On Air with AIB

Submitted by सोनू. on 29 November, 2015 - 05:49

इतक्या छान मालिकेबद्दल इथे वाचण्यासाठी शोधत होते पण धागाच मिळाला नाही. म्हटलं काढू धागा, होऊ दे खर्चं.

Star world आणि Start Plus येते ही मालिका रविवारी रात्री १० ला. मी Hotstar वर बघते टीव्हीवर बघायचे राहिले तर. शिवाय हिंदी आणि इंग्रजी दोन्ही बघायचे असतील तर एकाच वेळेस दोन्ही वाहिनींवर नाही जमत म्हणून हे बरं.
http://www.hotstar.com/tv/on-air-with-aib-english/6200
http://www.hotstar.com/tv/on-air-with-aib-hindi/6248

Star Gold वरही बहूदा येते कारण मागच्या भागात बोलले होते की जर तुम्ही स्टार गोल्ड वर बघताय तर इंद्रा द टायगर २५-३० मिनिटांत परत सुरू होईल, काळजी करू नका Happy

AIB वाले नॉकआऊट रोस्ट मुळे जास्तं प्रसिद्ध / कुप्रसिद्ध झाले. पण त्याआधीही त्यांचे व्हीडिओ पाहणारे माझ्यासारखे लोक असतीलच. आलिया भट चा जिनिअस ऑफ द इयर मस्तं होता. अनऑफेंडेड मधे त्यांनी मुरली देवरा, अनुराग कश्यप, रसल पीटर, अर्णव गोस्वामी यांना घेऊन खूप म्हणजे खूपच छान व्हीडिओ बनवला होता.
त्यांची सेव्ह इंटरनेट मुव्हमेंटही छान होती आणि त्याचा फॉलोअपही!

आता त्यांना टीव्हीवर मालिका करायला मिळालीय.
ट्रॅजिडीमे कॉमेडी गाणं म्हणत सुरू होणारा का कार्यक्रम बघताना खूप मजा तर येतेच, खूप काही समजतं पण! काहींना त्यातील वाह्यात शब्दं खटकू शकतात. हे लोक सगळ्यांची खिल्ली उडवतात. मोदी, राहूल, राज, उद्धव, शरद पवार, अगदी कोणीही राजकारणी तसेच सिनेजगतातील, उद्योगपती, सरकारी बाबू कोणीही अगदी कोणीही.

मी इंग्रजीमधले भाग आधी पाहीलेत आणि आत्ता हिंदीतले बघीतले. मलातरी इंग्रजीतले जास्तं आवडले. दोन्हींत विषय तोच असतो पण सादरीकरण, सादरकर्ते, काही विनोद, उदाहरणे इत्यादि वेगळे असतात.

पहिला भाग - Why be good

सुरुवातच मस्तं केलीय त्यांनी - If you are watching us on Hotstar then congrats, your video must be still buffering. If you are watching on Star World, don't lie, who watches Start World? Seriously, Star, they are called torrents, everybody has them.

भ्रष्टाचार बद्दल सुरुवात करताना - आपण आज भारताचा राष्ट्रीय खेळ भ्रष्टाचार याबद्दल बोलणार आहोत असं म्हटलं. आठवतोय ना भष्टाचार? It's the thing you used to care about before beef. Way back when किसने कितना खाया was more important than किसने क्या खाया. पुढच्या व्हीडिओमधले राहूल गांधींचे बोलणे तर हहपुवा होती. बघाच! भ्रष्टाचाराविषयी तक्रार करणे कसे महागात पडतेय आणि त्यांच्या बचावासाठी काही पाऊले उचलण्याची कशी गरज आहे हे छान मजेमजेत दाखवलंय. व्यापम घोटाळ्यातील whistle blower ला दिलेले संरक्षण दाखवलेय ज्यात तो सायकलवर जाताना त्याच्या मागे पोलीस संरक्षक दुसर्या सायकलवरून जातो. आधी म्हणे ते डब्बलसीट जायचे. RTI मधले बदल इत्यादिंवर पुढे विनोद केलेत. ती जाहीरात, निवडणूकीत हरण्याचा विक्रम करणार्या डॉ. के. पद्मराजन यांची मुलाखत, सगळंच बघण्यासारखं आहे.

दुसरा भाग - Aag - The Fire

यात आग विझवण्यासाठी, लागू नये म्हणून घेण्याची खबरदारी यासाठी भारतात कायकाय आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे ही माहीती खूप विनोदी अंगाने दिलीय. रामगोपाल वर्मा वाला व्हिडिओ लय म्हणजे लय भारी.

त्यांच्या शेवटच्या Can You Not भागात खूप्पच मजा आली. दिवाळीच्या दिवसात दिवाळीच्या रात्रीचा नासाने अवकाशातून घेतलेला फोटो म्हणून भारताचा जो फोटो लोक शेअर करतात तो खरा लोकसंख्या वाढ दर्शवणारा नकाशा आहे. This is not an image of festival of night. This is an image of the festival that happens when the light goes off :). त्याचबरोबर त्यांनी ती UNESCO ने जन गण मन ला सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून नावाजण्याच्या प्रसाराबद्दलही कानपिचक्या दिल्या. It is UNESCO, not Earth Idle like Indian Idle or American Idle. नंतरच्या भागात दूरदर्शन बद्दलही खूप मस्तं सांगितलं. टीआरपी ठरवताना ग्रामिण भाग गणलाच जात नव्हता त्यामुळे कोणीच डीडी पाहत नाहीत असं मानलं जात होतं. पण हा भाग जेव्हा घेतला तेव्हा कळलं की डीडी एक नंबर आहे.

तिसरा भाग - Cop Blocked

सुरुवात - होप तुम्ही सर्वांनी दिवाळी आनंदाने साजरी केली असेल, तुम्ही मोदी नसाल तर. बडेबडे स्टेट्स मे बडेबडे लॉसेस होते रहते है. Happy बिहार निवडणुकीचा मस्तं आढावा घेतला होता. न्यूज चॅनल्सनी कसे एक्झिट पोलमधे वेगवेगळे निकाल दाखवले होते, मतगणनेदिवशी NDTV ने सकाळी साडेनऊलाच भाजपा जिंकलीच असे निष्कर्ष काढले, वगैरे. तो दिवस मोदींसाठी चांगला दिवस नव्हता, बिहार मधे भाजपाची हार झालीच वर मोदींना अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या लागल्या.भाजपाच्या लोकांनी लावलेले फटाके जेव्हा निष्कर्ष आले तेव्हा - आम्ही तर अडवाणींच्या वाढदिवसाप्रित्यर्थ वाजवत होतो म्हणणे, मग अडवाणींचे "म्हटलं नव्हतं मी पार्टीच्या अजूनही कामी येत आहे" इत्यादि विनोदांनी मज्जा आली.

त्यानंतर असलेल्या भागात पोलिसांनी केलेले अत्याचार, त्याविषयी करता येणारी तक्रारीची तरतूद, सगळंच कसं फसवं आहे याबद्दल कोपरखळ्या होत्या.

शेवटच्या भागात नील नितिन मुकेश च्या गेम ऑफ थ्रोन्स मधे काम करण्यासाठी रोल मिळालाय या बातमीची मस्तं टर उडवलीय.

चौथा भाग - Space the Final Frontier

पॅरिस अटॅक, आयसीस बद्दल छान बोललेत. आत्ताच का, तेव्हा का नाही विरोध केला, असं बोलायचं तर पाकीस्तानला जा, सिरियाला जा, या सगळ्याबद्दल. ९९.९९% लोकांना सिरियाला नाही जायचेय किंवा नाही रहायचेय. ट्रिप अॅडवाझर मधे सिरियात जाऊन काय करावे यासाठी सर्वोत्तम उत्तर म्हणजे "तिथून निघून जा" हे आहे. ज्या ०.०१% लोकांना सिरियात पाठवताय त्यांना पाठवून तुम्ही त्यांना अजून जास्त हिंस्त्र व अजून जास्तं विघातक बनण्याचे प्रशिक्षण देऊ करताय.

सरसकटीकरणाबद्दल All dash are dash is not an argument. जर सगळे मुस्लिम आतंकवादी असतील तर सगळे पुरुष बलात्कारी आहेत, सर्व स्त्रीयांना वाहन चालवता येत नाही, सर्व तर्हेचा प्रणय हा मिशनरीच असतो,
सर्व संतोष नावाच्या मुलांची फक्तं अरेंज मॅरेजच होऊ शकतात, इत्यादिही खरे समजा. त्यानंतर एका शिख मुलाचा आतंकवादी म्हणून व्हायरल झालेला फोटो आणि तो कसा मॉर्फ्ड फोटो आहे त्यावर विनोद होते. इंटरनेट वरचे जहाल, तुम्ही एखादी बाजू घेतली की तुम्हाला तुम्ही हेच आहात, तेच आहात करणे.. सगळं मस्तं होतं. अगदी "फक यू आयसीस" हा जप प्रेक्षकांकडून करून घेणेही!

त्यानंतर भागाचा मूळ विषय, पब्लिक स्पेस. किती कमी भूभाग आम जनतेसाठी खुला आहे, दिल्लीतील गोल्फ क्लब, मुंबईतील रेसक्लब यांची खरी किंमत पण ते किती भाडे देतात, केवळ अतिश्रीमंतानाच तिथे जाता येणे, तेथील गवतासाठी हजारो कुटुंबांना लागणारे पाणी वापरणे, गरज नसताना त्यांची लीज वर्षे वाढवणे, शिवसेनेचा आक्षेप, बेंगलुरू मधले आटत चाललेले व आटवले जात असलेले तलाव, तलाव संरक्षण समितीचे कार्यालयही एका मृत तलावावरच असणे इत्यादि समजाऊन सांगताना केलेले विनोद हसवतातही तेवढेच.

शेवटच्या Can You Not मधे तर धमाल होती. पहलाज निहलानींचा (सेंसर बोर्ड चे अध्यक्ष) भारताच्या प्रगतीबद्दलचा व्हीडिओ. हा सरळ सरळ मोदींच्या प्रसिद्धीसाठी केलेला आहे पण खरं तर त्यांची वाट लावलीय. सुरुवातीची ते मोदीकाका मोदीकाका ओरडणारी, हिमालयात फिरणारी मुले, मोदींचे गायब होणे (आणि त्यावर राहूलही मोदीकाका असं म्हणून मोदी गायब होण्याची वाट बघून रडणे हा विनोद), भारताची प्रगती दाखवताना इतर देशांची विमाने, उड्डाणपूल, सौर्यऊर्जा प्रकल्प दाखवणे, यांची जाम उडवलीय. नंतर ते गांधीजींच्या मागे जाणारे मोदी त्यांच्याकडे काही चोरी करायला मागेमागे फिरतायत अशा पद्धतीने दाखवणे. नंतरचे विनोद खरच ऐकावेतच असे आहेत. त्यांनी स्वतःचा बनवलेला व्हिडिओ पण मजेशीर आहे.

पाचवा भाग - HIV/AIDS - Red Ribbon Red Alert

या भागाची सुरुवात त्यांनी उत्तरप्रदेशमधल्या मजेमजेपासून केली. असे राज्य जेथे गूगल मॅपवाली मुलगी पण संध्याकाळी ६ वाजता घरी जाते कारण तिथे लोक तिला "तुझ्या बेडरूमचा रस्ता दाखव" म्हणतात. मुलायमसिंग यांचे वाढदिवसाचे साजरीकरण, त्यांचे "नका करू हे सगळं" असे सांगणे, तरीही कार्यकर्त्यांनी ७६व्या वाढदिवशी ७६ किलोंचा केक आणणे, आजतक ने जेवणात कोणते कोणते पदार्थं होते त्याची दिलेली इत्यंभूत माहीती, ए.आर. रहमानचा कार्यक्रम, त्याने कसे या आमंत्रणाला हो म्हटले असेल, तो कसा रथातून आला, त्याची भावचर्या, मुलायम शपथविधीला न आल्यामुळे लालूंनी इथे न येणे, सगळं मजेशीर.

त्यानंतर च्या भागात प्लेसमेंट सिझन, गूगल ने दिलेला १.२७ करोड पगार, त्या मुलाबद्दल प्रतिसाद देताना लोकांना आलेला देशप्रेमाचा उमाळा, दिल्लीकर नाही, भारतीय म्हणा चे प्रतिसाद, नेहमीच दिल्लीतल्या मुलांना नावे ठेवता, किमान इथे तरी त्याला दुर्मिळ असलेला चांगला दिल्लीतला मुलगा म्हणून मिरवूदे म्हणणं, त्याचे मित्रं कसे नंतर त्याला चिडवत असतील, मुलीला जास्तं पगाराची नोकरी मिळल्यावर ते तिच्या बुद्धीमत्तेमुळे नव्हे तर सौंदर्यामुळे असे म्हणणे जसे गूगल वगैरे कंपन्या त्यांना नाचायला घेऊन पगार देतायत, काम करायला नव्हे असा लोकांचा समज, कला शाखेतले विद्यार्थी, परदेशी जाणार म्हणजे गोर्या पोरी फिरवणे हे समीकरण, हे सगळं टू गूड म्हणण्यासारखं.

नंतरचा HIV वाला भाग. १ डिसेंबर ला जागतिक एड्स डे निमित्तं. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन - नॅको ने केलेले दैदिप्यमान काम, जागरूकता, औषध पुरवठा, काँडोमचा पुरवठा, नवीन रुग्ण संख्या वाढ जागतिक सरासरीपेक्षा एक चतुर्थांश असणे, याबद्दलच्या चांगल्या गोष्टी मधेमधे इतर विनोद घालून सांगितले. नॅकोने इतके चांगले काम केले की परदेशी पतपुरवठा करणार्यांनी तो हळूहळू कमी केला कारण त्यांना वाटलं आता याची गरज एवढी नाहीय. नॅकोला सरकारी आरोग्य विभागात समाविष्टं करून घेतले गेले. (सरकारी म्हणणे म्हणजे सर्वात वाईट अपमान यावरचे विनोदही मस्तं होते. ). तिथल्या सरकारी कारभारामुळे औषध खरेदीला उशीर होत गेला. डोनर्स कडून येणारे $१८७ साठी १८ महिने उशीर झाला कारण सरकारी बाबूंमधे त्या पैशांचा विनिमय कसा करणार यावर इगोइश्यूमुळे एकमत होत नव्हते त्यामुळे तशी बजेटशीट बनू नाही शकली. भारताने नायजेरीयाला दान केलेली औषधे भारताने परत मागितली कारण भारतात त्यांची टंचाई निर्माण झाली. सिप्ला जे स्वस्तात औषधे देतात, त्यांनी लहान मुलांसाठी असलेल्या औषधांचा पुरवठा रोखून ठेवला कारण आधीच्या औषधांचे पैसे सरकारने दिले नव्हते. सरकारी पुरवठ्यातले काँडोम्स संपले, रामदेवबाबांनी योग करून एडस बरा होतो म्हणणे आणि नॅकोने ते फेटाळणे..

----------------------

हे वाचायला खूप कंटाळवाणे वाटत असेल पण तिथे विनोदांबरोबर ऐकताना मजा येते. बघाच! मला लिहीता नाही आलय सगळं पण बघताना मात्रं जी मजा आली ती लिहीता नाही येत आहे. बाकीचे भाग जसे येतील तसे त्यावरही लिहीण्याचा प्रयत्नं करेन. तुम्हाला आवडलेले विनोद जरूर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा कार्यक्रम संपता संपता पाहिला. मला तर अतिशय गंभीर मुद्दे वाटले.
नाकोच्या फंडींगबद्दल याआधीही वाचलं असल्याने ते आणखीनच जास्त गंभीर वाटले.

रेकॉर्ड केलाय. वेळ मिळेल तेव्हा पाहीन.

पण एन्डीटीव्हीवरच्या कठपुतळ्या, सीएनेन आयबीएनवरचा सायरसचा द वीक दॅट वॉजन्ट यापेक्षा यात काही वेगळं आहे का?

अतिशय गंभीर मुद्दे वाटले>>>
हो, गंभीर मुद्दे होते. सायरसच्या शो च्या बराच जवळचा शो आहे.

ते दोघे टेलिप्रॉम्प्टरमधे बघून वाचतात हे कळतं, त्यामुळे तितकीशी मजा नाही आली.
लेखन खूप छान आहे. पण मला सादरीकरण कमी वाटले.

तुम्ही हॉटस्टारवर बघताय ना? तुम्ही लिहिलेल्यातले काही काही स्टारप्लसवर नाही दाखवलं.
उ.प्र.वरचे जोक डेरिंगबाज होते. राडा नाही झाला म्हणजे मिळवली.
सरकारी आई आणि सरकारी बायकोवरचे पंचेस सॉल्लिड होते.

पहिल्या २ भागांची फक्त सुरुवातीचे काही मिनिटे हा शो पाहिला. त्यापुढे ते अति होतं.

जॉन ऑलिवरच्या 'लास्ट वीक टूनाईट'ची कॉपी आहे. रोहन जोशी तर हातवारे पण त्याच्यासारखेच करतो. Uhoh

गेले दोन आठवडे स्टार वर्ल्डवर पाहिलं. हे जास्त आवडलं.
गेल्या भागात तर अमीरच्या मुलाखतीचा व्हिडियो न पाहताच त्यावर कमेंट करण्याबद्दलच्या कोट्यांमधले लाँग पॉझेस...
आताचं चेनै पुराचं कव्हरेज. ते आजतकनी खरंच केलेलं का? मग ट्विन टॉवर्स कव्हरेज त्यांनी कसं केलं असतं हे पाहून बांध फुटला.
काल मायबोलीमुळे आणि हा एपिसोड पाहिल्यामुळे फारा दिवसांनी वेड्यासारखं हसायला मिळालं.

मी पण बघते प्रोग्राम. त्यातल्या त्यात जरा बरा शो आहे. इतर रद्दड मालिकांपेक्षा उत्तमच म्हणायला हवा.

काही भाग पाहिले, ओपन स्पेस वाल्या भाग मधील काही शब्द रचना तर घेरी आणणारी होती. टिवी वर बीप बीप होते का? कारण मी online पाहिला म्हणून विचारात अहे.

On Air with AIB Season 2 आलाय. मस्तं आहे.
http://www.hotstar.com/tv/on-air-with-aib/6200/nationalism-vs-antination...

लिप्स्टिक अंडर माय बुरखा, गुरमीत कौर, रिजिजू आणि सिनेमागृहातले राष्ट्रगीत यावर मस्तं विनोद केलेत.