मर्यादा….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 23 November, 2015 - 06:27

मर्यादा….

सोनिया आणि अभिजीत. दोघेही एकदम हाय प्रोफाईल म्हणवणारे. एकाच कन्सट्रक्शन कंपनीत कामाला होते. ती आर्कीटेक्ट आणि तो साईट इंजिनिअर. ती ऑफिसमध्ये आणि हा जिथे बांधकाम चालू आहे त्या साईटवर असायचा. तरीही एकदा तिला काही प्लान बनवण्यासाठी, साईटचा अंदाज घेण्यासाठी साईटवर जाव लागल आणि फोनवर होत असलेल फॉलो-अप प्रत्यक्षात झाल. ती नव्यानेच जॉईन झाली होती त्यामुळे तिला बरच काही समजावण त्याला कठीण जात होत आणि हे तसं हव हे अस करता येईल हे सांगण्यात त्यांचे खटके उडत होते... पण शेवटी कुठेतरी कोणीतरी मध्यस्थी घ्यायचं आणि काम सुरळीत होऊन जायचं. पुढे ती जुनी होत गेली आणि इमारतींचे मजले चढत चढत असताना, फोल्लो अप घेत असताना भांडणाची गाडी मैत्रीकडे चालू लागली. आता मध्यस्थी करायची कोणालाही गरजच नव्हती. ते दोघ आता समजून उमजून काम करत होते. पुढे एकमेकांचे स्वभावही आवडू लागले आणि त्यातून प्रेमाची मागणीही स्वीकारली गेली… प्यार के इजहार के बाद कपल्स म्हणून जरी ते वावरत असले तरी प्रेमापेक्षा त्यांच्यात मैत्री जास्त घनिष्ठ होती. बेस्ट पेक्षा अजून काही जास्त असत तर तेही कमी पडल असत त्यांच्या दोस्तीच वर्णन करायला. गेली चार वर्षं ते नात्यात गुंफले होते.

मुंबई ह्या मायानगरीत राहणाऱ्या त्या दोघांचं घराणंहि मुला-मुलींचं स्वातंत्र्य जपणार. आई वडील उच्च शिक्षित. आधुनिक (MODERN) म्हणवून घेणारे. सोनिया तशी बिनधास्त मुलगी.. कामाच्या वेळी काम आणी ते करायला कोणी सहकार्य नाही केलं तर अगदी "तेरी मां कि.... " अशा शिव्या वगैरे देत ते काम पूर्ण करून घेणारी. शिव्या फक्त मुलांनीच द्यावात असा नियम नाहीच हेच स्पष्ट मत तीच. "ओह्ह फ** " अस बोलूनच स्वतःच मत मांडणारी, भावना प्रदर्शित करणारी आणी जसजशी मोठी होत जात होती तशीच अजून बोल्ड होत जाणारी. मिळमिळीतपणा तिच्या स्वभावातच नव्हता. झणझणीत अशीच ती होती. स्कुटी नाही; तर बुलेट नाहीतर स्पोर्ट्स कार याचीच स्वारी करणारी. करिअर आणी त्यानंतर आयुष्य मस्तीत घालवणारी सोनिया पबमध्ये बेधुंद होऊन नाचायची.. ड्रिंक्सचे ग्लास रिझ्वायची.

अभिजीत सुद्धा अगदी तसाच होता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या त्याला सोनियाच हे राहणीमान आवडायचं. अगदी त्याला शोभेल असच. " वाईफ टाइप मटेरीअल " म्हणवून घेणारी मुलगी त्याच्यासारख्या बेफिकीर स्वभावाच्या मुलाबरोबर टिकण शक्यच नव्हत. थोडक्यात त्यांच्या दोघांमध्ये तीच "बडे बाप कि औलाद " ची गुर्मी होती आणि एकाच स्टेटस चे दोघे एकमेकांना अनुरूप होते. गलेलट्ठ पगार कमवायचा स्वतःच्या पायावर ठामपणे उभे आहोत याची जाणीव म्हणूनही आणि उडव्ण्यासाठीही.

वरवरच त्यांचं हे देखण रूप एकमेकांना अनुरूप अस होतच पण त्याव्यतिरिक्त त्यांचे मनाचे धागे जुळले होते. एक जगासमोर नसलेला चेहरा जो असतो जे बंध असतात ते यांचे एकमेकांसोबत उलगडलेले होते. सोनिया कितीही डेरिंगबाज, ड्याशिंग, स्मार्ट असली तरी तिला ऑफिसमध्ये उशिरा थांबाव लागणार असेल तर अभिजितच तिथे जाण, कधी स्वतःहून तिला कॉफी बनवून देण, तिच्यासोबत थांबून तिला मदत करण आणि इतकच नव्हे तर कधी कधी एखाद्या पार्टी मध्ये फक्त तिला एन्जॉय करता याव आणि फक्त तिच्या काळजीपोटी ह्याने ड्रिंकला हातही न लावण.. हे सगळंच सोनियाला त्याच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पाडायला लावायचं. बिनधास्त अशा तिच्या स्वभावापुढे तीच हळवं मन मग माघार घ्यायचं. अभिजीतला मात्र तीच हे रूप दिसायला थोडा उशीरच झाला. त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे त्याच्या बांधकामाच्या साईटवर त्याला झालेला अपघात. अभिजीतच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता आणि अति रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. तो बेशुद्धावस्थेतच होता, दहा ते बारा दिवस सोनिया त्याच्यासोबतच होती. त्याच्या उशाशी बसून. सगळी धावपळ चालू असताना स्वतःसोबत त्याच्या घरच्यांना धीर देत होती. अभिजीत पुढे रिकव्हर झाला, पण सोनियाने त्यासाठी जे काही उपास तापास केले, कशा रात्री घालवल्या हे सगळ घरच्यानकडून ऐकताना सोनियाची नवीन खंभीर आणि हळवी हि नवी ओळख त्याला दिसली आणि अविश्वास अन अभिमान या दोन्ही भावनांनी तो नव्याने सोनियाच्या या रूपाच्याही प्रेमात पडला.

तारुण्यातील जोश, उमेद, नवीन भराऱ्या, प्रेम, मैत्री, आदर, विश्वास, अभिमान अशा कितीतरी भावना वाढत चालल्या होत्या. दोघांच्याही घरी त्यांच्या या नात्याला आक्षेप नव्हता उलट लवकरच त्यांना लग्नाच्या बेडीत बांधण्याचा त्यांचा विचार चालू होता. या दोघांना मात्र आयुष्याला या नवीन नात्यात गुंफण्यासाठी आणखीन वेळ द्यायचा होता कदाचित इतक्यात त्यांना "संसार" हि जबाबदारी पेलायची नव्हती.

त्यातच ३१ डिसेंबर ची ती बेधुंद रात्र अवतरली. त्या रात्रीच प्लानिंग आधीच ठरलं होत. ६ जण. एकंदर ३ कपल्स. त्यात हे दोघे. इतर चौघे हि असेच, यांच्याच ग्रुप मधले. त्यांचे पार्टी फ्रेंड्स. ७ वाजेपर्यंत ऑफिस, त्यानंतरची संध्याकाळ Bandstand च्या कठड्यावर धुमाकूळ घालत गप्पा मारत घालवायची, मग हलकासा डीनर आणि रात्रीच्या जागरणासाठी, नवीन वर्षाच्या मस्तीभरल्या स्वागतासाठी पब पार्टी. 31st आहे म्हटल्यावर रात्री उशीर होण साहजिकच होत त्यामुळे अभिजीत ने आधीच ड्रायव्हर ना थांबायला सांगितलं होत. दरवर्षी प्रमाणे आधी सोनियाला घरी सोडून तो त्याच्या घरी जाणार होता. पार्टी ऐन रंगात आली होती. रात्रीचे किंवा नवीन वर्षाचे सकाळचे १.३० वाजले होते. HS पब मधील म्युजिक च्या तालावर, पाय अजूनही थिरकत होते. थोडी नशा, धुंदी चढली होती.. अन अभिजीत ने सोनियाला जवळ ओढलं.. कदाचित; नव्हे, होच... इतक्या वर्षात पहिल्यांदा.. त्याच इतक जवळ येण या आधी कधीच झाल नव्हत.. सोनियाने त्याला थोड सावरायला सांगितलं. तो थांबला .. अर्धा तास गेला असेल सोबतचे चौघे पांगले होते.. नेहमीप्रमाणेच .. कुठे गेले हे अभिजीतला कळाल होत.. त्याने सोनियाला पुन्हा जवळ खेचल.. ती त्याला प्रतिसाद द्यायला लागली..पण अगदी थोड्या क्षणातच भानावर येत तिने स्वतःला सावरल, नव्हे.. आवरलं. "NO" तिने त्याला नकार दिला, "Why ? विश्वास नाही ?" त्याच्या प्रश्नावर , "मला घरी जायचंय. " एवढच म्हणाली. त्याच्या नजरेत अविश्वास होता.. "ड्रायव्हर अंकल सोबत जा. I Will go by CAB " ती निघून गेली. थोड्या वेळात तोही तिथून निघाला. नशा चढली होती कि उतरली होती माहित नाही पण दोघांच्या दिशा बदलल्या होत्या.

एक जानेवारी. ऑफिसला सुट्टी होती. दोघेही विचारात बुडालेले. तिने नकार दिला मला. ? तिचा विश्वास नाही माझ्यावर? इतक्या वर्षांच्या सोबती नंतर ? बोल्ड आहे ना ती , मग माझ्या त्या क्षणाच्या भावना का नाही कळल्या तिला? काय चूक होत नेमक त्यात? तिला जवळ करणं... एकमेकांच होण हि भावना असण चुकीच आहे? ती मैत्रीण आहेच पण प्रेम आहे हे सुद्धा स्वीकारलं आहे ना ? मग ? MODERN आहोत आम्ही .. नवीन जनरेशन.. आणि ती अशी वागवी? विश्वासच नाही तर मग नात कसलं ? अभिजीत तिची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला ते मान्य करणं कठीण जात होत. सोनियाची मनःस्तिथी काही वेगळी नव्हती. अपराधी का ठरवून घेतेय मी स्वतःला ? त्याच्यावर विश्वास नसता तर इतक्या रात्री त्याच्यासोबात तिथे असते का मी? नशेच्या धुंदीत असताना त्या क्षणांसमोर नव्हत आहारी जायचं मला , समजून घेईल का तो हे ? माझ्या बिनधास्त वागण्यामागची हि मर्यादेची मी घातलेली नियमावली तो मान्य करेल? पण समजून घेण जमतच नसेल तर मग ते नात कस टिकेल ? विचार करण्यात दिवस संपला. पुढचे दोन्ही दिवस तसेच अबोला धरण्यात गेले. दुखावले तर दोघेही होते. एकमेकांची भूमिका त्यांना पटत नव्हती आणि दोघानाही स्वतःची भूमिका योग्य नसली तरी चुकीची वाटत नव्हती. एक आठवडा उलटून गेला होता. सोनियाला कामाचं प्रेशर खूप होत . रात्री थांबण आवश्यक होत . तिला अभिजीतची खूप आठवण येत होती. त्याला एकदाही बोलावस वाटू नये हे तिला जास्त त्रास देणार होत, तरी तिने एक शेवटची संधी म्हणून त्याला मेसेज केलाच, "OVER NIGHT WORK TODAY" तो आला. त्याच येण अपेक्षित होत, पण आज तो यावा म्हणून तिने फिंगर क्रॉस ठेवले होते. नेहमीप्रमाणेच सगळ सुरळीत होत, फक्त कधी न अनुभवलेलं एक अवघडलेपण कायम होत. रात्री १०-१०.३० च्या दरम्यान तीच काम आटोपलं. "निघुयात ?" कामाशिवाय विचारलेला त्याचा पहिला प्रश्न. "थांबुयात ?" तीच प्रश्नमिश्रीत उत्तर. निदान संभाषणाला सुरुवात तरी झाली.
तो- विश्वास नसलेल्या नात्यात थांबायचं कशाला?
ती- विश्वास नसता तर आत्ता इथे तू नसतास.
तो- ओह्ह रिअली??
ती- येस.
तो- मग त्यादिवशी हा विश्वास हरवला होता का? तू मला नकार दिलास .. कळतंय तुला .. ? अपराधी फील करतोय त्या दिवसापासून. एकदम लांब गेलोय तुझ्यापासून.. आणि तू लांब केलस मला. काय चुकल होत नक्की?
ती- अभिजीत, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते.. पण एकदा मला समजून घे. मान्य आहे आपण वेस्टर्न कल्चर मध्ये वाढलो आहोत, तेच फॉलो देखील करतो आहोत.. पण खरच अशा परिस्तिथीचा विचार मी याआधी केला नव्हता आणि तू अचानक जवळ आलास तेव्हा मला खरच नाही वाटल ते सुखद क्षण मी दारूच्या धुंदीत असताना आजमावेत आणि मग नकळत ते "नो " निघाल. शेवटी, त्याक्षणाला मी स्त्रीला असलेल्या मर्यादेकडे झुकले गेले, निदान भारतात तरी; आपल्या इंडिअन कल्चरकडे वळले गेले. नकळत आजीची राजकुमारीची कथा आठवली. कितीही modern असले तरी त्यावेळेला माघार घ्यावीशी वाटली. तुझ्या भावनांचा अनादर करायचा नव्हता.. पण स्वतःशी प्रामाणिक असल्याचा अभिमान कायम ठेवायचा होता. माझ वैचारिक स्वातंत्र्य तू नेहमीच जपत आला आहेस आणि त्यामुळेच मी इतक्या निर्भीडपणे आत्ता तुझ्याशी हे सार बोलू शकतेय.. पण खरच सॉरी... बघ म्हणजे.. आपली आभा (अभिजीतची बहीण ) तीच तर लग्न ठरलय पण तरीही तू तिला जपत असतोस. मिन्स कुठे तरी तुला कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते.. प्लीज घे ना समजून.. मला माझी वर्जीनीटी (कौमार्य) गुलाबांच्या पाकळ्यांवर झोपत नवर्याच्या मिठीत गमवायला आवडेल.

सोनिया हतबल होत म्हणाली होती पण तितकीच ती तिच्या विचारांवर ठाम होती. शेवटच्या एका वाक्यात तिने तिच्या मनातल काहूर त्याच्यासमोर मांडल , आणि ते त्यानेच शांत कराव अस तिला मनोमन वाटत होत. ती रडतच वॉश्रुम मध्ये गेली. अभिजीत थांबला तर माझा.. नाहीतर.... ती बराच वेळ रडत राहिली. १०-१५ मिनिटांनी बाहेर आली. अभिजीत बाहेरच उभा होता... हातात घेतलेले टिश्यू तिच्यासमोर धरत, " नाक पूस आधी. डोळ्यांपेक्षा ते जास्त लाल झालंय". अस म्हणाला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. "बाय द वे ... लग्नानंतर तरी जवळ घेशील ना... कि तेव्हाही ...?" तो डोळे मिचकावत म्हणाला, ती हसतच म्हणाली, "तुझ्याशी कोण लग्न करणार आहे ? हुह्ह्ह ..." आणि त्याच्या मिठीत शिरली.

***********नात्यांमध्ये होकार तर हसत स्वीकारले जातात, पण जेव्हा नकार स्वीकारला जातो तेव्हा ते नात खऱ्या अर्थाने स्वीकारलं जात आणि मग ते आणखीन परिपक्व आणि मजबूत झालेलं असत.

---- मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे गोष्ट. पण..
शुद्धलेखनाकडेही लक्ष द्या. उदा. क्रोमार्य, वॉश्रुम, घरच्यानकडून, खंभीर, फोल्लो अप, उडव्ण्यासाठीही, रिझ्वायची इ.इ.

गुड ..... Happy

छान.. मस्तच लिहलय...
नात्यांमध्ये होकार तर हसत स्वीकारले जातात, पण जेव्हा नकार स्वीकारला जातो तेव्हा ते नात खऱ्या अर्थाने स्वीकारलं जात आणि मग ते आणखीन परिपक्व आणि मजबूत झालेलं असत..

मस्त Happy