दत्तात्रेय

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 October, 2015 - 10:44

दत्तात्रेय माता दत्तात्रेय पिता
दत्तात्रेय भ्राता जिवलग
दत्तात्रेय दाता दत्तात्रेय त्राता
दत्तात्रेय सत्ता माझ्यावरी

सुखाचा सागर मायेचे आगर
जगण्या आधार दत्तात्रेय
अलोट कृपाळू अत्यंत दयाळू
पापीया सांभाळू करी देव

स्मरणा भुकेला जीव दे जीवाला
जागतो प्रेमाला खऱ्याखुऱ्या
धर्म वर्ण याती नसे तयास ती
जाणतसे रिती भक्तीचीच

आनंद कारक आपदी रक्षक
विश्वाचा नायक हरिहर
नाट्य सूत्रधार लीला भ्रमकार
काळ चक्राकार चालविता

जरी मायातीत खेळतो मायेत
मुक्ती बंधनात क्रीडा करी
थेंब पाणियाचा अंश सागराचा
तैसा हा तयाचा खेळ चाले

तयाच्या प्रेमाने सजले जगणे
प्रेमाचे चांदणे रोमरोमी
आता हे मागणे नुरावे मागणे
काही देणे घेणे तयावीण

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विप्र,

सर्व स्तवन सुंदर आहे. या ओळी विशेष आवडल्या :

>> जरी मायातीत खेळतो मायेत
>> मुक्ती बंधनात क्रीडा करी

आ.न.,
-गा.पै.