चिंग माय चा वृद्धाश्रम

Submitted by वर्षू. on 12 October, 2015 - 21:24

माझ्या रोजच्या रस्त्या च्या कोपर्‍यावर एक बैठी इमारत दिसे. एल आकारात पसरलेल्या या इमारती भोवताली असलेल्या सुंदरशा बगिच्यात बरेचसे वृद्ध गप्पा मारत बसलेले दिसत. कुणी आजी झोपाळ्यावर बसून विणकाम करणारी तर हातातल्या सिगरेट चे मस्तपैकी झुरके घेत तिच्याशी गप्पा करणारी दुसरी आजी दिसे. त्यांना पाहून कल्पना आलीच होती कि ही इमारत म्हणजे वृद्धाश्रम वगैरे असावा म्हणून कन्फर्म करायला मी एक दिवस त्या इमारतीत प्रवेश केलाच. समोरच त्यांचं ऑफिस होतं. आत शिरले तर एक मध्यम वयीन, हसतमुख स्त्री कंप्युटर शी खुडबुड करत बसली होती .तिच्या समोरची खुर्ची ओढून तिला थोडी माहिती विचारली तिने अगदी उत्साहाने माहिती दिली आणी अगदी आनंदाने ,आत जाऊन चक्कर मारायची, फोटो काढायचीही परवानगी दिली.

मी लगेच आतल्या भागात प्रवेश केला. समोरच मोकळा कॉरिडोर मोठ्याश्या व्हरांड्यात जात होता. चारी बाजूंनी
फुललेल्या बागेचं दर्शन होत होत होतं. मधे लांबच लांब लाकडी दोन टेबलांवर ,इथले रहिवासी आपसात गप्पा मारत्,हसत खिदळत सकाळचा नाश्ता घेत होते. ते सर्वच नीट कपडे घातलेले होते. एक वय सोडल्यास कुणीच आजारी वगैरे नव्हते. मला पाहिल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला पण भाषेची मोठ्ठीच अडचण.. माझी थाय भाषा त्यांना समजेना.. मग एक स्मार्टली ड्रेस्स्ड आजी ने मला तिच्याजवळ बोलावले .तिला थोडं इंग्लिश कळत होते. मग तिच्या थ्रू सर्वांशी थोड्या गप्पा केल्या . सगळेच एकेकटे होते. कोणी जीवन सहचर गमावलेला, मुलं नोकरी करता दुसर्‍या शहरात असलेली , तर कुणी सहचर,मुलं सगळच गमावून बसलेली.
. कुणी काहीबाही बनवून त्या गोष्टी विकून आपला खर्च भागवतात तर कुणी स्वैपाकघरा ची जबाबदारी उचलतात. कधी कुणाची मुलं राहाय खायचा खर्च देतात. ज्या कुणाला हे शक्य नसेल त्याच्याकरता सरकार आणी इथली म्युनिसिपालिटी यांचा सर्व खर्च देते.
समोरच्या बाजूला एक हॉस्पिटल होते. तिथले रुग्ण मात्र या बाजूला येऊ शकत नव्हते. कुणी खूप आजारी,किंवा व्हील चेअर वर , पण ते ही तिथल्या कॉरिडोर मधे बसून उत्सुकतेने या बाजूला पाहात होते.
मी जास्त काही त्यांच्या करता नाही करू शकले पण माझ्या जाण्याने त्यांना इतका आनंद झाला. मलाही प्रेमाने त्यांच्याबरोबर नाश्ता खायचे आमंत्रण मिळाले , माझी माहिती विचारून झाली. भारतीय म्हणून कौतुक ही झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल अमेरिकन्स , ऑस्ट्रेलियन्स , ईस्ट युरोपिअन्स रिटायर्ड लाईफ व्यतीत करायला स्वस्त आणी मस्त अश्या,' चिंगमाय' ला प्रिफरंस देताना दिसतात.
या वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग सुद्धा हसतमुख होता. नेमलेली कामे नीटनेटकी करत होता. पेशंट्स आणी इनमेट्स शी अतिशय अदबशीर, सहानुभुती ने वागत होता. कुठेही चिडचिड, आळस,कामचुकार् पणा, धूसपूस अजिबात जाणवली नाही.. भवताली प्रसन्न करणारी स्वच्छ, नीटनेटकी बाग, रिलॅक्स्ड बसलेली मंडळी... सगळं पाहून एकच विचार मनात आला.. इतकीही वाईट नाही वृद्धावस्था..

मला अश्या वृद्धाश्रमात आनंदाने रहायला आवडेल.

छान आणि प्रसन्न वाटले वाचुन व फोटो पाहुन.

किती छान आहे ही जागा.

फोटो मस्त आहेत. सगळी मंडळी कामात आहेत हे पाहूनच छान वाटले.
या वयात कशात तरी व्यस्त राहणे फार महत्त्वाचे!

पण बायकाच काम करताना दिसत आहेत... Sad
आणि तरीही पुरुष मंडळी आनंदी दिसतायेत... दया कुछ गडबड है!
Proud

वृद्धाश्रमातील टवटवीत बागेसारखीच "टवटवीत" ज्येष्ठ मंडळी पाहून खूपच छान वाटले ....

तुझ्यासारखी संवेदनशील व्यक्तिच अशी भेट देऊ जाणे आणि त्याचे सुरेख शब्दांकन करु जाणे... Happy

__/\__

मस्त वाटले. आजी आजोबा खरेच प्रेमळ दिसताहेत. आजींनी खास घरगुती मसाले घालून करून दिलेला चिंग माय स्पेशल खाउ नको तरी कसा म्हननार.

मस्त वाटले फोटो पाहुन. आणि हे चिंगमाय, चिंगराय ही नावेही अगदी गोड आहेत.

इथल्या आश्रमात राहणा-या लोकांना त्यांचे व्यक्तिगत प्रश्न असतीलही, पण ते मागे टाकुन हे लोक मजेत हसत फोटोला पोज देताहेत ते पाहुन खुप बरे वाटले.

वर्षूताई, तुझ्या चिंगराय/चिंगमाय सिरीजमधला हा भाग मास्टरपीस वाटतोय मला. किती सुंदर वृद्धाश्रम आहे हा. मलाही तिथे जाऊन राहायला आवडेल. स्वच्छ, प्रशस्त, प्रदुषण विरहीत. चेहर्‍यावर इतकी प्रसन्नता ओढून ताणून आणता येत नाही. वृद्धत्व आणि सोबतीची कमतरता ह्या दोन गोष्टींनी येणार्‍या खिन्नतेवर मात करेल असे वातावरण इथे नक्कीच असणार. पांढर्‍या टॉपमधल्या आजी आणि स्वयंपाकघरातल्या दोन्ही आजी क्यूट! जितकी कातडी मऊ मऊ आणि सुरकुतलेली तितकी जास्त गोड दिसतात ही म्हतारी माणसं Lol

ही लेखमाला अधिकच रंगतदार होत चाललीय. चिंग माय च्या विश्वात रमुन जायला होतंय.
किती गोड आहेत सगळे आजी आजोबा. मस्तं अगदी प्रसन्न.

amaa.. chiang mai is the spelling.. check thai airways.. mum-bkk-bkk-chiang mai

देवकी, फोटो अंगावर का गं आले.. येहीच रिअ‍ॅलिटी है.. जितक्या लौकर स्वीकारू तितकाच त्रास कमी होईल..
सत्या ला सामोरं जावचं लागेल नं एक ना एक दिवस.. मग ते डावलून किंवा इग्नोर करून कसं चालेल.. आम्ही तर तिथे रिटायरमेंट च्या दृष्टीने स्टडी ही करतोय.. Happy
निनाद, त्या आनंदी पुरुषांच्या, त्या कामं करणार्‍या, काही बायका नाहीयेत रे.. सगळे एकेकटेच आहेत.. पण तिथे बायका ही खूप आनंदी होत्या.. Happy

मला तो बॅट मॅन शर्ट घातलेला माणूस छान व हसरा वाटला.

वन वे तिकिट विचारले तर साइटने रिटर्न डेट कोणती विचारले तेव्हा कसेसेच झाले. फॉर सम जर्नीज नो रिटर्न डेट इज नीडेड.बुकमार्क केले आहे आर्टिकल.

जे नाही, त्याच दु:ख न करता, जे आहे त्यात समाधानी दिसतायत ही मंडळी. आपल्याला जे जमेल ते करत, आनंदात जगतायत. छानच! Happy

अमा, तुमची मुलगी अजुन बेसिक शिक्षण घेतेय. तुम्ही इतक्या लवकर वन वे तिकिट बुक करताय? अजुन वेळ आहे हो तुम्हाला...

टु वे टिकेट घेतले की ते थोडे स्वस्त पडते. आणि सईट्सचा धंदा पण होतो म्हणुन साईट्स टु वे विचारतात. आपल्या फक्त वन वेच पाहिजे असेल तर मिळते की.

येहीच रिअ‍ॅलिटी है.. जितक्या लौकर स्वीकारू तितकाच त्रास कमी होईल..
सत्या ला सामोरं जावचं लागेल नं एक ना एक दिवस.. मग ते डावलून किंवा इग्नोर करून कसं चालेल..

मस्त लिहिलेय्स.

दुर्दैवाने माझ्या आजुबाजुची म्हातारी मंडळी मी कायम दुर्मुखलेलीच पाहिलीत. आणि हे दुर्मुखलेपणही मुद्द्दाम ओढवुन घेतलेले, जरा जरी हसली तरी लोक काय म्हणतील याची यांना धास्ती. त्यामुळे असे कोणी हसत असलेले पाहिले की बरे वाटते. मागे बेलापुरमध्ये डॉक्टरांकडे गेलेले तिथे एक ७५ वर्षांची म्हातारी आलेली, नेरुळच्या वृद्धाश्रमातुन. दवाखान्हात सगळ्यांची फिरकी घेत होती, ओळख देख आहे की नाही याची भिड न बाळगता सगळ्यांशी बोलत होती. मस्त हसत होती. इतके बरे वाटलेले तिला पाहुन.

वृद्धाश्रमातील टवटवीत बागेसारखीच "टवटवीत" ज्येष्ठ मंडळी पाहून खूपच छान वाटले ....

तुझ्यासारखी संवेदनशील व्यक्तिच अशी भेट देऊ जाणे आणि त्याचे सुरेख शब्दांकन करु जाणे..>>> +१

े.. येहीच रिअ‍ॅलिटी है.. जितक्या लौकर स्वीकारू तितकाच त्रास कमी होईल..>>>>>> माझ्या म्हातारपणाबद्दल नाही वाटले.का कोण जाणे पण माझ्या आईची आठवण आली.त्यांमुळे तो सहजोद्गार आला.

अगा .. हो ना.. देवकी!! Happy ओके.. मी पण जनरली या फ्यूचर चा विचार करत असते तेंव्हा माझ्या डोळ्यासमोरही माझ्या आई दादां चे उदाहरण असते.. ते ही असेच होते.. शेवटपर्यन्त हसतमुख, अ‍ॅक्टिव्ह..

Pages