माफ करा मी पहील्यांदच लिहीत असल्यामुळे पहीला भाग खुपच चुकला.... हा भाग जमलाय का बघा आणि काही चुका झाल्या असतील तर सांगा....
थ्रील थरार २.
असे हे दोघे मित्र जय च्या गावाला जायला निघाले. संध्याकाळी ते जरा लवकरच म्हणजे ४ वाजताच रूमवर परत आले. फ्रेश झाले आणि एकच रात्र रहायच असल्याने कपडे वैगेरे घेन्याचा काहित प्रश्नच नव्हता. सुमारे ४-४.३० ला ते बाहेर पडले रोहित सुद्धा त्याला गावाकडे जायला मिळणार असल्यामुळे खुप खुश होता. दोघानहि excitement वाटत होती पण त्याना हे माहिती न्हवते कि पुढे आपल्या नशिबात काय लिहुन ठेवले आहे. आज gym चुकल्यामुळे रोहित जरा नाराजच होता पण त्याने तसे दाखवून दिले नाही. जय ने त्याची नवि कोरी bike घेतली होती रूम वरुन निघाल्यानंतर ते त्यांच्या दर्रोज च्या ठिकाणी चहा पिन्यासाठी गेले तेथे मस्त पैकी चहा पिउन ते पुढे निघाले तोपर्यंत संध्याकाळचे ५ वाजत आलेले होते त्यांची bike चौकातून निघाली. सुर्य मावळतीला आला होता थोडासा अंधार पडायला लागला होता रोहित ला bike येत असलि तरी जय ला त्याच्या bike चालवन्याच्या कूवती वर विश्वास नव्हता म्हणून long route वर जात असताना तोच bike चालवत असे.
त्यांचा असा हा १ तासाचा प्रवास सुरु झाला शहरातून बाहेर पडल्यानंतर रह्दारि कमी होऊ लागली आणि यांचा स्पीद ही वाढू लागला. आता बराचसा अंधार पदल्याने रस्त्यवरचे काही नीट दिसत नव्हते. जय ने गाडीची headlight चालु केली. रोहीत मागे बसुन मोबाइल वर गानी ऐकत बसलेला त्यामुळे त्याचे रस्त्याकडे लक्ष नव्हते. जय ला रस्त्याच्या कडेला एक पान टपरी दिसली त्याने गाडी बाजूला घेत थाबवली दोघांनीही उतरून थोडा आळस दीला. जय ने तीथूनच पाणी घेउन चूळ भरली आणि पान तपरी वरच्या माणसाला त्याने एक मावा बनवायला सांगितला. तोपर्यंत रोहीत आपल्याला खान्यासारख काही ईथे भेटेल का ते पहात होता मग त्याने पन एक सुपारी घेतल, रोहीतला सहसा सुपारी वैगेरे आवडयची नाही पन प्रवासात खायला त्याला खुप आवडायचे. एव्हाना जय चा मावा तयार झाला होता आणि पान तपरी वरच्या मानसाने तो एका लहान पॉलीथीन पिशवी मध्ये भरून तो जय कडे सुपूर्द केला जय ने त्यामधला थोडा तोंडात टाकला आणी तो बाईक चालू करू लागला रोहीत ही त्याच्या मागे येउन बसला तेव्हड्यात रोहीतला जाणवले की अंधार कुपच पड्ला आहे आणि पुर्ण रस्त्यावर एकही स्त्रीट लाईट नाहीये त्या पान टपरी मध्येच तेव्हडा मिणमिणता दीवा चालू होता. बाईक चालू करून ते रस्त्त्याला लागले.
जय आपल्याच तन्द्रित गाडी चालवत होता तेव्हड्यात त्यांच्या बाईक समोरून काहितरी विचीत्र .प्राणी गेल्याचे त्यांच्या ध्यानात आले कुत्रा किवा मांजर वैगेरे असेल म्हणून पहिला त्यानि दुर्लक्ष केले पन तो प्राणी त्यांच्याच गाडी सोबत रस्त्याच्या बाजुने येत असल्याचे त्याना जानवले आता मात्र जय ला थोडी भिति वाटू लागली. त्याने गाडी चा वेग कमी केला आणि रस्त्याच्या कडेला बघु लागला पहीला तर त्याला काहीच दिसले नाही पन गाडीच्या ईंजीन चा आवाज बंद झाल्यानंतर त्या प्राण्याचा गुरगुरन्याचा आवाज ऐकयला आला. आता मात्र दोघांचीही जाम तंतरली, त्यांच्या मागून आलेल्या गाडीच्या प्रकाशात त्याना एवडेच कळाले की तो प्राणी म्हंजे एक जखमी झालेला लांडगा आहे.
ते बघितल्यानंतर जय ने गाडी चालु सुसाट वेगाने त्याने ती पुडे पळवली रोहीत तर हे सर्व पाहून स्तब्दच झाला, त्या लांड्ग्याचा तो तुटलेला जबडा आणि त्यातुन वाहणारे रक्त अजुन त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हते.
प्रतिसाद देऊन सांगा..... कशी
प्रतिसाद देऊन सांगा..... कशी वाटली कथा
पहिला प्रयत्न म्हणून उत्तम
पहिला प्रयत्न म्हणून उत्तम आहे.
पण शुद्धीकरणाचे काही जमले पाहा. त्यामुळे वाचनात रसभंग होतो आहे.
ओपन ऑफिस आणि फायरफॉक्स दोन्हीला मोफत मराठी शुद्धीचिकित्सक उपलब्ध आहेत. येथे पाहा
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-spell-checker/
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/marathi-dictionary/
http://extensions.openoffice.org/fr/project/marathi-spellchecker-and-hyp...
------------
असो, पुढील भागामध्ये,काय असू शकेल यासाठी माझे दोन शब्द.
---
जय ने परत गाडी काढली. आणि दोघेही न बोलता प्रवास करू लागले. कितीतरी वेळ झाला तरी रस्ता संपतच नाहीये असे वाटू लागले. जयने वेल घालवण्यासाठी उरलेला मावा खावा असा विचार केला. चालत्या गाडीवरच खिशात हात घातला. अनपेक्षितपणे त्याच्या हाताला खिशात काही तरी बुळबुळीत लागले. त्याने चटकन हात खिशातून बाहेर काढला. नेमका त्याच क्षणी गाडीच मिणमिणता चालणारा दिवा उडाला. आता अंधारात गाडी चालत होती. चांदण्यात दिसेल तो रस्ता.
रोहीत आपल्या खिशात काय असावे याचा विचार करत होता. जय कशाबश्या दिसणार्या रस्तावर हळूहळू गाडी चालवत होता.
'पोहोचले असू का रे आपण' रोहीतने विचारले'
'हो बहुतेक जवळच असू आता'
दोघांनीही लांडग्याचा विषय टाळला.
इतक्यात त्यांना रस्त्यावर काही तरी दिसले.
जय गाडी चालवत होता बाईक समोरून काहितरी प्राणी गेल्याचे त्यांच्या ध्यानात आले कुत्रा किवा मांजर वैगेरे असेल असे वाट्ले. या वेळी अंगावर शहारा आला दुर्लक्ष केले पण तो प्राणी त्यांच्याच गाडी सोबत रस्त्याच्या बाजुने येत असल्याचे त्याना जाणवले आता मात्र त्यांना थोडी भिती वाटू लागली. त्याने गाडी चा वेग कमी केला आणि रस्त्याच्या कडेला बघु लागला पहीला. यावेळी गाडी बंद करण्याची हिंमत होत नव्हती. पण तरी दोघांनाही परत त्या प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकयला आला.
त्यांच्या मागून परत एक गाडी आली. आलेल्या गाडीच्या प्रकाशात त्याना एव्हढे कळले की तो प्राणी म्हणजे एक जखमी झालेला लांडगा आहे! त्याचे भेदक डोळे रोहीतकडे पहात होते. ते बघितल्यानंतर जयने गाडी चालु सुसाट वेगाने त्याने ती पुढे पळवली. त्या नजरेने रोहीतच्या अंगात एक शिरशीरी उठली. परत लांडगा परत तेच ठिकाण.
त्या लांड्ग्याचा तो तुटलेला जबडा आणि त्यातुन वाहणारे रक्त आणि ती भेदक नजर, अजुन त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याने मघाशी खिशात घातलेला हात वर केला.
बोटावर लागलेले रक्त खाली ओघळत होते.
आपल्या जबड्यात त्याला एक विचित्र हालचाल जाणवली. लांब जीभेने त्याने बोटंवरून आलेला रक्ताचा ओघळ चाटून घेतला आणि तो आता पाठमोर्या जयकडे नव्या नजरेने पाहू लागला.
--
कथा हायजॅक करण्याचा प्रयत्न नाही.
फक्त कथा पुढे जाऊ शकेल हे सांगण्यासाठी हे उदाहरण दिले आहे.
पटले नसल्यास क्षमस्व!
Reply dilyabaddal
Reply dilyabaddal thanks...Ani tumhi suchavlele paryay mi nakkich baghen..pahilach praytn aahe..thank u very much...pudhcha bhag tumhi sangtay tasa nasel...aani kahi chuka astil tr suchva plz
तुम्ही सुचवलेला कथेचा भाग पण
तुम्ही सुचवलेला कथेचा भाग पण मस्त आहे
तुम्ही सुचवलेला कथेचा भाग पण
तुम्ही सुचवलेला कथेचा भाग पण मस्त आहे
येउ द्या पुढचा भाग.
येउ द्या पुढचा भाग.
Interesting !!
Interesting !!
निनाद यांनी सुचविल्याप्रमाणे
निनाद यांनी सुचविल्याप्रमाणे कथा फुलवता येऊ शकते..
निनाद सर फारच छान आहे.पण एक
निनाद सर फारच छान आहे.पण एक शंका आहे जयने खिशात हात घातला.......... मग रोहित स्वतः च्या खिशात काय असावे असा का विचार करत होता