नाटक

Submitted by धनुर्धर on 10 October, 2015 - 11:41

नाटक
नाटकाची तालीम जोरात आणि जोशात चालू होती. नाटकाच्या तालमीच्या नावाखाली आम्ही तास बुडवतो अशी काही दृष्ट मुलांची तक्रार होती, पण तिला काही अर्थ नव्हता. मात्र रघु मात्र नाटकात नसूनही आम्ही तालमीसाठी बाहेर पडलो की आमच्या मागे यायचा. आणि तास बुडवायचा, त्याच खापर आमच्यावर फुटायच, पण गॅदरींगमध्ये आपण नाटक करणे कसे आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्या वर्गाचे नाव कसे संपुर्ण शाळेत गाजणार आहे हे राहुल आमच्या वर्गशिक्षकांना पटवून द्यायचा आणि आम्हाला तालमीसाठी तास बुडवण्याची परवानगी मिळायची. नाटकाचं नाव होत 'ढोंगी साधू' एका गावात एक साधू अंधश्रद्धा पसरवून गावाला लुटत असतो. आणि दोन शाळाकरी मुलं त्याचा डाव हाणून पाडतात. अशी साधारण त्या नाटकाची कथा होती. त्यात मी आणि राहूल त्या शाळाकरी मुलांचं काम करीत होतो. साधूच काम आमच्या वर्गातील सर्वात मोठ्या आकाराच्या मंगेशकडे होते. पाटीलाची भूमिका निलेश करत असे तर सरपंचाची भुमिका महाजन करीत असे. इतर दोनतीन मुले व मुली गावकर् यांची भूमिका करत असतं. एकदा कशाचा तरी राग येऊन मंग्याने आम्हा सगळ्यांना शिव्या दिल्या व एक दोघांना त्याच्या हातातील कुबडीचे चार तडाखे बसले. तर एकदा " निलेश सारखा माझ्याकडे बघून हसतो" अशी एका मुलीन तक्रार केली. एवढ्या दोन अडथळ्या व्यतिरिक्त कोणताही अडथळा न येता तालीम नियमित सुरू होती . आमच्या सर्वांचे संवाद जवळपास पाठ झाले होते. पण मंगेशचे संवाद मात्र काही केल्या पाठ होईनात. त्यात तो साधूची म्हणजे मुख्य भुमिकाच करत होता. त्यात उठता बसता त्याला शिव्या द्यायची सवय त्यामुळे "भक्ता मी तुझ्यावर प्रसन्न आहे" हे वाक्य "तुझ्या आयला भकता मी तुझ्याव परसन्न हाये" असं होऊन जायचं. त्यात त्याला त्याची चुक कोणी सांगितली की बसलीच कुबडी

त्याच्या पाठीत! त्यामुळे त्याला सांगण्याच्या भानगडीत कोणी पडत नसे. पण कसंबस आम्ही ते नाटक बसवलं. स्नेहसम्मेलनापुर्वी निवडसमिती समोर त्या नाटकाचा प्रयोग करावा लागे. आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी फक्त दहा मिनीटांचा अवधी मिळे. आम्ही आमंच नाटक निवडसमिती समोर सादर केलं. अर्थात शालेय गणवेश घालून कारण तोपर्यंत नाटकासाठी आवश्यक कपडे आमच्या जवळ नव्हते. पण निवडसमितीला आमची नाटिका आवडली. आमच्या वर्गातल्या काही मुलीसुद्धा तिथे हजर होत्या. त्यानाही नाटक आवडले. नाटक गॅदरींग साठी निवडले गेल्यामुळे आमचाही उत्साह वाढला. आम्ही नाटकासाठी आवश्यक कपडे गोळा करण्याच्या मागे लागलो. आम्ही शालेय विर्ध्याथ्याचे काम करीत असल्याने आमची कपड्याची काहीच अडचण नव्हती. बाकीच्यांनाही काही अडचण आली नाही. प्रश्न फक्त साधुच्या कपड्याचा होता. एकतर मंगेशच्या आकाराचा धष्टपुष्ट साधू आम्हाला भेटत नव्हता. भेटला तर त्याच्या जवळ एकच पोषाख असे. तो द्यायला तयार नसे. शेवटी एक भगवे वस्त्र आम्हांस मिळाले. मग त्याचे दोन तुकडे करून एक कमरेभोवती व एक अंगावर अशी त्याची व्यवस्था केली. एका कुबडीची व्यवस्था अगोदरच केली होती. एनवेळी कमंडलू मिळेना म्हणून एक छोटी किटलीच कमंडलू म्हणून घेतली. वातावरण निर्मिती साठी एका मेलेल्या जनावराची कवठी व काही हाडे आम्ही गोळा केली होती. त्यापैकी एक हाड मंगेशच्या हातात द्यायचे ठरले. गॅदरींग जसे जसे जवळ येत होतं. तसा तसा आमचा उत्साह वाढत होता. आणि एकदाचा तो दिवस उगवला. दुपारी तीन वाजता आमच्या शाळेच्या पटांगणातील मंडपात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सुरु झाले. आमच्या कार्यक्रमाची वेळ चारची होती. त्यामुळे आम्ही एका वर्गात मेकअप करण्यासाठी जमलो. प्रत्येकाने आपआपले कपडे घातले. मंगेशनेही भगवे कापड गुंडाळले, मुलीन आपला संवाद म्हटला. पण पोरंग काही रडेना. ती गोंधळून मागे पाहू लागली. आत्ता स्टेजमागील माईक बंद पडला होता. मग शेवटी त्या मुलीनं आईचे संवाद आणि मधुनच पोराच रडणे दोन्हीही एकाच माईकवर मॅनेज केलं. शेवटचा सीन साधूच्या आश्रमामधील होता. साधूबाबा स्टेजवर आवतरले. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि इकडे माईकचा पुन्हा आवाज बसला. माईकवाला पुन्हा स्टेजवर येऊन माईक दुरूस्त करू लागला. गावकरी साधूला भेटायला येतात असं दृश्य होतं. पण पाटील म्हणजे निलेश एवढा घाबरला होता की, तो स्टेजवर येईनाच. आम्ही परोपरीने त्याला समजावीत होतो. पण तो काही कुणाचं एकेना. इकडे साधूबाबा मंत्र म्हणतच होते. स्टेजवर कोणी येईना त्यामुळे त्याचा रागाचा पारा चढला आणि मंत्राच्या जागी शिव्या बाहेर पडू लागल्या. त्याने शिव्या द्यायला आणि माईक सुरु व्हायला एकच गाठ पडली. संपुर्ण मंडपात शिव्या घुमल्या. कसबशी निलेशची समजूत घालून त्याला स्टेजवर आणलं. शेवटी येऊन आम्ही गावकर्याचं प्रबोधन करणार होतो. पण स्टेजवर गेल्यावर माझ्याही पोटात गोळा आला. मला संवादच आठवेनात. कशीबशी राहूलने वेळ मारून नेली. शेवटी गावकर्याना साधूला हाकलून द्यायचे होते. पण एनवेळी कुणाचा तरी पाय साधूच्या पंचात अडकला आणि साधूचा पंचा सुटून साधू स्टेजवर आडवा झाला. चिडलेला मंगेश साधूच्या भुमिकेतून आपल्या मुळ रूपात आला. तो कुबडीचा उपयोग तलवारी सारखा करू लागला. प्रत्येकजण आपआपला जीव घेऊन स्टेजवरून खाली धावत सुटला. मीही धावत सुटलो पण जाता जाता दिसलेला आमच्या वर्गशिक्षकांचा रागावलेला चेहरा काही डोळ्यासमोरून हालत नव्हता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hahaha..