किती घाई तरी प्रतिसाद द्यायची. हे लिहिलंय की: भांडे सील करायला मी पीठा ऐवजी अॅल्युमिनिअम फाॅईल वापरली.
दिड मा. तुमचा प्रतिसाद भारी
दिड मा. तुमचा प्रतिसाद भारी आहे
स्टेप बाय स्टेप फोटो खूप छान
स्टेप बाय स्टेप फोटो खूप छान आहेत..... मस्तच रेसीपी
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
सही! तुमचे फोटोज भारी
सही!
तुमचे फोटोज भारी अॅपेटायझिंग असतात!
चाखून बघितलेत की काय बाई?
चाखून बघितलेत की काय बाई?
चुम्मेश्वरी दिसतोय एक एक
चुम्मेश्वरी दिसतोय एक एक प्रचि..
पण मी कधी खाल्ला नै हा प्रकार
_/\_ वोव, अमेझीन्ग I made
_/\_ वोव, अमेझीन्ग
I made first time such non-veg recipe of biryani, U won't believe it really turned out very very tasty, the fragrance was tooooooooo gooooood, just tempting. sorry! I was not aware in Margashirsh month non-veg is not prepared, but it was demand from Nephew for some chiken biryani, accidently; I saw this recipe and couldn't stop myself; prepard last Sunday, Appreciated your efforts of writing with foto, Thanks for being there, with Compliments of the Seasons,
Thank you Geeta. I simply
Thank you Geeta. I simply took a few pics, wrote some basic steps and thus became a recipe. I couldn't have imagined it would be that helpful to someone, and since, it has been, all pleasure is mine. Thanks for generous feedback.
प्रॉन आपला विक पॉईन्ट...मस्त
प्रॉन आपला विक पॉईन्ट...मस्त फोटू...
हा संडे आता प्रॉन बिर्याणीने सार्थकी लावणार..
अप्रतिम
अप्रतिम
फोटो पाहून फार इच्छा होतेय
फोटो पाहून फार इच्छा होतेय करायची. आज संध्याकाळी कोलंबचं काय करावं या विचारात ही रेसिपी मिळाली. यम्म
Pages