मान्यवर मायबोली प्रशासक,
सप्रेम नमस्कार,
गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.
एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.
मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.
वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....
ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!
एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?
ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!
मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.
राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!
मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!
या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.
मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"
अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.
मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.
आपली नम्र
वैष्णवी धारप
अहो रॉबिनहूड, मायबोलीमुळे
अहो रॉबिनहूड, मायबोलीमुळे जेव्हढा त्रास होतो त्याच्याहून जास्त त्रास जगात नाहीये का?
तुम्ही अजूनहि माझे ऐका. सकाळी उठून गणपतीचे स्मरण करण्या ऐवजी श्री. मोतीलाल यांचे सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याजोगे शब्द आठवा - जिंदगीईईई ख्वाब है......... वगैरे.
म्हणजे काय होईल, जगातल्या कुठल्याहि गोष्टीचा त्रास होणार नाही. मग नोकरी धंदा, जे जमेल ते करून जमेल तेव्हढा पैसा जमवा. म्हणजे मुकाट्याने शांत बसून माझ्या सारखे एम बी ए करता येईल.
मग समजेल - जगात चांगले वाईट चूक बरोबर काही नाही.
म्हणजे मग सगळीकडे नुसती मौज्जा हि मौज्जा! जमले तर नाचा पण! नाहीतर इथे येऊन लेखननृत्य करा!
मग मायबोलीवर येणे बंद करायला नको, तसेहि थोडा वेळ इथे घालवला तर काही वेगळीच मजा असते इथे.
खरे तर हे सगळ्यांनीच समजून घ्यावे, पण इतरांना ते इतक्यात कळणार नाही. म्हणून फक्त तुम्हालाच सांगतो.
त्या देवपूरकरांनीच काय घोडं
त्या देवपूरकरांनीच काय घोडं मारलं होतं ? त्यांनाही असंच सांभाळून घेता आलं असतं की
काही गायिका नाही का नवीन
काही गायिका नाही का नवीन गायिकांना पळवून लावत असत स्पर्धा नको म्हणून.
बोवाजी अरे हो तुम्ही यम बी ए
बोवाजी अरे हो तुम्ही यम बी ए करत होतात त्याचे काय झाले?
जी मंडळी ह्या पत्रातला हेतू
जी मंडळी ह्या पत्रातला हेतू महत्वाचा आहे, पत्र कुणी लिहिलंय हे महत्वाचं नाही हे सुचवतायत त्यांच्याकडेही काही उपाय दिसत नाहीत इथल्या प्रॉब्लेम्सवर. >>> सायो, प्रीमॅच्यूअर विधान.
आता पर्यंत आपण मुळात मुद्याकडे लक्ष द्यायचं की एका स्पेसीफीक आयडीनी लिहिलंय म्हणून त्यातले मुद्देच नाकारायचे - ह्यावर चर्चा करत होतो. आता निदान ' मायबोलीवर वातावरण चांगलं नाही' हे प्रॉब्लेम स्टेटमेंट तरी अॅक्सेप्ट झालंय इथे.
(अजूनही ह्या बीबी वरच्या ८०% पोस्टस 'आयडी' मधे अडकल्या आहेत, पत्रातल्या मुद्द्याकडे नाही)
आता उपायांवर चर्चा करण्यात अर्थ आहे ना?
वैयक्तीक पातळीवरचे उपाय :
१) आपण स्वतः काय लिहितो, कोणत्या भाषेत लिहितो, मुद्याबद्दल लिहितो आहे की आयडी बॅशींग करतो आहोत भावनेच्या उद्रेकाच्या भरात याचा प्रत्येकाने विचार करणे.
२) जे राजकीय, सामाजिक विषय चर्चेला असतात ते आता केवळ 'वाफ दवडून सोडून द्या' अशी सामाजिक स्थिती राहिली नाहीये. किमान सुशिक्षित लोकांनी तरी विचार करून मत मांडणं आवश्यक आहे. कारण जग मोठ्या स्थिंत्यंतरातून जात आहे , राजकीय, सामाजिक, आर्थिक, सगळ्याच लेव्हलला हे भान ठेवून मत व्यक्त करावं
३) मतभेद असणार. कारण आपण सगळे वेगवेगळ्या बॅगग्रांऊंड मधून आलो आहोत. आणि मतभेदाशिवाय चर्चेला अर्थही नाही. पण मुद्द्याला धरून वाद घालायला शिकण्याची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणून या चर्चांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. आयडी विरुद्ध वाद घालून काय साध्य होणार? काय नवीन विचार मंथन होणार?
४) तातडीनं पोस्ट लिहिण्याह्ची, प्रतिक्रीया देण्याची गरज नाही. कॉर्पोरेट मधे सांगतात ना - की निगेटीव्ह मेसेज असलेली मेल लिहित असाल चिडुन तर लिहा, पण लगेच सेंन्ड करू नका.
इथे देखील हा उपाय करून पहायला हवा प्रत्येकाने. त्या 'मोमेंटला त्रागा, चिडचिड , फस्ट्रेशन' लिहिण्यात येतं, पण थोड्या काळाने त्यावर नीट विचार केला जातो.
५) प्रत्येक विषयावर प्रत्येकाने मत देण्याचे गरज नसते
६) जर लोक चर्चा करत असतील, तर त्यांची त्यांनी ती करूदेत. तुम्हाला ईंटरेस्ट नसेल, त्रास होत असेल तर वाचायला, सल्ले द्यायला आणी काड्या घालून मजा बघायला जाऊ नका. इतका संयम वैयक्यीक पातळीवर आपण सगळ्यांनीच दाखवला तर कदाचित घडतीलही बदल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
टीप : 'आत्मपरीक्षणाबद्दल' हा कितीही चेष्टेचा विषय असला किंवा झाला, तरी काल अमितव या आयडीने काही क्षणासाठी केलेले आत्मपरीक्षण नक्कीच स्वागतार्ह आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सांघिक पातळीवर
तुम्हाला खरंच दुसर्याची (मग तो तुमचा कितीही जवळचा मित्र, नातेवाईक असला तरीही) मत पटताहेत का? यावर विचार.
उगाच मूळ लेख/मुद्दा न वाचता ' वरच्या प्रतिसदाला प्रतिसाद' (हो -ला हो, किंवा नाही-ला नाही) देणं कमी करू शकतो.
प्रशासकीय पातळीवर
१) जे धागे हाताबाहेर जाताहेत, जिथे मुद्यावर चर्चा न होता आयडींवर होतीये ते तात्काल वाहते करणे. लोकं व्हेंट आऊट करणार. ते लगेच कमी होणं , बंद होणं शक्य नाही. पण ते सेव्ह करून ठेवायची गरजच नाहीये.
उगाच दोन दिवसांनी तो धागा पाहणार्या लोकांना त्यावरची असली चर्चेला सोडून लिहिलेली मत कळायची काहीही गरज नाहीये.
२) वैयक्तीक पातळीवर संयम दाखवला तर कमी मॉडरेशनची गरज पडेल. पण तरीही माझ्यासकट अनेक लोक नक्कीच व्हॉलेंटीयर करायला तयार होतील , मॉडरेट मॉडरेशन करायची वेळ आलीच तर.
पण उपाय न करता दुर्लक्ष करणं हा नक्कीच उपाय नाही.
असो. फार मोठं पोस्ट झालंय. त्याबद्दल क्षमस्व.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे उपाय लोक किती इंप्लीमेंट करतील हा वेगळा मुद्दा आहे. पण 'पत्रातला हेतू कळणार्या लोकांकडे त्यावर उपाय नसावेतच' हे assumption अजिबातच योग्य वाटलं नाही. म्हणून हा लेखनप्रपंच
<<<< मायबोलीवरील सर्वात उबग
<<<< मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले..........सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं! >>>>
उगी, उगी. जाऊ दे हो त्यांना.
हिरे, सोने शोधायला जायचे तर आधी भरपूर माती, कधी कधी खूप घाण माती पण अंगाला लागतेच, मग कुणि तक्रार करतात का? उगाच माती किती घाण होती हे सांगत सुटतात का? ती घाण माती बाहेर आणून इतरांना दा़खवत बसतात का?
की हिरे, सोने दाखवतात?
आता तुम्हाला संधि मिळाली आहे तर काही हिरे, सोने दाखवा. घाण आम्ही सगळेच सहन करतो आहोत, त्यात कळत नकळत भर टाकतोच आहे, म्हणजे तुमच्यासारखे संशोधक त्यातून काहीतरी चांगले बाहेर काढतील.
प्रयत्न करत रहा - काही चांगले दिसेल तिकडे जास्त लक्ष द्या. तुम्हाला यश लाभेल, नाव होईल नि पैसे पण मिळतील.
बोवाजी अरे हो तुम्ही यम बी ए
बोवाजी अरे हो तुम्ही यम बी ए करत होतात त्याचे काय झाले?
झाले? अहो एम बी ए करून काही होत नसतं करायचे असते काही तर एम बी ए कशाला करायचे?
रार +१
रार +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रार यांचे अनेक मुद्दे
रार यांचे अनेक मुद्दे सर्वकालीन सत्य असल्याने ते न पटण्याचा प्रश्नच नाही.
छोटा राजनने भारतात येऊन अहिंसेवर व्याख्यान द्यायला सुरूवात केली तर त्या सभेला "विचार" ऐकायला इथले किती जातील हा मुद्दा नाही का ?
बोले तैसा चाले...
(No subject)
>>आता निदान ' मायबोलीवर
>>आता निदान ' मायबोलीवर वातावरण चांगलं नाही' हे प्रॉब्लेम स्टेटमेंट तरी अॅक्सेप्ट झालंय इथे.>> हे दोन पानं मागेच म्हटलंय की वातावरण खराब झालंय हे अॅक्सेप्ट केलंय म्हणून. तू वाचलं नसावंसं बहुतेक.
रार छान पोस्ट .
रार छान पोस्ट .
चला काहि "सेन" उपाय यायला
चला काहि "सेन" उपाय यायला लागले आहेत.
माझ्याकडुन एक - एखादा आय्डी हाताबाहेर जाउ लागला तर त्याचे राय्टिंग प्रिविलेजेस काढुन टाकावे किंवा एक-दोनदा समज देउन गोठवावे. ड्रुपल मधे अशी सोय असावी...
रार, उत्तम मुद्देसूद पोस्ट.
रार, उत्तम मुद्देसूद पोस्ट. उपायांची लिस्ट आवडली.
ओके. वर सुनियाद यांनी धुणी
ओके.
वर सुनियाद यांनी धुणी धुण्याचा फोटो टाकलाच आहे, तर -
मी इथे (या स्पेसिफिक धाग्यावर. इन्स्पेक्टरवाला धागा आठवत असेल काहिंना. नसेल तर असोच.) काही आयडींना (नपेक्षा त्यापाठील व्यक्तींना) बॅश करणारच.
त्यात
असो.
१. बेफ़िकीर उर्फ मानभावी खोटारडे. ताऽरीफ करूँ क्या उसकी..... असो.
२. मंदार_जोशी उर्फ सध्याचे बाळाजीपंत की काय ते. "मायबोलीपेक्षा माझा स्वाभिमान" व "पुन्हा येणार नाही" इ. गर्जनांसह त्यानंतर अनेकदा ब्यान झालेले तेच ते. (हे, मी सध्या कुठे बसलोय ते तुम्हाला ठाऊक नाही, पुढील परिणामांना तयार रहा इ. अनेकानेक धमक्या देत असतात. जे सायबरस्टॉकिंगखाली भारतातही दखलपात्र आहे. अजूनही चामडि बचावून आहेत.)
३. "संतुलित, तटस्थ, समतोल" कट्टेकर महेश.
४. चोर्टाकस / प्रसाद. व..
५. इथून तिथून ब्रिगेड अन शेंडी खेचून आणणारे लिंबूराम.
हे प्रामुख्याने येतात. इतरही आहेत, ज्यांच्या उल्लेखाने यांना महत्व देण्यात प्वाइंट नाही.
मी एकट्यानेच यांना "वैयक्तिक" बोलायचे नाही. या सर्वांनी मात्र मला आडून/घालून-पाडून, अश्लाघ्य बोलायचे, हे लायसन मी यांना दिलेले नाही. तेव्हा, इथेच, अत्ताच, परतफेड होणारच.
यानंतर, काही दुर्दैवी "बावळट" इथे आहेत. ज्यांचा नेक्स्ट "चेतन गुगळे" करण्याचे काम स्पेसिफिकली मंदार जोशी व बेफिकीर हे दोन लोक रियलटाईममधे करीत असतात, हे नमूद करू इच्छितो. ही दोन व्यक्तीमत्वे, इतर काहीच कामधंदे नसल्याप्रमाणे इथे व्हेंडेटा चालवीत असतात, व ऑफलाईनही लोकांना सायबरसेलात जायला उद्युक्त वगैरे करीत असतात.
यांच्या निर्लज्जपणालाच बळी पडून मी माझी ओरिजिनल आयडी गमावून बसलो आहे. फक्त, त्यासोबत यांच्यापैकी बेफिकीर यांच्या मुर्दाड डुप्लिकेट आयड्यांनाही लगाम बसला आहे, हे समाधान आहे. मंदार_जोशी हे त्यांच्या कर्मानेच अनेकानेकदा आयाड्या गमावत असतात, त्यांचेबद्दल बोलून उपयोग नाही.
या माझ्या धुतलेल्या धुण्याकडे लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद!
रार +१.
रार +१.
असो. पुन्हा एकदा, सार्वजनिक
असो.
पुन्हा एकदा, सार्वजनिक धाग्यांवरून मी लिहिणे बंद.
शुभरात्री!
रार. मला पत्रातला हेतू
मला पत्रातला हेतू कळणार्या लोकांकडे त्यावर उपाय असावेतच हा आग्रह अजिबातच योग्य वाटला नाही. दुसर्याला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त किंवा वेगळ समजल आहे ह्याचा अर्थ असा नाही की दुसर्यावर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा लोड टाकावा. प्रश्न आहे हे मान्य असेल तर आपल्यापरीने उपाय सुचवावा. नसेल माहिती उपाय तर दुसर्याला बोलायला कंफर्टेबल वाटेल, वेळ होईल तेव्हा तो/ती/ते उपाय सांगेपर्यंत चप बसावं. दुसर्याकडच्या उपायांची पंचाईत करण्यामागचा उद्देश मला समजणे कठीण आहे.
>>पुन्हा एकदा, सार्वजनिक
>>पुन्हा एकदा, सार्वजनिक धाग्यांवरून मी लिहिणे बंद.<<
लिहिणे बंद नका करु, प्रक्षोभकारी लिहिताना जरा हात आ़खडता घ्या. आणि हे फक्त तुम्हाला नाहि, सगळ्या पंत, संत, बाई, बुवा यांना लागु आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राज, (फक्त तुमच्यासाठी
राज, (फक्त तुमच्यासाठी रिटायरमेंटातून बाहेर)
"एका गालात मारली तर दुसरा पुढे करावा" याच तत्वात, समोरच्याने निर्लज्जपणा केला, तर आपणही एक्झॅक्टली तितकाच उलट करावा, हे येऊ शकते काय?
- गांधीजींच्या विचारांचा नम्र पाईक (मी)
***
पुन्हा एकदा, हेमाशे वगैरे...
सायो, वाचलं नीट. पण तसं
सायो, वाचलं नीट. पण तसं असूनही बहुतांशी पोस्टी आयडीबद्दलच येत होत्या हे सत्य देखील नाकारता येत नाहीच नाही.
इथेच ह्याच धाग्यावर ते उघड झालंय, परत एकदा.
आणि होऊ देत की टप्याटप्याने सविस्तर चर्चा. प्रॉब्लेम, उपाय, अंमलबजावणी सगळं एकाच पोस्टमधे लिहायला हवं असं नाहीच ना. याचा अर्थ 'उपाय नसावेतच' असं जे गृहीत धरलं गेलं ते योग्य वाटलं नाही इतकंच.
संपादक मंडळ वाढवा. लाइव्ह
संपादक मंडळ वाढवा. लाइव्ह सदस्य संखेच्या प्रमाणात संपादक हवेत, तर ते कंट्रोल करू शकतील. रोटेशन बेसिसवरही संपादक नेमता येतील.
रार, तुझी पोस्ट एखाद्या
रार, तुझी पोस्ट एखाद्या निबंधासारखी आहे. मुद्देसूद वगैरे ! ही परीक्षा असती तर तुला मार्क पण मिळाले असते
पण.... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मूळ प्रॉब्लेम ला ते मुद्दे हे उत्तरच नाही दुर्दैवाने ! कारण हे विचार करणारे , आत्मपरीक्षण करण्याची किमान शक्यता असलेले आयडीज हे या समस्येच्या मुळाशी नाहीच आहेत!
समस्येचे कारण असलेले ठराविक ट्रोलिंग करणारे आयडीज जे अनेक वेळा मरून पुन्हा जिवंत झालेत अन जे लाथाळ्या करण्यासाठीच पुन्हा पुन्हा नव्या नावाने येतात ते हे मुद्दे १ ते ६ ला किंमत देतील किंवा आत्मपरीक्षण वगैरे करतील ही अपेक्षा भाबडी म्हणावी लागेल .
बरेच सेन्सिबल आयडीज नं ६ ऑलरेडी फॉलो करतात म्हणूनच जात नाहीत ठराविक बाफ वर. पण त्यानेही मूळ प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीच. त्यावर कसलाही उपाय नाहीये दुर्दैवाने असंच चित्र दिसतेय.
आता नुसतं पेपरात लिहायचं वय
आता नुसतं पेपरात लिहायचं वय गेलंय, किंवा भाषणं करून वाद स्पर्धा गाजवायचंही, मैत्रेयी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता ज्या गोष्टी तुम्हाला पटतात आणि ज्या तुम्ही करू शकता / जसे तुम्ही वागू शकता स्वतःच्या आयुष्यात - त्याबद्दलच मी लिह्तीये, आणि बोलतीये. आणि 'गिव्ह अप करणं' हा उपाय नाही हे नक्की.
साधी गोष्ट आहे, लोक जर 'प्रयोग म्हणून आयडी घेऊन लिहीत असतील आणी अॅनालिसीस करत असतील', तर आपणही ' आयडीपाशी न अडकता मूळ मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?'
जास्तीत जास्त काय होईल, उपाय फेल जाईल. पण कदाचित त्या प्रोसेस मधून नवीन काही उपाय सुचतील.
आता निदान ' मायबोलीवर वातावरण
आता निदान ' मायबोलीवर वातावरण चांगलं नाही' हे प्रॉब्लेम स्टेटमेंट तरी अॅक्सेप्ट झालंय इथे.>>>>>>>> काही आयडींनी इथे येऊन तसं लिहिलय येवढच. नक्की कोणी आणि किती आयडींनी तसं म्हंटलं म्हणजे ती वस्तुस्थिती आहे असं समजायला पाहिजे? एकंदरितच "मायबोलीवरचं वातावरण चांगलं नाही" ह्याची पुंगी वाजवणार्यांनी आधी त्यांच्या हाय हॉर्स/उच्चासनावरुन खाली यावं. तुम्ही जेव्हा कोणी कसं वागायला पाहिजे ह्याचे एक ते ज्ञ मुद्दे लिहिता तेव्हा तुम्ही स्वत:लाच कसं जास्त कळतं ह्याच्यामध्ये घुसत आहात हे कृपया विसरु नये.
कोण कसे वागतात, काय बोलतात अन बरोबर काय हे सांगणारे तुम्ही कोण? जे मुद्दे तुम्ही मांडले आहेत त्यातली एक सुद्धा गोष्ट तुमच्याकडून किंवा तुम्ही ज्या बाफं/सर्कल मध्ये वावरता त्यात झालेली नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तो शुद्ध अंधळेपणा आहे. इथेच तर प्राबलेम आहे. काही आयडी त्यांना काही विषय जिव्हाळ्याचे आहेत म्हणून वाहवत जातात आणि पुढे दंगा करतात म्हणून ते वाईट पण दुसर्या बाजूनी त्यांना आपल्या उच्चासनावर बसून "जज" करणारे चांगले कसे काय?
म्हणूनच मला रॉहु, झक्की ह्यांच्या पोस्टी पटतात, दे नेवर क्लेम दे नो समथिंग. इथे येतात, त्यांना आवडतं त्या बाफं वर लिहितात, जिथे नाही जमत आपलं असं वाटतं तिथे जात नाहीत. ह्या नसत्या आपल्या स्वतःची वागणूक सुधारणे ह्या पलिकडे कशामध्येच तथ्य नसलेल्या सिमींगली नोबल पण एकदम येडछाप अश्या सुधारणा वगैरे करायच्या भानगडीत ते पडत नाहीत. पडत नाहीत म्हण्ण्यापेक्षा तसं करणं हे गरजेचं नाहीये हे त्यांना चांगलं माहित आहे. We all could learn from them!
>>गांधीजींच्या विचारांचा नम्र
>>गांधीजींच्या विचारांचा नम्र पाईक (मी) <<
अरे व्वा, मग तर अगदिच सोपं काम. गांधीजींच्याच "बी द चेंज यु वांट टु सी इन द वर्ल्ड" हि उक्ती आत्मसात करुया...
मायबोलीवर दंगा चालू झालाय
मायबोलीवर दंगा चालू झालाय तेव्हढ्यात आपण ड्रेस कोड बदलून घेऊयात का ?
भारी ड्रेस आहे बदलायचा विचार
भारी ड्रेस आहे बदलायचा विचार कशाला करतायत.?
बुवा, वरची पोस्ट नीट वाचा.
बुवा, वरची पोस्ट नीट वाचा. वाद होणारच. मत मांडली जाणाराच आणि ती जायलाच हवीत.
पण धार मताला असावी, त्यानी दुसर्याची मतं खोडली/कापली जावीत.
शब्दांमुळे दुसर्या आयडींना कापण्यात किंवा त्यांना वैयक्तीक जखमा करण्यात ती धार का वापरायची?
आणि तुम्ही कोणाला तुमचं रोल मॉडेल म्हणायचं आणि कोणाकडून काय शिकायचं हा तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे.
हे प्रत्येकानं आपापलं ठरवावं.
वैष्णवी धारप या रोल मॉडेल
वैष्णवी धारप या रोल मॉडेल असाव्यात. सहमत.
Pages