सोशल नेटवर्किंग (भाग ५)

Submitted by लाडू on 30 October, 2015 - 01:40

भाग १: http://www.maayboli.com/node/56176

भाग २: http://www.maayboli.com/node/56188

भाग ३: http://www.maayboli.com/node/56200

भाग ४: http://www.maayboli.com/node/56221

हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मयंक poptates मध्ये बराच वेळ बसून होता. अनघा अजूनही आली नव्हती. तो तिची वाट पाहत होता असही नाही. त्याला खर तर शांतता हवी होती. पण अनघा काय सांगते याचीही उत्सुकता होती. अनघा आली तीच मोठ्या उत्साहात. ती नेहमीप्रमाणे आल्याआल्याच चालू झाली असती पण मयंकच्या रडवेल्या चेहऱ्यावरूनच कळत होत कि काहीतरी बिनसलंय. मयंक शून्यात हरवला होता. ती त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली तरी मयंकला कळलेच नाही. शेवटी तिने मयंकला हलवून विचारले कि काय झालंय. काही नाही असे म्हणत मयंक मेनू कार्ड मध्ये बघू लागला. अनघाला आता स्वतःच्या आणि मल्हारच्या प्रकरणापेक्षा मयंकला काय झालंय हे कळून घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटू लागला.

तिने पुन्हा पुन्हा खोदुन विचारल्यावर मयंकला अश्रू थांबवणे अवघड झाले. अनघाच आपल्याला समजू शकते अस वाटून मयंकने तिला घडलेल्या साऱ्या घटना सांगितल्या. अगदी काहीही न गाळता. अनघाची माफीही मागितली त्याने, आजवर तिची कदर न करता बेफिकीरपणे वागल्याबद्दल. अनघाशी आणि इतरही अनेक मुलींशी इतक वाईट वागल्यामुळेच कदाचित आपल्यावर ही वेळ आलीय अस सगळ कितीतरी वेळ मयंक बडबडत राहिला. आणि अनघा सुन्न होऊन ऐकत राहिली. या सगळ्या प्रकारानंतर आपण काय बोलावे हे तिला कळतच नव्हते. पण मयंकला माफ करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. आज मयंक ज्यातून जात होता त्या सगळ्यातून ती ही गेली होती. मयंक तिला हवा होता अगदी मनापासून तेव्हापासूनच मयंक कायमच तिच्याशी तोडून वागला होता. त्यामुळे आज मयंकला माफ करावे, त्याला जवळ घ्यावे आणि प्रेमाने त्याच्याशी काही बोलावे अस अनघाला कितीही वाटत असले तरी तसे तिला करायचे नव्हते. कदाचित आज मयंकला माफ करून ती मयंकला स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून देऊ शकत होती. आज मयंकशी थोडस प्रेमाने बोलून मयंकला कायमसाठी आपलस करून घेऊ शकली असती. पण तिला तसे काहीही करायचे नव्हते. तिला काल मल्हारने facebook वर बोलता बोलता प्रपोज केले होते. आपला मोबाईल नंबर दिला होता. आणि लवकरच एका स्पेशल दिवशी तो तिला भेटणार होता. आणि मग ती facebook वर in a relationship लिहिणार होती. मल्हार सारखा फोटोग्राफर तिचा boy-friend असणार होता. आणि हे सगळ सहज घडल नव्हत. त्यासाठी तिने दिवसरात्र मेहनत केली होती. मल्हार एक खूप busy फोटोग्राफर होता. bollywood इंडस्ट्रीमध्ये तो काम करत होता. अनघाला भेटण आणि त्यासाठी वेळ काढण त्याला शक्य नव्हत. म्हणून अनघाला पूर्णपणे facebook आणि whatsapp वरच त्याला पटवाव लागल होत. अर्थात हे सार तिने एके काळी मयंकसाठीही केल होत. पण आज तिच्या कष्टांचे चीज झाले होते. आता तिच्याकडे मल्हारचा option होता. मयंकपेक्षा जास्त प्रसिध्द माणूस तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. आणि मयंकला त्याची चूक कळायलाच हवी होती. ती तशीच शांत बसून राहिली.

बराच वेळ शांततेत गेल्यानंतर मयंकला अचानक आठवल कि अनघा काहीतरी सांगायला भेटणार होती. ऐकायची इच्छा नव्हती. पण तरीही त्याने विचारल. अनघा बहुधा वाटच पाहत होती संधीची. मयंकच्या मनस्थितीचा जराही विचार न करता तिने मयंकला स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. मल्हारशी मैत्री, chats, flirt त्यातून दोघांमध्ये निर्माण झालेलं प्रेम, मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण, नंतर एक-दोन दिवसात मल्हारने तिला केलेलं प्रपोज, सगळ सगळ सांगितलं. अगदी रंगवून रंगवून. आणि त्या नादात हेही कि काल मल्हार तिला भेटला होता. दोघांनी रात्री कॅन्डल लाईट डिनर केल. अर्थात मयंकला काही फरक पडला नव्हता. त्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याची ती अवस्थाच नव्हती. मयंकला काहीच पटलेलं नाही हे लक्षात येताच अनघाने आपला फोन काढला. whatsapp वरच अख्ख chat मयंकला वाचायला दिल. आणि मयंक सर्द झाला.

मल्हार इतक उत्कृष्ट flirt करतो हे मयंकला आताच कळले होते. अनघा-मल्हार chat मधला मल्हारचा एक एक शब्द नाटकी होता. मल्हार अनघाला फसवत होता. हे मयंक स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकत होता. त्याने पूर्ण chat अधाशासारखे वाचले

मल्हार: हे बेब, हाऊज यु?
अनघा: मी मस्त. यू से
मल्हार: मी पण.
अनघा: काय करतोयस? busy आहेस का?
मल्हार: नाही ग. मी सुंदर मुलींसाठी कायमच वेळ काढतो. त्यात तू तर फारच विशेष आहेस आता माझ्यासाठी.
अनघा: Happy म्हणजे?
मल्हार: म्हणजे .....
मल्हार: काही नाही.
अनघा: ए सांग ना प्लीज.
मल्हार: अग जेव्हापासून तुला facebook वर पहिले होते, पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो'. माहितेय मला, की तुला खर नाही वाटणार. अग पण खरच. म्हणूनच तुझी फ्रेंड रिक्वेस्ट लगेच accpeted.कसली छान दिसतेस तू.
अनघा: काहीही. इतक्या सुंदर सुंदर मुली तुझ्या आसपास असतात. आणि तू काय माझ्या प्रेमात पडणार?
मल्हार: अग मुली, माझ प्रोफेशनच तस आहे. पण म्हणून सगळ्या सुंदर मुली कशा आवडतील मला. माझ्यासाठी एखादीच असेल ना कोणीतरी स्पेशल. आणि ती तू आहेस अस मला कायम वाटत.
अनघा: जा रे तू. मी जाते offline. तू खूप मस्करी करतोयस आता. मला झेपत नाही आहे.
मल्हार: अग नाही नाही. ऐक, खरच. एक सांगू का? रागवणार नसशील तर?
अनघा: आता विचारायला कशाला पाहिजे? सांग ना.
मल्हार: मला तू आवडतेस. जर तुला चालणार असेल तर i will b like to be with you.
अनघा: अरे काय बोलतोयस? प्लीज मल्हार मस्करी करू नकोस. मला खरच सहन नाही होणार.
मल्हार: अग मस्करी नाही. तू निट विचार करून उत्तर दे. घाई अजिबात नाही. पण प्लीज माझा विचार कर उत्तर देताना. खूप तडफडतो आहे ग मी तुझ्यासाठी. नाही नको म्हणूस. प्लीज.

यापुढच काही मयंकला वाचवल नाही. त्याने मल्हारचा फोटो पाहिला. डोळ्यावर हातात धरलेला canon 5D त्यामुळे अर्धा चेहरा कॅमेऱ्याच्या मागे. हात focussing करताना. कॅमेरा मात्र स्पष्ट दिसत होता. brand ,नाव आणि लेन्ससहित. त्याने फोन बंद करून परत दिला. अनघाला कस समजवायचं मल्हार टाइम पास करतोय ते? त्याच्यासारखा मुलगा अनघाला का भाव देईल याचा तरी अनघाने विचार करायला हवा. पण मयंक यातलं काहीच बोलू शकला नाही. बोलला असता तरी अनघाने कितपत ऐकल असत शंकाच होती. अनघाला all the best म्हणत तो उठला तिथून. आणि bye सुद्धा न म्हणता चालू लागला. अनघा मात्र त्याच्यामागून न जाता केविलवाण्या मयंकची अवस्था पाहून हसत राहिली.

मयंकला अजूनच वाईट वाटले होते. त्याला कोणालातरी हे सगळे सांगावेसे वाटत होते. अनघा समजून घेईल असे वाटत असताना तिने आणखी हर्ट केले होते. आपसूकच मयंकची पावलं सिद्धांतच्या घराकडे वळली. बरेच दिवस मयंकने एकही फोटोशूट केले नव्हते. श्रावणी मल्हार आयुष्यात जेव्हापासून आले होते तेव्हा पासूनच कदाचित. त्यामुळे सिद्धांतला भेटणे हि बंद झाले होते. खर तर सिद्धांतला स्वत:च्या एका प्रोजेक्टसाठी मयंकचे फोटो काढायचे होते. त्यामुळे तोच आज मयंकला भेटायचा विचार करत होता. पण मयंकला आपल्याच घरात पाहून त्यालाही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. "बोल मित्रा, काय खाणार? काय पिणार? बंदा खिदमतमे हाजीर है". ही सिद्धान्त्ची नेहमीची स्टाईल होती. मयंकला एकदम प्रिन्स वागणूक द्यायचा तो. पण मयंकने एक क्षणही न थांबता त्याला सगळे सांगितले. श्रावणीपासून सुरु झालेली हि स्टोरी मल्हार आणि नंतर अनघा-मल्हार प्रकरणापर्यंत येऊन थांबली.

सिद्धांतने खरोखर मनापासून सगळे ऐकले. पण मयंकचा मित्र असला तरी तो logically विचार करणारा मुलगा होता. आणि त्याच्या दृष्टीने त्याला सगळ्यात महत्वाची होती फोटोग्राफी. तो मयंकला फक्त एवढेच म्हणाला, "मला मल्हारला भेटायचय. माझ एक काम आहे. तू म्हणत असशील तेवढा मोठा फोटोग्राफर असेल मल्हार तर हे काम फक्त तोच करू शकतो. त्याचा नंबर घे अनघाकडून." आणि मयंक पुन्हा एकदा अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिला. जगातला प्रत्येक जण किती स्वार्थी असू शकतो याचा आज त्याला अनुभव येत होता. पण सिद्धांत त्यावरच थांबला नाही. त्याने अक्षरशः मयंकचा फोन खेचून घेत अनघाचा नंबर शोधला आणि तिला call करून फोन पुन्हा मयंककडे दिला. इच्छा नसताना मयंक तिच्याशी बोलू लागला. सारवासारव करण्यात त्याला अजिबात वेळ घालवायचा नव्हता. तो फक्त एवढच बोलू शकला कि मला मल्हारचा नंबर दे. इथे अनघाच्या जीवाची घालमेल सुरु झाली. मयंकला मल्हारचा नंबर का हवा असेल? तो मल्हारशी भांडणार तर नाही? नाही नाही, मयंकला मल्हारशी बोलू द्यायचं नाही. काही झाल तरी. पण तरीही नंबर दिला माही तर मयंकला वाटेल मी खोट बोलतेय. काय कराव हे अनघाला कळत नव्हत. तेवढ्यात सिद्धांतने फोन घेतला. आणि अनघाला अगदी कळकळीची विनंती केली कि तुला भीती वाटत असेल तर तस काही नाहिये. मला एक प्रोफेशनल फोटोशूट करायचंय, जे करायला मल्हारसारखा माणूस हवाय. विश्वास ठेव हे काम झालं तर सगळ्यांचाच फायदा आहे. मॉडेलच नाव मी च सुचवायचं आहे त्यामुळे जर मल्हार हे करणार असेल आणि त्याने तुला मॉडेल म्हणून घेतलं तरी मला चालेल, आणि यात तुझा फायदा जास्त आहे. कोणाचा मेंदू कधी काय विचार करतो, आणि मोडेलिंग साठी मुली काय करू शकतात हे सिद्धांतला स्वानुभवावरून माहितच होते. त्याच्या अपेक्षेप्रमाणे अनघाने विचार करायला वेळ लावलाच नाही. म्हणाली whatsapp बघ. नंबर पाठवते. आणि पुढच्या सेकंदाला मयंकचा फोन वाजला. मल्हारचा फोन नंबर शेवटी सिद्धांतला मिळाला होता.

जराही वेळ ना लावता त्याने स्वत:च्या मोबाईल वरून मल्हारला मेसेज केला. "फोटोशूट संदर्भात बोलायचं आहे. सध्या मी एका bollywood प्रोजेक्ट मध्ये काम करतोय. तुझी मदत हवीय. by the way मी सिद्धांत. तू ही फोटोग्राफर आहेस तर ओळखत असशीलच. रिप्लाय ची वाट बघतो." दोन-तीन मिनिटातच मल्हारचा मेसेज सिद्धांतच्या मोबाईल स्क्रीन वर झळकत होता.

क्रमशः

भाग ६: http://www.maayboli.com/node/56249

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुक वरून एकमेकांना प्रपोज केल जाणे आणि accept पण केल जाणे हे सुद्धा मला धक्कादायक वाटले.
आणि अशी reality असेल तर मुलांशी बोलले पाहिजे मला.

Pages