Submitted by नंद्या on 12 November, 2015 - 10:03
त्याचे इन्विटेशन कसे मिळवावे ?
[ गूगलवरती माहिती मिळाली की लिहीतोच मी इथे]
पण कुणी वापरला असेल तर तुमचा अनुभव लिहा प्लीज.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://fi.google.com/about/
https://fi.google.com/about/
काहि नविन, ब्रेकथ्रु
काहि नविन, ब्रेकथ्रु टेक्नॉलॉजी वाटत नाहि. बरेचसे फिचर्स आय्फोनमध्ये ऑलरेडी (उदा: ऑटोकनेक्ट टु फस्टर सेल्लुलर टेक्नॉलॉजी, डिवायस हँडॉफ वगैरे) आहेत. सिम्कार्ड ड्रिवन टेक्नॉलॉजी असताना फक्त नेक्सस प्लॅट्फॉर्म का रेस्ट्रिक्ट केलाय ते समजलं नाहि...
राज तुमच्या पोष्टीत मराठी
राज तुमच्या पोष्टीत मराठी शब्द किती आणि इंग्रजी किती?
>>राज तुमच्या पोष्टीत मराठी
>>राज तुमच्या पोष्टीत मराठी शब्द किती आणि इंग्रजी किती?<<
आदतसे मजबुर; शिवाय आता पैलवान नाहित माबोवर मग पर्यायी शब्द कोण शोधुन देणार...
रॉहू, त्यांनी ते पर्यायी
रॉहू, त्यांनी ते पर्यायी मराठी शब्दांत लिहीले असते तर तुम्हीच "हे कोणी नॉर्मल मराठीत समजावेल का" म्हंटले असते
माझा इथला रूममेट वापरतो
माझा इथला रूममेट वापरतो प्रोजेक्ट फाय. सुरुवातीला नेक्सस वर ते टेस्टिंग करत आहेत आणि लवकरच इतर फोन्सना पण उपलब्ध होईल सुविधा. इतर नेटवर्कच्या मानाने हिचे दर वाजवी आहेत आणि नेटवर्क कव्हरेजही तसे बरे आहे (किमान आयोवात तरी त्याला काही अडचण आलेली नाही. फुल्ल रेंज!) हिचा मुख्य फायदा रोमिंगला आहे. T-mobile असल्याने वायफाय थ्रू पण नेटवर्क अॅक्सेस करता येते आणि गूगल इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर पण करार करत आहे त्यामुळे जेव्हा ही सुविधा संपूर्णपणे अस्तित्त्वात येईल तेव्हा इंटरनॅशनल रोमिंग ही संकल्पना पुसली जाऊ शकेल (जगभर एकच नंबर). किमान गूगलचे ध्येय असे असावे असे त्यांच्या विविध टॉक्स, ब्लॉग्ज वरून वाटते.
इन्विटेशन - जर वनप्लस वन/टू/एक्स चे इन्विटेशन मिळवायचा अनुभव असेल तर प्रोसेस अगदी सारखी आहे. वेटलिस्ट वर नाव नोंदवा. त्यांचे फोरम चेक करत रहा, अनेकदा ऑफर्स असतात. विविध फेसबुक पेजेस वर अनेकदा शेअरेबल इन्व्हाईट्स वाटले जातात. थोडक्यात इथे 'संधिसाधू' (:स्मित:) असणे गरजेचे आहे.
सिंडरेला, पायस धन्यवाद
सिंडरेला, पायस धन्यवाद !
वापरून बघतो सुविधा.
हूडकाका विषयाला सोडून असलेल्या पोश्टी टाकून काड्या घालायची सवय सोडा
>>तेव्हा इंटरनॅशनल रोमिंग ही
>>तेव्हा इंटरनॅशनल रोमिंग ही संकल्पना पुसली जाऊ शकेल (जगभर एकच नंबर). किमान गूगलचे ध्येय असे असावे असे त्यांच्या विविध टॉक्स, ब्लॉग्ज वरून वाटते.<<
वाय-फाय कॉलिंग हि सुविधा अमेरिकेत अस्तित्वात आहे. या भारत भेटीत चालते कि नाहि हे बघ्ण्यात येइल...
वाय-फाय कॉलिंग हि सुविधा
वाय-फाय कॉलिंग हि सुविधा अमेरिकेत अस्तित्वात आहे. या भारत भेटीत चालते कि नाहि हे बघ्ण्यात येइल... >> हो पण गूगल इतर कंपन्यांचे नेटवर्क पण वापरेल सो वाय-फाय शिवाय पण फोन वापरता येईल - (सेम दरात) - ही गोष्ट नवीन आहे. बघूयात वर्षानंतरच नक्की येईल कि प्रोजेक्ट फाय अजून काय काय सुविधा उपलब्ध करते.
मी वापरायला सुरूवात केली आहे.
मी वापरायला सुरूवात केली आहे. काही दिवसांनी लिहीन इथे परत.