Submitted by limbutimbu on 31 October, 2015 - 00:14
घोडा /घोडी विकत घेणे मनास येते आहे....
कोणकोणत्या जातीचे घोडे उपलब्ध असतात?
कुठे मिळतील? किती किंमतीपर्यंत?
रेसचे रिटायर्ड घोडे कसे मिळवायचे?
घोड्यांचे खाणे /खुराक काय असतो?
क्रुपया घोड्यांच्या पालनाविषयी माहिती हवी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सारंगखेडा जि.धुळे. घोडे लाखात
सारंगखेडा जि.धुळे. घोडे लाखात जातात. रेसच्या रिटायर्ड घोड्यांचा रायडिंग साठी उपयोग नसतो. घोडे साधारणतः चितळ्यांची बाकरवडी, काकांची बालुशाही, दुर्वांकुरचा आमरस, एस्पी ची बिर्याणी, तिरंग्याचे मटण, ब्रोकोळीची, झुकिनीची शुद्ध तुपातली भाजी खातात !
कय पण येडगळ प्रश्न:
हूडा, तुला माहित नाही तर तसे
हूडा, तुला माहित नाही तर तसे सांग ना..... तुझ्या आवडीचे पदार्थ घोड्याच्या नावावर का खपवतो आहेस?
अन मी गाय, घोडा, शेळीमेंढी, ससे इत्यादी पाळण्याबाबत गंभिरपणे विचार करतो:फिदी::)
लिंबुजी, विषयाबद्दल काही
लिंबुजी, विषयाबद्दल काही माहिती नाही पण..
चांदा हे पुस्तक वाचलं की काय एवढ्यात?
ते वाचून माझीही इच्छा झाली होती घोडा पाळण्याची.
लिंबुभाऊ , आमचा घोड्या पाळून
लिंबुभाऊ , आमचा घोड्या पाळून लग्नाकार्याला मिरवणूकीत भाड्याने द्यायचा साईड बिझनेस आहे.
पाच घोड्या आहेत.
सीझन नसेल तेव्हा इथल्या तीन गार्डन्सच्याबाहेर मुलांना राऊंड मारायला ठेवतो, तीन घोड्या नुसत्याच एका जोडीची बग्गी आहे.
तर तुम्हाला नेमकी काय माहिती हव्येय ती मला लिहिता येईल.
फक्तं खालील मुद्द्यांची माहिती द्या.
- किती घोडे घ्यायचेत
-घोडे की घोड्या
- त्यांच्याकडून काय काम अपेक्षित आहे?
- किती पैसे, मॅनपॉवर इन्वेस्ट करायची तयारी आहे?
- कुठे ठेवणार आहात? बिल्डींग खालच्या मोकळ्या जागेत/ बेडरूममध्ये/ गॅलरीत?
- शाकाहारी घोडेच हवेत की मांसाहारीपण चालतील?
- घोड्यांच्या हगुमुतूच्या विल्हेवाटीची काय व्यवस्था लावणार?
शाकाहारी घोडेच हवेत की
शाकाहारी घोडेच हवेत की मांसाहारीपण चालतील? >>
अरे वा, शेळ्यामेंढ्यापण
अरे वा, शेळ्यामेंढ्यापण आवडतात का पाळायला?
मग माझ्या सख्ख्या नातेवाईकांचा प्लान्ट आहे शेळीपालनाचा.
कर्नाटक गव्हर्नमेंटची स्कीम होती त्या थ्रू आहे.
तिथनं माहिती मिळवून देवू शकेन.
पण महाराष्ट्रात ती स्कीम नसणार.
तरिही डबल पैसे इन्वेस्ट करून तुम्ही लिंबीवहिनींच्या शेतात शेळ्यामेंढ्या किंवा इमूपालनाचा प्लान्ट नक्की बनवू शकता.
नाहीतरी शाकाहारी/ जैन लोकांनी मांसौत्पादनाचा व्यवसाय करायची आपल्या देशाची थोर परंपरा आहेच.
(आमचे ते नातेवाईकही कट्टर शाकाहारी आहेत, इतकेच नव्हे ते मांसाहारी भाडेकरूही ठेवत नाहीत.)
मानव, पुस्तक नाही वाचलेले. पण
मानव, पुस्तक नाही वाचलेले. पण बाबासाहेब पुरंदरेंची पागा होती पर्वती खाली, तेव्हा लहानपणापासुनचे आकर्षण आहे.
साती.. ग्रेट.... काखेत कळसा अन गावाला वळसा अस झाल की...
अहो, येत्या दोन वर्शात मी बहुतेक रिटायरमेंट घेईन. त्यानंतर लिंबीच्या शेतावरच जाऊन रहायचा बेत करतो आहे. तर त्या बेतास अनुसरुन, गाय-वासरु /बैल, घोडा इत्यादि जित्राब/जनावरे पाळण्याबाबत माहिती गोळा करतो आहे. गायीम्हशींकरता घरचा चारा उपलब्ध होईल. घोड्याचे तसे नाही. तो केवळ दारी "अश्व" असावा म्हणूनच हवा आहे. (गज ही घेतला असता, पण माझी तितकी क्षमता नाही)
आता पासुन माहिती काढली, तर आर्थिक तजवीज, तबेला/गोठा इत्यादि बाबी जुळविता येतिल. गावाकडे मोप जागा आहे.
माझ्या लग्नात मला हुंडा म्हणुन कबुल केलेले "गाय-वासरु" (सवत्सधेनू) सासुरवाडीहून मिळणे अजुन बाकी आहे. ते देखिल सांभाळायचे आहे.
अर्थात हौस म्हणून. तर याबाबींचा अंदाज आला, तर बेत तडीस न्यावा की नाही ते ठरविता येईल.
हरे राम राम राम राम ! काय कड़क
हरे राम राम राम राम ! काय कड़क प्रश्न पडतात माबोकरांना अस वाटल धाग्याच नाव वाचून.
बंगलोरला मल्ल्याच रेसकोर्स आहे काहितरी, त्यांना विचारा
आजकाल हे प्राणी चोरीला जातात
आजकाल हे प्राणी चोरीला जातात म्हणे बरका, म्हणजे विचार करताना त्यांच्या साठी सुरक्षा रक्षक ठेवावा लागेल का या बाबीचा विचार करावा असे मला वाटते. (सिरियस्ली)
केवळ दारी "अश्व" असावा
केवळ दारी "अश्व" असावा म्हणूनच हवा आहे. (गज ही घेतला असता, पण माझी तितकी क्षमता नाही) > --^-- .
मला हुंडा म्हणुन कबुल केलेले >:अओ:
>>>>> मला हुंडा म्हणुन कबुल
>>>>> मला हुंडा म्हणुन कबुल केलेले >अ ओ, आता काय करायचं अरेरे <<<<<<
अहो हल्ली त्यास वरदक्षिणा म्हणतात पंचवीस वर्षांपूर्वी हुंडाच म्हणायचे....
आणि हल्ली नै का? लोकांना टूव्हिलर/फोर व्हिलर दारी झुलायला हव्या असे वाटत? ब्यान्का देखिल ४% ते ८% पर्यंत इतक्याच व्याजदरात कर्जही पुरवतात फोरव्हिलर दारात झुलवायला... जेव्हा कि शैक्षणीक कर्ज १६% ने असते.
आता लोखंडी, पेट्रोल डिझेल पिणारी फोरव्हिलर जनावरे दारी झुलवायची स्वप्ने लोक बघतात/बघु शकतात व अर्थव्यवस्थेच्या भरभराटीच्या नावाखाली त्यास सरकारी/महसुली/ब्यान्किंग यन्त्रणा सपोर्टही करतात... तर मजसारख्या सामान्याने निदान गेला बाजार घोडा/घोडी दारी झुलवावयाची स्वप्ने का बघु नयेत म्हणतो की मी !
माझी मैत्रीन रायडिंग इन्स्त
माझी मैत्रीन रायडिंग इन्स्त क्टर आहे. तिला विचारून सांगते. काही परमि ट वगिअरे पण लागत असणार. चारा पाणी, व्हेट वगैरे खर्चिक काम आहे. बट हॉर्सेस आर द बेस्ट फार जीव लाव्णा रा हुशार प्राणी आहे. सा इड ला कोंबडया पाळून त्या इनकम मधून घोड्याचा खर्च निघेल.
शेळी पालनाचे इथे पण आहे. गौरी देशपांडेंच्या भगिनी जाई निंबकर ह्यांचा पूर्वी फार्म होता शेळ्यांचा. विंचूर्णीचे धडे मध्ये आहे तसे.
साइकिलसे तो घोडाइच अच्चा.
प्रकु, संरक्षणाचा मुद्दा
प्रकु, संरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे, चोरीला जाणे वगैरे..... पण कायेना, तुम्ही काय व कसे पाळता आहात यावरही बरेच अवलंबुन आहे, जसे की लग्नात वरातीत वगैरे वापरले जाणारे जनावर असेल, तर त्यास अनोळखी माणसांचीही सवय होऊन, चोर आला तरी एखादा नवरदेवच आलाय असे समजुन बिनदिक्कत त्याचेबरोबर जाइल, पण तेच जर थोडे "माणुसघाणेच" बनविले (मी घोड्यास अगदी पेठेत नाही तरी "पुण्यातच" पाळणारे... बनेल आपोआपच आमच्या संगतीत राहुन ), जसे ते कुत्र्यांनाही बनवतात, तर मात्र चोराची काही खैर नाही, घोड्याची लाथ हा जबरी प्रकार असतो, पेकाट वा जिथे लाथ बसली तिथले हाडुक मोडलेच पाहिजे काट्टकिनी !
कुत्रा आहे का घरी ? मला फार
कुत्रा आहे का घरी ? मला फार आवडत कुत्रा पाळायला. दुसरा मजला आहे ना पण.
साठीनंतर गावी गेले रहायला की निदान कुत्रा तरी पाळणारच.. घोडा झेपणार नाही.. छोटे शिंगरू लहानाचे मोठे केले की जमेल म्हणा.
अजून कोणते प्राणी पाळू शकतो सरळपणे. मांजर नको पण अजिबात.
लिंबुभाऊ घोडे
लिंबुभाऊ घोडे खरेदी/पहाण्यासाठी कधीतरी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला भेट द्या तिथली 'अकलूज कृषी बाजार उत्पन्न समिती' दरवर्षी घोडेबाजार भरवते, कमीतकमी किंमती पासून अतिशय जातिवंत व महागडे घोडे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील.तिथेच तुम्हाला घोड्याचा आहार व इतर माहीती अगदि सविस्तर मिळेल. किंमत पहा आणि तुम्ही ठरवा घोडा बाळगायचा की नाही.
यावर्षीच्या घोडेबाजारातील काही क्षणचित्रे इथे पहा.
अगदीच हौस असेल तर एखाद भीमथड़ी
अगदीच हौस असेल तर एखाद भीमथड़ी तट्ट पहा आपल्याकडल्या वातावरणात तेच नीट टिकेल! शिवाय ह्या तट्टाचा पुर्वज अटकेपरेंत गेलता ही मिजास करुन मिश्याना (असल्यास) कोकम अन तूप समप्रमाणात मिसळून लावण्याची साइड हौस बी भागेल
ओके विजय, आमचे व्याही
ओके विजय, आमचे व्याही लातुर/मराठवाड्यातील असल्याने त्यांचेकडुन माहिती घेतोच आहे. अकलुजचा बाजारही वेळात वेळ काढून पाहुन येईन.
अनघा, लिंबीला अज्जिबात आवडत नाहीत कोणतेही कुत्रीमांजरे/प्राणि वगैरे पाळलेले.. [मीच कसा काय आवडतो काय की... ]
पण जागा असेल ना गावाकडे, तर जरुर पाळाच. लाखालाखाच्या गाड्यांवर अन इंधनावर वारेमाप पैसे उधळण्यापेक्षा मला प्राणि पाळायला आवडेल.
नाना स्कॉच, माझाही बेत काहीसा
नाना स्कॉच, माझाही बेत काहीसा तसाच आहे.
मीच कसा काय आवडतो काय की...
मीच कसा काय आवडतो काय की... फिदीफिदी ]
>>> अहो पदरात पडलं अन पवित्र झालं . काय करता?
( मी होत्ये म्हणून टिकल्ये हा आंतरराष्ट्रीय अॅक्रिडेटेड डायलॉक आहेच वरती पुन्हा )
येवढ सगळ करताहात तर दोन
येवढ सगळ करताहात तर दोन झोपड्या बांधून ठेवा ... कृषी पर्यटन किंवा गावसहल म्हणून आम्ही येत जाऊ रहायाला ४ दिवस
मी होत्ये म्हणून टिकल्ये हा
मी होत्ये म्हणून टिकल्ये हा आंतरराष्ट्रीय अॅक्रिडेटेड डायलॉक आहेच वरती पुन्हा
>>
.
.
लिंबूभौ माझ्या शेजार्याने
लिंबूभौ
माझ्या शेजार्याने गेल्या महिन्यातच एक घोडा आणला आहे पाळायला. ५ महिन्यांचा आहे. त्याच्यासाठी अर्धी बादली हरभरा भिजत घालतात. सध्या एवढेच...:स्मितः
कारण त्याने मला घोडा पहायला बोलावलंय पण अजून जमलं नाही.
आणि त्यांच्या गावाबाहेरच्या सेट्प मधे तो ठेवला आहे. तिथे त्याच्या २ गायी आहेत आणि एक कुत्रा.
बघून आले की इथे लिहीन.
ग्रेट मानुषी.... नक्कीच बघुन
ग्रेट मानुषी.... नक्कीच बघुन या अन लिहा तपशील...
अनिरुद्ध, पूर्वी तंबु टाकुन राहिलोच होतो, पण जरा टिकाउ झोपड्या नक्कीच उभारणार आहे. तेव्हा बोलवीनच.
>>> अहो पदरात पडलं अन पवित्र झालं . काय करता? ( मी होत्ये म्हणून टिकल्ये हा आंतरराष्ट्रीय अॅक्रिडेटेड डायलॉक आहेच वरती पुन्हा )
हूडा.... समदु:खी रे आपण.... घरोघरी मातीच्याच चुली... नै का?
रोज घरुन ऑफीसला जाताना
रोज घरुन ऑफीसला जाताना पार्कच्या बाहेर एका गल्लीत रोज एका घोड्याला आंघोळ घातली जाते आणि खाणे दिले जाते, मस्त उमदा घोडा आहे, विचारुन सांगते.
आमच्या अमेरिकेत घोडा असा
आमच्या अमेरिकेत घोडा असा पाळतात - इथे मुख्यतः रेसचे घोडे इन्व्हेस्टमेन्ट म्हणून घेतात. तुम्हाला घोडा घरी ठेवावा लागत नाही की त्याचे काहीच करावे लागत नाही. तुम्ही फक्त स्टॉक घेतल्यासारखा पैसा इन्व्हेस्ट करायचा. बाकी सगळे ट्रेनर, जॉकी बघून घेतात. घोडा त्यांच्याच फार्म वर रहातो. तेच रेस साठी ट्रेन करतात, रेस मधे उतरवतात, त्याबदल्यात रेस मधल्या उत्पन्नाचा भाग अर्थात त्यांना द्यावा लागतो , उरलेला पैसा तुमचा. आपण रेस ला जायचं, आपल्या घोड्याबरोबर फोटो काढायचे, बस्स घोड्याला इजा झाली किंवा आजारी अथवा मरण पावला तर पैसे बुडाले!
मैत्रेयी, इकडेही असेल तशी
मैत्रेयी, इकडेही असेल तशी पद्धत, फक्त माहित नाही इतकेच.
पण मला तसे नाही करायचे. खरोखरचे जनावर स्वतःच पाळायचय, स्वतःच त्याचा खरारा करायचा, प्रेमाने खाऊपिऊ घालायचे, जमल्यास फिरायला जायचे वगैरे.
कुत्री चांगली असतात हो, लळा
कुत्री चांगली असतात हो, लळा लावतात, मांजरींसारखी लाळ घोटत घरात फिरत नाहीत.. जशी सवय लावली तसे रहातात प्रामाणिक असतात, राखण करतात.. लिंबीवैनींना समजाऊन एक तरी कुत्रे पाळाच घोड्याबरोबर.. घोड्यापेक्षा त्याची सेवा नगण्य करावी लागते. दोन वेळा भाकर दिली की झाल की.
अनघा, लिंबीला मान्य होवो ना
अनघा, लिंबीला मान्य होवो ना होवो, शेतावर कुत्री पाळावी लागणारच, त्याशिवाय तिकडे रहाणे अशक्य होईल. पुर्ण जंगल आहे शेताशेजारि. भरपुर वन्य पशुपक्षी अन दोनपायाची (मानवी) जनावरे यापासुन राखण हवी तर कुत्रे हवेच.
कधीतरी पुढच्या आयुष्यात संधि
कधीतरी पुढच्या आयुष्यात संधि मिळाली तर कोम्बड्या पाळायचे ठरवले आहे. सावंतवाड़ीला आमची कोम्बडि होती आणि ती अंडिहि द्यायची. घरमालकाच्या खुराड्यात राहायची. ईथे येताना त्यानाच् देऊन आलो.
नेटवर कोम्बड्यांचा एक मस्त पिंजरा पाहिलाय, इथेही टाकलेला बहुतेक कोणी.एक दीड फुट रुंदीचा एल्युमीनियम जाळीचा मोठ्ठा पाइप अंगणात् दिलेला फिरवुन. एका बाजूने बंद एक बाजू खुराड्यात. कोम्बड्या मस्त अंगणभर फिरुंन गवत टिपत राहतात. त्या कुठे पळून जायची शक्यता नाही आणि कोणी प्राणी त्यांच्यावर हल्ला करायचीही शक्यता नाही.
Pages