http://milindmahangade.blogspot.in/2011/11/blog-post_21.html लोकल डायरी --१
http://milindmahangade.blogspot.in/2011/12/blog-post.html लोकल डायरी --२
http://milindmahangade.blogspot.in/2012/01/blog-post.html लोकल डायरी -- ३
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_8.html लोकल डायरी --४
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_10.html लोकल डायरी --५
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post.html लोकल डायरी --६
http://milindmahangade.blogspot.in/2015/03/blog-post_27.html लोकल डायरी --७
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post.html लोकल डायरी --८
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_19.html लोकल डायरी --९
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_26.html लोकल डायरी --१०
http://milindmahangade.blogspot.in/2015/04/blog-post_29.html लोकल डायरी --११
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post.html लोकल डायरी -- १२
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_6.html लोकल डायरी -- १३
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_17.html लोकल डायरी --१४
http://milindmahangade.blogspot.in/2015/05/blog-post_22.html लोकल डायरी --१५
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post.html लोकल डायरी --१६
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_19.html लोकल डायरी -- १७
http://milindmahangade.blogspot.in/2015/06/blog-post_26.html लोकल डायरी -- १८
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post.html लोकल डायरी --१९
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_13.html लोकल डायरी -- २०
http://milindmahangade.blogspot.in/2015/07/blog-post_20.html लोकल डायरी -- २१
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post.html लोकल डायरी -- २२
http://milindmahangade.blogspot.in/2015/08/blog-post_18.html लोकल डायरी -- २३
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post.html लोकल डायरी -- २४
http://milindmahangade.blogspot.in/2015/09/blog-post_12.html लोकल डायरी -- २५
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post.html लोकल डायरी --२६
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_13.html लोकल डायरी -२७
http://milindmahangade.blogspot.in/2015/10/blog-post_20.html लोकल डायरी -२८
लोकल डायरी -२९
आज सकाळी मी रस्त्यात होतो तेव्हा माझा फोन वाजला .
" अरे कुठे आहेस तू ? लवकर ये "
" हो ... हो... आलोच ... लोकल आली का प्लॅटफॉर्मवर ? "
" हो आत्ताच आली ... लवकर ये ...."
" शून्य मिंटात आलो ..." म्हणून मी फोन कट केला आणि धावतच रेल्वेचा ब्रिज चढु लागलो . लोकल नुकतीच प्लॅटफॉर्मवर लागली होती . जवळ जवळ सर्वच डब्यांमधुन लोकांनी आपापल्या पद्धतीने सजावट करायला सुरुवात केली होती . आमची अंबरनाथ लोकल सरासरी दहा मिनिटे प्लॅटफॉर्मवर थांबते . त्यामुळे ह्या दहा मिनिटांत आम्हाला सगळी सजावट उरकायची होती . गाडी सुटल्यावर पुजा होणार होती . लोकलमधला हा दसरा खरंच काही औरच असतो . सर्व सणांहुन वेगळा साजरा होतो आणि तोही अगदी उत्साहात ! मी धावत आमच्या डब्यापाशी गेलो . शरद - भरत झेंडूच्या फुलांच्या माळा खिडक्यांना आणि दरवाज्याला लावत होते . सावंत आणि भडकमकर डब्याच्या आत झिरमिळया आणि पताका लावत होते .
" अरे काय यार मध्या , ये लवकर मदतीला .... " भरत म्हणाला .
“ सॉरी … सॉरी … ” म्हणत मी लगेच जाऊन माझी बॅग ठेवली आणि त्यांना मदत करायला लागलो . माझ्या हातात काम देऊन शरद कुठेतरी निघुन गेला . मी फुलांच्या माळा लोकलच्या खिडक्यांना गुंडाळू लागलो . आत जिग्नेस देवीचा फोटो खिड़कीच्या वरच्या मोकळ्या जागेत चिकटवत होता . नायर अंकल त्याला मदत करत होते . डोअरवरचा रवीच्या ग्रुपनेही त्यांच्या जागेत सजावट केली होती . डोअरला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले होते . आमची लोकल सोन्याचे दागिने घातल्यासारखी सजली होती . सर्व डब्यात उत्साहाचं वातावरण होतं . जो तो एकमेकांना ' हॅप्पी दसरा ' करत होता . आमची तयारी होते न होते तोच प्लॅटफॉर्मवर ढोल आणि ताशांचा आवाज यायला लागला . सगळे बाहेर बघु लागले तर शरद ढोल ताशा घेऊन आला होता ... थेट प्लॅटफॉर्मवर ! तो कधी काय करील काही सांगता येत नाही ... त्याने आम्हा सगळ्यांना बाहेर बोलावले . त्या ढोल ताशाचा ठेका असा होता की कधी आमची पावले थिरकायला लागली कळलेच नाही . मग रवीचा ग्रुप आणि बाकीचे ग्रुपही आमच्यात सामील झाले . लेडीज कंपार्टमेंटमधल्या बायका सुधा बाहेर येऊन बघु लागल्या . मग काय आमच्या लोकांना चेवच चढला. वरातीत नाचल्याप्रमाणे सगळे नाचायला लागले . मी सहज बघितलं , अँटी व्हायरस सुद्धा कौतुकाने आमच्याकडे बघत होती . एकदा माझ्याकडे बघुन 'मस्त' अशी हाताने हलकीशी खुण पण केली . मला प्लॅटफॉर्मवरचा पत्रा ठेंगणा वाटायला लागला . पाच मिनिटे आमचे नाचकाम चालू होते . अचानक लोकलने हॉर्न दिला . सगळ्यांची गाडीत चढायची घाई झाली . लोकल हलली आणि सगळे गोंधळ करत चढु लागले . गाडीत चढता चढता शरदने ढोलवाल्याला २०० रु. दिले आणि तो आत आला . सगळे त्याच्या ह्या सरप्राईजवर खुश झाले . नाचुन नाचुन सगळे दमले होते पण धमाल आली .
" शरद यार ... एक नंबर ... फुल्ल धमाल ... " डोअरवरचा रवी म्हणाला .
" सही शरदभाय ... मजा आ गया ... " जिग्नेसही खुश दिसत होता .
" आयला चांगलं सरप्राईज दिलस यार ... मस्त ... "
" जाम भारी ..." सगळे जण त्याचे कौतुक करत होते .
" चला , आता आपण पूजा करुन घेऊ ..." सावंत म्हणाले . मग खिड़कीवरच्या देवीला आम्ही हार घालून देवीची आरती सुरु केली . जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ... आरती सुरु झाली आणि मी सहज पलीकडे पाहिलं . सर्व बायका आरतीमधे सामील झालेल्या होत्या . अँटीव्हायरस सुद्धा आरती गात हलक्याश्या टाळ्या वाजवत होती . एक वेगळाच माहोल तयार झाला . सगळं वातावरण प्रसन्न झालं . आरती म्हणता म्हणता सारखं माझं लक्ष तिच्याकडेच जात होतं . ती मला मिळावी अशी आशा मनात धरुन होतो. अम्बे तुजवाचुन कोण पुरविल आशा ....
आरती झाली . नंतर प्रसाद वाटपही झाले . थोडा प्रसाद आम्ही पलीकडे लेडीज डब्यातही दिला . देवीची आरती आणि पूजा पार पडली आणि सगळे जण एकमेकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ लागले . शरदच्या ढोल ताशांनी बहार आणली . भडकमकरांनी खुष होऊन तर आपली बसायची जागाही त्याला दिली ... विंडो ! हा तर खुपच मोठा बहुमान होता . सगळ्यांनी त्याला विंडोत बळजबरीने बसवलं . आम्ही त्याचं कौतुक करत असतानाच माझा मोबाईलचा मेसेजटोन वाजला .
Mast majaa aali ... baaki tu mast nachatos … अँटी व्हायरसचा व्हॉट्सऍप मेसेज आला . चेहऱ्यावर नकळत एक हास्याची लेकर उमटली . मी पलीकडे तिच्याकडे बघितलं . ती मिश्किल नजरेने माझ्याकडेच पहात होती .
Thanks मी औपचारिक आभार मानले .
He asa dar varshi karta ka ?
Ho .... pan hya varshi amchya groupchya sharad ne dhol aanla hota mhanun jast maja aali .
Gr8. ती आज चांगल्या मूड मधे दिसत होती . तिने केशरी रंगाचा टॉप आणि जीन्स घातली होती . मस्त दिसत होती . तिला विचारावे का ? तिच्या लग्नाबद्दल ? एक विचार मनात आला . आता तसे बरेच दिवस उलटून गेलेत . त्या दोघांचा काहीतरी निर्णय झाला असेलच ! ती इतकी खुश दिसतेय म्हणजे नक्कीच ते दोघे लग्न करणार असतील . आपण कशाला मधे पडा ? तिने स्वतःहुन विषय काढला तर ठीक ... असा विचार करुन मी मोबाईल बंद केला आणि पुन्हा आमच्या ग्रुपच्या दंगामस्तीत सामील झालो .
" आयला , ही ढोल ताशाची आयडिया कशी काय सुचली रे ? " सावंत विचारत होते .
" तुम्हाला बोल्लो ना परवा ... एक सरप्राईज आहे म्हणून ... ते हे ! "
" धमाल आली ... पण सगळ्यात भारी भडकमकर नाचत होते ... " मी म्हणालो .
" हो ... खरंच भारी आहेत ते ... नाचताना त्यांचा पाय माझ्या पायावर पडलाय तो अजुन दुखतोय ...." भरत म्हणाला . आणि आम्ही सगळे हसलो .
" नायर अंकल पण कड़क नाचले ..."
" हो ना ... मी तर पहिल्यांदा त्यांना नाचताना बघितलं "
" मध्याचा फेवरेट नागिण डान्स मस्तच ! "
" सावंत मात्र नाचले नाहीत ... फोटो काढण्याच्या निमित्ताने लांबच रहात होते . "
" हो ... बरोबर आहे ... तरी मी दोन- तीन वेळा त्यांना खेचून आणलं नाचायला ... पण थोडंसं नाचल्यासारखं करुन परत त्यांची फोटोग्राफी सुरु करायचे .
" अरे बाबा , मला नाही नाचता येत ... काय करु ? "
" आणि आम्ही काय भरतनाट्यम शिकलोय काय ? आम्हाला तरी कुठे नाचता येतंय ... ? चार उड्या मारायच्या ! पतंग खेचायची …. नायतर मध्यासारखी नागीण काढायची …. झाला डान्स ! काय त्यात एवढं ? ”
" ये जिग्नेस तो नाचते नाचते गाड़ी के निचे जाने वाला ता ... मैंने कैसा तो संबाला उसको "
" आधी फ़क्त आपला ग्रुप होता , पण नंतर रवी आणि बाकीचे पण नाचायला आले ... फुल्ल टू धमाल आली ..."
" आणखी थोड़ा वेळ लोकल थांबायला पाहिजे होती ... " वगैरे वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला यायला लागल्या . हे सण आणि उत्सव माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचे असतात ह्याची जाणीव झाली . थोडा वेळ का होईना पण माणसांना आपापली दुःखे विसरायला मदत होते . मनाला एक विरंगुळा मिळतो . जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते . नाहीतर जिग्नेस त्याचे दुखः विसरून , आज इतका आनंदी होऊन नाचला नसता आणि नायर अंकल त्यांच्या भावांच्या भांडणाच्या विचारांतून बाहेर पडले नसते . दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात ह्याचा नवीन प्रत्यय आला ... सुखाने दुःखावर विजय मिळवला होता .
माझ्या बांद्रा वेस्ट ह्या पुस्तकासाठीची लिंक खाली दिली आहे … फक्त एका टिचकीची गरज आहे…
हा भाग पण आवडला.
हा भाग पण आवडला.
मस्त
मस्त
सुंदर...
सुंदर...
(No subject)
मस्त.. जोरात जाऊ द्या आता
मस्त.. जोरात जाऊ द्या आता
भारिच होता....
भारिच होता....
Tujhe dekh dekh sona -
Tujhe dekh dekh sona - 2
Tujhe dekh kar hain jagna
Maine yeh zindagani
Sang tere bitaani
Tujhmein basi hain meri jaan haai
(jiya (LOCAL) dhadak dhadak Jaayen) - 2
मस्त हाहि
मस्त हाहि
(No subject)
सुंदर...
सुंदर...
उत्तम!
उत्तम!
राजे तुमची गाडी काही रूळावर
राजे तुमची गाडी काही रूळावर मात्र येत नाहीये...तंगवणे चांगले जमते तुम्हांला. पण कुतुहल अजून टिकून आहे.
पु.ले.शू.
(No subject)