Submitted by गजानन on 11 December, 2015 - 05:04
कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्यांच्या अनुषंगाने येणार्या अडचणी / त्रास / उपाय यावर चर्चा करण्यासाठी...
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हल्ली बर्याच लहान वयात
हल्ली बर्याच लहान वयात डोळ्यांना नंबर येतो.
<<
डिस्क्लेमर : किचकट, तांत्रिक व लांबलचक प्रतिसाद. वाचला नाही, तर अती उत्तम!
१. प्रत्येक "नॉर्मल" लहान मुलास जन्मतः +३ ते +४ असा नंबर असतो.
ही त्याची कारणे आहेत. स्कूलगोइंग एजपर्यंत म्हणजेच ५-६ वर्षे वयापर्यंत हा नंबर कमी होऊन शून्याच्या आसपास पोहोचतो.
२. हा नंबर स्टॅबिलाईज होताना शून्याच्या आगे मागे थांबतो.
काहीदा डोळ्याची साईज वाढतच राहते, व मायनस नंबर येतो.
बहुतेकदा हा नंबर प्युबर्टल ग्रोथ स्पर्ट अर्थात १२-१३व्या वर्षी उंची अचानक वाढते तेव्हा येतो, अन थोडाफार वाढत जाऊन १८-२०च्या वयापर्यंत 'स्टेबल' होतो. २-३ पेक्षा पुढे जात नाही.
काही 'पॅथॉलॉजिकल मायोप्स'चा नंबर अर्थात डोळ्याची साईज अगदी ५-६व्या वर्षांपासून आयुष्यभरही वाढत राहते व नंबर १२-१५ च्याही पुढे जाऊ शकतो.
साधारणपणे १-१.५ च्या पुढे मायनस नंबर गेला, तर दिसण्यात अडचणी येतात.
३. "नंबर" मोजू जाता "चष्म्याचा नंबर नाही (Emmetropia)" अशी व्यक्ती विरळा आहे. दुसर्या शब्दांत, जगात बहुतेक सर्वांनाच थोडाफार (पाव-अर्धा-पाऊण डायोप्टरपर्यंत) नंबर असतो. उदा -०.२५/०.५०/०.७५ इ. (मोठ्ठे नंबर असलेले लोक खूप कमी प्रमाणात असतात)
तरीही, डोळ्याच्या भिंगात असलेल्या फोकसिंगच्या अंगभूत क्षमतेमुळे "डोळ्यावर थोडा ताण देऊन" नेहेमीच्या वापरासाठी पुरेशी तीक्ष्ण नजर कंफर्टेबली बहुतेक सर्वांनाच मिळत असते.
नजरेच्या अती वापराने, अर्थात, अती वाचन, लेखन, टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल इ., किंवा अशक्तपणा उदा. टायफॉईड मलेरियासारख्या आजारातून उठणे वगैरेमुळे हा 'थोडा' ताण जमा होत होत पुढे क्युम्युलेटीव्ह स्ट्रेस बनून डोके दुखण्यासारखे त्रास देतो. अशावेळी तो छोटा नंबर वापरायचा सल्ला डॉ. देतात. त्रास बंद झाला तर "नंबर गेला" असे सांगतात. हा नंबर "जात" नाही, तो आहे तिथेच असतो, प्रॅक्टिकल परपजेस साठी चष्मा लावत राहयची गरज संपलेली असते.
४. सिलिंड्रिकल प्रकारचे, डोळ्याच्या 'शेपमुळे' असलेले नंबर असले तर अगदी १.५-२ नंबर असूनही डोळ्याने बरेच चांगले दिसते. (वर क्र.२ वर सांगितला तो बुबुळाच्या साईजमुळे येणारा नंबर. "Axial" myopia or hypermetropia.
यात डोळ्याचे 'कर्व्हेचर' चेंडूसारखे असते. हे अंड्यासारखे असले, तर येणार्या नंबरला सिलिंडर्/कंपाउंड्/टॉरिक अशी नावे आहेत. टेक्निकली थोऽडा फरक पण एकंदरात अर्थ तोच.)
हे नंबर असल्यावर जास्तकरून डोकेदुखीची तक्रार येते. दिसत नाही ही तक्रार येत नाही.
*
टीव्ही पाहताना, दूरच्या अंतरावरील चित्र क्लिअर दिसत नाही, म्हणून मुले टीव्हीच्या जवळ जाऊन बसतात. यामुळे आपण मुलाला डोळे तपासायला नेतो, व मुलाला चष्मा 'लागतो' तेव्हा
अ. नंबर/चष्मा टीव्हीमुळे लागलेला नाही, तर टिव्हीमुळे तो सापडला आहे.
ब. नंबर डॉक्टरने लावलेला नाही, तुमच्या डोळ्याने मागितला आहे.
या दोन बाबी लक्षात ठेवाव्यात.
हीच गोष्ट आजकालच्या अती छोटे फाँट्सवाल्या पॉवरपॉइंटस, खडू-फळ्याऐवजी व्हाईट/स्मार्टबोर्ड्सवरची लहान अक्षरे. वर्गाची मोठी साईझ. यांच्यामुळे मुलांना नंबर आहे हे लवकर लक्षात येते. हा नंबर स्क्रीनमुळे लागलेला नाही. तर त्यामुळे सापडलेला आहे.
*
डोळ्याची 'साईज' अर्थात अॅक्झिअल लेंग्थ ही "नॉर्मली" २३ मिमि असते. ही १ मिमिने कमी झाली तर +३ व जास्त झाली तर -३ नंबर लागतो! अर्थात, -०.२५ वा -०.५० इ. नंबरवाल्यांनी आपले डोळे किती सूक्ष्म प्रमाणात लहान/मोठे आहेत हे समजून घ्यावे.
कुणी उंच आहे, कुणी बुटका. कुणी गोरा कुणी काळा, तशी डोळ्याची साईजही प्रत्येकाची सारखी नाही. त्यामुळे प्रत्येकाला वेगळा नंबर येऊ शकतो. तो उंचबुटकेपणासारखाच साधा सरळ नॅचरल व्हेरिएशनचा प्रकार आहे. तेव्हा डॉक्टरने मुलांना नंबर आहे सांगितलं, की जणू कॅन्सरचे निदान सांगितले, असे आभाळ कोसळल्यासारखे वागणार्या पालकांची मला गंमत वाटते.
चष्मा ही साधी सिंपल चपलेसारखी अॅक्सेसरी आहे. त्याचा बाऊ करू नका. मस्तपैकी एंजॉय करा.
कित्येक वर्षांपूर्वी चप्पल वापरात नव्हती. लोक अनवाणी फिरतच असत. पण मग थोडा त्रास सहन करावा लागत असे. सवय झाली की नो प्रॉब्लेम. तेच चष्म्याचे आहे. तुम्ही विनाचष्म्याने बिन्धास्त फिरू शकता. फक्त 'तितके' क्लिअर दिसणार नाही, तितका त्रास सहन करायचा. साईबाबाच्या नावाने नैका आपण अनवाणी शिर्डीला वगैरे जात?
याच कारणाने, "आमचे आजोबा/आजी! अहो आयुष्यभर त्यांना चष्मा लागलाच नाही!" अशी वाक्ये ऐकू येतात.
याचे उत्तर, आजोबांनी कधीच पेपर वाचला नाही, अन आजीला ३५शीत सून येत होती, ४०शी नंतर जवळचे दिसत नाही, तोपर्यंत दळण-निवडण करायला नव्या डोळ्यांच्या सुना घरात आलेल्या असत. म्हातारा-म्हातारी बिना चष्म्याने खुष
तर यावरून,
५. चाळीशी. अर्थात प्रेस्बायोपिया.
सुमारे ४० वर्षे वयात 'जवळचे' म्हणजे सुमारे सव्वा फूट अंतरावरचे वाचन इ. करायला दिसत नाही. हा वयाशी संबंधीत नंबर आहे. डोळ्याच्या 'फोकसिंग' मेकॅनिझममधे वयानुसार आलेल्या अशक्तपणामुळे हा येतो. वयासोबत वाढतो.
यानंतर सुमारे ५०-५२ च्या आसपास दूरचेही नीट दिसत नाही. हा नैसर्गिक नेत्रभिंगातील रिफ्रॅक्टिव्ह इण्डेक्स बदलांमुळे येतो. दूरचा प्लस नंबर.
६०-६५ वयानंतर अनेकदा चष्मा 'सुटतो'. अर्थात बिनाचष्म्याने पुन्हा वाचता येऊ लागते. मोतीबिंदू येण्याच्या आधीच्या काळात हे होऊ शकते. नैसर्गिक भिंगात होणार्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलांमुळे हे घडून येते.
***
आता या अख्ख्या प्रवचनात अमुक जीवनसत्वाची कमतरता, तमुक इन्फेक्शन असं काही दिसलं का?
तर तात्पर्यः
नंबर अमुक खाल्ल्याने येत नाही अन जातही नाही.
गोळ्या औषधांनी तो 'बरा' होत नाही, कारण तो आजारच नाही. नॅचरल व्हेरिएशन आहे.
मोबाईल खेळून, टीव्ही पाहिल्याने इ. नंबर येत नाही. पण मुलांना तशी भीती दाखवणे योग्य आहे.
त्याचप्रमाणे 'चश्मा लावला नाही तर नंबर वाढेल, लावला तर जाईल' यालाही शास्त्रीय आधार नाही, पण तशी भीती दाखवणे योग्य आहे, जेणेकरून पेशंट 'बरा' होईल.
दीमा उत्तम प्रतिसाद, हां
दीमा उत्तम प्रतिसाद, हां पूर्ण धागा पीडीएफ सेव्ह करणार आहे मी
मुले आणि
मुले आणि टीव्ही/मोबाईल.
टीव्ही व मोबाईल या दोन्ही गोष्टी बेबीसिटींगसाठी आपणच वापरणे सुरू करतो. त्यानंतर मुलांना त्याचे अॅडिक्शन येते. त्यानंतर आपण ते सोडवायचा प्रयत्न करतो.
रडण्यार्या मुलासमोर मोबाईलवर चलचित्रं/गाणी लावणार्या, किंवा मुलांना टीव्हीसमोर बसवून कामे आवरणार्या आया/बाबांची मजबूरी मी समजू शकतो, पण त्याचवेळी त्यांच्या पाठीत दोन धपाटे (आई/बाबांच्या. मुलांच्या नव्हे) घालावेसे मला वाटतात. (अन हो. मी तितका म्हातारा आहे. नव्या आईबाब्यांना नक्कीच दोन धपाटे देऊ शकेन
)
दीमा, प्रवचन नीट वाचलं. अख्ख
दीमा, प्रवचन नीट वाचलं. अख्ख समजलं. धन्यवाद.
पण मग व्हिटॅमिन्सचा संबंध प्रत्यक्ष डोळ्याच्या कार्यक्षमतेशी आहे का? म्हणजे मुळात व्हिजन, इमेज, हालचालींचे व्हिज्युअल आकलन वगैरे?
Dima yancha pratisad header
Dima yancha pratisad header madhe takta yeil ka?
Uttam mahiti.
Dima yancha pratisad header
Dima yancha pratisad header madhe takta yeil ka?
<<
नाही. कारण तो धागाविषयाला धरून नाही. अवांतर आहे.
सीआरटी हे प्रकरण भारतात आलंय
सीआरटी हे प्रकरण भारतात आलंय का? या थेरपीत सीआरटी लेंस (जी काॅंटॅक्ट लेंससारखीच असते) फक्त रात्री झोपण्या पुर्वि घालुन सकाळी उठल्यावर काढुन ठेवायची असते. दिवसभरात २०/२० विजन मीळते असा त्यांचा दावा आहे...
लेझर सर्जरीबद्दल वर जे
लेझर सर्जरीबद्दल वर जे प्रतिकूल प्रतिसाद आहेत ते सर्वच केसिसमध्ये वॅलिड आहेत का? की काही स्पेसिफिक केसेसमध्ये लेसिक करणे योग्य?
दीड मायबोलीकर, मोबाईल, टीव्ही
दीड मायबोलीकर, मोबाईल, टीव्ही यांमुळे चष्म्याचा नंबर लागत नाही तर आधीच लागलेला आहे याचा केवळ सुगावा लागण्यास मदत होते, हे सांगून मोठाच गैरसमज आणि फुकटचे टेन्शन दूर केलेत. अनेक धन्यवाद.
आशू,

परावर्तीत सूर्यप्रकाश आणि संगणकाच्या पडद्यातून उत्सर्जित प्रकाश यात फरक नक्कीच आहे. पण संगणकाच्याच पडद्यातून एक रखरखीत देखाव्याचा अणि दुसरा हिरवळीच्या देखाव्याचा प्रकाश यात दुसरा नक्कीच रिलॅक्सींग वाटेल ना? काही ठिकाणी हापिसात सूर्यप्रकाशासाठी एकदम उजेडबंद क्युबिकल्स असतात. तिथे तेवढेच आपले म्हणतात तसे.
दीमा, सविस्तर पोस्टीबद्दल
दीमा, सविस्तर पोस्टीबद्दल अनेकानेक धन्यवाद!
जीडी, दीमांनी ते म्हातारे आहेत, आई-बापसाला दोन दणके ते घालू शकतात ही वॉर्निंग देऊन ठेवली आहे हां
अगदी अगदी गं!! आमच्याकडे तर रात्रीही हवाच असतो मोबाईल.>>> योडे, वेळीच कठोर हो आणि बंद कर तिची ही सवय.
आमच्याकडे लेकीला आमच्या दोघांच्याही मोबाईलला आमच्या परवानगीशिवाय हात लावण्यास सक्त मनाई आहे.
दिमा, वरच्या पोस्टीसाठी
दिमा, वरच्या पोस्टीसाठी धन्यवाद. ही पोस्ट हिंदी -पंजाबीमध्ये ट्रांस्लेट करून काही ज्ये.नांना सांगेन. लेकाला चश्मा लागल्यावर कित्येक दिवस आमच्या घरी दुखद वातावरण होतं.
शाळेच्या रुटीन तपासणीमध्ये नंबर असेल तपासून घ्या असं सांगितलं पेडीने. मग तपासल्यावर +०.५ नंबर आहे असं कळलं. सहा एक महिन्यात हा नंबर् बहूतेक जाईल असं सांगितलं होतं. पण सहा महिन्यांनी तपासल्यावर मायनस सिलेंड्रिकल नंबर निघाला. नंबर तसा किरकोळ्च होता पण तरी चश्मा वापरायला सांगितलं होतं डॉ. नी. त्यानंतर जवळ्पास दिड वर्ष नंबर अगदी स्टेबल
होता. आत्ता किंचीतसा वाढलाय एका डोळ्याचा.
तो चश्मा निघून जावा म्हणून काय काय खायला द्यायला सांगितलं जातं मला हे विचारूच नका. अगदी ट्रेनमध्ये भेटणारे लोकसुद्धा उपाय सांगत असतात.
( चश्म्याचा आम्हाला एकच त्रास होतो की तो जवळपास दर महिन्याला तुटतो. म्हणून आम्ही महिन्याच्या खर्चात आता फ्रेमचे पैसे गॄहित धरलेले असतात. लेकाला कोणी अरे तुझ्या चश्म्याच्या फ्रेमचा रंग गेल्यावेळी अमुक अमुक होता असं म्हटलं तर तो मेरे पास मॅजिक चश्मा है, उसका कलर अपनेआप बदलता है असं उत्तर देतो.)
२-३ वर्षापूर्वी आम्हाला
२-३ वर्षापूर्वी आम्हाला दिमांकडून बरेच धपाटे बसू शकले असते. पण आता पोळ्या आउट सोर्स केल्यामुळे आम्ही टिव्ही समोर मूल बसवण्याचा वेळ कमी करण्यात यशस्वी झालो आहोत.साडे नऊ चा ऑफ टाइमर लावला आहे. साधारण रात्री ८.३० -९.३० कार्टून लागतात. बाकी वेळी काहीच लागत नाही. नंतर झोपायला जाऊन अकबर बिरबल किंवा पक्षी किंवा सोलर सिस्टम चे पुस्तक वाचून दाखवतो.
दीमा, खूप खूप धन्यवाद. धपाटे
दीमा, खूप खूप धन्यवाद.
धपाटे घाला, चालतील.
दीमा, सविस्तर पोस्टीबद्दल
दीमा, सविस्तर पोस्टीबद्दल अनेकानेक धन्यवाद! >>>अगदी अगदी!
माझी एक नातेवाईक एका ७
माझी एक नातेवाईक एका ७ वर्षांच्या मुलाचा हाय नंबर जावा म्हणून रेकी देते....रेकिने नंबर पूर्ण जातो म्हणे....
दिमा...तुमच्या पोस्टच् पारायण
दिमा...तुमच्या पोस्टच् पारायण लावते घरी....
लेन्सेस घरी आणले. एकाच
लेन्सेस घरी आणले. एकाच डोळ्याचे. -०.५ चे.
काल सुट्टीच्या दिवशी वेळ आहे म्हणून आंघोळ झाल्यावर पहिल्यांदा लेन्स लावण्याचा प्रयोग केला. 'सुट्टी आहे म्हणून निवांत' असलेल्या वेळात ४ वेळा बेल वाजली, दोन वेळा लेकीने हाका मारल्या आणि एकदा फोन वाजला. व्हिडीओ पाहिले त्यात बाई डोळा ताणून धरते आणि पटकन लेन्स लावते असं होतं. माझा ताणलेला डोळा लेन्स जवळ आणल्या आणल्या पटकन मिटायचा. असं बरेचदा झाल्यावर डोला उघडा पाहिला तर डोळ्याच्या बाहुलीवर ठेवलेली लेन्स त्या बाहुलीला चिकटण्याऐवजी बोटालाच चिकटून बाहेर यायची.नवर्याने एकदोनदा 'काय नडलंय्/चष्मा लावत जा/लेन्सकार्ट मध्ये जाऊन त्यांच्याकडूनच लावून ये' वगैरे सल्ले दिले. पण न डगमगता प्रयत्न चालू ठेवले. जरा वैतागून रडावंसं पण वाटलं. शेवटी लेन्स डोळ्यात गेल्यासरखी वाटल्या वर बाकी कामं चालू ठेवली. संध्याकाळी लेन्स काढताना ती बराच वेळ दिसलीच नाही. सकाळी नक्की ती लावली होती की कुठे पडून गेली हेच कळेना. शेवटी बर्याच प्रयत्नांती ती दिसली आणि काढता आली. एकंदर २० मिनीट वेळ प्रत्येक वेळी हे पाहून निराशा आली.
आज हपिसात आल्यावर परत नव्याने युद्ध चालू केले. परत २०-२५ मिनीटं लागली. व्हियतनामी साहेब रजेवर आणि हपिसातले लोक सुट्ट्यांवर असताना हे प्रयोग करणे चालू केल्याबद्दल हुश्श वाटले.
लोक रजेवरुन येऊन त्यांची आणि आमची कामं नीट चालू होईपर्यंत हा वेळ ५ मिनीटावर येईल अशी आशा आहे.
लेन्स ला डोळ्यापेक्षा ते ज्यावर ठेवलं आहे ते बोटच जास्त आवडतंय.
धीर्धरा धीर्धरा तकवा हडबडू
धीर्धरा धीर्धरा तकवा हडबडू गडबडू नका ||
तू लेन्स घेताना तिथेच एखादं डेमो घेतलं नाहीस का? डॉक्टर किंवा दुकानवाले व्यवस्थित समजावून सांगतात
काळजी करू नकोस. लौकरच हा वेळ २० सेकंदांवर येईल. चिकाटीने सराव ठेव.
फक्त आसपास पंखा चालू नसावा. आणि टॉवेल अंथरून त्यावर लेन्स केस ठेवून हा उद्योग करावा म्हणजे पडलीच इकडे तिकडे तरी तिथेच टॉवेलवर पडते आणि सापडते.
सगळ्यात योग्य वेळ म्हणजे आंघोळ करून बाहेर आलं की आणखी काहीही करायच्या आधी लेन्स लावायच्या. इतके स्वच्छ हात आणि ते निवांत काही सेकंद दिवसात आणखी कुठल्याही वेळी नसतात
(No subject)
लेन्स फक्त उलट का सुलट हे
लेन्स फक्त उलट का सुलट हे मात्र नीट बघून घे प्रत्येक ट्रायला. कारण डोळा फटकन मिटून लेन्स बाहेर येताना हमखास उलट्या बाजूला मुडपते
लेन्स बोटार घेताना तिच्या
लेन्स बोटार घेताना तिच्या बुडाचा कमीत कमी भाग बोटावर टेकेल असे पाहिले तर लेन्स बोटावरच राहण्याची शक्यता कमी होते. (बोट जास्त ओले असेल तर लेन्सचा जास्त भाग बोटावर टेकला जातो.)
कोणत्या लेन्स आहेत? सॉफ्ट
कोणत्या लेन्स आहेत?
सॉफ्ट आहेत हे गृहीत धरून सांगतोय.
एका टेबलवर स्वच्छ मोठा टॉवेल किंवा पंचा पसरा.बसताना खुर्ची आणि टेबलात अंतर नको. नाहीतर लेन्स पडली तर अंगावर किंवा जमिनीवर पडेल. मग शोधणं कर्मकठीण. दिसलीच तर तुम्हालाच दिसेल. तुमच्या घरातल्या डोळ्यांनी धड असलेल्यांना दिसण्याची शक्यता शून्यपेक्षा जरा बरी.
हवं तर आरसा घ्या समोर.
तुम्ही उजवर्या (डावर्या सारखं) असाल हे गृहीत धरून
उजव्या बोटाच्या इंडेक्स फिंगरवर लेन्स ठेवा.
डाव्या हाताच्या मधल्या बोटाने वरची पापणी उघडून धरा.
आता उजव्या हाताच्या मधल्या बोटाने खालची पापणी पकडून ठेवा.
आता या डोळ्याने त्या इंडेक्स फिंगरवरच्या लेन्सकडे एकटक पाहत रहा आणि बोट हळूहळू बुब्बुळाशी आणा.
लेन्सचा डोळ्याला स्पर्श झाला की हळूहळू दोन्ही पापण्या सोडा.लेन्स आपसूक बुबुळाला मिठी मारेल.हे काम अगदी अलवार हाताने आणि मानेने करायचं आहे. आता इतका वेळ आपसूक रोखला गेलेला श्वास सोडा.
मग काही वेळ पापण्यांची उघडझाप करा. मुंडी घुमाए बगैर चारोंं ओर नजर घुमाओ.
हा डोळा सर झाला की दुसरा डोळा.
मी लेन्स इंडेक्स फिंगरवर ठेवली की त्यावर सोल्युशनचा एक थेंबही टाकतो. त्याचा डोळ्याला छान गारेगार स्पर्श होतो. (यात काही चूक नाही ना हो दीमा?)
लेन्स काढताना फक्त वरची पापणी पकडून धरणं पुरेसं होईल. लेन्सला अलगद हलका चिमटा काढा. ती चिमटीत सापडेल.
तुम्ही जिथून लेन्स घेतल्यात तिथे तुम्हाला नीट ट्रेनिंग देऊन प्रॅक्टिस करवून घेतली नाही का?
कन्झ्युमर फोरममध्ये केस ठोका.
जर तुमची सेमी सॉफ्ट किंवा हार्ड लेन्स असेल तर ती डोळ्यात कुठेही गेली तरी तीवरून अलगद बोट फिरवून किंवा बुब्बुळ फिरवून दोघांचे मीलन घडवता येते. याचं डिटेल्ड प्रोसिजर आता नीट लक्षात नाही.
अगदी महत्त्वाचं. नखं नीट कापलेली हवीत. लेन्स लावायला किंवा काढायला डोळ्यात बोट घालण्यापूर्वी हात व बोटे साबणाने व साध्या पाण्याने नीट धुऊन घ्या. विशेषतः मिर्च्या, आले यातले काही कापले असेल तर. बेस्ट म्हणजे ही (आले मिर्ची चिरायची) कामे आउअटसोर्स करा.
हो बोट एकदम कोरडे आणि लेन्सचा
हो बोट एकदम कोरडे आणि लेन्सचा अगदी मध्यबिंदू त्यावर अलगद ठेवायचा
आणि आधी उजवी मग डावी किंवा उलट जो काही क्रम असेल तो क धी ही बदलायचा नाही. घालताना तोच आणि काढतानाही तोच
डेमो नाही दिला, असा काढण्या
डेमो नाही दिला, असा काढण्या लावण्याचा पण डेमो मिळू शकतो हे माहित नव्हतं. त्याने फक्त लेन्स लावून दुचाकी चालवताना गॉगल लावा, हात स्वच्छ ठेवा,इंटर्नेट वर बघा इ. बेसिक सूचना दिल्या.
२० मिनीटावरुन २० सेकंद वाचून एकदम छान गार गार वाटलं
आता सगळे डिटेल प्रतीसाद परत वाचते आणि ते उद्याची लढाई चालू करताना लक्षात ठेवते.
बॉश लॉम्ब प्युअर व्हिजन एच डी
बॉश लॉम्ब प्युअर व्हिजन एच डी २ आहे, बहुतेक सॉफ्ट असावी.
अर्ध्या डायोप्टरची लेन्स?
अर्ध्या डायोप्टरची लेन्स? कठीण आहे.
बरी आहे ना तब्येत? अहो लेन्स न लावताही छान दिसतं की तुम्हाला? चष्माही लावू नका अन लेन्सही.
मी लेन्स इंडेक्स फिंगरवर
मी लेन्स इंडेक्स फिंगरवर ठेवली की त्यावर सोल्युशनचा एक थेंबही टाकतो. त्याचा डोळ्याला छान गारेगार स्पर्श होतो. (यात काही चूक नाही ना हो दीमा?)
<<
अजीबात नाही.
अॅक्चुअली त्या सोल्युशनमुळे लेन्स कॉर्निआकडे खेचली जाईल आपोआप. कॅपिलरी प्रेशर की काय म्हणतात तसं.
http://www.bausch.in/en-in/yo
http://www.bausch.in/en-in/your-eye-concerns/wearing-contact-lenses/inse...
यातलं ३ Look straight ahead हे महत्त्वाचं आहे.
-०.५ ची लेन्स मिळाली
-०.५ ची लेन्स मिळाली तुम्हाला? कुठे ?
मला लेकास्ठी हवी होती तर मिळत नाही अस सांगितले
चष्मा न लावता दूरची लहान
चष्मा न लावता दूरची लहान अक्षरे वाचता येत नाहीत. एच आणि एन मध्ये गोंधळ होतो.
६ आणलेली वापरते..नंतर परत बिना चष्मा/लेन्स काही काळ.
Pages