ओट्स & को. सँडविच
साहित्य -
१) एक वाटी ओट्स् (टोस्टेड व्हरायटी घरी होती ती वापरली)
२) एक वाटी नारळाचं दूध आणि उरलेला चोथा,
३) एक वाटी दुध,
४) अर्धी वाटी साखर,
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) पाणी
९) चिमुट मीठ
१०) तेल
कृती -
१. खवलेल्या खोबर्याचे दुध काढुन घेतले - साधारण वाटीभर होईल इतपत पाणी घालुन सारखे केले आणि चोथा बाजुला काढुन ठेवला;
२. अर्ध्या वाटी ओट्स ची पावडर करून घेतली;
३. उरलेले ओट्स + ड्रायफ्रुट्स एकत्र करून घेतेले.
४. एका बोल मधे नारळाचे दुध + साधे दुध (२ चम्चे वगळून ठेवले*) + १ चमचा साखर + ओट्स ची पावडर एकत्र नीट मिसळून घेतली. यात स्वाद आनि रंगासाठी थोडे केशर घातले + वेलची पावडर घातली.
५. हे मिश्रण डबल बॉयलर पद्धतीने एकत्र गोळा होईतो शिजवून घेतले.
६. अप्पे पात्राला लाईटली ऑइल स्प्रे मारुन घेतला. त्यात हे मिश्रण घालुन सारखे करुन घेतले आणि थंड झाल्यावर मोल्ड्स काढुन घेतले.
७. दुसर्या पातेल्यात तूप घालुन खोबर्याचा चव नीट परतून घेतला. त्यात उरलेली साखर आणि वेलची पावडर घालुन सारण बनवले. वरती काढुन ठेवलेले २ चमचे दूध घातले*. उगाच नजर नको लागायला म्हणून चिमुट्भर मिठ घातले गार झाल्यावर त्यातच उरलेले ओट्स आणो ड्रायफ्रुट्स घातले.
८. दोन तयार मोल्डस मधे सारण भरून सँडविचेस बनवली... ओट्स आणि खोबर्याची सजावट केली
-----------
बदलून वापरलेले पदार्थ -
दुधी - दुध
गुळ - साखर
मुळ पाककृतीच्या जास्तीतजास्त स्टेप्स फॉलो करायचा प्रयत्न केला आहे.
----------
माहितीचा स्त्रोत :
कोकोनट केक वरुन घेतलेले इन्स्पिरेशन आणि प्रयोग
भारीच लाजो ! हा असा प्रकार
भारीच लाजो !
हा असा प्रकार मला कधीही सुचला नसता.
ते आप्पेपात्रात सेट करणे पण फारच कल्पक. ते शिजवलेले ओट्स थोड्याशा चिकट शिर्यासारखे मऊ लागतात का खाताना ?
Wah tayade wah Yacha arth hi
Wah tayade wah
Yacha arth hi mul recipe Lajo tai chi nhiye
धन्य!!
धन्य!!
लाजोताईचा सिक्सर !! क्या बात
लाजोताईचा सिक्सर !! क्या बात
भारी आयडिया . तोपासू
मस्त झालेय.
मस्त झालेय.
वा! मस्त आयडिया! मला तरी असलं
वा! मस्त आयडिया!
मला तरी असलं काही करायला अजिबातच सुचणार नाही..
मस्तं आयडीया.
मस्तं आयडीया.
वाहव्वा रे वाहव्वा...येक
वाहव्वा रे वाहव्वा...येक नंबर.
Superb !
Superb !
लय भारी लाजो.
लय भारी लाजो.
रंग किती सुंदर आलाय!
रंग किती सुंदर आलाय! आप्पेपात्र वापरणं कल्पनेच्या पलीकडले आहे. पाककलाकार आहेस!
लाजो द ग्रेट शेफ!! __/\__
लाजो द ग्रेट शेफ!! __/\__ काय भारी कल्पना आहे.. अतिशय टेंप्टिंग आहे एंड प्रॉडक्ट!!!
मस्तच !
मस्तच !
सुंदर दिसताहेत सँडविचेस!!
सुंदर दिसताहेत सँडविचेस!!
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
मस्तं आयडीया. ग्रेट.
मस्तं आयडीया. ग्रेट.
नेहमीचा _/\_ घ्यावा...
नेहमीचा _/\_ घ्यावा...
अप्रतिम
अप्रतिम .....________________^___________
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी