थ्रील थरार ४ (शेवटचा भाग) .

Submitted by Abhishek Sawant on 4 December, 2015 - 12:33

थ्रील थरार ४ (शेवटचा भाग)
.
.
जयच्या आईने त्यांना मस्तपैकी चहा बनवून दिला. ते चहा संपवणार तेव्हड्यात लाईट जाते. आणि ५ मिनिटांनी लोकांचा गलका ऐकु येतो, कोणीतरी जयला हाक मारते अरे घरात काय बसलायसा बाहेर य चोर आलेत चोर. आणि.......
.
.
.
आणि ते उठून बाहेर जातात, लाईट नसल्याने अंधारात ठीकसे काही दिसले नाही. बाहेर आल्यानंतर जय ने रोहितला एक काठी दिली आणि त्यानेही एक जाड जुड काठी बघुन स्वत:जवळ ठेवली. रोहितने पाहिले की ५ ते ६ लोक अंगणात उभे होते बहूदा जयचे काकावैगेरे असावेत. सगळ्यांच्या हातात कुर्हाडी काठ्या होत्या ,येणाय्रा संकटाला तोंड देण्याची धमक त्यांच्यात दिसत होती. दुरवरून कोठूनतरी ओरड्न्याचे आवाज ऐकु आल्याने ते जमा झाले, जयने रोहितची ओळख सगळ्याना करून दिली. रोहित जरा अंगाने धिप्पाड असल्याने आणि त्याचे व्यायामशाळेत कसलेल शरीर पाहुन त्या लोकांना रोहित चा आधार वाटू लागला होता कारण तेथे राखण देतील अशी माणसे कमी होती. घरातल्या बायका तर खुप घाबरल्या, सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव दिसत होते भितिचे.
दुरवरुन कुठून तरी दुरवरुन ओरडण्याचा आवाज येत होता त्या दिशेने ते सगळे बॅटरीचा प्रकाशात काही दिसतय का ते पाहु लागले , तेवढ्यात कोणीतरी म्हणाले पाठीमागच्या डोंगराच्या बाजुने दोन ते तीन प्रकाशझोत येताना दिसतायेत. आणि खरोखरच डोंगराच्या कड्यावरुन कोणीतरी वेगाने खाली उतरत असल्याचे जाणवत होते. ते बॅटरीचे प्रकाशझोत जसजसे जवळ येत होते तसतसे सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. रोहित तर अजुनही आपल्या नशीबाला दोश देत होता, त्याच्या चेहर्‍यावरचे भितिचे भाव लपवता येण्यासारखे न्हवते, तो अश्या परिस्थितिला कधीही सामोरा गेला नव्हता.
जय च्या घरातल्या एका म्हाताय्रा बाबाने सगळ्या लहान मुलांना आणि स्त्रियांना आत जायला सांगीतले आणि तो डोंगराच्या दिशेने आवाज देत आपल्याच गावातले लोक आहेत क हे पाहू लागला. पण तिकडुन काहीच प्रतिसाद आला नाही.
मग ते सावध पवित्रा घेउन पुढे झाले, सगळ्यांच्या हातात काठ्या कुर्हाडी होत्याच चोर जवळ आले तसे त्यांनी आपल्या बॅटरी बंद केल्या, आता कुणालाच काही कळेनासे झाले. रोहीत ला तर विस्वास बसत नव्हता आपण अश्या स्थितिमध्ये अडकु असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नाही. त्याचे हातपाय थंड झाले, ह्रुदयामध्ये धड्धड वाढली ,संपूर्ण शरीरात भितीची लहर उठली. रोहीत जसा थांबला होता त्याला काय कळावे कळ्त नव्हते तो मख्ख पणे एकाच जागी उभारून होता.
त्या शांततेला चिरत कोणाचीतरी किंकाळी वातावरणात विरली, अंधारात एक तर काही दिसत नव्हते, फक्त होणारे वर आणि त्यामागुन येनाय्रा आर्त किंकाळ्यानी सगळा आसमंत ढवळुन निघाला होता. रोहित तर अजुनही तिथेच खिळुन होता जसे काही त्याला कोणीतरी तिथेच जखडुन ठेवले आहे, त्याचे पूर्ण शरीर घामाने ओलेचिम्ब झालेलं. तरीही तो त्या धक्यातुन सावरला आणि घरच्या डाव्या बाजुला असणार्‍या शेतात त्याने उडी मारली. उडी मारल्यानंतर एक भयंकर कळ त्याच्या घोट्या पासून ते थेट मस्तकात शिरली, त्याचा एका मोठ्या दगडावरुन पाय निसटुन मुरगळला होता त्या वेदनेसोबतच त्याने धावायला सुरुवात केली आणि त्याने मागे वळुन पाहिले पण नाही, ते शेत संपले दुसरे शेत लागले तरी तो धावतच होता., पायाला होणाय्रा वेद्ना,चिक्खल , दगड धोंडे , अंगाला ओरबडणारे शेतपीक या कशाचाही त्याला फरक पडणार नव्हता. तो असाच कितीतरी वेळ पळत पहीला आणि कुत्र्यांच्या भुंकण्यावरुन त्याला जाणवले की तो तिथुन बराच दुर आला होता. त्याचे कपडे सागळे घामाने भिजले होते ठीकठीकाणी खरचटले होते, घोटा अजुनही ठणकत होता.
त्या परीस्थितीतही त्याला वाटले की आपण तिथून पळून आलो हे चुकले तिथे थाबुन जयच्या फॅमीलीला मदत करायला पाहिजे होती, तेवड्यात त्याला जाणवले कोणीतरी त्याच्या वर नजर थेउन आहे. रोहित ऊसाच्या शेतात असल्यामुळे फक्त पानांची सळसळ त्याला ऐकू आली आणि अंधुक प्रकाशात त्याला एक कूत्र्यासारखी आक्रुती दिसली, त्या प्राण्याचा डोळ्यात त्याला तिच विलक्षण चमक दिसली त्याला हे कळायला वेळ लागला नाही की हा त्याना रस्त्यात दिसलेला लांडगा आहे. तो काही हालचाल करणार तेवढ्यात लांड्ग्याने त्याच्यावर झेप घेतली, त्याच्या मांसल मऊ मानेत लांड्ग्याचे दात अलगद घुसले रोहित पळुन दम लागल्यामुळे आणि भिती मुळे काहीच करु शकला नाही. लांड्गा त्याची पकड मजबूत करत गेला अगदी रोहितच्या शेवटच्या श्वासापर्यंत.......
समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks..