शापित गड भाग ६

Submitted by श्रीमत् on 6 December, 2015 - 23:47

शापित गड भाग १ http://www.maayboli.com/node/49017
शापित गड भाग २ http://www.maayboli.com/node/51000
शापित गड भाग ३ http://www.maayboli.com/node/51077
शापित गड भाग ४ http://www.maayboli.com/node/52056
शापित गड भाग ५ http://www.maayboli.com/node/56667

पंडीतच्या वेषातील समर वर्मा मंदगतीने तटबंदीवरील सैनिकांच्या मानवंदना स्विकारत पुढे चाल करत होता. त्याच्या चेहरयावर एक आसुरी समाधान दिसत होतं. तो जसजसा आगेकुच करत होता तस-तसा त्याच्या मागचा प्रदेश आत्ताच रंग-रंगोटी केल्याप्रमाणे उजळुन निघत होता. नाना पिशाच्च प्रगट होऊन या वरातीत आता सामील होऊ लागले होते. एखाद्या छबीन्या प्रमाणे सर्व त्याच्या मागुन जल्लोषात चालले होते. त्यांच्या आनंदाला पारावार ऊरला नव्हता कारण काहीच तासांनी त्यांना त्यांचा राजा मिळणार होता.

इकडे राजकुमारी आरोही मला आणि भिवाला घेऊन पुन्हा राजवाड्यात आली. अर्थात यावेळी आम्ही तिच्या बंदीस्त पालखीतुनच राजभवनात प्रवेश केला होता. तिच्या दालनात येताच तिने भोईंना हातानेच जाण्याची खुण केली. आता इथुन पुढे काय आणि कस करायच याची मला आणि भिवाला काहिच कल्पना नव्हती. मी सहज आरोहीला विचारल, "आम्ही इथे आहोत याचा त्याला संशय आला तर?", "तर काय? माझ्याबरोबर कायम राहाव लागेल गडावर! त्याचे गुलाम बनुन" आरोही काहीशी हसतच म्हणाली. मी मनात म्हणालो, "तुझ्याबरोबर राहायला मिळतय तर गुलामच काय काहिही होण्याची माझी तयारी आहे". आरोही पुढे बोलु लागली, "हे पहा काळजीच कारण नाही! समर वर्मा आधी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा घालुण सर्व पिशाच्चांना जाग्रुत करेल. त्यानंतर हि सर्व जत्रा गडाच्या मागच्या बाजुने घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीरापाशी जाईल. तिथे पोहचताच सुर्योदय होण्यापुर्वी तो मंत्रोच्चारण करुन मंदीरा समोरील अग्नीकुंडात स्वताला झोकुन देईल व वेताळाला प्रसन्न करुन पुन्हा जिंवत होईल. त्यानंतर तो काय करु शकतो याची कल्पनाच न केलेली बरी."

"हे सार ठिक हाय. पण आपण फकस्त तीनजन ह्यो एवढा मोठा लवाजमा सांभाळना्र तरी कसा? त्यात आमच्याकड कसली दैवी ताकद बी न्हाय. न्हाय बा... आपल्या बाच्यान बी न्हाय व्हायच हे, मी चाललु परत. आता काय बी होऊ दे". भिवा म्हणाला. भिवाच मध्येच अस गलितगात्र होण माझ्यासाठी त्रासदायक ठरल असत, कारण नाही म्हटल तरी त्याच्या मुळेच मी या भीतीदायक वातावरणात तग धरु शकलो होतो. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करु लागलो. शेवटी आरोहीनेच मध्यस्ती करत आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला. "काळजी करु नका सर्वात महत्वाच, जो पर्यंत मी आहे तो पर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि राहीला प्रश्न तुमच्या भावाचा जर त्याला यातुन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला त्याची आजची उपासना ऊधळुन लावावीच लागणार". इति आरोही.
आरोहीच्या धीरोत्तर शब्दांनी भिवा आता शांत झाला होता. तिनेच पुढे बोलायला सुरवात केली. "सर्वात आधी तुम्ही तुमचा पेहराव बदला. ज्यानेकरुन तुम्ही कोणी बाहेरचे नसुन आमच्यापैकीच एक वाटायला हव. राहीला प्रश्न माणसाच्या रक्ताचा ज्याच्यामुळे तुम्ही लगेच ओळखले जाऊ शकता तर मी तुम्हाला एक कुपी देइन ज्यातील द्रव्या मुळे तुमचा गंध ह्या वातावरणात विरुन जाईल." आम्ही तिथुन निघणार इतक्यात आरोही ने मला हाताने थांबण्याची खुण केली. तिने शांतपणे तिच्या तर्जनीतली अंगठी काढुन माझ्या पुढे केली.."हि तुमच्या बोटात घाला. जर मध्येच काही गडबड झाली तर ही कुपी जमीनीवर जोरात आपटा आणि अंगठी वाला हात पुढे करा त्यातील दैवी तरंगामुळे तुम्ही आलेल्या संकटातुन वाचु शकाल". माझी बोटं थोडी जाड असल्यामुळे ती अंगठी मी तर्जनीत न घालता माझ्या अनामिकेत घातली. का माहीत नाही पण आतुन मला फार बर वाटत होतं. मी तिच्या गोड चेहर्याकडे एकदम आश्वासक पणे पाहिल तेव्हा तिही माझ्याकडे काहीशी तशीच पाहत असल्याच मला जाणवल. अर्थात ही वेळ आता या सर्व गोष्टींविशयी विचार करण्याची नक्कीच नव्हती. आरोहीची कल्पना चांगली होती. पण वाघाच कातड घालुन त्याच्याच गुहेत शिरताना जी अवस्था होईल तशी अवस्था आमची झाली होती. "हे सर्व झाल्यावर आता पुढे काय? म्हणजे आपण त्याच्या पुजेत विघ्न आनणार कसं?", मी आरोहीला विचारल. यावर मंद हसत तिने भिवाकडे पाहिले, " याची व्यवस्था मी काल संध्याकाळीच केली होती त्या डुक्कराला भिवाच्या फासापर्यंत आणुन. पुढच काम भिवाने केलेलं आहेच. आपल्याला त्या डुकराच शीर लागेल. कारण ज्यावेळी त्याचं मंत्रोच्चारण अंतीम चरणाकडे जाईल त्यावेळी सभोवतालची सर्व पिशाच्च उन्मादाने अग्नी कुंडाच्या भोवताली फेर धरुन वेताळाला आळवायला सुरवात करतील, बस्स ह्याच गाफिल क्षणी आपल्याला विजेच्या चपळाईने तिथे जाऊन हे शीर त्या अग्नी कुंडात टाकायच आहे. ज्यामुळे उपासनेत विघ्न येइल आणि सभोवतालच्या सर्व अमानवीय गोष्टींचा नाश होउन हा गड शाप मुक्त होईल कायमचा". ऐकायला जरी सोप्प वाटत असल तरी हे सर्व क्रुतीत उतरवायच आहे या विचारानेच छातीत धडकी भरली.

गडाखाली ठाकर वाडीत भिवाच्या घरासमोर मिनमिनत्या कंदीला च्या प्रकाशा्त काहीतरी हालचाल चालु होती. भिवाच्या पोटुश्या बायकोने नवरा सकाळी दोन पोरांबरोबर वर गेला तो परत खाली आलाच न्हाय म्ह्णुन बोंब ठोकली तशी वाडीतली काही वांड पोर झोपडी समोर बसुन काहीतरी कुजबुज करत होते. भिवाचा बाप डोक्याल हात लावुन वर डोळे लावुन बसला होता. चर्चेअंती त्यांच्यातलाच एकजण उठला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, "वैनी तुह्या काळजी नको करु. बस ही रात सरुंदे. सकाळच्याला पहिल्या वक्ताला आम्ही सर्वजन वर जाऊन त्या समध्यासनी धुंडतो. आता वर जायच आमच काय धाडस न्हाय. रातच्यान कसल कसल इचित्र आवाज बी वरन येऊ लागल्यात."

राजकुमारी आरोहीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे पेहराव बदलुन घेतले. मी माझा स्वीस नाईफ व ती कुपी धोतराच्या पिरवणीत लपवुन ठेवली न जानो काही वेळ आलीच तर. आम्ही दोघांनीही तिने दिलेल्या कुपीतील द्रव्य अंगावर लावले. निघण्याच्या अगोदर भोयांकरवी तिने डुकराचे शीर आणुन त्याला एका जाड कापडात व्यवस्थित बांधुन घेतले. ते शीर आता भिवाच्या पाठीवर आवरण बांधुन त्यात लपवल. म्हणजे चालताना त्याचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि समोरुन कोनी पाहील तर त्याला संशय ही येणार नाही. बस आता आम्ही पुढच्या लढाईस सज्ज झालो होतो ज्यात फक्त जिंकावच लागणार होतं नाहीतर विनाश अटळ आहे.

काल रात्री बाहेरुन वाडा फक्त उजळलेला दिसत होता. पण ऐश्वर्य काय असत याची अनुभुती आता प्रत्यक्षात पाहुन मिळाली. ते मखमली पडदे, झुंबर, त्यातली रोशनाई, बसायच्या गाद्या त्यावरचे लोड, काचेच नक्षीकाम, भिंतीवरील चित्र आणि या सर्व वातावरणात यांत्रिकपणे गस्त घालणारे ते सैनिक. अर्थात सार काही अमानवीय. कोणाला संशय येऊ नये म्हणुन मी आणि भिवा आरोहीच्या मागे तिच्या सेवकांप्रमाणे चाललो होतो. मगाशी आम्ही कपडे बदलायला गेल्यापासुन आरोही एकदम शांत झाली होती. तिने एकदाही माझ्याकडे पाहील नव्हतं त्यामुळेच कि काय मला खचित अस्वस्थ झाल्यासारख वाटत होतं.

खाली येताच आम्ही डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाऊ लागलो. आरोही आत जाताच दोन तीक्ष्ण भाले कैचीप्रमाणे आम्हाला आडवे आले आणि काळजात धस्स झालं. भिवाच्या पाठीवरच शीर फक्त ऊसळुन बाहेर यायचच बाकी होत. आम्ही लगेच सावरुन समोर पाहिल, चार लालबुंद डोळे आमच्याकडे खुनशी नजरेणे पाहात होते. इतक्यात राजकुमारी आरोहीने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकत त्यांना ईशार्यानेच बाजुला होण्यास सांगितले. आम्ही काहीसे गोंधळल्यासारखेच तिच्या मागोमाग आत शिरलो. थोडस चालल्या नंतर आरोहीने परत एकदा डाव वळन घेतल व ती हळुहळु एक एक पायरी खाली उतरु लागली. ती जस जशी खाली ऊतरु लागली तस तश्या बाजुच्या कळकटलेल्या मशाली प्रजव्लित होऊ लागल्या. प्रथमच आम्हाला आरोहीच्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली. भिवाच माहीत नाही पण माझी मात्र त्या पोशाखात पुरती गोची होत होती. हळु हळु पावल टाकत मी उतरत होतो. पुढे आरोही, मध्ये मी आणि मागे भिवा वळणाकार वीस-एक पायर्या उतरल्या नंतर आरोही पुन्हा उजव्या बाजुस वळाली. दहा-पंधरा पावले चालल्यानंतर अचानक ती एका भिंती समोर थांबली. तिच्या मागोमाग आम्ही सुध्दा थबकुन थांबलो. आता पुढे काय अशा प्रश्नार्थक चेहरयाने मी तिच्याकडे पाहिल तस तिने मला हातानेच पुढे यायला सांगुन भिंतीवरील दगडी चिन्हाकडे माझे लक्ष वेधले तो एक उलटा स्वस्तीक होता. तिने मला अलगद तो दगडी स्वस्तीक माझ्या डाव्या बाजुला फिरवण्यास सांगितला. मी मनात म्हणालो एवढ्या वर्षांनंतर कोणीतरी हात लावत असेल फिरेल तरी का? कि पोपट होतोय माझा! पण काय आश्चर्य स्वस्तीक अगदी अलगद फिरला. आणि दोन मोठे दगड घासताना जसा आवाज होईल तसा आवाज होऊन ती अजस्त्र दगडी भिंत अलगदपणे बाजूला झाली. अच्छा तर हाच तो "गुप्त" दरवाजा. मी आणि भिवा काहीतरी विस्मयकारक बघितल्यासारख एकमेकांच्या तोंडाकडे पाहात होतो. समोरच एक अरुंद भुयार तोंड आवासुन आमच्या स्वागतास सज्ज होतं. सात फुट ऊंच व तीन फुट रुंद अश्या त्या भुयारातुन एकच माणुस आरामात जाऊ शकत होता. आम्ही तिथुन आत आलो त्याच क्षणी पुन्हा तसाच आवाज करत तो दरवाजा बंद झाला. अस वाटल जणु काही एका अजस्त्र अजगराने आपल तोंड उघडुन आम्हाला गिळलय आणि आम्ही आता त्याच्या पोटात कायमचे बंद झालोय.

डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम.......... इकडे समर वर्मा त्याच्या लवाजम्यासह गडाच्या उतरणीला लागला होता. सारी भुतावळ मशाली नाचवत वाद्यांच्या आवाजात घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीराकडे मार्गक्रम करीत होती. वाटेत येनार प्रत्येक जनावर आप-आपल्या परीने ओरडुन काहीतरी अमानवीय पाहिल्याच सांगत होतं तर हेच चित्र-विचित्र आवाज ऐकुन खाली हरवल गावात कित्येक लोकं डोक्यावर वाकाळ घेऊन निपचित पडले होते. डाव्या हातात लगाम धरुन उजव्या हाताने घोड्याच्या आयाळीवरुन ह्लका हात फिरवत रागीट डोळ्यांनी समर वर्माने वर आकाशाकडे पाहात पुटपुटले, "माझ्या उपासनेत खंड पाडणार काय? त्यासाठी आधी तुम्ही जिंवत तर राहील पाहिजे. त्याच्या चेहर्यावर क्रुर हासु उमटल. हाआहाहाहाहाआहाआ...............अजुन फक्त काहीच तास", पंडीत उर्फ समर वर्माच्या चेहर्यावरील भाव हेच दर्शवत होते.

गेले वीस पंचवीस मिनिटे आम्ही आरोहीच्या मागोमाग चालत होतो. कित्येक वळण घेतली असतील काहीच कळत नव्हत. भुयारातल वातावरण थंड असुनही माझ्या आणि भिवाच्या माथ्यावरुन घाम निथळत होता. थोड्याच वेळात पुन्हा एक छोटा दरवाजा लागला त्याच्या बाजुलाच दोन लहान देवड्या होत्या त्या मागे सारुन आम्ही पुढे जायला वळ्तोय तोच माझा पाय कशात तरी अडकुन मी धडपडलो माझ्या धक्क्याने भिवा सुद्धा थोडासा कलुन बाजुच्या भिंतीवर आदळला. आम्हाला अस गडबडलेल पाहुन आरोहीने मागे वळुन पाहील. पाहतोय तर दोन मानवी सापळे भिंतीला टेकुन निपचित पडले होते. त्यांच्या एकुन अवस्थेवरुन काहीतरी भंयकर त्यांनी पाहील असाव अस वाटत होतं. मला लगेच दादोसाने फॉरेनर्स बद्दल सांगितलेली गोष्ट आठवली. म्हनजे हे खालुन वर त्या दरवाज्या पर्यंत जाण्याचा प्रयत्नात होते पण मध्येच कसल्या तरी अमानवीय शक्तीने त्यांचा घात केला होता. हात देऊन मला भिवाने उठवण्याचा प्रयत्न केला तसा माझ्या मागुन कसलातरी आवाज झालेला मला जाणवला. घमम्म्म्म्म्, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म................तो आवाज आता हळु हळु मोठा होऊ लागला. मागे वळुन पाहिल तर आठ दहा लालबुंद डोळे आमच्याच दिशेने येत होते. आम्ही उठुन पळणार तशी आरोही आमच्या समोर उभी राहुन मोठ्या मोठ्या ने हासु लागली. तिच ते कर्णकर्कश्य हसणं छातीची धडधड वाढवत होतं. "उपासनेत व्यत्यय आणणार तुम्ही?...... हाहआहाआहाआआ अहाआहाआहाआआअ........ त्या आरोहीचा बंदोबस्त केव्हाच झालाय आता तुमची पाळी." परत मोठ्याने हसण्याचा आवाज........आता आरोहीच्या सुंदर देहाच्या जागी लाल राकट डोळे दिसत होते. तिचा नाजुक आवाज जाऊन आता घोगरा आवाज ऍकु येऊ लागला "स्स्सोड्णार नाही.... स्स्सोड्णार नाही...." आणि अचानक मागुन मानेवर जोरात कसला तरी प्रहार झाल्याची जाणीव झाली. डोळे मिटता मिटता शेवटचे काही शब्द ऍकु आले..."आज वेताळाला एक नाही तर तीन-तीन नरबळी मिळनार. ......हाहआहाआहाआआअहाआहाहाआआहाआहाअ..........."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users