प्राॅन दम बिर्याणी

Submitted by डीडी on 13 December, 2015 - 02:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

एक बाऊल प्राॅन्स
३ टी-स्पून मिरची पावडर
२ टी-स्पून गरम मसाला
अर्धा टी-स्पून हळद
लिंबाचा रस
२ दालचिन काड्या
१०-१२ लवंगा
१ मसाला वेलची
८-१० हिरवी वेलची
१ चक्रफुल
१ टी-स्पून शहाजीरे
२ तमालपत्र
४ कांदे
३ पेले बासमती तांदूळ
१ टेबल-स्पून आलं लसूण पेस्ट
१ टोमॅटो
मुठभर कोथंबीर
१ टेबल-स्पून कोकोनट क्रीम
केशर
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. प्राॅन्स स्वच्छ धुवून त्यात १ टी-स्पून मिरची पावडर, अर्धा टी-स्पून हळद, १ २ टी-स्पून गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस चोळून किमान ३० मिनिटं मॅरीनेट होऊ द्या.

मसाले-

२. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ३० मिनिटं निथळत ठेवा.

३. एका भांड्यात तेल गरम करा त्यात १ दालचिन काडी, लवंगा, मसाला वेलची, ४-५ हिरवी वेलची, चक्रफुल परतून घ्या. प्राॅन बिर्याणीला चिकन वा मटण बिर्याणी पेक्षा थोडं जास्त तेल लागतं, कारण प्राॅन इतर मीट सारखं प्राॅन्स तेल नाही सोडत.

४. कांदे बारीक चिरून घ्या.

५. मसाला भाजला गेला कि त्यात बारीक चिरलेले कांदे घाला.

६. कांदे पूर्ण गोल्डन ब्राऊन होऊ द्या आता त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि परता.

७. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, कोथंबीर, मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला.

८. बाजूला एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात शहाजीरे, हिरवी वेलची, १ तमालपत्र, १ दालचिन घालून तांदूळ घाला. तांदूळ साधारण ९० टक्के शिजला कि थर लावायला तयार आहे .

९. मिश्रणातून तेल सुटे पर्यंत परता.

१०. त्यात मॅरीनेट केलेले प्राॅन्स घाला.

११. वरून थोडे १ टेबल-स्पून कोकोनट क्रीम घाला. चिकन बिर्याणीप्रमाणे दह्याचा पर्याय आहे पण कोकोनट क्रीम आणि प्राॅन काॅम्बीनेशन जास्त छान वाटतं.

१२ . रेव्ही मध्ये प्राॅन्स ७-८ मिनिटं शिजू द्या.

१३. एका भांड्यात एक थर प्राॅन्स आणि एक थर भात वरून थोडी पुदिना पाने(माझ्या कडे पुदिना चटणी होती केलेली तीच वापरली) घालून, सगळे थर लावून घ्या.

१४. वरून थोडे थोडे करून केशराचे पाणी सोडा.

१५. बिर्याणी दम व्हावू द्यावी. भांडे सील करायला मी पीठा ऐवजी अॅल्युमिनिअम फाॅईल वापरली.

साधारण १० मिनिटे मंद आचेवर बिर्याणी दम होऊ द्या.

प्राॅन दम बिर्याणी तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि स्वतःचे प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रीम घालायच्या आधीचे प्रॉन्स. कसले दिसताहेत!!
बिर्याणी करेपर्यंत टिकणार नाहीत माझ्यासमोर.

पण प्रॉन्स अन शेलफिश सध्या काँट्राइंडीकेटेड आहेत Sad

तो पापड असा रोल करुन कसा भाजला आहे?>>> भाजुन गरम असत्ताना रोल करता येतो, फार फास्ट करावे लागते.

मस्त रेसिपी आणि सॉलीड प्रेझेंटेशन Happy

प्रॉन्स चालत नाहीत त्यामुळे करण्याची आणि खाण्याची शक्यता शुन्य Sad

जबरी आहे पाकृ. मला फोटो आणि तुझी लिखाणाची पद्धत आवडली.
मी प्रॉन्स नाही खात. Sad (अजून मी होतकरू मासे खाऊ आहे)

प्रॉन्स ऐवजी बटाटे, कच्चे केळे, वांगे, रताळे चालेल का? ...
कांद्याऐवजी लसूण, आणि लसणी ऐवजी आले घातल्यास...?
एक भा.प्र... Proud

Light 1

फोटो मस्त आहेत.

देसाई, यवेळी मी बदल म्हणून 'फ्रोजन प्रॉन्स असतील तर ते थॉ करून धुवून घ्यायचे की कसं' असा प्रश्न विचारणार होते Happy सांगा बरं.

प्रॉन्स ऐवजी बटाटे, कच्चे केळे, वांगे, रताळे चालेल का? ...
कांद्याऐवजी लसूण, आणि लसणी ऐवजी आले घातल्यास...?
<<

बिर्याणी ऐवजी फोडणीचा भात करायचा आहे काय?

एक भो.उ. Proud

Light 1

Pages